Saturday 1 April 2023

दुरुस्तीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या देव कन्स्ट्रक्शनकंपनीवर कारवाई करण्याची मागणी आपना वतन .

पिंपरी .दि . ०१ एप्रिल २०२३ .
 पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे अनेक हौशी जलतरणपटू तलावात पोहण्यासाठी येत असतात. अनेक विद्यार्थी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याची कला अवगत करतात. परंतु जुनी सांगवी येथील बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव दुरुस्ती अभावी मागील ३ वर्षांपासून बंद असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना


 पोहण्यासाठी इतरत्र जावे लागत असून त्याठिकाणी गर्दी असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. सदरचे काम ठेकेदाराला देऊन दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत परंतु अजूनही त्याठिकाणी एखाद्या खाणीचे स्वरूप आलेले आहे.राडारोडा,कचरा,बांधकामाचे साहित्य अस्तव्यस्त पडलेले आहे. या जलतरण तलावाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. पाणी गळती, जुन्या फारश्या दुरुस्ती, तलाव परिसरातील कुस्ती मैदान, जॉगिंग ट्रॅक, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र, कपडे बदलण्याची स्वतंत्र .खोली, फॅब्रिक छत,रंगरंगोटी आदी कामे अपूर्ण आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना पोहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे जुनी सांगवी मधील कै. बाळासाहेब शितोळे तलावाचे कामास दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी. तसेच सदर जलतरण तलावाचे काम जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले