Wednesday, 10 March 2021

पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा मा.अतुलसिंह परदेशी यांची निवड झालेली आहे 🌹🌹


पुणे, दि /10, मार्च. (Lok hitay news )
    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली असल्याची माहीती सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली...
    अतुलसिंह परदेशी हे मागील पंधरा वर्षांपासून पत्रकारीतेत आपले अमूल्य असे काम करीत असून गेल्या पाच वर्षांपासून आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवत पत्रकार बांधवांच्या समस्यासाठी ते नेहमी आग्रेसर राहीले आहे त्यामुळे वृत्त वाहिनी संघाचे अध्यक्ष रणधीर कांबळे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी त्यांची निवड पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी निवड केली असल्याची माहीती राज्य सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली...
    पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या सलग तिस-यादा अतुलसिंह परदेशी यांची निवड झाल्याने कामगार फलोत्पादक मंत्री दिलीपराव वळसे पाटील मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारने शिरूर चे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आमदार महेश दादा लांडगे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप अन्ना बनसोडे दिलीपराव मोहिते पाटील अतुल बेनके मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या...
    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तिस-यांदा पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाची जबाबदारी दिले आहे ती चोख पार पाडून पत्रकार बांधवांचे प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या तसेच पत्रकार संघाचा विस्तार करणार असल्याचे अतुलसिंह परदेशी यांनी सांगितले...

Friday, 12 February 2021

मानवता हिताय सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या *मानवता हिताय चषक 2021.

पिंपरी.. दि 12/ फेब्रुवारी,   (लोक हिताय न्यूज)    पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातून वीस संघाने सहभाग घेतलेला आहे . स्पर्धेचा वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग क्रिकेटपटुंचा मानवता हिताय सोशल फाउंडेशन तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
 भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नगरसेविका सौ सुलक्षणा शिलवंत धर, सौ गीता मंचरकर व वरिष्ठ वकील मा. श्री सुशील मंचरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच ह्या वेळी युवा नेतृत्व सार्थ पालांडे 
स्पर्धेचे आयोजक व मानवता हिताय सोशल फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, आरिफ भाई शेख, राजेश चौहान, अभिजीत गोफण, सुरेश जाधव, मनोज रेड्डी, तुषार पास्कल, सलमान शेख, प्रदीप वंजारे, युवराज जाधव, शंकर उनवणे, अक्षय साबळे, अज्जू धोत्रे,अतुल धोत्रे, अमित माने, अमोल माने, कृष्णा पवार  व इतर खेळाडू उपस्थित होते.

Tuesday, 26 January 2021

विठ्ठल नगर मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा, राहुल भाऊ भोसले युवा मंच यांच्या वतीने


दि,26 जानेवारी.( Lok hitay news.)
"राहुलभाऊ भोसले युवामंच यांच्या वतीने  ध्वजरोहण "
विट्ठलनगर येथील कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले युवामंच यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजरोहण नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
"बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देश एकसंध आहे, बाबासाहेबांच्या संविधानमुळेच तळागळातील नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत." असे प्रतिपादन राहुलभाऊ भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी न्यानोबा धावारे,अशोक देवकर,किशोर गवळी,अशोक बनसोडे,दत्ता जाधव,संजय जाधव,विनोद गायकवाड़,बापू सावंत,सुनील नलावडे, तिम्मा टाकळे,महादेव अडसुळे,साहेबराव इनकर,श्याम धोत्रे,दत्ता ढोबळे,सुनीता पाटोळे, स्नेहलता पाटोळे,मीरा वाघमारे, छाया राव व युवमंचाच्या सर्व सदस्यनी परीश्रम घेतले.

Sunday, 10 January 2021

रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब


 
         पुणे,  दि. 10 (लोक हिताय न्यूज .प्रतिनिधी. दिलीप देहाडे  ): रक्तदान करणे हे एक मोठे काम असून यामुळे एखादया दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले.
  पुण्यातील कोंढवा येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन श्री.सत्तार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे,माजी आमदार महादेव बाबर, कारी मोहम्मद इदरीस,माजी स्थायी समिती सदस्य रसिद शेख, अलाहद इब्राहिम भाई, उस्मान तांबोळी, नदीम मुजावर, नगरसेवक  गफूर पठाण, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
  राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आल्याने            मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केलेले असून रक्तदान करणे हे एक मोठे काम आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. अशा रुग्णालयांवरही आपण सर्वांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे. राज्यातील गोर गरिबांना मदत करणे महत्वाचे आहे. या शिबिराच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्वांना व रक्तदात्यांना मी मनापासून  शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले.
  यावेळी लॉकडाऊन कालावधीत ज्यांनी चांगले काम केले त्यांचा सन्मानही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. 
  आमदार चेतन तुपे म्हणाले, कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आला आहे. मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून या ठिकाणी रक्तदान शिबीराच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. हे फार महत्त्वाचे असून यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचू शकतो. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहभाग घेताला अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो.
  यावेळी माजी आमदार महादेव बाबर, अलाहद इमब्राहिम भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारी मोहम्मद इदरीस यांनी केले तर सुत्रसंचालन सोयब अन्सारी यांनी केले. यावेळी रक्तदाते, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Sunday, 3 January 2021

खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांना मानिनी फाऊंडेशनचे खुले पत्र

. दि 3/जानेवारी... (Lok hitay news..)खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांना मानिनी फाऊंडेशनचे खुले पत्र
बहुविध संस्कृतीने नटलेल्या भारत देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे. या खंडप्राय भारत देशात महाराष्ट्र हे राज्य उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सहकार, कृषी अशा क्षेत्रांबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक स्वातंत्र्याबाबत देखील नेहमी अग्रेसर राहिला आहे. यासाठी अनेक ज्ञात, अज्ञात समाज सुधारकांचे, साहित्यिकांचे, राजकीय पुढा-यांचे उल्लेखणिय कार्य आहे. यामध्ये महाराष्ट्राचे दुरदृष्टीचे नेते ज्यांनी महिलांना राजकारण तसेच शिक्षणात आरक्षण आणि वडीलोपार्जित संपत्तीमध्ये समान हिस्सा दिला, ते राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ खासदार शरद पवार यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. याबद्दल महाराष्ट्रातील सर्व महिलांना आदर आहेच. खा. शरद पवार यांनी महिलांना राजकारणात आरक्षण दिले. परंतू त्यांच्याच पक्षात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणा-या महाविकास आघाडी सरकार मध्ये महिलांना संरक्षण मिळाले का ? असा प्रश्न मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी खुल्या पत्राव्दारे खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारला आहे.
      राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश पदाधिका-या विरुध्द नुकताच औरंगाबादमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला. या नराधमाचा राज्यभरातील विविध महिला संघटनांनी, राजकीय पक्षांनी रस्त्यावर येऊन निषेध केला. पिडीतेला न्याय मिळावा व अत्याचा-यावर कडक कारवाई करावी, यासाठी निदर्शने करणा-या महिलांमध्ये आम्ही खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना शोधत होतो. औरंगाबाद येथील या घटनेतील आरोपी एनसीपीचा पदाधिकारी नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे. औरंगाबाद हे पुण्यापासून दूर आहे. त्यामुळे कदाचित खा. सुळे आणि चाकणकर यांना घटनेबाबत माहिती मिळण्यास विलंब झाला असे तुर्त ग्राह्य धरुया. शुक्रवारी पहाटे (दि. 1 जानेवारी 2021) पुण्यात खराडी येथे कामावरुन घरी जाणा-या युवतीचे अपहरण करुन काही नराधमांनी तीच्यावर बलात्कार केला. राज्याची राजधानी मुंबई येथे नविन वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवतीवर अत्याचार करण्यात आला. या घटना महाराष्ट्राला काळीमा फासणा-या आहेत. त्याचा निषेध आम्ही मानिनी फाऊंडेशनच्या वतीने करीत आहोत.
      मात्र, इतर वेळी शुल्लक कारणांमुळे देखील माध्यमांपुढे येऊन प्रसिध्दी मिळविणा-या खा. सुळे आणि चाकणकर या घटनांचा गुन्हा दाखल झाल्यापासून दिसत नाहीत. त्या नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटनस्थळी गेल्या आहेत काय ? सोशल मिडीयाव्दारे देखील यांनी त्या नराधमांचा साधा निषेधही केला नाही. दहशतवाद्याला ज्याप्रमाणे जात धर्म नसतो. तो दहशतवादीच असतो. तसेच बलात्कार करणा-या अशा नराधमांना देखील भय आणि लज्जा नसते. असे नराधम कोणत्याही जाती धर्माचे किंवा पक्षाचे असले तरी समाजातील सुजाण नागरिकांनी विशेषता राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचा निषेध केला पाहिजे.    
        देशात महिलांसाठी पहिली शाळा महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात भिडे वाडा येथे सुरु केली. देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन परिस्थितीत खंबीरपणे पुढे येऊन महिलांसाठी शाळा सुरु ठेवली. फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा वारसा सांगणा-या खा. शरद पवार यांनी भले महिलांना राजकारणात आरक्षण दिले परंतू, महिलांना संरक्षण देण्याबाबत त्यांचा पक्ष कमी पडला आहे काय ? राजकीय क्षेत्रातील महिलांचे भक्षक हे पक्षातीलच पदाधिकारी असतात. असे राजकीय भक्षकच असहाय महिलांचे शोषण करतात. कौटुंबिक, सामाजिक अत्याचाराबरोबरच राजकारणातील छुपे अत्याचारांचे, राजकीय बलात्कारांचे प्रमाण देखील खुप आहे. त्याला कधीच वाचा फुटत नाही, असे ‘राजकीय बलात्कार’ आता थांबले पाहिजेत. त्यासाठी समस्त महिला भगिनींनी सर्व मतभेद, पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. अशा ‘राजकीय बलात्कार पिडीत’ महिलांनी देखील धैर्याने पुढे येऊन राजकीय प्रस्थापित शोषणकर्त्यांचा बुरखा फाडला पाहिजे. या पांढरपेशांचा खरा चेहरा आणि त्यांची दृष्कृत्य समाजापुढे आणली पाहिजे, अशी अपेक्षा खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून राज्यातील महिला करीत आहेत.
      महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात अशा कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनेत आणि त्यातुनच घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे अनेक माध्यमांनी निदर्शनास आणून दिले आहे. तरी देखील खा. सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर आता शांत का आहेत ? असा प्रश्न आम्हा महिलांना पडला आहे. ‘दिशा’ कायद्या अंतर्गत तीस दिवसात या नराधमांना शिक्षा देण्याची आणि पिडीतांना न्याय मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आता तुमच्यावर आहे. कायद्याने अशा उघडकीस येणा-या घटनांना काही काळ पायबंद बसेलही, पण कोणत्याही क्षेत्रातील महिलांवर पडद्याआडून होणारे अत्याचार थांबण्यासाठी आता खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. येणा-या नविन वर्षापासून पुढे राजकारणासह सर्वच क्षेत्रातील महिलांना युवतींना खुल्या आणि मुक्त वातावरणात अभिमानाने, स्वाभिमानाने जगण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करावा असे मानिनी फाऊंडेशच्या वतीने मी संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण आपणास करीत आहे.