Sunday, 21 March 2021
Wednesday, 10 March 2021
पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा मा.अतुलसिंह परदेशी यांची निवड झालेली आहे 🌹🌹
पुणे, दि /10, मार्च. (Lok hitay news )
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली असल्याची माहीती सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली...
अतुलसिंह परदेशी हे मागील पंधरा वर्षांपासून पत्रकारीतेत आपले अमूल्य असे काम करीत असून गेल्या पाच वर्षांपासून आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवत पत्रकार बांधवांच्या समस्यासाठी ते नेहमी आग्रेसर राहीले आहे त्यामुळे वृत्त वाहिनी संघाचे अध्यक्ष रणधीर कांबळे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी त्यांची निवड पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी निवड केली असल्याची माहीती राज्य सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली...
पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या सलग तिस-यादा अतुलसिंह परदेशी यांची निवड झाल्याने कामगार फलोत्पादक मंत्री दिलीपराव वळसे पाटील मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारने शिरूर चे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आमदार महेश दादा लांडगे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप अन्ना बनसोडे दिलीपराव मोहिते पाटील अतुल बेनके मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या...
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तिस-यांदा पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाची जबाबदारी दिले आहे ती चोख पार पाडून पत्रकार बांधवांचे प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या तसेच पत्रकार संघाचा विस्तार करणार असल्याचे अतुलसिंह परदेशी यांनी सांगितले...
Friday, 12 February 2021
मानवता हिताय सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या *मानवता हिताय चषक 2021.
पिंपरी.. दि 12/ फेब्रुवारी, (लोक हिताय न्यूज) पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातून वीस संघाने सहभाग घेतलेला आहे . स्पर्धेचा वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग क्रिकेटपटुंचा मानवता हिताय सोशल फाउंडेशन तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नगरसेविका सौ सुलक्षणा शिलवंत धर, सौ गीता मंचरकर व वरिष्ठ वकील मा. श्री सुशील मंचरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच ह्या वेळी युवा नेतृत्व सार्थ पालांडे
स्पर्धेचे आयोजक व मानवता हिताय सोशल फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, आरिफ भाई शेख, राजेश चौहान, अभिजीत गोफण, सुरेश जाधव, मनोज रेड्डी, तुषार पास्कल, सलमान शेख, प्रदीप वंजारे, युवराज जाधव, शंकर उनवणे, अक्षय साबळे, अज्जू धोत्रे,अतुल धोत्रे, अमित माने, अमोल माने, कृष्णा पवार व इतर खेळाडू उपस्थित होते.
Wednesday, 10 February 2021
Tuesday, 26 January 2021
विठ्ठल नगर मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा, राहुल भाऊ भोसले युवा मंच यांच्या वतीने
दि,26 जानेवारी.( Lok hitay news.)
"राहुलभाऊ भोसले युवामंच यांच्या वतीने ध्वजरोहण "
विट्ठलनगर येथील कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले युवामंच यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजरोहण नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
"बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देश एकसंध आहे, बाबासाहेबांच्या संविधानमुळेच तळागळातील नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत." असे प्रतिपादन राहुलभाऊ भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी न्यानोबा धावारे,अशोक देवकर,किशोर गवळी,अशोक बनसोडे,दत्ता जाधव,संजय जाधव,विनोद गायकवाड़,बापू सावंत,सुनील नलावडे, तिम्मा टाकळे,महादेव अडसुळे,साहेबराव इनकर,श्याम धोत्रे,दत्ता ढोबळे,सुनीता पाटोळे, स्नेहलता पाटोळे,मीरा वाघमारे, छाया राव व युवमंचाच्या सर्व सदस्यनी परीश्रम घेतले.
Friday, 15 January 2021
Sunday, 10 January 2021
रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब
पुणे, दि. 10 (लोक हिताय न्यूज .प्रतिनिधी. दिलीप देहाडे ): रक्तदान करणे हे एक मोठे काम असून यामुळे एखादया दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले.
पुण्यातील कोंढवा येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन श्री.सत्तार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे,माजी आमदार महादेव बाबर, कारी मोहम्मद इदरीस,माजी स्थायी समिती सदस्य रसिद शेख, अलाहद इब्राहिम भाई, उस्मान तांबोळी, नदीम मुजावर, नगरसेवक गफूर पठाण, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आल्याने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केलेले असून रक्तदान करणे हे एक मोठे काम आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. अशा रुग्णालयांवरही आपण सर्वांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे. राज्यातील गोर गरिबांना मदत करणे महत्वाचे आहे. या शिबिराच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्वांना व रक्तदात्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले.
यावेळी लॉकडाऊन कालावधीत ज्यांनी चांगले काम केले त्यांचा सन्मानही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार चेतन तुपे म्हणाले, कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आला आहे. मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून या ठिकाणी रक्तदान शिबीराच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. हे फार महत्त्वाचे असून यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचू शकतो. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहभाग घेताला अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो.
यावेळी माजी आमदार महादेव बाबर, अलाहद इमब्राहिम भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारी मोहम्मद इदरीस यांनी केले तर सुत्रसंचालन सोयब अन्सारी यांनी केले. यावेळी रक्तदाते, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
Subscribe to:
Posts (Atom)