रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले. पिंपरी-चिंचवड.दि.7/(Lok hitay news. Dilip dehade )शहराध्यक्ष पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार आहे दोन उमेदवार. वरिष्ठ नेत्यांच्या अस्मितेची लढाई जनतेला पाहायला मिळते नंबर एक. स्वप्निल कांबळे यांची निशाणी कप बशी. नंबर दोन उमेदवार कुणाल वाव्हाळकर यांची निशाणी उगवता सूर्यआहे.येत्या 10 ऑक्टोंबर रोजी लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. प्रथम गटाचे नेत्या चंद्रकांत सोनकांबळे. दुतीय गटाच्या नेते बाळासाहेब भागवत या प्रकारामध्ये चांगलीच झुंजत झोपलेली पाहायला मिळते पक्षाचे सदस्य नोंदणी दोन हजारापर्यंत असून यात मात्र चितपट कोण करणार याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे या दोन गटाचा सामना खऱ्या अर्थाने 10 ऑक्टोंबर रोजी पाहायला मिळेल
Thursday, 7 October 2021
काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड शहरात सेनापती मिळाला डॉक्टर कैलास कदम यांच्या रूपाने
.
पिंपरी .दि,0७/ ऑक्टोंबर. (लोक हिताय न्यूज. दिलीप देहाडे )
गेल्या अनेक दिवसापासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्ष अध्यक्ष नसणारा पक्ष म्हणून समोर येत होता अशा वेळेस सर्व काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराच्या नेत्यांनी अंग झटकून घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्ष वरती अत्यंत दुरवस्था झालेली होती तरीदेखील गटातील राजकारणाला वेळोवेळी बाजूला ठेवून डॉ. कैलास कदम यांची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या देशातील कामगार कायद्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महागाईच्या विरोधात अनेक वेळा धरणे आंदोलन केले त्यातून पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कामगारांना गोरगरीब जनतेला न्याय मिळावी या भूमिकेतून सातत्याने प्रयत्न करणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत शहरातील नेते डॉ. कैलास कदम यांचं मोलाचे योगदान या शहरात पाहायला जनतेला मिळालं आणि जनतेला अपेक्षित असणारा नेता व शहराध्यक्ष. डॉ.कैलास कदम यांच्या रुपाने मिळाला मुळे पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं
Sunday, 3 October 2021
Wednesday, 1 September 2021
Thursday, 26 August 2021
कर्ज बुडव्यांवर कारवाई करा, कामगारांना संरक्षण व नोकरीची हमी द्या.....रश्मी मंगतानी
पिंपरी (लोक हिताय न्यूज )(दि. 26 ऑगस्ट 2021) पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात कार्यविस्तार असणा-या दि सेवा विकास बँकेवर आरबीआयने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. जून महिण्यात बँकेच्या चाचणी लेखा परिक्षणात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, यापुर्वी संचालक मंडळाने निर्णय घेऊन दिलेली काही कर्जे फसवी आहेत. त्यामुळे अशा अनेक खात्यांची वसूली ठप्प झाली आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला आहे. बँकेची तरलता कमी होत आहे. पर्यायाने ठेवीदार व खातेधारकांना त्यांची रक्कम देणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. या फसव्या कर्जामुळे आणि ठेवीदारांना द्यावयाच्या रक्कमेमुळे बँकेचे अधिकारी व कर्मचारी दबावात आहेत. आम्हा कर्मचारी व अधिका-यांना माजी संचालक तुरुंगात टाकले जाईल अशी धमकी देत आहेत. आम्हाला आमच्या संरक्षणाबाबत व नोकरीबाबत हमी द्यावी, अशी मागणी दि सेवा विकास बँकेच्या महाव्यवस्थापक रश्मी मंगतानी यांनी अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
गुरुवारी (दि. 26 ऑगस्ट) पिंपरी कॅम्पमधील दि सेवा विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात अधिकारी व कर्मचा-यांनी निदर्शने केली. यानंतर रश्मी मंगतानी यांच्या समवेत शिष्ठमंडळाने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भेटून निवेदन दिले.
मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या दि सेवा विकास बँकेच्या एकूण पंचवीस शाखा असून दहा हजारांहून जास्त सभासद आहेत. जून महिण्यात भारतीय रिजर्व्ह बँकेचे महाप्रबंधक संजय कुमार यांनी या बँकेवर प्रशासकाची गणेश एस. आगरवाल नियुक्ती केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामकाजात अनेक त्रूटी व अनियमितता दिसून आल्याने प्रशासक नेमण्याचा आदेश काढण्यात आला. बँकेच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरुन माजी अध्यक्षासह संचालकांवर फौजदारी कारवाई सुरु आहे.
मार्च 2018 मध्ये बँकेमध्ये एकूण ठेवी (सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये) 823.42 कोटी इतक्या रक्कमेच्या होत्या त्या कमी होऊन 31 मार्च 2021 (लेखा परिक्षण बाकी आहे) 409.49 कोटी पर्यंत कमी झाल्या आहेत. तर नेट एनपीए 31 मार्च 2018 ला 136.66 कोटी (32.08%) होता. तो आता 31 मार्च 2020 अखेर 114.23 कोटी (34.65%) इतका आहे. तसेच या बँकेचे आठ हजारांहून जास्त सभासद आहे. बँकेत होणा-या अनियमित व्यवहारांबाबत माजी अध्यक्ष धनराज नथुराज आसवाणी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये तीव्र आक्षेप घेत संचालक मंडळाने कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तत्कालीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे सतिश सोनी यांनी लेखा परिक्षण करण्याचे आदेश दिले होते
Wednesday, 11 August 2021
महापालिका आयुक्त श्री राजेश पाटील यांचे उल्लेखनीय काम; कामगार नेते यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले आयुक्तांचे कौतुक पिंपरी, 11 ऑगस्ट (लोक हिताय न्यूज )- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री राजेश पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा नियंत्रणात आला. मृत्यूदर घटला आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे संयमाने परिस्थिती हाताळत असून राज्यातील जनतेला योग्य मार्गदर्शन करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात यशवंतभाऊ भोसले यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड महापालिकेने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याकरिता कमालीची जागरुकता केली. शहरातील रुग्णालयांमध्ये प्रचंड सुधारणा केली. त्यामुळे कोरोनाच्या नवीन रुग्णांचा दर 100 च्या आतमध्ये आला. रिकव्हरी रेटही वाढला. मृत्यूचे प्रमाण घटले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण करत असलेले मार्गदर्शन हे उपयोगी पडत आहे. त्याबद्दल आपले मनस्वी आभार.पिंपरी-चिंचवड शहरामध्ये श्री राजेश पाटील यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा नियंत्रणात आला. जनजागृती, आरोग्य विभागावर उत्तम पकड, शहराची स्वच्छता या अनेक संबंधित विभागात शिस्तबद्ध कार्यक्रम राबविला. त्यांच्या कार्यकुशलते बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद! राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या विनंतीला मान देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) साफसफाईच्या निविदेस स्थगिती देऊन 217 कोरोना योद्ध्यांच्या आयुक्तांनी नोक-या वाचविल्या. त्यानिमित्त संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन आभार मानले.महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कॉरीडॉर, अंतर्गत, बाह्य परिसरातील रस्ते, गार्डन, डक्ट, ड्रेनेज लाईनची साफसफाई व स्वच्छता हे काम ठेकेदाराकडून ठेकेदाराची स्वत:ची अत्याधुनिक उपकरणे, रसायने व मनुष्यबळाचा वापर करुन यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करुन घेण्याची ई-निविदा प्रसिद्ध केली होती. 1 ऑगस्टपासून नवीन कामकाज सुरु करण्याचा आदेश दिला होता. परंतु, कोरोना काळात काम करणारे 217 कंत्राटी कर्मचारी बेरोजगार होणार होते. त्यांच्या नोक-या जाणार होत्या. कंत्राटदार कोणीही असेल तरी चालेल. त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. फक्त कोरोना काळात काम करणा-यांच्या नोकऱ्या जाऊ नयेत. त्यांना बेरोजगार करू नये आणि त्यांचे वेतन कमी होऊ नये. या 217 कोरोना योद्ध्यांच्या नोक-या वाचविण्याची राष्ट्रीय श्रमिक आघाडीने विनंती केली होती. त्याला मान देत निविदेस स्थगिती दिली आणि 217 कर्मचा-यांच्या नोक-या वाचविल्या त्याबाबत भोसले यांनी आयुक्त पाटील यांचे आभार मानले....
Subscribe to:
Posts (Atom)