Saturday, 1 July 2023
पीसीएमसी सी अँड टी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा अगदी आनंदात पार पडला .
पिंपरी ( प्रतिनीधी) दि ०१ जुलै २०२३ चिंचवड महानगरपालिका अंकित ए जी एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. आज आपल्या पीसीएमसी सी अँड टी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा अगदी आनंदात पार पडला कंपनीचे असिस्टंट मॅनेजर प्रतीक तावरे ,देविका शेळके मॅडम, अनिता मोरे, धनाजी शिंदे, आशिष साळुंखे ,अंकुश त्रिभुवन, गणेश शिंदे ,अविनाश थिटे, दीपक पाटोळे, अभिषेक गोवंडे, नानासाहेब गायकवाड व इतर अधिकारी पदाधिकारी व ग्रुपचे सर्व सफाई कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व कामगारांना यावेळी अल्पोपहार देण्यात आला प्रतीक तावरे सरांनी चांगले मार्गदर्शन केले धनाजी शिंदे यांनी सर्वांचेआभार मानले अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले अभिषेक गोंवंडे यांनी मार्गदर्शक सूचना करून या कार्यक्रमाची सांगता केली
मोशी क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प तात्काळ रद्द करा .माजी विरोधी पक्षनेते नाना काटे .
नेहरु नगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमच् काय
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
मोशी क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प तात्काळ रद्द करा, अन्यथा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा (संग्रहित छायाचित्र)
पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा घाट कशासाठी घातला आहे. सल्लागाराच्या नावाखाली ७ कोटी ९६ लाख रुपयांची उधळण आयुक्त कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ४०० कोटींचा खर्च गृहीत धरून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. याला जवळपास १.९९ (निविदा पूर्व १.९८ टक्के तर निविदा पश्चात ०.१ टक्के) ओम टेक्नॉलिक्स कंपनीला देण्याचे ठरविले आहे. मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र.१/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे. या कामासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे, गहुंजे व बारामती अशी तीन क्रिकेट स्टेडियम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरालगत गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना नव्याने क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट कोणाच्या सांगण्यावरून घातला जात आहे. यामागे राज्यातील सत्तेत असणारे खोके सरकार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी हे अंतर्गत आर्थिक तडजोडी करून प्रशासनाला हाताशी धरून शहरातील जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा संशय नाना काटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नव्याने विकसित करणारे क्रिकेट स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी की पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी त्यांच्या सल्लागारासाठी कोट्यावधीची उधळपट्टी आणि क्रिकेट स्टेडियमचा घातलेला घाट तात्काळ रद्द करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभारणार, असा निर्वाणीचा इशारा नाना काटे यांनी दिला आहे.
सब हेड - अवघ्या 90 दिवसांत 447 कोटी महापालिका तिजोरीत जमा .
.पिंपरी (प्रतिनीधी) दि ०१ जुलै २०२३ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने पालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच दमदार अशी कामगिरी केली आहे. विभागाने अवघ्या 90 दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांकडून तब्बल 447 कोटी रुपयांचा कर वसूल करून महापालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. तर प्रामाणिकपणे कर भरुन शहरविकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या अवघ्या पहिल्या तिमाहीतच 447 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
6 लाख 2 हजार 203 मालमत्ता धारकांना पैकी 3 लाख 3 हजार 350 मालमत्ता धारकांनी म्हणजे पन्नास टक्के मालमत्ता धारकांनी तीन महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी 447 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
'वृध्दीकडे नेणारा प्रकल्प सिद्धी
पालिकेने यंदा मालमत्ता करांची बिले वाटप महिला बचत गटांतील महिलांना देण्याचे ठरवले. याला प्रकल्प सिद्धी असे नाव देण्यात आले. हा निर्णय पालिकेसाठी खरोखर 'सिद्धिकडून वृध्दिकडे' नेणारा ठरला. जवळपास चारशे महिलांनी निव्वळ चाळीस दिवसात उन्हातान्हाची पर्वा न करता शंभर टक्के बिलाचे वाटप केले. यंदा नागरिकांना वेळेत बिले मिळाल्यामुळे नागरिकांनी 30 जून पर्यंत असलेल्या सवलतींचा फायदा घेतला आहे. त्यामुळे महिला बचत गट नावीन्यपूर्ण स्वरूपाचे काम पण करू शकतो असा संदेश गेला. या महिलांसाठी हा एक नवा अनुभव असला तरी त्यांनी यात यशस्वी सहभाग नोंदवला आहे. त्यांनी बिले वाटप करताना संकलित केलेल्या माहितीचा आता पालिकेला दीर्घ काळ फायदा होणार आहे. यातून बचत गट महिलांना अजून वेगवेगळ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
चौकट-2
आकडे बोलतात
तीन महिन्यांत वसूल झालेला कर संकलनाचा वाढता आलेख
वर्ष. करदात्यांची संख्या रक्कम
2020-21 : 1,15,851 : 148 कोटी
2021-22 : 1,39,649 : 171 कोटी
2022-23 : 1,96,839 : 253 कोटी
2023-24 : 303350 : 447 कोटी
चौकट-3
30 जून 2023 ठरला 'विक्रमी दिवस'
नेहमी वर्षाअखेर 31 मार्च रोजी सर्वाधिक कराचा भरणा होत असतो. यंदा मात्र 30 जूनला सर्वच कर संकलन विभागीय कार्यालयात मालमत्ता धारकांची तुफान गर्दी होती. 30 जूनला यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले. या एकाच दिवसात तब्बल 14 हजार 620 नागरिकांनी तब्बल 30 कोटी 85 लाख रुपयांचा भरणा केला. त्यात 21 कोटी निव्वळ ऑनलाईन भरणा आहे.
चौकट -4
असा आला रूपया
ऑनलाईन - 291 कोटी 81 लाख
विविध ॲप - 4 कोटी 68 लाख
रोख. - 52 कोटी 47 लाख
धनादेशाद्वारे - 37 कोटी 74 लाख
इडीसी- 4 कोटी 8 लाख
आरटीजीएस - 21 कोटी 70 लाख
डीडी- 1 कोटी 36 लाख
चौकट-5
कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी
3 लाख 3 हजार 350 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 2 लाख 68 हजार 6 निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 23 हजार 916 बिगर निवासी, 7 हजार 130 मिश्र, 2 हजार 246 औद्योगिक तर 2018 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे .
चौकट-6
वाकड, सांगवी, चिंचवड, थेरगावमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या अधिक
कर संकलनासाठी शहरात 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 39 हजार 600, सांगवीमध्ये 34 हजार 694, चिंचवडमध्ये 29 हजार 303 थेरगावमध्ये 28 हजार 368 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 4 हजार 131 मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.
चौकट-7
अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसुलीचे टार्गेट
तीन महिन्यांत 50 टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आता आर्थिक वर्षातील 9 महिन्यात उर्वरित 50 टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसूल आणि चालू कर 100 टक्के वसुली करणे हेच विभागाचे एकमेव ध्येय असणार आहे.
कोट-1
कर संकलन विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व श्रेय जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्या नागरिकांना आहे. त्याबद्दल या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. हा सर्व कररुपी पैसा शहराच्या शाश्वत विकासाचा पाया राहील याची मी ग्वाही देतो. या शहराच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील यावर मी वैयक्तिक लक्ष देत आहे.
: श्री .शेखर सिंह, आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कोट-2
गत वर्षीपासून आम्ही राबवत असलेल्या अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमाचे हे सांघिक यश आहे. हे करत असताना आम्हाला काही जप्तीसारख्या अप्रिय कारवाया कराव्या लागल्या असल्या तरी त्यामागे शहराच्या विकासाचे सूत्र आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यातून हे शहर अधिक सर्वांगसुंदर, राहण्यासाठी सुखद होईल याची दक्षता घेतली जाईल.
१ ) प्रदीप जांभळे-पाटील
अतिरिक्त आयुक्त
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कोट-3
माहितीचे शुध्दीकरण, बीलांचे वेळेवर वाटप यासाठी आमचा प्रकल्प सिद्धी एक मैलाचा दगड ठरला आहे. "सिद्धीकडून वृद्धिकडे" ही टॅगलाईन बचत गटांच्या महिलांनी अक्षरशः खरी करून दाखवली. कर संकलन विभाग त्यांचा शतशः आभार आहे. या प्रकल्पाला आम्ही भविष्यात अजून उंचीवर नेणार आहोत. माहिती विश्लेषण, त्यावर सर्जनशील आकर्षक जनजागृती यासाठी फॉक्सबेरी यंत्रणेची आम्हाला भरीव मदत झाली आहे. शेवटी आमच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक कामगिरी मोलाची ठरली आहे. विभागातील कार्यक्षम कर्मचारी अधिकारी यांचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी एक भाग्ययोग आहे असे मी समजतो.
:नीलेश देशमुख
सहायक आयुक्त,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
Friday, 30 June 2023
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिकेसाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे, प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे महापालिका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे,
पिंपरी, दि.३० जून २०२३ :-* आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिकेसाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे, प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे महापालिका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे, तसेच महापालिकेस विविध सन्मान प्राप्त होत असून पालिकेच्या लौकीकात भर पडत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते माहे जून २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या ३४ तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १ अशा एकूण ३५ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी महादेव बोत्रे, मंगेश कलापुरे, नथा माथेरे, चारूशिला जोशी, विजया कांबळे, शेखर गावडे, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे जून २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ३४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, उपअभियंता शहाजी गायकवाड, मुख्याध्यापिका सुरेखा चोपडे, लेखापाल प्रविणकुमार देठे, भांडारपाल भास्कर रिकामे, मुख्य लिपीक ज्ञानेश्वर पिंगळे, जयकिसन कुंजीर, स्टाफ नर्स सीमा पवार, फार्मासिस्ट रमेश तापकीर, उपशिक्षिका कुमुदिनी मदने, उपशिक्षक कुमुद शिंदे, लिपीक अनिल राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक महादेव व्हटे, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट राजेंद्र नागपुरे, मिटर निरीक्षक अशोक भोसले, प्रमुख अग्निशमन विमोचक तानाजी चिंचवडे, अशोक इंगवले, क्रिडा पर्यवेक्षक सुभाष पवार, वीज पर्यवेक्षक राजेंद्र निपुंगे, दूरध्वनी पर्यवेक्षक निशिगंधा वारंग, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर रावण कसबे, वायरलेस ऑपरेटर गोरक्षनाथ विरकर, वाहनचालक अरूण भोसले, नारायण तापकीर, शहाजी भोसले, रखवालदार रंगनाथ वाल्हेकर, प्लंबर अनिल भोईर, मजूर शशिकांत हुलावळे, प्रकाश काटे, राजेंद्र पडवळ, सफाई कामगार चिंधू पारखी, वसंता नैनार, सफाई सेवक विमलाबाई वाल्मिकी, गटरकुली दिलीप केदारी यांचा समावेश आहे.
तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार कमल ओव्हाळ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला मिळाले अंशत: यश .
महापालिका प्रशासनाचा नगर विकास विभागाला प्रस्ताव
पिंपरी (प्रतिनिधी ) दि ३0 जून २०२३ .
पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर लादलेल्या उपयोगकर्ता शुल्काच्या दंडातून (शास्ती) सुटका होणार आहे. महापालिका प्रशासनाने २०१९ पासून ऐवजी एप्रिल- २०२३ पासून करवसुलीची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे.
उपयोगकर्ता शुल्क आणि दंडाची रक्कम माफ करावी. या मागणीसाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे मागणी केली होती. या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापालिका भवन येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, जितेंद्र वाघ, चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत घनकचऱ्याची हाताळणी व व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील सर्व मालमत्तांकडून उपयोगकर्ता शुल्काची आकारणी सुरू केली आहे. सर्वसामान्य मिळकतधारक आणि लोकप्रतिनिधींचा या कर आकारणीला विरोध आहे. उपभोगकर्ता शुल्क आकारणीबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दि. १ जुलै २०१९ रोजी अधिसूचना जाहीर केली होती. मात्र, गेल्या चार वर्षात याबाबत प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. प्रशासकीय दप्तरदिरंगाईमुळे हा कर वसुली प्रलंबित राहीला आहे. याला सर्वसामान्य नागरिकांना जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. शहरातील प्रति मालमत्ता ६० रुपये प्रतिमहा अशा प्रमाणे वार्षिक ७२० रुपये अशी दि. १ जुलै २०१९ पासून ‘उपयोगकर्ता शुल्क व शास्ती’ वसुली सुरू केली आहे, याला शहरातील नागरिकांचा विरोध आहे, ही बाब प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.
राज्य सरकारने याबाबत दुसरी अधिसूचना दि. १ जुलै २०१९ रोजी काढली. त्यानुसार, प्रशासन गेल्या चार वर्षांचा एकत्रित दोन टप्प्यांमध्ये कर वसूल करीत आहे. सामान्य नागरिकांना यामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या चार वर्षांच्या शास्तीसह उपयोगकर्ता शुल्काची वसुली व्यवहार्य नाही. त्यामुळे व्यापक जनहिताच्या दृष्टीने चार वर्षांचा कराची ‘शास्ती’ रद्द करुन एप्रिल- २०२३ पासून उपयोगकर्ता शुल्काची आकारणी करावी, अशी सूचना केली. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एप्रिल- २०२३ पासून कर आकारणी करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
विशेष म्हणजे, ‘झिरो वेस्ट’ धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या सोसायटीधारकांकडून उपयोगकर्ता शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. तसेच, पर्यावरणपूरक सोसायटींना मिळकतकरामध्ये सवलत देण्याकामी सवलत धोरणाच्या कक्षा विस्तारण्याची मागणी सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली
:
महापालिका प्रशासनाने २०१९ पासूनचा दंड रद्द करावा. २०१९ ते २०२३ पर्यंत वसुल केलेली दंडाची रक्कम समायोजित करावी. तसेच, झिरो वेस्टसह पर्यावरण पूरक सोसायटींसाठी मिळकत कर सवलत योजनेच्या कक्षा विस्ताराव्यात आदी मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत. तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आमच्या मागणीला काहीअंशी यश मिळाले आहे. तरीही उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
- महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Thursday, 29 June 2023
चंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मीची दादरमध्ये निदर्शने
आजाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
मुंबई-(प्रतिनिधी)) दि . २९ जून २०२३ रोजी
भीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनेचे संस्थापक अॅड चंद्रशेखर आजाद यांच्यावर काल उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज मुंबईसह राज्यभरात उमटले.मुंबईत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर येथे जोरदार निदर्शने करीत आजाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली.
आजाद यांच्या गाडीवर काल सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला यात आजाद गोळी लागून जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.भीम आर्मीसह विविध सामाजिक राजकीय पक्ष संघटनांनी सदर घटनेचा निषेध करतानाच पुणे, लातूर औरंगाबाद जालना नागपूर, बुलढाणा, अकोला,चंद्रपूर, अहमदनगर ,नाशिक,नंदूरबार, सह राज्यभरात रास्ता रोको तसेच निदर्शने केली.
मुबईतील स्वामी नारायण मंदीर दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात जोरदार निदर्शने केली.या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे ,महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड,दिनेश शर्मा,विजय कांबळे, संतोष वाकळे,सुशीलाताई कापुरे,सुरेश धाडी,
, बाळू साळे, रमेश बालेश, श्रीकांत धावारे, अविनाश समींदर, विजय कांबळे, प्रकाश पाईकराव ,अमोल निकाळजे,मिलिंद चिंचवलकर,
यांच्यासह जाती अंत चळवळीचे सुबोध मोरे ,शाहीर सुरेंद्र बर्वे,संदेश गायकवाड, सुनील कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. आजाद यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना त्वरीत अटक करून कडक कारवाई करावी ,सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच आजाद यांना त्वरीत झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीसांमार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
दरम्यान येत्या २४ तासात गुन्हेगार अटक न झाल्यास राज्यभरात सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटनांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी दिला आहे
सर्व आंदोलन कर्त्यांना माटुंगा पोलीसांनी ताब्यात घेतले.
विजय जगताप लिखित प्रा. रामकृष्ण मोरे 'परामर्श एका शिल्पकाराचा' पुस्तकाचे प्रकाशन
विचार शून्यता ही मोठी समस्या - नितीन गडकरी
पिंपरी, (लोक हिताय न्युज) (दि. २९ जून २०२३) राजकीय जीवनामध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांचे साहित्य, संस्कृती चित्रपट, कला तसेच समाजसेवा याविषयीचे विचार पक्के होते. त्यामुळेच प्रा. मोरे यांनी सर्वच क्षेत्रात लीलया मुशाफिरी केली आणि आपल्या कार्य कतृत्वाचा ठसा उमटवला. सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता विचार शून्यता ही मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवनावरील 'परामर्श एका शिल्पकाराचा' ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आकुर्डी येथे करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. प्रकाशन समारंभास काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार, पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमा खापरे, ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे गजानन एकबोटे, लेखक विजय जगताप, अंशुल प्रकाशनच्या संचालिका तृप्ती विजय जगताप,
राजीव जगताप आदी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे पूर्वी तंत्रज्ञान विकसित नव्हते परंतु आता याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अत्याधुनिक सोयी सुविधा यांचा लाभ घेऊ शकतो त्यातून नव्या पिढीला ज्येष्ठ विचारवंत प्रतिभावंतांचे मार्गदर्शन मिळू शकते त्याचे दस्ताऐवजी करण होऊ शकते असे गडकरी यांनी सांगितले.
दिग्विजय म्हणाले की, प्रा. मोरे यांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली होते पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले कार्य केले व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेसचे दुर्भाग्य की त्यांचा लवकर मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मोठी हानी झाली.
यावेळी हर्षवर्धन पाटील, डॉ. सदानंद मोरे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
लेखक विजय जगताप यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली.
स्वागत उल्हासदादा पवार यांनी केले.
Subscribe to:
Posts (Atom)