Friday, 23 October 2020

नामदेव ढाके यांनी आपल्या उंची इतकेच बोलावे- सतीश दरेकरभ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली....




पिंपरी-दि.२३..(Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे )
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र शासन यांच्यावर आरोप करण्यापूर्वी आपल्या राजकीय उंचीचा विचार करावयास हवा होता. नामदेव ढाके यांनी आपल्या उंचीइतकेच बोलावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी नगरसदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेलचे निरिक्षक सतीश दरेकर यांनी ढाके यांना  लगावला आहे.
जाम्बो कोविड सेंटरच्या परिचारिकांचे वेतन ठेकेदार कंपनीने दिले नसल्याने एका राजकीय पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे.
कोरोनाच्या कालावधीत लोकांना वाचविण्याचे निर्णय घेण्यापेक्षा करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात पिंपरी चिंचवड शहराचे सत्ताधारी भाजपाचे नेते मशगुल होते. रात्रीच्या अंधारात निविदा प्रक्रीया पार पाडणार्‍या भाजपाच्या या कारभाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहिर केल्याने शहरातील भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे यामुळे आता ते अजितदादा पवारांवर आरोप करु लागले असल्याचे सतीश दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाला रोखण्यात महापालिका प्रशासन आपयशी ठरले होते तर सत्ताधारी भाजपाचे लोक मलीदा लाटण्यात गुंतले होते. त्यामुळे लोकांना वाचविण्यासाठी अजितदादा पवार यांनी सातत्याने लक्ष दिले व शहरात कोरोना रोखण्यात त्यांच्या प्रयत्नांमुळे यश आले आहे. असे असताना भाजपा ना. अजितदादा पवारांवर व महाराष्ट्र शासनावर भोंगळपणाचा आरोप करत असेल तर त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असे वाटते असा आरोप सतीश दरेकर यांनी केला आहे.
कोविड सेंटर मधिल परिचारिकांना वेतन देण्याची जबाबदारी संपूर्णपणे महापालिकेची असून त्यांनी ते दिलेच पाहिजे असेही सतीश दरेकर यांनी आपल्या पत्रकांत म्हंटले आहे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालयात क्षयरोगनिदान करणाऱ्या ट्रूनॅट मशिनचे उद्घाटन "

पिंपरी-दि २३:-(Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे. )
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालय,चिंचवड येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या क्षयरोग निदान करणाऱ्या ट्रूनॅट मशिनचे उद्घाटन अतिरिक्त आरोग्य वैदयकीय आधिकारी डॉ.पवन साळवे यांच्या हस्ते झाले.
"क्षयरूग्णांना बेडका तपासणीसाठी व क्षयरोगाच्या जलद निदानासाठी हि मशिन नवसंजीवनी ठरेल." असे प्रतिपादन डॉ.साळवे यांनी केले.
सदर कार्यक्रमावेळी आरसीएच वैदयकीय आधिकारी डॉ.वर्षा डांगे,सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सुनिल जॉन,शहर क्षयरोग नियंत्रण आधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर,शहर क्षयरोग दुरीकरण केंद्राच्या वैदयकीय आधिकारी डॉ.अंजली ढोणे. अन्य कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sunday, 4 October 2020

रिपब्लिकन सेनेचे पिंपरी चिंचवड शहर महिला शहराध्यक्ष भीमा ताई धुळे यांची निवड सेनेचे अध्यक्ष धनाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले..

पिंपरी.  दि.4/10/2020. Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे... पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष पदि भिमाताई तुळवे यांची नियुक्ती करण्यात आली व
मोठ्या संख्येने महिलांनी जाहीर प्रवेश केला 
 *राष्ट्रीय अध्यक्ष मा सरसेनानी.आनंदराज आंबेडकर साहेब व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब*पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ साहेब * रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष  धुराजी*शिंदे यांच्या हस्ते सौ. भिमाताई तुळवे यांची पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष पदि निवड करण्यात आली व तसेच मोठय़ा संख्येने महिलांनी जाहीर प्रवेश केला या वेळी उपस्थिती उपध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर हिरभाऊ लांडगे महासचिव पिंपरी चिंचवड शहर अरुण मैराळे प्रेवक्ते पिंपरी चिंचवड शहर हौवसराव शिंदे प्रभारी पिंपरी चिंचवड शहर वर्षाताई शेलार उपध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर उमाताई शेख सचिव पिंपरी चिंचवड शहर राहुलभाऊ  विटकर प्रभाग अध्यक्ष गोगलबाई सोनकांबळे रेखाताई जावेर सलमाताई सय्यद प्रतिभाताई थोरात आणिताताई ठोंबरे बलभीम मस्के अदी उपस्थित मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी  येथे  प्रवेश घेण्यात आला पिंपरी चिंचवड शहरात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध रहावे....