पिंपरी-दि.२३..(Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे )
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र शासन यांच्यावर आरोप करण्यापूर्वी आपल्या राजकीय उंचीचा विचार करावयास हवा होता. नामदेव ढाके यांनी आपल्या उंचीइतकेच बोलावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी नगरसदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेलचे निरिक्षक सतीश दरेकर यांनी ढाके यांना लगावला आहे.
जाम्बो कोविड सेंटरच्या परिचारिकांचे वेतन ठेकेदार कंपनीने दिले नसल्याने एका राजकीय पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे.
कोरोनाच्या कालावधीत लोकांना वाचविण्याचे निर्णय घेण्यापेक्षा करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात पिंपरी चिंचवड शहराचे सत्ताधारी भाजपाचे नेते मशगुल होते. रात्रीच्या अंधारात निविदा प्रक्रीया पार पाडणार्या भाजपाच्या या कारभाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहिर केल्याने शहरातील भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे यामुळे आता ते अजितदादा पवारांवर आरोप करु लागले असल्याचे सतीश दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाला रोखण्यात महापालिका प्रशासन आपयशी ठरले होते तर सत्ताधारी भाजपाचे लोक मलीदा लाटण्यात गुंतले होते. त्यामुळे लोकांना वाचविण्यासाठी अजितदादा पवार यांनी सातत्याने लक्ष दिले व शहरात कोरोना रोखण्यात त्यांच्या प्रयत्नांमुळे यश आले आहे. असे असताना भाजपा ना. अजितदादा पवारांवर व महाराष्ट्र शासनावर भोंगळपणाचा आरोप करत असेल तर त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असे वाटते असा आरोप सतीश दरेकर यांनी केला आहे.
कोविड सेंटर मधिल परिचारिकांना वेतन देण्याची जबाबदारी संपूर्णपणे महापालिकेची असून त्यांनी ते दिलेच पाहिजे असेही सतीश दरेकर यांनी आपल्या पत्रकांत म्हंटले आहे
No comments:
Post a Comment