Thursday, 26 November 2020

केऱ्हाळा गावामध्ये, पुणे बार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला

                                     सिल्लोड.   दिनांक:- 26/11/2020.(लोक हिताय न्यूज.).  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे), अंतर्गत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर संविधान सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने के-हाळा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे  संविधान दिन साजरा करण्यात आला.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बार्टीचे उमाकांत बोराडे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष श्री राजेंद्र मस्के यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे D. O. के. एस. दांडगे, व प्रमुख पाहुणे मनोहर आपार हे होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर देहाडे, संतोष देहाडे, नंदाबाई धनेधर, भास्कर देहाडे, वंदना मस्के, कमलबाई देहाडे, अलकाबाई देहाडे, आधी ग्रामस्थांनी कठोर परिश्रम घेतले. सदरील सविधान सप्ताह  बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिल्लोड तालुक्यात साजरा करण्यात येत आहे.

Monday, 2 November 2020

चाकण मधील विटेक्सो कंपनीमध्ये एकवीस हजार रुपयांचा वेतनवाढ करार संपन्न...


पिंपरी (दि. 2 नोव्हेंबर 2020...   (लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे )       कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे देशभर औद्योगिक व व्यापार विषयक मंदीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांची एकजूट व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे चाकण येथील विटेक्सो टेक्नोलॉजीस कंपनीमध्ये 21,000 रुपयांच्या वेतन वाढीचा करार नुकताच संपन्न झाला. त्यामुळे चाकण औदयोगिक पट्यातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या करारात कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक अनुराग गर्ग आणि हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी कंपनीचे शाखा प्रमुख रामचंद्रन रामनाथन, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख अर्चना श्रीवास्तव, मनुष्यबळ विकास अधिकारी सचिन महिंद्र, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, युनिट प्रतिनिधी विजय राणे, सुरेश सांदुर, विकास धवन, नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.
         1 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीसाठी हा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या वेतनवाढ करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष मासिक 15,000 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अप्रत्यक्ष मासिक 6000 रुपये असे एकूण मासिक 21,000 रुपयांचा लाभ कामगारांना होणार आहे. तसेच एकूण वार्षिक पगाराच्या 17 टक्के बोनससह डी.ए., घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, वाहन भत्ता, गणवेश भत्ता अधिक इतर भत्ते अशी अप्रत्यक्ष 6000 रुपये मासिक वेतन वाढ मिळणार आहे. वैद्यकीय विमा तीन लाख रुपये वार्षिक आणि वैदयकीय विमामध्ये आई, वडीलांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कामगारांसाठी वाहतूक व कॅन्टिन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच कामगार किंवा त्यांचा कुटूंब सदस्य मयत झाल्यास 35,000 रुपये अत्यावश्यक मदत म्हणून देण्यात येणार आहेत. या आस्थापनेत हिंद कामगार संघटना मान्यता प्राप्त संघटना असल्यामुळे कराराचा लाभ सर्व कायम कामगारांना होणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दार माहिती दिली