Thursday, 26 November 2020

केऱ्हाळा गावामध्ये, पुणे बार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला

                                     सिल्लोड.   दिनांक:- 26/11/2020.(लोक हिताय न्यूज.).  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे), अंतर्गत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर संविधान सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने के-हाळा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे  संविधान दिन साजरा करण्यात आला.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बार्टीचे उमाकांत बोराडे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष श्री राजेंद्र मस्के यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे D. O. के. एस. दांडगे, व प्रमुख पाहुणे मनोहर आपार हे होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर देहाडे, संतोष देहाडे, नंदाबाई धनेधर, भास्कर देहाडे, वंदना मस्के, कमलबाई देहाडे, अलकाबाई देहाडे, आधी ग्रामस्थांनी कठोर परिश्रम घेतले. सदरील सविधान सप्ताह  बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिल्लोड तालुक्यात साजरा करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment