Sunday, 20 December 2020

ताई तुझ्या वेदना मी जाणून घेऊ शकतो,पिंपरी चिंचवड चे उपमहापौर मा,केशव घोळवे. ऊसतोड कामगारांच्या हाकेला आले धावून



पिंपरी-दि.20 दिसें (लोकहितायन्यूज  )
ताई तुझ्या वेदना मीच जाणू शकतो. ऊस तोडणी कामगारांच्या वेदना मी स्वतः अनुभवल्या आहेत आणि तू तुझी मुलगी गमावली आहेस. हे दुःख खूप मोठे आहे अशा शब्दात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव हनुमंतराव घोळवे यांनी निरगुडसर (मंचर) येथील ऊस तोडणी कामगार कुटुंबियांचे सांत्वन केले.
दोन दिवसापूर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगाराची आठ वर्षाची मुलगी तेजश्री रामेश्वर पवार ही खेळताना विहिरीत पडली व तीचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी निरगुडसर येथे प्रत्यक्ष जावून या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस दीपक नागरगोजे होते.
केशव घोळवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी भेट दिली व तेथील प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली व त्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे निरगुडसर पारगांव विभागाचे गट अधिकारी बाळसीराम टाव्हरे व नवनाथ चव्हाण यांच्यासह ऊस तोडणी कामगारांच्या पालावर जावून मृत पावलेल्या मुलीची आई कल्पना रामेश्वर पवार, आजोबा ज्ञानेश्वर मलकांत राठोड, आजी मथुराबाई ज्ञानेश्वर राठोड या दुःखी कुटुंबियांची भेट घेतली.
पालावर असलेल्या लोकांशी व चर्चा करुन तेथे कारखान्याच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सुविधा व सोईंचीही केशव घोळवे यांनी माहिती घेतली.
यावेळी संबंधित अधिकार्‍यांसह कारखान्याचे संचालक नामदेव काशिनाथ थोरात यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली व चर्चा केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्याशीही दुरध्वनीवरुन उपमहापौर केशव घोळवे यांनी संवाद साधला.
संचालक नामदेव थोरात यांच्याशी बोलताना केशव घोळवे यांनी मृत मुलीच्या गरीब कुटुंबावर खूप मोठा आघात झाला आहे. यामुळे कारखान्याने तातडीने त्यांना आर्थिक मदत करावी. ऊस तोडणी कामगारांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचा वीमा उतरविण्यात यावा. ज्या विहिरीत हा अपघात झाला आहे त्या विहिराला संरक्षक कठडा नाही, त्यामुळे सदर विहिरीची कारखान्याने तातडीने दुरुस्ती करावी. ऊस तोडणी कामगार जेथे वास्तव्यास आहेत त्याठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात यावे अशा मागण्या केल्या या सर्व मागण्यांचा विचार करण्याचे अश्वासन नामदेव थोरात व चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी दिले.
या दौर्‍यात उपमहापौर केशव घोळवे यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांचीही त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली व भीमा शंकर साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांच्यासंदर्भातही सविस्तर माहिती घे

No comments:

Post a Comment