Tuesday, 21 February 2023

पहाटेच्या भेटीचे सर्व रेकॉर्ड तोडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ..

पिंपरी दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी विधानसभा मतदारसंघांमध्ये शेवटच्या दोन दिवसात प्रचाराचा निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीचे विविध नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी शहरात मोठे मोठे सभा घेत आहेत .आणि भारतीय जनता पार्टीच्या व शिवसेना शिंदे गटातील आणि मित्रपक्ष यांच्या वतीने विविध नेते मंडळी  भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरलेले आहे .महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवारी यांनी देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मैदानात उतरविले असल्याचे सांगण्यात येत आहे .  तिरंगी लढतीमध्ये अनेक अपक्ष उमेदवार देखील आहे असे असताना प्रत्येकाला आपला उमेदवार निवडून आण्याचा हा ध्यास मनात धरलेला आहे .मात्र आता होऊन जाऊ द्या आणि 26 फेब्रुवारी 2023 ची मतदारांची  ताकत कीन्हा मागे किती आहे हे जनतेला पाहू द्या याउद्देशाने .राज्याचे मुख्यमंत्री पहाटे तीन वाजता .
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या घरी येऊन निवडणुकीचे वातावरण कशा पद्धतीने चालले आहे आणि रात्रीच्या खास काही घडामोडी कडे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले आहे .पहाटेच्या भेटीची चर्चा सतत राज्यात पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार सातत्याने कार्यकर्ते आणि नेते मंडळी यांच्याबरोबर सतत घडामोडी संदर्भात पाहते भेट घेत असल्याची नेहमीच चर्चेत असतात .यावेळी देखील चिंचवड विधानसभेच्या निवडणूक प्रचारनियोजनाच्या माध्यमातून सध्या राज्यभर तिरंगी लढतीचे वारे वाहत आहेत . आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या  पहाटेच्या भेटीचे चर्चाकडे आणि कार्यकर्ते आणि पक्षाच्या नेत्यांबरोबर पहाटेच्या भेटीत निमित्ताने काही आगळावेगळ्या घडामोडी घडवून आणतील का . या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्रीश्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे तीन वाजता जगताप कुटुंबाची भेट घेऊन कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आत्मविश्वास किती पट भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजय करण्यासाठी आहे हे पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी पहाटे तीन वाजता भेट घेऊन या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसासाठी अपक्षांबरोबर महाविकास आघाडीची झोप उडवलेले आहे . .. .

No comments:

Post a Comment