Monday, 10 April 2023
Saturday, 1 April 2023
दुरुस्तीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या देव कन्स्ट्रक्शनकंपनीवर कारवाई करण्याची मागणी आपना वतन .
पिंपरी .दि . ०१ एप्रिल २०२३ .
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे अनेक हौशी जलतरणपटू तलावात पोहण्यासाठी येत असतात. अनेक विद्यार्थी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याची कला अवगत करतात. परंतु जुनी सांगवी येथील बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव दुरुस्ती अभावी मागील ३ वर्षांपासून बंद असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना
पोहण्यासाठी इतरत्र जावे लागत असून त्याठिकाणी गर्दी असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. सदरचे काम ठेकेदाराला देऊन दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत परंतु अजूनही त्याठिकाणी एखाद्या खाणीचे स्वरूप आलेले आहे.राडारोडा,कचरा,बांधकामाचे साहित्य अस्तव्यस्त पडलेले आहे. या जलतरण तलावाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. पाणी गळती, जुन्या फारश्या दुरुस्ती, तलाव परिसरातील कुस्ती मैदान, जॉगिंग ट्रॅक, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र, कपडे बदलण्याची स्वतंत्र .खोली, फॅब्रिक छत,रंगरंगोटी आदी कामे अपूर्ण आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना पोहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे जुनी सांगवी मधील कै. बाळासाहेब शितोळे तलावाचे कामास दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी. तसेच सदर जलतरण तलावाचे काम जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले
Sunday, 26 March 2023
ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची गरज आहे . नाना कांबळे .
पिंपरी . दि . २६ मार्च २०२३ . लोक हिताय )
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या वय वर्ष साठ वर्षावरील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा किमान पाच हजार रुपयाचे मानधन देण्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे यांनी केली.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर नाना कांबळे बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष प्रवीण शिर्के, मावळते अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मीडिया विंगचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत साळुंखे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष अविनाश अदक नवनिर्वाचित सरचिटणीस रोहित खर्गे डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष राजू वारभुवन, नवनिर्वाचित उपाध्यक्ष माधुरी कोराड, गणेश मोरे, नवनिर्वाचित कोषाध्यक्ष राम बनसोडे व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना कांबळे म्हणाले की, पत्रकार संघाचे साठ वर्षावरील ज्येष्ठ सदस्यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघ दरमहा किमान पाच हजार रुपयांचे मानधन देणार आहे असा उपक्रम राबविणारा पिंपरी चिंचवड पत्रकार संघ हा देशातील एकमेव पत्रकार संघ ठरणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे निमंत्रक गोविंद वाकडे या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पत्रकार संघ भक्कमपणे वाटचाल करत आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने लवकरात लवकर पत्रकार भवन च्या भूमिपूजनाचे नियोजन करण्यात येणार असून पत्रकार कॉलनी साठी म्हणून शासनाकडे पाच एकर जागेची मागणी करण्यात आली आहे ही जागा प्राप्त झाल्यानंतर जवळपास 80 पत्रकारांना स्वतंत्र बंगले बांधून देण्याचा मनोदय असल्याचेही नाना कांबळे यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने देशातील पहिले प्रिंट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे महाविद्यालय उभे करण्याचा मनोदय ही नाना कांबळे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वीपणे पार पाडले त्याच धर्तीवर नजीकच्या काळात महिला पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन भरविण्याचा प्रयत्न असून देशभरातील महिला पत्रकारांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने येत्या महिनाभरात पत्रकार प्रशिक्षण उपक्रम अंतर्गत आठ दिवसाचा प्रमाणपत्र प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे यासाठी अनेक मान्यवर पत्रकार मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचेही नाना कांबळे यांनी यावेळी सांगितले.
Tuesday, 21 February 2023
पहाटेच्या भेटीचे सर्व रेकॉर्ड तोडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ..
पिंपरी दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी विधानसभा मतदारसंघांमध्ये शेवटच्या दोन दिवसात प्रचाराचा निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीचे विविध नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी शहरात मोठे मोठे सभा घेत आहेत .आणि भारतीय जनता पार्टीच्या व शिवसेना शिंदे गटातील आणि मित्रपक्ष यांच्या वतीने विविध नेते मंडळी भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरलेले आहे .महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवारी यांनी देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मैदानात उतरविले असल्याचे सांगण्यात येत आहे . तिरंगी लढतीमध्ये अनेक अपक्ष उमेदवार देखील आहे असे असताना प्रत्येकाला आपला उमेदवार निवडून आण्याचा हा ध्यास मनात धरलेला आहे .मात्र आता होऊन जाऊ द्या आणि 26 फेब्रुवारी 2023 ची मतदारांची ताकत कीन्हा मागे किती आहे हे जनतेला पाहू द्या याउद्देशाने .राज्याचे मुख्यमंत्री पहाटे तीन वाजता .
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या घरी येऊन निवडणुकीचे वातावरण कशा पद्धतीने चालले आहे आणि रात्रीच्या खास काही घडामोडी कडे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले आहे .पहाटेच्या भेटीची चर्चा सतत राज्यात पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार सातत्याने कार्यकर्ते आणि नेते मंडळी यांच्याबरोबर सतत घडामोडी संदर्भात पाहते भेट घेत असल्याची नेहमीच चर्चेत असतात .यावेळी देखील चिंचवड विधानसभेच्या निवडणूक प्रचारनियोजनाच्या माध्यमातून सध्या राज्यभर तिरंगी लढतीचे वारे वाहत आहेत . आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या भेटीचे चर्चाकडे आणि कार्यकर्ते आणि पक्षाच्या नेत्यांबरोबर पहाटेच्या भेटीत निमित्ताने काही आगळावेगळ्या घडामोडी घडवून आणतील का . या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्रीश्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे तीन वाजता जगताप कुटुंबाची भेट घेऊन कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आत्मविश्वास किती पट भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजय करण्यासाठी आहे हे पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी पहाटे तीन वाजता भेट घेऊन या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसासाठी अपक्षांबरोबर महाविकास आघाडीची झोप उडवलेले आहे . .. .
Monday, 20 February 2023
Subscribe to:
Posts (Atom)