Friday, 8 November 2019

आज राम मंदिर व बाबरी मशीद च्या निर्णय फायन देणयात आले असून सर्वांना समाधानी असावी

योध्या निकाल लाईव्ह...
नवी दिल्ली : अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता या खटल्याचा निकाल येणार असून संपूर्ण सुप्रीम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Live Update...
11.15 - मंदिर बनवण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश
11.12 - रामजन्मभूमी न्यासला वाद असलेली जमीन देण्याचे आदेश
11.10 - मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा देण्याचे आदेश
11.08 - सुन्नी बोर्डाला अयोध्येत दुसरी जागा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.06 - मुस्लीम वर्गाला दुसरी जागा देण्याच आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.05 - रामाचा जन्म त्याच जागी झाला होता याचे पुरावे - कोर्ट
11.04 - 1885 पासून हिंदू चौथाऱ्यावर पूजा करत होते.
11.03 - हिंदू सीता स्वयंपाकघरातपूजा करत होते. - कोर्ट
11.01 - इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज वाचली जात होती असा पुरावा नाही - कोर्ट
11.00 - मुस्लीम पक्ष जमिनीवर एकाधिकार नाही सिद्ध नाही करु शकला.
10.55 - आस्था आणि विश्वासच्या आधारावर नाही तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल - कोर्ट
10.52 - 12 व्या आणि 16 व्या शतकात काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही - कोर्ट
10.50 - मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही- कोर्ट
10.49 - एएसआयच्या रिपोर्टनुसार मशीदच्या जागी आधी मंदिर होतं असं देखील निर्णयात म्हटलं गेल्याचं कळतं आहे.
10.47 - आस्था आणि विश्वासवर कोणताही वाद नाही होऊ शकत - कोर्ट
10.46 - जमीन विवादाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय दिला जाईल - कोर्ट
10.45 - रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही. - कोर्ट
10.42 - बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसल्याचं कोर्टाने निर्णयात म्हटलं आहे. याचा अर्थ बाबरी मशीदच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं.

No comments:

Post a Comment