Tuesday 29 October 2019

सिल्लोड आमदार यांच्या ओल्या दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना लुक्ससा न भरपाई दया

Lok hitay live news, 
सिल्लोड              निवडणुकीच्या विजयाचा आनंद राज्यभरात विशेषता मराठवाड्यात पडत असलेल्या पावसाने धुवून नेला. विजयी मिरवणुका, सत्कार, समारंभाची संधी देखील काही लोकप्रतिनिधींना मिळाली नाही, काहींनी दुष्काळाचे गांभीर्य ओळखत थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी तर थेट तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी 31 ऑक्‍टोबर रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.
औरंगाबादः निवडणुकीच्या विजयाचा आनंद राज्यभरात विशेषता मराठवाड्यात पडत असलेल्या पावसाने धुवून नेला. विजयी मिरवणुका, सत्कार, समारंभाची संधी देखील काही लोकप्रतिनिधींना मिळाली नाही, काहींनी दुष्काळाचे गांभीर्य ओळखत थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी तर थेट तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी 31 ऑक्‍टोबर रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.
सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील निवडणूक सत्तार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. वैयक्तिक सत्तार आणि त्यांनी नव्यानेच ज्या पक्षात प्रवेश केला, त्या शिवसेनेची इभ्रत देखील त्यांच्या विजयावर अंवलबून होती. विरोधकांनी एकत्रितपणे लढा दिल्यावरही सत्तार विक्रमी मतांनी विजयी झाले. मुंबईहून परतताच सत्तार यांनी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे झालेले नुकसाना पाहण्यासाठी शेत गाठले.
मक्‍याचे काढून ठेवलेली कणंस, त्याला कोंब फुटली, तर कापसाच्या बोंडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसना झाले. अख्खे शेत पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आंनदावर देखील विरजण पडले. सत्तार यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न तर केलाच, पण नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी कृषी आणि महसुल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कामाला देखील लावले. पण नुकसान इतक्‍या मोठ्या प्रमाणात झाले, की केवळ पंचनामे, करून भागणार नाही तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे गरज लागणार आहे. हे ओळखून अब्दुल सत्तार यांनी 31 ऑक्‍टोबर रोजी सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयावर ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment