Thursday, 28 May 2020

कष्टकरी कामगारांना सायकल वाटप राज्यातील असंघटित कामगारांसाठी विशेष सायकल वाटप करून उपक्रम राबवला

Lok hitay news..



पिंपरी (lok.hitay news ) :  कोव्हीड१९ या साथीच्या रोगामुळे टाळेबंदीमुळे हाताचे काम गेले आणी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे आपण   हळूहळू पूर्वपदाकडे येण्यासाठी प्रयत्नशिल आहोत.  सध्या कामगाराना कामावर जाण्यासाठी  वाहन उपलब्ध नाही, दुचाकी वापरु शकत नाही अशा स्थितीत कष्टका-याना दिलासा म्हणून विविध संस्थातर्फे  आज पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांचे हस्ते सायकल चे वाटप  करण्यात आले.यावेळी  कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, नगरसेवक एकनाथ पवार ,अभिजीत कुपटे ,सुनील पाटील, सतीश नाजरे विनीत पाटील, महिला आघाडीच्या माधुरी जलमुलवार, राजेश माने ,उमेश डोर्ले, सखाराम केदार आदी उपस्थित होते.

 यावेळी स्वच्छता कामगार ,फेरीवाला, घरेलू कामगार ,कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार  यांना सायकलींचे वितरण करण्यात आले प्रातिनिधिक स्वरूपात १५ सायकलींचे मोफत  वितरण करण्यात आले.यासाठी २०० कामगारांनी नोंदणी केली आहे.

टाळेबंदी तून  पुर्वपदावर येत असताना हाताला काम मिळत असताना  कामावर पोहोचायला परतायला  सायकल ही विनाइंधन, वाहतूक कोंडी, पर्यावरणपूरक तसेच वैयक्तिक व सामाजिक आरोग्यास उपयुक्त आहे.म्हणून इतर देशाप्रमाने अपल्या कडे ही सायकला चा वापर वाढला पाहिजे    असे मत व्यक्त करत आयुक्त श्रावण हार्डीकर या उपक्रमाचे स्वागत केले.
कोव्हीडचे सोशल डिस्टन्सिंग निकष पाळत सायकल कामावर पोहोचण्यास उत्तम उपाय व भुमिका ठरणार आहे.अवश्यक  स्थळी जाणे  आणी सायकल ला आधुनिक पद्धतीचे लॉक असनार आहे त्यामूळे  सायकली सुरक्षित रहाणार आहेत.

म्हणूनच सायलटूवर्क,  पुणे सायकलवेरनेस, निसर्ग सायकल मित्र, भद्रायराजते प्रतिष्ठाण, ग्रीन सायकल क्लब, युलू बाईक्स व कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य तसेच सायकल महापौर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगित तत्वावर कष्टकरी तसेच कोव्हीड योध्यांना मोफत सायकल प्रदान उपक्रम. राबविण्यात आला .प्रवासासाठी असंख्य अडचणी होत्या मात्र सायकली मिळाल्याने यावेळी कष्टकरी कामगारानी  आनंद व्यक्त केला.

Tuesday, 26 May 2020

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उद्योजक अनिल आसवानी आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते

Lok hitay news...






पिंपरी (लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे. )(26 मे 2020) : कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बहुतांश सर्वच रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध संस्थांना व रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून पिंपरी चिंचवडमधील युवा उद्योजक अनिलशेठ आसवानी आणि मित्रपरिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पिंपरी कॅम्प येथील संत कंवरराम बुड्डा मंडळी ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये पिंपरी कॅम्पमधील दिव्यांग सेल्समन दीपक शिघे यांनी देखील रक्तदान करून इतरांचा उत्साह वाढविला. संकलित झालेले रक्त पिंपरीतील पिंपरी चिंचवड सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट या रक्तपेढीत देण्यात आले. रक्तदान शिबिराच्या आयोजनात महेश नागरानी, प्रकाश समतानी, धनेश तलरेजा, जगदीश आसवानी, शशिकिरण यादव, अनिल तांबे, सुनील घोगिया, सुनील छुगानी, पवन रामनानी, दीपक पंजवानी, ईश्वर राजानी आदींनी सहभाग घेतला होता.
दिव्यांग रक्तदाते सेल्समन दीपक शिघे यांचा आयोजक अनिलशेठ आसवानी यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला.
-------------------------------

Friday, 22 May 2020

पि. चि. शहरातील खाजगी शाळांना. मनसे चा इशारा... शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांना दिले पत्र

Lok hitay news...





 पिंपरी.. दि.
कोरोना विषाणू च्या मारामारी मध्ये आज सर्व सामान्य नागरिक त्रस्त असताना शहरातील खाजगी शाळा पालकांना शालेय साहित्य व फि भरण्या साठी तगादा लावत आहे
आजच्या परिस्थितीत सर्व नागरिकांना आर्थिक आडचणी मध्ये असताना शाळा प्रशासनाने सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरु नये. चालू शैक्षणिक वर्षासाठी शाळा चालू करण्यासाठी शासनाने  कोणतेही धोरण ठरवले नसताना शाळा सर्व सामान्य नागरिकांना त्रासदेत आहे.
या विषयावर महाराष्ट्र नवर्निमाण सेना पिंपरी-चिंचवड शहर यांनी शिक्षण मंडळातील उपअधिकिरी मा.पराग मुंडे साहेब यांना निवेदन दिलेआहे या वेळेस उपस्थित हेमंतभाऊ डांगे. शहर अध्यक्ष मनविसे. बाळा दानवले उपाध्यक्ष मनसे.मयुर चिंचवडे विभाग अध्यक्ष मनसे
आपल्या मार्फत महाराष्ट्र नवर्निमाण सेना सर्व नागरिकांना आव्हान करतेय कि जर कोणात्याही शाळेने फि किंवा शालेय साहित्य घेन्याची बळजबरी केली तर मनसे संपर्क साधावा हि विनंती...

लोक हिताय न्यूज. संपर्क. मो. 9975659478.. 

Tuesday, 19 May 2020

चांदवड कुषी उत्पन्न बाजार समिती आज पासून कांदा खरेदी सुरु...

Lok hitay news..

                                                                           नाशिक. (Lok hitay news )जिल्हा् प्रतिनिधी,  -:शांताराम दुनबळे: चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावरील कांदा शेतीमालाचे लिलाव मंगळवार ( दि .१ ९ ) पासुन नियमित सुरु होत आहे . शेतकरी , व्यापारी , मापारी व हमाल यांनी याची नोंद घ्यावी , असे आवाहन सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी केले आहे . शेतकरी बांधवांनी लिलाव झालेनंतर कांदा भरण्यासाठी पाटी , घमेले सोबत आणावे . लिलावास येतांना पुढीलप्रमाणे नियम पाळावेत , असे आवाहन करण्यात आले आहे.कांदा लिलाव दैनंदिन सुरु राहतील . कांदा लिलावासाठी नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही . कांदा लिलाव मोकळ्या स्वरूपात निवड व प्रतवारी करुन विक्रीस आणावा . शेतकरी बांधवांनी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये . ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतर ( सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत ) आवारात यावे . रात्री मुक्कामी येणा - या वाहनांना आवारात प्रवेश दिला जाणार नाही . एका दिवसात ४०० ते ५०० वाहनांचा लिलाव केला जाणार आहे . शेतकरी बांधवांनी बाजार समितीत आल्यानंतर आप आपल्या वाहनाजवळच थांबावे , तसेच एका वाहनाबरोबर एकाच व्यक्तीने यावे . लिलावाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करु नये . ज्या वाहनाचा लिलाव सुरु असेल त्या शेतक - यानेच वाहनाजवळ थांबावे . गर्दी करु नये किंवा समुह करुन बसु नये . प्रत्येक शेतक - याने किमान ५ ते १० फुट अंतर ठेवून ट्रॅक्टर लावावे . तसेच आवारात येण्यापुर्वी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधुन यावे . आवारात आल्यानंतर कुठेही धुंकू नये . धुम्रपान करु नये . आजारी व्यक्तीने बाजार समितीत कांदा शेतीमाल विक्रीस येऊ नये अथवा बाजार आवारात प्रवेश करु नये . बाजार समितीचे आवारावर शेतकरी बांधव व बाजार घटकांसाठी हात , पाय स्वच्छ धुण्याची व्यवस्था केलेली असुन ठिक - ठिकाणी ३० ते ४० लिटरचे ड्रम व त्यासोबत साबण ठेवण्यात आलेली आहे . त्याचा दैनंदिन व वेळोवेळी वापर करण्यात यावा . बाजार समितीचे मुख्य गेटवर निर्जंतुकीकरण कक्षाची निर्मीती करण्यात आलेली असुन आवारत येणाऱ्या सर्व घटकांनी त्याचा नियमित वापर करावा . सर्व बाजार घटकांनी शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सुचनांचे स्वंयस्फुर्तीने काटेकोर पालन करावे व बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे , असे आवाहन सभापती , उपसभापती यांनी केले आहे .

Saturday, 16 May 2020

खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिलाबाबत तक्रार निवारण समिती,, जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Lok hitay news..




पुणे, (लोक हिताय न्यूज.. प्र. )दि. 16-
........              राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणा-या रुग्णांची संख्या लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजनेसाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम, १८९७ हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. तथापि, वाढती रुग्णसंख्या व भविष्यात उद्भवणारी उद्रेकजन्य परिस्थिती लक्षात घेता, खाजगी रुग्णालये यांच्याकडूनही रुग्णसेवा घेणे अपरिहार्य ठरले आहे. त्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहे व काही रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या व उपचार घेऊन गेलेल्या बऱ्याच रुग्णांच्या विविध प्रकारच्या मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी तथा  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक असलेल्या सदस्यांची जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत केली आहे.अतिरिक्त आयुक्त, आरोग्य, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त,आरोग्य, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे जिल्हा हे सदस्य आहेत तर जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी
सदस्य सचिव या नात्याने सर्व यंत्रणेशी समन्वय साधून प्राप्त होणा-या तक्रारीबाबत समितीचे अध्यक्ष/ सदस्य यांच्याशी समन्वय साधून प्राप्त तक्रारीचे योग्य ते निवारण करण्याच्या अनुषंगाने  योग्य ती कार्यवाही करावी, असे
जिल्हाधिकारी तथा  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे
अध्यक्ष नवल किशोर राम यांनी आदेशित केले आहे.

Wednesday, 13 May 2020

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त 36 पोलिसांना आरोग्य मंत्र्याच्या उपस्थित डीचार्ज

लोक हिताय न्यूज.





दि. 14. मे. (Lok hitay news) *नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे . मालेगांव येथे बंदोबस्तात कोरोनाची लागण झालेल्या आणि उपचाराअंती कोरोनामुक्त झालेल्या एकूण ७ पोलीसांना आज संध्याकाळी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचे उपस्थितीत डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगांव येथे डिस्चार्ज देण्यात आला. या पोलीसांना निरोप देतांना पोलीस बॅण्डने ‘हम होंगे कामयाब’ची धुन वाजवून आरोग्य व पोलीस यंत्रणेला लढण्याचे बळ दिले. तेव्हा कोरोनामुक्त पोलिसांच्या चेहऱ्यावरही आत्मविश्वासाची लकेर उमटली होती.
यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , आमदार दिलीप बनकर, मविप्रच्या सरचिटणीस निलीमा पवार उपस्थित होते.
मालेगाव येथे कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची लागण झालेल्या ३३ पोलिसांना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगांव येथे २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णावर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले. आज आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व नाशिक येथील जाकीर हुसेन रुग्णालयातून २८ पोलिस तसेच शहरातील इतर आठ रुग्ण असे एकूण ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायी : आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे*
राज्यात २५ हजार ९२२ कोरोना पॉझिटीव्ह असून, ५ हजार ५०० रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील मृत्युदरही अटोक्यात आहेत.  तसेच नाशिक जिल्ह्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायी असून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसही लवकरच यातून बरे होतील. मालेगाव मधेही बऱ्याच प्रमाणावर परिस्थितीत अटोक्यात असल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले.

*युनानी, होमिपॅथी व आयुर्वेदा या तिघांच्या एकत्रीकरण समिती गठीत*
कोरोनावर मात करण्यासाठी डॉ. तात्याराव लहाने यांचे अध्यक्षतेखाली तसेच आयुषचे डॉ. कोहली व डॉ. खोलप यांच्या माध्यमातून युनानी, होमिओपॅथी व आयुर्वेदा या तिघांचे एकत्रीकरण आयुष मंत्रालयाने  समिती गठीत केली आहे. या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शसूचनेचे सर्व नागरिकांनी पालन केले तर निश्चितच त्याचा फायदा सर्वदूर होणार असल्याचे मत डॉ.टोपे यांनी व्यक्त केले.

*मालेगांवातील एकही रुग्ण व्हेंटीलेटरवर नाही*
मालेगावातील रुग्ण संख्या जास्त असली तरि येथील रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत आहेत. येथील एकही रुग्णाला अद्याप व्हेंटीलेटर लावण्याची आवश्यकता भासली नाही. तसेच ते म्हणाले कोरोनावर मात करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असून सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. टोपे म्हणाले, मालेगाव शहरातील अधिग्रहीत रुग्णालयात सध्या २० ते २५ टक्के रुग्ण आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात ओपीडी सुरु करण्यात आली आहे. मालेगावात टेलिमेडिसीन व टेलीरेडिओग्राफी दोन दिवसात सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिकांच्या मागणीनुसार मालेगावातील हज हाऊस अधिग्रहीत करण्यात आले असून कोविड १९ लॅबला किडस् नियमित पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या covid-19 वॅar रूम च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी कौतुक केले

Lok hitay news...





पुणे.lok hitay news  दि. 13 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या  'कोविड 19 वॉर रुम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत असलेल्या कामाचे कौतुक केले.  कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या.

 यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच महापालिकेतील संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
  महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रुम' मधून होणाऱ्या कामाचे कौतुक करुन महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेलीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), डेलीकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) मध्ये आजवर वैद्यकीय सुविधा घेतलेल्या नागरिकांची संख्यात्मक माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली.

  गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करताना विशेष दक्षता घ्यावी, असे सांगितले. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या  जीपीएस ट्रॅकींगवर भर द्यावा, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

  यावेळी फ्लू सेंटर मध्ये तपासणी केलेले रुग्ण, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल येथील खाटांची व्यवस्था, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आलेले सॅम्पल, त्यातील पॉझिटीव्ह, निगेटीव्ह, प्रलंबित सॅम्पल ची संख्या, आतापर्यंतचे पॉझिटीव्ह, निगेटीव्ह व मृत रुग्ण, दैनंदिन वाढत जाणा-या केसेस, कोविड 19 बाबत जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजना, स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेली निवारा केंद्रे, याबाबत श्री. हर्डीकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोना विषयक कामासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी यावेळी  सांगितले. 

Tuesday, 12 May 2020

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड यांच्या कडून रमजान ईद होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात यावे.........नाशिक जिल्हा. प्र. शांताराम दूनबळे यांच्या कडून मिळाली

Lok hitay news...







*दि. 13.मे..... नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गला आळा घालण्या साठी आपण आपली ख़ुशी बाजूला ठेऊन या वर्षी रमजान ईद साजरी करू....... फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच या संघटनेच्या वतीने.डॉ. दिलीप मेनकर मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद व गट नेते. गणेश भाऊ धात्रक .मनमाड यांना निवेदन देण्यात आले तर देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे राज्यातील आरोग्य विभागा पुढे मोठे आवाहन निर्माण झालेले आहे . कोव्हीड - 19 प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापण विभाग व आरोग्य विभाग आपल्या स्तरावरून लॉकडाऊन आपदा काळात योग्य ते निर्णय घेत आहे . शासनाने सर्वत्र लागू केलेला लॉकडाऊन हा एकच उपाय सफल होत असतांना दिसत आहे . तसेच शासन या कोव्हीड - 19 च्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून स्थिती नियंत्रणात ठेवण्याची अथक प्रयत्न करत आहेत . दि . 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू होऊन आज रोजी यास 51 दिवस उलटलेले आहे . हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुढील काळात ही लॉकडाऊन वाढण्याचे चिन्ह आहेत . सद्यस्थितीत मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे , जो अर्धा ( 17 रोजे ) संपन्न झाले . येणाऱ्या रमजान ईदसाठी मुस्लिम समाजात जोमात तयारी सुरू करत असतो . कारण मुस्लिम समाजात सर्वात मोठी ईद म्हणजे रमजान ईदच असते . या रमजान ईदच्या उत्साहामुळे बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचारमंच संघटनेकडून विनंती आहे की , रमजान ईद ( ईद - उल - फितर ) पर्यंत बाजारातील कापड दुकाने , चप्पल - बुटाचे दुकाने , तसेच सौंदर्यप्रसाधन आदींची दुकाने बंद ठेवण्यात यावी . असे निवेदन फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचारमंच संघटनेकडून देण्यात आले या निवेदन देताना.फिरोज भाई शेख .मिर्झा अहमद बेग. हाजी. मुस्ताक सर .विलास अहिरे. रईस मंसुरी .शकूर भाई शेख. ज्ञानेश्वर शिंदे .सलिम मोहम्मद शेख.सद्दाम आत्तर मनमाड शहर अध्यक्ष.आफरोज अत्तार.उपस्थित होते.................. 

17 तारखेनंतरच्या लॉक डाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यानी व्यवस्थित सूचना कराव्यात कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट तुमच्या बाहेर साथीचा प्रचार नको,,, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,,,

Lok hitay news..





मुंबई.. (लोक हिताय न्यूज). दि १२: १७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले. ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते. लवकरच पावसाला येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात,कोरोना  संकटाशी लढतांना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील हे पाहावे असेही ते म्हणाले.

 आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी विचार मांडले


मुख्यमंत्री म्हणाले की, पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करतांना कोणत्याही परिस्थिती जिल्ह्याजिल्ह्यांच्या  सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत  याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे ये जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल त्यामुळे संसर्ग वाढणार नाही.

कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील.  त्या साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही  तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्स मध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सुचना त्यांनी केली.

राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे मात्र आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत मग  एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यांत सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. मध्यंतरी मी विविध जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या त्यातही आरोग्याविषयी सुविधांच्या  कमतरता जाणवल्या होत्या. आरोग्याच्या रिक्त जागाही भराव्या लागतील.

गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करून काही लक्षणे आहेत का ते तपासले . आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा,  एकीकडे उद्योग सरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पहा व स्थानिकांमधून उपलब्ध करून द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना मुक्तीच्या लढ्यात परिचारिकांचे योगदान महत्वाचे... विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर

Lok hitay news..






  पुणे ,दि. 12:  (लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे ) .... कोरोना मुक्तीच्या लढयात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लाऊन रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्कारुन चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज काढले.
  बै.जी. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन व प्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन डॉ.म्हैसेकर यांनी केले ,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉ.कार्यकर्ते, अधीक्षक डॉ.अजय तावरे, उपअधीक्षक डॉ.बी.जे. जाधव, अधिसेविका डॉ. राजश्री कोटके आदी उपस्थित होते.  यावेळी अधिसेविका डॉ.राजश्री कोटके यांनी उपस्थित परिचारिक व परिचारिकांना आरोग्य सेवेची शपथ दिली.
  डॉ. दिपक म्हैसेकर यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले,  रुग्णालयामध्ये परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबळात सुध्दा दिवसरात्र तत्परतेने चांगली सेवा देवून आरोग्य सेवेचा दर्जा  उंचावत आहेत. कोरोना मुक्तीच्या या लढयात त्यांचे योगदान महत्वाचे असून आरोग्य सेवेमधील परिचारिका एक महत्वाचा घटक आहे. परिचारिकांनी  त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून मानवतेचे दर्शन घडवले आहे. तसेच परिचारिकेबरोबरच परिचारकही अहोरात्र सेवा देत आहेत. जगावर कोरोनाचे संकट असतांना असंख्य परिचारिका व परिचारक बंधू  रुग्णांसाठी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना मुक्तीच्या लढयातील परिचारक बंधू आणि भगिणींचे हे योगदान कोणीही विसरु शकरणार नाही, अशा शब्दात जागतिक परिचारिका दिनाच्या गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
  अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे म्हणाले, परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक असून सध्याच्या कोरोना मुक्तीच्या लढयात  त्या उत्कृष्टरित्या आपली  सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेला मी सलाम करतो, अशा शब्दात त्यांनीही सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ.संगीता भुजबळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.मृदुला फुले यांनी मानले.
      कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी  रुग्णालयात कोरोना शॅम्पल तपासणीच्या लॅबला भेट देवून पहाणी केली व कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा  बैठक घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या.
  यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक, परिचारिका उपस्थित होत्या.

देहू आळंदी पालखी सोडावयाचे स्वरूप कसे असल्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय,, जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Lok hitay news...





पुणे, 12- देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील,योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे,संजय मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणा-या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोशल डिस्टसिंग’ बाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत, आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                   या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या
 प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.

Monday, 11 May 2020

मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतलेल्या मीटिंगमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा, जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडी यांनी खाल खालील मुद्दे मांडले आहे

Lok hitay news...







नाशिक जिल्हा प्रतिनिधी ,शांताराम दुनबळे यांजकडून,            दि. 12.मे.. कोरोनाविरोधात झगडण्यासाठी मा.मुंख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी पुढाकार घेतला असला तरी महाराष्ट्रात कामगारांचे प्रश्न तीव्र झाले असताना महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांनी अधिक पुढाकार घेणे आवश्यक आहे.प्रवासी कामगारांना योग्य मार्गदर्शन झालेले नाही.त्यामुळे ते पोलिस स्टेशनवर फॉर्म भरण्यासाठी व डॉक्टर्सचे सर्टिफिकिट घेण्यासाठी फेऱ्या मारत आहेत.त्यांना फॉर्म पोलिस स्टेशनतर्फेच देण्यात यावा.फॉर्मचा काळा बाजार थांबवावा.पोलिस स्टेशन व जवळचे वॉर्ड ऑफिस यात समनव्यय साधून सर्टिफिकीट साठी डॉक्टर ऊपलब्ध करून द्यावेत.त्या ठिकाणी कामगार मंत्रालयाच्या वतिने लेबर ऑफिसर ठेवावा. त्यानेही कामगारांची नोंद करून रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधून प्रवासी कामगारांना त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी.ह्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी जास्त लक्ष घातले पाहिजे.रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईचे आहेत.ते कोठे आहेत.त्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
* येथे प्रवासी कामगारांबरोबर प्रश्न असंघटित कामगार,आशा कामगार,सुरक्षा रक्षक,सफाई कामगार,हॉस्पिटल्स मधिल नर्सिस,आया,वॉर्ड बॉईज ईत्यादिंचा प्रश्न निर्माण झालेला आहे.ते कामगार आवश्यक सेवा असल्यामुळे कामावर येतात. त्यांना या काळात जास्त दैनंदिन भत्ता दिला पाहिजे.मुंबई महापालिका तो भत्ता देत आहे.आशा कर्मचाऱ्यांवर तर हल्ले होत आहेत ते थांबवले पाहिजेत.घर कामगार मोलकरणींचाही प्रश्न आहे.
*कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितिचा गैरफायदा घेऊन डिझास्टर मंनेजमेन्ट ॲक्टचे नाव सांगून अनेक ठिकाणी कामगारांच्या पगाराची घोठवणूक केली जात आहे ईतकच नव्हे तर पगार कमि केला जात आहे.१२,१२ तासांची ड्यूयटी दिली जात आहे.कामगार कायद्यांची पायमल्ली केली जात आहे ते बंद झाले पाहिजे.
*दुसरा मोठा प्रश्न रेशनचा आहे.धान्य वेळेवर येत नाही.त्यात भेसळ असते त्यासाठी व्हिजिलन्स पथक ठेवली पाहिजेत.महत्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांनाही रेशन मिळाले पाहिजे.महाराष्ट्रातच अनेक वर्षे राहणाऱ्या नागरिकांना पुरावे नाहीत म्हणून रेशनकार्डे नाकारली गेली आहेत.ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्यांना रेशन मिळालेच पाहिजे.रेशनिंग व्यवस्था सार्वर्त्रिक झाली पाहिजे
*कोरोनाशी लढायच असेल तर डॉक्टर्स नर्सिस,वैद्यकिय कर्मचारी ह्यांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.महाराष्ट्र सरकारने खाजगी डॉक्टर्सना दवाखाने ऊघडा म्हणून आदेश दिला आहे. तो योग्यच आहे.पण त्यांना योग्य पीपीई,एन९५ मास्क,डबल,ट्रीपल लेयर मास्क ईत्यादि ऊपलब्ध करून दिले पाहिजेत.
*महाराष्ट्र सरकारने वरळी येथिल नॅशनल स्पोस्टस् सेन्टर,रेस कोर्स पार्किंग प्लेस,सोमय्या ऊद्यानातिल जागा,गोरेगाव येथिल एनएससी च्या काहि जागेवर तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटल्स ऊभारण्याचा निर्णय घेतला आहे ते स्वागतार्ह आहे.ती हॉस्पिटल्स नंतरही सार्वजनिक रूग्णालये म्हणून कायम केली पाहिजेत.सरकारने आरोग्यावर जास्त खर्च केला पाहिजे.
*आता प्रश्न मुंबई मेट्रोपोलिटिएन रिजनचा मांडतो.यात मुबई,ठाणे,कल्याण डोंबिवली,नवी मुंबई पनवेल पर्यंतचा भाग येतो.मुंबईतिल नागरिक ऐरिलीपर्यंत कामाला जातात तसेच ठाणा,डोंबिवलीतिल माणसे ' मुंबई' ला कामाला येतात.त्या रिजनच्या प्रशासनामध्ये सूसूत्रता नाही.कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था पाहिजे.आता ती अपूरी आहे बसेसचे ड्रॉपही कमी आहेत व कर्मचाऱ्यांच्या राहणाच्या ठिकाणापासून दूर आहेत.
*काही प्रस्न केन्द्र शासनाच्या अखत्यारित येतात.मजूर,शेतमजूर,बांधकाम कामगार,ग्रामीण व शहरी कष्टकऱ्यांना प्रत्येकी ७ हजार रूपये द्यावेत,शेतकऱ्यांना एकरी ७ हजार रूपयांचे अर्थसहाय्य करावे,हमिभाव देणारी सरकारी केन्द्रे चालू करावी अशी आग्रही मागणी केन्द्र सरकारकडे प्रा.जोगेंद्र कवाडे सर व जयदीप कवाडे केली आहे.
ईतरांनी शेतिचे,बी बियाण्याचे प्रश्न सविस्तर मांडले आहेत ते मी रिपीट करत नाही.
*महाराष्ट्रात रिक्षा,टेम्पो,टॅक्सीचालक यांचे प्रश्न तीव्र आहेत त्यांना अर्थसहाय्य झाले पाहिजे.
त्याचप्रमाणे केन्द्र सरकारने महाराष्ट्राचा जीएसटीचा हिस्सा ताबडतोब द्यावा यासाठी सर्व राजकिय पक्षांनी एकजूटीने केन्द्राकडे मागणी करावी,महाराष्ट्राने एकजूट दाखवावी.या कोरोनाविरोधाच्या युद्धात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आपल्याबरोबर रहील.
याशिवाय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी खालील मुद्दे मांडले..
* मुंबईत मनपाचेच नव्हे तर महाराष्ट्रात सफाई कामगार कोरोना विरोधातिल युद्धात फ्रन्ट लाईनवर आहेत.त्यांना मास्क,ग्लोव्हज,सॅनिटायझेशनचा सतत पुरवठा झाला पाहिजे.त्यांना मास्क घरी घेऊन जा,धुआ व परत वापरा हे सांगितले जाते.ते कामगार चाळीत किंवा झोपडपट्टीत राहतात.मास्क घरी घेऊन गेले तर कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे.
सफाई कामगारांची पिरीऑडीकल टेस्टींग झाली पाहिजे.त्यांना३०० रु विषेश भत्ता दिला पाहिजे व कामावर येण्यासाठी बसेस ऊपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
*एमजीएम हॉस्पिटल सारख्या हॉस्प्पिटलचा ऊपयोग नॉन कोविड रुग्णासाठी करावा
*प्रत्येक विभागात एक आयएसए नोडल अधिकारी म्हणून नेमावा त्याने फिल्डवरही गेले पाहिजे.म्हणजे कोरोना विरोधी युद्धाअला सूसूत्रता येईल.
वरील सुचना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मुख्यमंत्री यांना करण्यात आली.

Sunday, 10 May 2020

पायी जाणाऱ्या परराज्यातील मजुरांच्या मदतीला प्रशासन.... जिल्ह्यधिकारी. नवल किशोर राम

Lok hitay news..







पुणे, दि.१०-
लॉकडाऊन मुळे अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार वाहनांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने
पायी प्रवास करीत आहेत. या नागरिकांच्या मदतीला प्रशासन धावून आले आहे. पुण्याचे उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पायी
 जाणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी ८ बसेस शिरूर येथून सोडल्या. त्यामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील २०० नागरिक रवाना झाले. नागरिकांना रवाना करण्यापूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी या सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला. पुणे ते  शिरूर रस्त्यावर मोठ्या संख्येने परराज्यातील नागरिक पायी चालत जात आहेत. उद्या सोमवारी ५० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आणखी बसेस उपलब्ध झाल्यास तसेही नियोजन केले जाईल, असे उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

Saturday, 9 May 2020

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सूक्ष्म नियोजन.. विभागीय आयुक्त. डॉ. दीपक म्हैसेकर

Lok hitay news.





पुणे,.लोक हिताय न्यूज. दि.९ : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून  जिल्हा रेड झोनमध्ये  आहे.  एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून  आणखी रुग्ण वाढणार नाहीत,यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्यासाठीप् प्रयत्न करावे,अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी  केल्या.
    विभागी आयुक्त आज सातारा जिल्हा दौऱ्यावर होते.कराड येथील विश्रामगृहात कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन काय उपायोजना करीत आहे, त्याचा सविस्तर आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
प्रतिबंधित क्षेत्र सोडून जिल्हाधिकारी हे लॉकडाऊनमध्ये सुट देत आहेत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर पुढे म्हणाले, शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बाजारपेठेंबाबत निर्णय घेतील. जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून युद्ध पातळीवर काम करीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी  रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी द्यावी.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आपल्याबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ, लहान मुलांची काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये.
कोरोना बाधित रुग्णांवर कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येतात. या मेडिकल कॉलेजला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार व सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी सविस्तर माहिती दिली.
कटेंनमेंट झोन असणाऱ्या  मलकापूर येथील अहिल्यानगर व सातारा येथील सदरबझार या भागाला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

Wednesday, 6 May 2020

जेष्ठ पत्रकार दिनकर देहाडे. यांचं दुःख निधन. इगतपूरी सह नाशिक जिल्ह्यात शोककळा

Lok hitay news



"                             . .      नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दूनबळे , दि. 6.मे.. इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात सुपरिचित असलेले सर्वच स्तरांची जान असलेले सामाजिक , राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील एक हुशार व्यक्तीमत्व गोरं गरिबांसाठी आहो रात्र झटणारे शेतकरी , प्रकल्पग्रस्त , भूमिहीन यांचे प्रश्न निःशुल्क मार्गी लावणारे असे निस्वार्थी हसतमुख  व्यक्तीमत्व , दै . लोकमत व दै . नवशक्तीचे पत्रकार , दैनिक लोकनायक चे उपसंपादक आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ता दिवंगत . दिनकर रामचंद्र देहाडे हे गेल्या दोन दिवसांपासून कॅन्सरसदुर्घ्य आजाराने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथील के . ई . एम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दुर्दैवाने त्या ठिकाणी कोरोना ग्रस्त रुग्ण असल्याने त्यांनाही त्यांची लागन झाली व त्यातच त्यांचा आज पाच वाजता अंत झाला .मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ५४होते तर त्यांच्या  पश्चात पत्नी व तिन अविवाहित मुली असल्याने या दुःखद निधनाने नाशिकजिल्यात इगतपुरी शहरासह  तालुक्यात याना मानणारा पञकार बांधव सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक जनसमुदाय मोठा होता त्याच्यां अकाली जाण्याने सवॅ परिसरातुन  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे........
. भावपुर्ण 🙏🙏🙏🙏🙏💐💐श्रद्धांजली....💐💐💐💐 लोक हिताय न्यूज. पुणे........ दिलीप देहाडे............... 

Monday, 4 May 2020

जागतिक महामारी च्या साथीमध्ये देहूरोड येथील साधना सेवाभावी संस्था, गरिबाच्या मदतीला आली धावून

.Lok hitay news..





मावळ. (Lok hitay news )दि .3/5/2020 रोजी जिवनावश्यक धान्याचे वाटप.
कोरोना या जागतीक माहामारी च्या साथी मध्ये. अत्यंत गरजू गरिबांना,  एकतीस मार्च दोन हजार वीस पासून हाताला रोजगार मिळत नसल्यामुळे, उपासमार होत असल्यामुळे साधना सेवा भावी संस्था देहू रोड या संस्थेने बालाजी नगर पावर हाऊस टेल्को रोड येथे गोर गरीब जनतेला १० किलो गहू आटा,२० किलो तांदूळ,तेल १किलो, सोयाबीन २ किलो,चनाडाळ ३ किलो, साखर १ किलो, चहा पाव किलो, मीरची पावडर ५०० ग्राम ,हळदी २५० ग्राम,मीठ १ किलो.इ.वस्तुचे किट तयार करून ५० गरजु कुटुंब ला सोशल डिस्टटं ठेवून तसेच प्रत्येकास स्यनीटाईज करून वाटप केले.
या वेळी संस्थेच्या डायरेक्टर सविता जाधव, तसेच विरमनी मनीकाम , सुनिता चौधरी व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.बालाजी नगर चे अविनाश भालेराव,नशीर शेख, संतोष कदम , अरविंद तरकसे इ.नी सहकार्य केले.
या प्रसंगी ज्यांना किट मिळाली त्यांनी संस्थेचे खुप आभार व्यक्त केले.व ज्या गरजुना मीळाली नाही त्यांना किट मीळण्यासाठी संस्थेंकडे मागणी केली.

मध प्रेमींचा बांध फुटला नाशकात उडाला सोशल डिस्टिंग चा फज्जा... तळीरामांचा एकच गोंधळ

"  Lok hitay news...








.
...                                                                           राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली ( त्यामुळे आज........नाशिक जिल्हा. प्र. शांताराम. दूनबळे...  ( 4 में ) पासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले आहेत . नाशिक मध्ये सकाळी सहा वाजेपासून मद्यप्रेमींनी वाईन शॉप बाहेर गर्दी केली . काही जण तर तीन चार तासांपासून रांगेत तात्कळत उभे आहे . अक्षरशा तळीराम दारू घेण्यासाठी तळ ठोकून बसले आहे . प्रत्येक जण चार ते पाच बॉटल खरेदी करणार असल्याची चर्चा तळीरामांनमधून निघत आहे . नाशिक शहरात रुग्ण संख्या मर्यादित असली तरी महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये आहे . रविवारी ( दि . ४ ) रात्री उशिरा जिल्हाधिका - यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि ऑरेंज झोनची यादी घोषित केली , त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत .रेङ झोन तालुके नाशिक   नांदगाव येवला मालेगाव निफाङ चादंवङ  सिन्नर तर ऑरेजं झोन मध्ये दिङोरी पेठ सुरगाणा ञ्यंबकेश्वर इगतपुरी कळवण बागलाण देवळा ह्या तालुक्याचां समावेश असुन  त्यातअत्यावश्यक सेवा असणा - या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले आहे . झेरॉक्स व स्टेशनरी , हार्डवेअर , गॅरेज , वाहनांचे शो रूम , सर्व्हिस स्टेशन्स आणि अन्य अनेक दुकाने सुरू झाले आहे . विशेष म्हणजे शहरातील अनेक मद्य दुकाने सुरू होताच तळीरामांनी गर्दी केली होती . नाशिकरोड येथील दत्त मंदिर आणि जीपीओ जवळील एका मद्य दुकानात रांगा लागल्या असून , फिजिकल डिस्टसिंगचा पूर्णत : फज्जा उडाला आहे .



उच्चं स्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे विभागाचा आढावा.......

Lok hitay news...







    पुणे, lok hitay news. दि.4: कोरोनाचा संसर्ग वाढू नये ,यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या.
  विभागीय आयुक्त  कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना यासाठी भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर आदी उपस्थित होते.
  डॉ. गडपाले म्हणाले, पुणे शहरातील महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या केंद्रीय पथकाने आज पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हयात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.
         

Sunday, 3 May 2020

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने, रस्त्यावरती डीवाईडर झाडावर. पाणी फवारणी करण्यात यावी.... मातोश्री संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांची मागणी

. Lok hitay news...







दि. 3.मे... (लोक हिताय न्यूज.. )पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान विभागाने त्वरीत रस्त्याच्या मध्ये भागे डिवायडर मध्ये लावलेल्या झाडांना पाणीच्या टँकरच्या माध्यमातून एक दिवस आड तरी पाणी घालावी आशी मागणी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर हे महापालिका उद्यान विभागाकडे करत आहेत.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊंड असल्या कारणांने ह्या वर्षी माञ उन्हाळ्याचा महिना सूरू होवूनही महापालिका उद्यान विभाग झाडांना पाणी घालत नसल्यांने पाण्याअभावी झाडे जाळून खाक होत आहेत.

झाडांकडे दुर्लक्षित केल्यांने मोठया प्रमाणात झाड सुकून पडले आहेत. महापालिका उद्यान विभागाने त्या त्या प्रभागात झाडांना पाणी घालण्याचे आदेश द्यावेत असे गणेश आहेर. गोरख पाटील. गणेश पाडूळे. यांनी मागणी केले आहे 

कोरोना योद्धांना भारतीय सेना दलाची मानवंदना, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार

Lok hitay news..








            पुणे, (लोक हिताय न्यूज. )दिनांक ३- देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्यनेमाने  आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना यौद्धा आहेत. दरम्यान त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने आज संपूर्ण देशभरात आकाशातून पुष्पवृष्टी करत कोरोना यौद्धांचा सन्मान केला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय सैन्य दलाच्या विशेष विमानाने पुष्पवृष्टी केली. पुण्यातही कोरोनावर उपचार करणा-या रुग्णालयावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचे मेजर जनरल नवनीत कुमार यांनी व्यक्त केले. तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचा त्यांनी विशेष गौरव केला. 
                 विभागीय आयुक्त कार्यालयात प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
          मेजर जनरल नवनीत कुमार म्हणाले, कोरोनाच्या लढाईतील यौध्दांना बळ देणे हे आपले कर्तव्य असून पुणे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या 22 जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी सतत कार्यरत आहेत, सोबतच लॉकडाऊनच्या काळात शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी देखील अत्यंत समन्वयाने कार्य करत आहेत,या सेवा देणा-या कोरोना सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे आजच्या  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भारतीय सैन्य दलाच्या या उप्रकमाबाबत आभार व्यक्त केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव,उपायुक्त ( सामान्य ) संजयसिंह चव्हाण,उपायुक्त जयंत पिंपळगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे, तहसिलदार मीनल भोसले,  सहा.उप संचालक ( आरोग्य) आडकीकर, उपसंचालक खांडकेकर,तहसिलदार मनिषा देशपांडे, लेखा अधिकारी गणेश सस्ते, नायब तहसिलदार बाळासाहेब क्षिरसागर, स्वीय सहायक अनिकेत जोशी, स्वीय सहायक संजय भुकण, अर्चना फडणीस, लिपीक सचीन सांगडे, वाहनचालक बाळु खाडे, शिपाई गुलाब गिजरे शिपाई शरद टेकवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 1 May 2020

नाशिक मालेगावपोलीस ठाण्यातील, दोन्ही किडनी चा प्रॉब्लेम असणारा पोलीस दलातील युद्धा. कोरोना च्या सामना करत आपली ड्युटी करत आहे,,,

.Lok hitay news.




नाशिक जिल्हा.प्र.शांताराम दूनबळे. दि. 1.मे. - अदृश्य शत्रू असलेल्या करोना युद्धात अनेक जण उतरले असून या सर्वांचा एकच ध्येय आहे . तो करोनाला देशातून हद्दपार करने , या युद्धात इतर घटका सोबत पोलीस देखील महत्वाची भूमिका बजावत असून आपले जीव धोक्यात घालून पोलीस रात्र - दिवस आपले कर्तव्य बजावत आहे . पोलीस दलातील राजेंद्र सोनवणे नावाचा एक योद्धा असून त्याला किडनीचा आजार असल्याने आठवड्यातून दोन वेळा त्याला डायलिसिस घ्यावे लागते मात्र असे असताना देखील हा करोना वारीयर्स मालेगावात रोज आपले कर्तव्य बजावत आहे . राजेंद्र सोनवणे हा मूळ मनमाडचा त्याचा लहानपण मनमाडच्या जमधाडे चौकात गेलं . चांगली उंची आणि धष्टपुष्ट शरीरयष्टी चांगली उंची आणि धष्टपुष्ट शरीरयष्टी असल्यामळे तो ३३ वर्षा पूर्वी पोलीस दलात दाखल झाला . वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर सध्या हा पोलीस जवान मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात ते ऑन ड्यटी आहे . काही वर्षा पूर्वी त्याला किडनीचा आजार झाला असून त्याची एक किडनी पूर्णपणे निकामी झाली तर दसरी पण निकामी होण्याच्या मार्गावर असल्याने तो गेल्या चार वर्षापासुन डायलिसीसवर आहेत . आठवड्यातून दोन वेळा यासाठी त्याला दवाखान्यात जावे लागते . देशात कोरोनाचे आगमन झाले मालेगावात देखील कोरोनाची लागण झाली आणि पाहता पाहता मालेगाव हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला . त्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला . अगोदरच पोलिसांची सख्या कमा त्यात कारानामुळे संख्या कमी त्यात कोरोनामुळे कामाचा वाढलेला ताण पाहून राजेंद्र सोनवणे याच्यातील पोलीस जागा झाला आणि स्वता मृत्यूशी झुंज देत असतांना हा पठ्ठा आपले कर्तव्य निभावण्यासाठी मैदान उतरला असून सध्या कॅम्प परिसरात रावळगाव नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहे . त्याचा आजार पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला कामावर न येण्याचा केवळ सल्लाच दिला नाही तर मनाई केली आहे .मात्र माझ्या मालेगाववर करोनाचे मोठे संकट आले असताना मी घरात बसून गंमत कशी पाहू शकतो शेवटी मी पोलीस आहे माझ काम लोकांचे रक्षण करण्याचे आहे . त्यामुळे मला काम करण्याची मुभा देण्यात यावी अशी त्याने वरिष्ठांना विनंती केली त्याची तळमळ पाहता अधिकाऱ्यांनी देखील त्याला झेपल अस काम दिल . . राजेंद्र सोनवणे सारखे असंख्य पोलीस अधिकारी , कर्मचारी , डॉक्टर , महापालिका , पालिका , ग्रामपंचायत मधील अधिकारी , कर्मचारी , सफाई कामगार यांसह इतर अनेक घटक आपले जीव धोक्यात घालून आहोरात्र आपले कर्तव्य बजावत असून हे सर्व करोना योद्धे ( वारीयर्स ) आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही