Lok hitay news..
पुणे, दि.१०-
लॉकडाऊन मुळे अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार वाहनांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने
पायी प्रवास करीत आहेत. या नागरिकांच्या मदतीला प्रशासन धावून आले आहे. पुण्याचे उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पायी
जाणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी ८ बसेस शिरूर येथून सोडल्या. त्यामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील २०० नागरिक रवाना झाले. नागरिकांना रवाना करण्यापूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी या सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला. पुणे ते शिरूर रस्त्यावर मोठ्या संख्येने परराज्यातील नागरिक पायी चालत जात आहेत. उद्या सोमवारी ५० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आणखी बसेस उपलब्ध झाल्यास तसेही नियोजन केले जाईल, असे उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment