Tuesday 26 May 2020

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उद्योजक अनिल आसवानी आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते

Lok hitay news...






पिंपरी (लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे. )(26 मे 2020) : कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बहुतांश सर्वच रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध संस्थांना व रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून पिंपरी चिंचवडमधील युवा उद्योजक अनिलशेठ आसवानी आणि मित्रपरिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पिंपरी कॅम्प येथील संत कंवरराम बुड्डा मंडळी ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये पिंपरी कॅम्पमधील दिव्यांग सेल्समन दीपक शिघे यांनी देखील रक्तदान करून इतरांचा उत्साह वाढविला. संकलित झालेले रक्त पिंपरीतील पिंपरी चिंचवड सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट या रक्तपेढीत देण्यात आले. रक्तदान शिबिराच्या आयोजनात महेश नागरानी, प्रकाश समतानी, धनेश तलरेजा, जगदीश आसवानी, शशिकिरण यादव, अनिल तांबे, सुनील घोगिया, सुनील छुगानी, पवन रामनानी, दीपक पंजवानी, ईश्वर राजानी आदींनी सहभाग घेतला होता.
दिव्यांग रक्तदाते सेल्समन दीपक शिघे यांचा आयोजक अनिलशेठ आसवानी यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला.
-------------------------------

2 comments:

  1. खूपच छान उपक्रम आयोजक अनिल आसवानी व लोकहिताय टीम ला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन

    ReplyDelete