Friday, 5 November 2021

काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड अल्पसंख्य शहर अध्यक्ष शाहबुद्दिन शेख यांनी पत्रकारांना दिवाळीची भेट वस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

पिंपरी.5. नोव्हेंबर. (Lok hitay news )पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)  काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने दिवाळी पत्रकार बंधु यांना भेट देऊन साजरी करण्यात आली, याप्रसंगी निर्भय पत्रकार चे संपादक कलिंदर (मामू)शेख,रिपब्लिक गर्जना चे संपादक दिलीप देहाडे, रिपब्लिकन आवाज चे संपादक मनोज डंबाळे, वास्तव चक्र चे संपादक दिपक श्रीवास्तव यांना दिपावली चे शुभेच्छा दिल्या. 
     या वेळी शहर उपाध्यक्ष हर्षद ओव्हाळ, संजीवनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इम्रान बेग, उपाध्यक्ष  इर्शाद ‌सय्यद,काँग्रेस भोसरी ब्लॉक उपाध्यक्ष वैभव गरूड व सामाजिक कार्यकर्ते योगेश सोनवणे उपस्थित होते.

Wednesday, 13 October 2021

विश्वकल्याण कामगार संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी यशवंतभाऊ भोसले


पिंपरी, 13 ऑक्टोबर (Lok hitay news )- राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय राष्ट्रीय संघटनेचे वरिष्ठ  उपाध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची विश्वकल्याण कामगार संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी निवड करण्यात आली. कामगारांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने मदत करण्याची ग्वाही भोसले यांनी दिली.

 विश्वकल्याण कामगार संघटना आकुर्डीतील बजाज ऑटो लिमिटेड कंपनीत सन 2003 पासून कार्यरत आहे. संघटनेची स्थापना रावसाहेब शिंदे यांनी केली. संघटनेने आजपर्यंत कामगार हिताची खूप कामे केली. आजही रावसाहेब शिंदे यांच्या तत्वांनी संघटनेचे कामकाज चालते. सन 2007 मध्ये रावसाहेबांचे आकस्मिक निधन धाले. त्यांच्या मृत्यूनंतर बजाज ऑटो लिमिटेड येथे सन 2008 साली व्यवस्थापनाने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्यामध्ये 2700 कामगारांपैकी जवळपास 2400 कामगार स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेर पडले. जेमतेम 300 कामगार कंपनीत राहिले. रावसाहेबांनंतर संघटनेस कमकुवत स्वरुपाचे नेतृत्व लाभले. चुकीच्या निर्णयांनी कामगारांचे खूप नुकसान झाले. संघटनेस कामागारांसाठी दीड ते दोन कोटी मोजावे लागले. प्रामाणिक सभासद, कार्यकर्ते, कमिटी सदस्य, कार्यकारिणी सदस्य यांच्या सापत्नभावाची वागणूक मिळत गेली.

संघटनेच्या सभासदांवर अन्यायकारक वागणूक सुरु झाली. युनियन स्थापनेपासून सोबत असणा-या पदाधिका-यांना युनियन मधून काढले. स्वार्थी लोकांची टोळी तयार केली. कोणतीही चूक नसताना सभासदत्व रद्द केले. याला कंटाळून आकुर्डीतील कामगारांनी स्वतंत्र कामकाज करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे स्वतंत्र कमिटी, कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.

कामगार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले व तळागाळातील कामगारांसाठी तळमळीने काम करणारे, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, नॅशनल फ्रंट ऑफ इंडिया ट्रेड युनियन या राष्ट्रीय संघटनेच्या केंद्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी असलेले कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी निवड करण्यात आली. संघटनेला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन राहणार आहे. संघटनेने त्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. याबाबतची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब थोरवे यांनी दिली.

Thursday, 7 October 2021

झुंज शहराध्यक्ष पदाची

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले. पिंपरी-चिंचवड.दि.7/(Lok hitay news. Dilip dehade )शहराध्यक्ष पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार आहे  दोन उमेदवार. वरिष्ठ नेत्यांच्या  अस्मितेची लढाई जनतेला पाहायला मिळते नंबर एक. स्वप्निल कांबळे यांची निशाणी कप बशी. नंबर दोन उमेदवार कुणाल वाव्हाळकर यांची निशाणी उगवता सूर्यआहे.येत्या 10 ऑक्टोंबर रोजी लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. प्रथम गटाचे नेत्या चंद्रकांत सोनकांबळे. दुतीय गटाच्या नेते  बाळासाहेब भागवत या प्रकारामध्ये चांगलीच झुंजत झोपलेली पाहायला मिळते पक्षाचे सदस्य नोंदणी दोन हजारापर्यंत असून यात मात्र चितपट कोण करणार याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे या दोन गटाचा सामना खऱ्या अर्थाने 10 ऑक्टोंबर रोजी पाहायला मिळेल

काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड शहरात सेनापती मिळाला डॉक्टर कैलास कदम यांच्या रूपाने

.

पिंपरी .दि,0७/ ऑक्टोंबर. (लोक हिताय न्यूज. दिलीप देहाडे )
 गेल्या अनेक दिवसापासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्ष अध्यक्ष नसणारा पक्ष म्हणून समोर येत होता अशा वेळेस सर्व काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराच्या नेत्यांनी अंग झटकून घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्ष वरती अत्यंत दुरवस्था झालेली होती तरीदेखील गटातील राजकारणाला वेळोवेळी बाजूला ठेवून डॉ. कैलास कदम यांची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या देशातील कामगार कायद्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महागाईच्या विरोधात अनेक वेळा धरणे आंदोलन केले त्यातून पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कामगारांना गोरगरीब जनतेला न्याय मिळावी या भूमिकेतून सातत्याने प्रयत्न करणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत शहरातील नेते डॉ. कैलास कदम यांचं मोलाचे योगदान या शहरात पाहायला जनतेला मिळालं आणि जनतेला अपेक्षित असणारा नेता व शहराध्यक्ष. डॉ.कैलास कदम यांच्या रुपाने मिळाला मुळे पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं

Thursday, 26 August 2021

कर्ज बुडव्यांवर कारवाई करा, कामगारांना संरक्षण व नोकरीची हमी द्या.....रश्मी मंगतानी

पिंपरी (लोक हिताय न्यूज )(दि. 26 ऑगस्ट 2021) पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात कार्यविस्तार असणा-या दि सेवा विकास बँकेवर आरबीआयने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. जून महिण्यात बँकेच्या चाचणी लेखा परिक्षणात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, यापुर्वी संचालक मंडळाने निर्णय घेऊन दिलेली काही कर्जे फसवी आहेत. त्यामुळे अशा अनेक खात्यांची वसूली ठप्प झाली आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला आहे. बँकेची तरलता कमी होत आहे. पर्यायाने ठेवीदार व खातेधारकांना त्यांची रक्कम देणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. या फसव्या कर्जामुळे आणि ठेवीदारांना द्यावयाच्या रक्कमेमुळे बँकेचे अधिकारी व कर्मचारी दबावात आहेत. आम्हा कर्मचारी व अधिका-यांना माजी संचालक तुरुंगात टाकले जाईल अशी धमकी देत आहेत. आम्हाला आमच्या संरक्षणाबाबत व नोकरीबाबत हमी द्यावी, अशी मागणी दि सेवा विकास बँकेच्या महाव्यवस्थापक रश्मी मंगतानी यांनी अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
         गुरुवारी (दि. 26 ऑगस्ट) पिंपरी कॅम्पमधील दि सेवा विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात अधिकारी व कर्मचा-यांनी निदर्शने केली. यानंतर रश्मी मंगतानी यांच्या समवेत शिष्ठमंडळाने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भेटून निवेदन दिले.
      मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या दि सेवा विकास बँकेच्या एकूण पंचवीस शाखा असून दहा हजारांहून जास्त सभासद आहेत. जून महिण्यात भारतीय रिजर्व्ह बँकेचे महाप्रबंधक संजय कुमार यांनी या बँकेवर प्रशासकाची गणेश एस. आगरवाल नियुक्ती केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामकाजात अनेक त्रूटी व अनियमितता दिसून आल्याने प्रशासक नेमण्याचा आदेश काढण्यात आला. बँकेच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरुन माजी अध्यक्षासह संचालकांवर फौजदारी कारवाई सुरु आहे.
        मार्च 2018 मध्ये बँकेमध्ये एकूण ठेवी (सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये) 823.42 कोटी इतक्या रक्कमेच्या होत्या त्या कमी होऊन 31 मार्च 2021 (लेखा परिक्षण बाकी आहे) 409.49 कोटी पर्यंत कमी झाल्या आहेत. तर नेट एनपीए 31 मार्च 2018 ला 136.66 कोटी (32.08%) होता. तो आता 31 मार्च 2020 अखेर 114.23 कोटी (34.65%) इतका आहे. तसेच या बँकेचे आठ हजारांहून जास्त सभासद आहे. बँकेत होणा-या अनियमित व्यवहारांबाबत माजी अध्यक्ष धनराज नथुराज आसवाणी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये तीव्र आक्षेप घेत संचालक मंडळाने कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तत्कालीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे सतिश सोनी यांनी लेखा परिक्षण करण्याचे आदेश दिले होते 

Wednesday, 11 August 2021

महापालिका आयुक्त श्री राजेश पाटील यांचे उल्लेखनीय काम; कामगार नेते यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले आयुक्तांचे कौतुक पिंपरी, 11 ऑगस्ट (लोक हिताय न्यूज )- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री राजेश पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा नियंत्रणात आला. मृत्यूदर घटला आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे संयमाने परिस्थिती हाताळत असून राज्यातील जनतेला योग्य मार्गदर्शन करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात यशवंतभाऊ भोसले यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड महापालिकेने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याकरिता कमालीची जागरुकता केली. शहरातील रुग्णालयांमध्ये प्रचंड सुधारणा केली. त्यामुळे कोरोनाच्या नवीन रुग्णांचा दर 100 च्या आतमध्ये आला. रिकव्हरी रेटही वाढला. मृत्यूचे प्रमाण घटले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण करत असलेले मार्गदर्शन हे उपयोगी पडत आहे. त्याबद्दल आपले मनस्वी आभार.पिंपरी-चिंचवड शहरामध्ये श्री राजेश पाटील यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा नियंत्रणात आला. जनजागृती, आरोग्य विभागावर उत्तम पकड, शहराची स्वच्छता या अनेक संबंधित विभागात शिस्तबद्ध कार्यक्रम राबविला. त्यांच्या कार्यकुशलते बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद! राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या विनंतीला मान देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) साफसफाईच्या निविदेस स्थगिती देऊन 217 कोरोना योद्ध्यांच्या आयुक्तांनी नोक-या वाचविल्या. त्यानिमित्त संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन आभार मानले.महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कॉरीडॉर, अंतर्गत, बाह्य परिसरातील रस्ते, गार्डन, डक्ट, ड्रेनेज लाईनची साफसफाई व स्वच्छता हे काम ठेकेदाराकडून ठेकेदाराची स्वत:ची अत्याधुनिक उपकरणे, रसायने व मनुष्यबळाचा वापर करुन यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करुन घेण्याची ई-निविदा प्रसिद्ध केली होती. 1 ऑगस्टपासून नवीन कामकाज सुरु करण्याचा आदेश दिला होता. परंतु, कोरोना काळात काम करणारे 217 कंत्राटी कर्मचारी बेरोजगार होणार होते. त्यांच्या नोक-या जाणार होत्या. कंत्राटदार कोणीही असेल तरी चालेल. त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. फक्त कोरोना काळात काम करणा-यांच्या नोकऱ्या जाऊ नयेत. त्यांना बेरोजगार करू नये आणि त्यांचे वेतन कमी होऊ नये. या 217 कोरोना योद्ध्यांच्या नोक-या वाचविण्याची राष्ट्रीय श्रमिक आघाडीने विनंती केली होती. त्याला मान देत निविदेस स्थगिती दिली आणि 217 कर्मचा-यांच्या नोक-या वाचविल्या त्याबाबत भोसले यांनी आयुक्त पाटील यांचे आभार मानले....

Wednesday, 19 May 2021

तानाजी पवार अपहरण प्रकरणात दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात......

चिंचवड , दि.१९ (लोक हिताय न्यूज ) –  एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार यांचे अपहरण करून त्यांच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आणखी दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती.

साजिद महिबुब शेख (वय २१, रा. अल्फाइन गार्डन सोसायटी बिल्डींग नंबर फ्लॅट नंबर २०४, गणेश मंदिराजवळ कृष्णा नगर म्हेत्रे वस्ती चिखली पुणे), रोहित अशोक कुसाळकर (वय २०, रा. पवार चाळ राम मंदिराच्या पाठीमागे राम नगर चिंचवड पुणे) अशी खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुलतान इम्तीयाज कुरेशी (वय २०, रा. आंनदनगर, चिंचवड), रोहीत उर्फ सोन्या गोरख भोसले (वय २०, रा. गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी, चिकन चौक, ओटास्किम, निगडी) यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस शिपाई मगर, गारगोटे असे वरील गुन्ह्यातील आरोपींचा पिंपरी, चिंचवड, चिखली आणि निगडी परिसरात शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी साजिद आणि रोहित मंगळवारी (दि. १८) चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डन समोर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली.

काय आहे अपहरण आणि खुनी हल्ला प्रकरण –

११ मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी पवार आमदार बनसोडे यांना उलटे बोलले असल्याचा समज झाल्याने १२  मे रोजी सकाळी ११ वाजता तानाजी पवार यांचे हेडगेवार भवन, आकुर्डी येथील त्यांच्या ऑफिसमधून बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले.(Lok hitay news )

तानाजी पवार यांचे अपहरण करून त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे १० ते १५ साथीदारांनी पवार यांना हाताने, लथाबुक्क्यांनी, चामडी पट्टयाने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून पवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत तानाजी पवार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेची सुरुवात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकुर्डी येथे झाल्याने हा गुन्हा पिंपरी पोलिसांकडून निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यात पोलिसांनी दोन दिवसात दोघांना तर त्यांनतर आणखी दोघांना अटक केली. खंडणी विरोधी पथकाने... (Lok hitay news )

Monday, 3 May 2021

खुना चि धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई करा. सुरेश निकाळजे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या प्रमाणे....



 दि, 3  मे..( Lok hitay news )माझा खुन होण्याच्या शक्यते मुळे व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या भीती मुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात २४ राहण्याची परवानगी मिळणेबाबत अथवा पोलीस सुरक्षा मिळणेबाबत.
  मी सुरेश निकाळजे राहणार सुभेदार रामजी आंबेडकर नगर वैशाली हौसिंग सोसायटी बिल्डिंग Q फ्लॅट नंबर 3 डीलक्स मॉल समोर पिंपरी कॅम्प.
मी गेली २५ वर्ष आंबेडकरी चळवळीत काम करत आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष या पदा वर मागील दीड वर्षा पासून काम करीत आहे. मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. मी पिंपरी चिंचवड मधील अनेक अवैध धंद्या विरुद्ध आपल्या आयुक्तालयात तक्रार केली असून वेळोवेळी अवैध धंद्या विरुद्ध आंदोलने ही केली आहेत त्याचाच राग धरून अवैध धंदे करणारे आसवाणी टोळी ने वेळोवेळी मला जीवे ठार मारण्याची  धमकी देणे तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न चालू केले व काही खोट्या गुन्ह्यात अडकविले देखील. मी वेळोवेळी आपल्या आयुक्तालयात आसवाणी टोळी तील प्रमुख सदस्य श्रीचंद आसवाणी, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, राजू आसवाणी, अनिल आसवाणी, धनराज आसवाणी, हरेश आसवाणी लकू भोजवानी, विनोद भोजवानी, यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिले आहेत परंतु आसवाणी टोळी चे पिंपरी चिंचवड तील अनेक पोलीस अधिकारी यांच्याशी आर्थिक संबंध असल्याने माझ्या तक्रार अर्जाची दाखल कोणीही घेतली नाही.नुकतेच मी त्यांच्या अवैध दारू विक्री ची तक्रार आपल्याकडे केली त्यानुसार आपण त्या अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर कारवाई केली त्याचाच राग धरून मी राहत असलेल्या ठिकाणी येऊन वरील गुंडानी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मी त्या गुंडां विरुद्ध तक्रार अर्ज देऊनही माझी तक्रार अजूनही पिंपरी पोलीसांनी घेतली नाही. तसेच आसवाणी टोळी ने पिंपरी पोलीस यांच्याशी संगणमत करून 14 निराअपराध तरुणांना खोट्या खुनाच्या गुन्ह्यात अडकविले मलाही या खुनाच्या गुन्ह्यात पिंपरी पोलीस व आसवाणी टोळी अडकविन्याचा प्रयत्न करीत होते परंतु मी दिनांक २९/०४/२१ ते ३०/०४/२१ रोजी एका लग्न कार्यासाठी उस्मानाबाद येथे गेलो असल्याने माझे नाव या खोट्या खुनाच्या गुन्ह्यात गोवता आले नाही. तरी आयुक्त साहेब मी आपणास नम्र निवेदन करतो की माझा खुन होण्याच्या शक्यते मुळे व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या भीती मुळे  मला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात २४ राहण्याची परवानगी मिळावी अथवा पोलीस सुरक्षा मिळावी ही विनंती 

Saturday, 17 April 2021

कोरोना रुग्णांसाठी अंडी शेंगदाण्याचे लाडू व चांगल्या दर्जाचे जेवण मिळेल. ऍड. नितीन लांडगे

पिंपरी (दि. 17 एप्रिल 2021) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल असणा-या रुग्णांना आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्रात (इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन सेंटर - ट्रिपल सी) दाखल असणा-या रुग्णांना अंडी आणि शेंगदाण्याचा लाडूचा समावेश असणारे चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येणार असल्याची महिती पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
         गुरुवारी (दि. 15 एप्रिल) स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सदस्य मिनलताई यादव, निता पाडाळे, सुलक्षणा शिलवंत - धर, शशिकांत कदम यांनी कोरोनाच्या उपचारासाठी दाखल रुग्णांना प्रोटीन युक्त आहार देण्याची आणि जेवण पुरवणा-या संस्थांची महागाई आणि इंधन दरवाढ झाल्यामुळे दरवाढ करुन देण्याची मागणी विचारात घ्यावी अशी मागणी केली. जेवण देणारे पुरवठादार मागील एक वर्षापासून प्रती मागणी 180 रुपये प्रमाणे सेवा देत आहेत.
        पिंपरी चिंचवड मनपाच्या वायसीएम, नविन भोसरी, आकुर्डी, जीजामाता, तालेरा आणि जम्बो कोविड रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी हजारो रुग्ण दाखल आहेत. येथिल रुग्णांना आणि कर्मचा-यांना गरजेनुसार दोन वेळचे जेवण, दोन वेळचा चहा, एक वेळचा नाष्टा आणि दोन पाण्याच्या बाटल्या देण्यात येतात. जेवणामध्ये चपाती, भाजी, भात, सॅलड यांचा समावेश असतो. या जेवणात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करावा, अशी मागणी सदस्यांनी केली होती. प्रतिदिन, प्रतिमाणसी रुपये 180/- हा दर मागिल वर्षीचा आहे. बारा महिण्यात वाढलेली महागाई, इंधन दरवाढ विचारात घेऊन पुरवठादारांना प्रतिमाणसी, प्रतिदिन पन्नास रुपयांपर्यंत दरवाढ आणि या जेवणात रोज अंडी आणि शेंगदाण्याच्या लाडूचा समावेश करण्यात यावा असा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. या पुरवठादारांच्या जेवणाचा दर्जा चांगला रहावा यासाठी आयुक्तांनी भरारी पथक नेमावे. असेही या बैठकीत ठरले. अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
----------------------------

Wednesday, 10 March 2021

पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा मा.अतुलसिंह परदेशी यांची निवड झालेली आहे 🌹🌹


पुणे, दि /10, मार्च. (Lok hitay news )
    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली असल्याची माहीती सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली...
    अतुलसिंह परदेशी हे मागील पंधरा वर्षांपासून पत्रकारीतेत आपले अमूल्य असे काम करीत असून गेल्या पाच वर्षांपासून आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवत पत्रकार बांधवांच्या समस्यासाठी ते नेहमी आग्रेसर राहीले आहे त्यामुळे वृत्त वाहिनी संघाचे अध्यक्ष रणधीर कांबळे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी त्यांची निवड पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी निवड केली असल्याची माहीती राज्य सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली...
    पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या सलग तिस-यादा अतुलसिंह परदेशी यांची निवड झाल्याने कामगार फलोत्पादक मंत्री दिलीपराव वळसे पाटील मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारने शिरूर चे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आमदार महेश दादा लांडगे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप अन्ना बनसोडे दिलीपराव मोहिते पाटील अतुल बेनके मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या...
    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तिस-यांदा पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाची जबाबदारी दिले आहे ती चोख पार पाडून पत्रकार बांधवांचे प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या तसेच पत्रकार संघाचा विस्तार करणार असल्याचे अतुलसिंह परदेशी यांनी सांगितले...

Friday, 12 February 2021

मानवता हिताय सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या *मानवता हिताय चषक 2021.

पिंपरी.. दि 12/ फेब्रुवारी,   (लोक हिताय न्यूज)    पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातून वीस संघाने सहभाग घेतलेला आहे . स्पर्धेचा वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग क्रिकेटपटुंचा मानवता हिताय सोशल फाउंडेशन तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
 भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नगरसेविका सौ सुलक्षणा शिलवंत धर, सौ गीता मंचरकर व वरिष्ठ वकील मा. श्री सुशील मंचरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच ह्या वेळी युवा नेतृत्व सार्थ पालांडे 
स्पर्धेचे आयोजक व मानवता हिताय सोशल फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, आरिफ भाई शेख, राजेश चौहान, अभिजीत गोफण, सुरेश जाधव, मनोज रेड्डी, तुषार पास्कल, सलमान शेख, प्रदीप वंजारे, युवराज जाधव, शंकर उनवणे, अक्षय साबळे, अज्जू धोत्रे,अतुल धोत्रे, अमित माने, अमोल माने, कृष्णा पवार  व इतर खेळाडू उपस्थित होते.

Tuesday, 26 January 2021

विठ्ठल नगर मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा, राहुल भाऊ भोसले युवा मंच यांच्या वतीने


दि,26 जानेवारी.( Lok hitay news.)
"राहुलभाऊ भोसले युवामंच यांच्या वतीने  ध्वजरोहण "
विट्ठलनगर येथील कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले युवामंच यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजरोहण नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
"बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देश एकसंध आहे, बाबासाहेबांच्या संविधानमुळेच तळागळातील नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत." असे प्रतिपादन राहुलभाऊ भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी न्यानोबा धावारे,अशोक देवकर,किशोर गवळी,अशोक बनसोडे,दत्ता जाधव,संजय जाधव,विनोद गायकवाड़,बापू सावंत,सुनील नलावडे, तिम्मा टाकळे,महादेव अडसुळे,साहेबराव इनकर,श्याम धोत्रे,दत्ता ढोबळे,सुनीता पाटोळे, स्नेहलता पाटोळे,मीरा वाघमारे, छाया राव व युवमंचाच्या सर्व सदस्यनी परीश्रम घेतले.

Sunday, 10 January 2021

रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब


 
         पुणे,  दि. 10 (लोक हिताय न्यूज .प्रतिनिधी. दिलीप देहाडे  ): रक्तदान करणे हे एक मोठे काम असून यामुळे एखादया दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले.
  पुण्यातील कोंढवा येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन श्री.सत्तार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे,माजी आमदार महादेव बाबर, कारी मोहम्मद इदरीस,माजी स्थायी समिती सदस्य रसिद शेख, अलाहद इब्राहिम भाई, उस्मान तांबोळी, नदीम मुजावर, नगरसेवक  गफूर पठाण, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
  राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आल्याने            मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केलेले असून रक्तदान करणे हे एक मोठे काम आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. अशा रुग्णालयांवरही आपण सर्वांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे. राज्यातील गोर गरिबांना मदत करणे महत्वाचे आहे. या शिबिराच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्वांना व रक्तदात्यांना मी मनापासून  शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले.
  यावेळी लॉकडाऊन कालावधीत ज्यांनी चांगले काम केले त्यांचा सन्मानही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. 
  आमदार चेतन तुपे म्हणाले, कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आला आहे. मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून या ठिकाणी रक्तदान शिबीराच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. हे फार महत्त्वाचे असून यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचू शकतो. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहभाग घेताला अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो.
  यावेळी माजी आमदार महादेव बाबर, अलाहद इमब्राहिम भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारी मोहम्मद इदरीस यांनी केले तर सुत्रसंचालन सोयब अन्सारी यांनी केले. यावेळी रक्तदाते, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते