Wednesday, 19 May 2021

तानाजी पवार अपहरण प्रकरणात दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात......

चिंचवड , दि.१९ (लोक हिताय न्यूज ) –  एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार यांचे अपहरण करून त्यांच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आणखी दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती.

साजिद महिबुब शेख (वय २१, रा. अल्फाइन गार्डन सोसायटी बिल्डींग नंबर फ्लॅट नंबर २०४, गणेश मंदिराजवळ कृष्णा नगर म्हेत्रे वस्ती चिखली पुणे), रोहित अशोक कुसाळकर (वय २०, रा. पवार चाळ राम मंदिराच्या पाठीमागे राम नगर चिंचवड पुणे) अशी खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुलतान इम्तीयाज कुरेशी (वय २०, रा. आंनदनगर, चिंचवड), रोहीत उर्फ सोन्या गोरख भोसले (वय २०, रा. गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी, चिकन चौक, ओटास्किम, निगडी) यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस शिपाई मगर, गारगोटे असे वरील गुन्ह्यातील आरोपींचा पिंपरी, चिंचवड, चिखली आणि निगडी परिसरात शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी साजिद आणि रोहित मंगळवारी (दि. १८) चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डन समोर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली.

काय आहे अपहरण आणि खुनी हल्ला प्रकरण –

११ मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी पवार आमदार बनसोडे यांना उलटे बोलले असल्याचा समज झाल्याने १२  मे रोजी सकाळी ११ वाजता तानाजी पवार यांचे हेडगेवार भवन, आकुर्डी येथील त्यांच्या ऑफिसमधून बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले.(Lok hitay news )

तानाजी पवार यांचे अपहरण करून त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे १० ते १५ साथीदारांनी पवार यांना हाताने, लथाबुक्क्यांनी, चामडी पट्टयाने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून पवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत तानाजी पवार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेची सुरुवात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकुर्डी येथे झाल्याने हा गुन्हा पिंपरी पोलिसांकडून निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यात पोलिसांनी दोन दिवसात दोघांना तर त्यांनतर आणखी दोघांना अटक केली. खंडणी विरोधी पथकाने... (Lok hitay news )

No comments:

Post a Comment