दि, 3 मे..( Lok hitay news )माझा खुन होण्याच्या शक्यते मुळे व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या भीती मुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात २४ राहण्याची परवानगी मिळणेबाबत अथवा पोलीस सुरक्षा मिळणेबाबत.
मी सुरेश निकाळजे राहणार सुभेदार रामजी आंबेडकर नगर वैशाली हौसिंग सोसायटी बिल्डिंग Q फ्लॅट नंबर 3 डीलक्स मॉल समोर पिंपरी कॅम्प.
मी गेली २५ वर्ष आंबेडकरी चळवळीत काम करत आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष या पदा वर मागील दीड वर्षा पासून काम करीत आहे. मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. मी पिंपरी चिंचवड मधील अनेक अवैध धंद्या विरुद्ध आपल्या आयुक्तालयात तक्रार केली असून वेळोवेळी अवैध धंद्या विरुद्ध आंदोलने ही केली आहेत त्याचाच राग धरून अवैध धंदे करणारे आसवाणी टोळी ने वेळोवेळी मला जीवे ठार मारण्याची धमकी देणे तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न चालू केले व काही खोट्या गुन्ह्यात अडकविले देखील. मी वेळोवेळी आपल्या आयुक्तालयात आसवाणी टोळी तील प्रमुख सदस्य श्रीचंद आसवाणी, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, राजू आसवाणी, अनिल आसवाणी, धनराज आसवाणी, हरेश आसवाणी लकू भोजवानी, विनोद भोजवानी, यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिले आहेत परंतु आसवाणी टोळी चे पिंपरी चिंचवड तील अनेक पोलीस अधिकारी यांच्याशी आर्थिक संबंध असल्याने माझ्या तक्रार अर्जाची दाखल कोणीही घेतली नाही.नुकतेच मी त्यांच्या अवैध दारू विक्री ची तक्रार आपल्याकडे केली त्यानुसार आपण त्या अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर कारवाई केली त्याचाच राग धरून मी राहत असलेल्या ठिकाणी येऊन वरील गुंडानी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मी त्या गुंडां विरुद्ध तक्रार अर्ज देऊनही माझी तक्रार अजूनही पिंपरी पोलीसांनी घेतली नाही. तसेच आसवाणी टोळी ने पिंपरी पोलीस यांच्याशी संगणमत करून 14 निराअपराध तरुणांना खोट्या खुनाच्या गुन्ह्यात अडकविले मलाही या खुनाच्या गुन्ह्यात पिंपरी पोलीस व आसवाणी टोळी अडकविन्याचा प्रयत्न करीत होते परंतु मी दिनांक २९/०४/२१ ते ३०/०४/२१ रोजी एका लग्न कार्यासाठी उस्मानाबाद येथे गेलो असल्याने माझे नाव या खोट्या खुनाच्या गुन्ह्यात गोवता आले नाही. तरी आयुक्त साहेब मी आपणास नम्र निवेदन करतो की माझा खुन होण्याच्या शक्यते मुळे व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या भीती मुळे मला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात २४ राहण्याची परवानगी मिळावी अथवा पोलीस सुरक्षा मिळावी ही विनंती
No comments:
Post a Comment