Tuesday, 3 October 2023

पिंपरी चिंचवड मध्ये समता सैनिक दलाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन .भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थिती .

मनोज गरबडे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले .

पिंपरी: दि ३ ऑक्टोबर रोजी पिंपरी विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही मनोज गरबडे या समता सैनिक दलाच्या सैनिकाची उमेदवारी जाहीर करीत आहोत. पिंपरी विधानसभेत या वेळेस नक्की परिवर्तन घडणार. असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर यांनी केले. या रॅलीत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली . पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या नावाच्या जयघोषात मोटारसायकल व चारचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी हातात निळ्या झेंडे घेऊन व समता सैनिक दलाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. सोमवार (दि.०२) शहरातून निघालेल्या भव्य अशा मोटारसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.यामध्ये पुरुषांसह महिलांची संख्यादेखील लक्षणीय होती. या भव्य रॅलीचे चळवळीतील कार्यकर्ते व सर्व समाजातील बांधवांतर्फे  दहा ते पंधरा ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, पिंपरी येथील भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असणाऱ्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता शिक्षण व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, वाढती अराजकता, बेरोजगारी हे देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या बाबी आहेत. राजकीय उदासीनता यास कारणीभूत आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी आपले योगदान महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता आहे.त्यासाठी आपण तयार असायला हवे.पिंपरी विधानसभेसाठी आमचा उमेदवार ठरला!'रॅलीला संबोधित करताना डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर म्हणाले, समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आमची संघटना साथ देणार असून मनोज गरबडे या युवकाला पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी देणार आहोत. असे जाहीर करत त्यांनी मनोज गरबडे यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती संजय फुलपगारे ' आम्रपाली गायकवाड, आकाश इजगज, दिनेश बनसोडे, दिनेश वाघमारे तसेच समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, चळवळीतील पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार राहुल सोनवणे यांनी मानले .

Wednesday, 20 September 2023

पिंपरी-चिंचवडमध्ये गोपिचंद पडळकर विरोधात आंदोलन*

गोप्या नावाचं कुत्रं... भुंकतंय...त्याचा बंदोबस्त करा..!*
*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर काटे यांची टीका*

पिंपरी  दि ..२० स्पटेंबर रोजी पिंपरीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा.श्री.अजितदादा पवार यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केल्याबद्दल विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर याचा जाहीर निषेध करण्यात आला. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रसेच पक्षाचे शहराध्यक्ष श्री. अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा प्रा. कविताताई आल्हाट, युवक सेलसह सर्व सेलचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
‘‘गोप्या नावाचा कुत्रा... काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सोडला आहे. तो कुणावरही आक्षेपार्ह बोलत असतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचे डिपॉडिट जप्त झाले होते. आता त्याला नेत्यांच्या इशाऱ्यावर भूंकल्याशिवाय चालणार नाही. पण, गोप्या जो बोलत आहे. ते त्यांच्या नेत्यांना मान्य आहे का? असा खरा प्रश्न आहे,’’ अशा परखड शब्दांत माझी भूमिका मांडली. राजकीय, सामाजिक जीवनात पडळकरने सभ्यता ठेवावी, अन्यथा आम्ही त्यांचा इतिहास महाराष्ट्रा समोर मांडू... असा इशाराही यानिमित्ताने दिला आहे.
यावेळी माजी नगरसेविका संगिता ताम्हाणे, शमीम पठाण, माया बारणे, माजी नगरसेवक संजय नेवाळे, राजू बनसोडे, मुख्य संघटक अरुण बो-हाडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, शहर प्रवक्ते विनायक रणसुभे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्ना डांगे,ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल,अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ कुरेशी, ज्ञानेश्वर कांबळे, श्रीधर वाल्हेकर, ओबीसी प्रदेश निरीक्षक सचिन औटे,वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला संघटिका मीरा कदम, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, सामाजिक न्याय महिला अध्यक्ष गंगा धेंडे भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, नीलम कदम, लीगल सेल अध्यक्ष संजय दातीर पाटील, शहर  उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, शिरीष साठे, प्रदीप गायकवाड, रवींद्र सोनवणे, सचिन वाल्हेकर, रिजवाना सय्यद, अक्षय माछरे, मंजितसिंग, मंगेश बजबळकर, दिनेश पटेल, प्रतिक साळुंके, नितिन सुर्यवंशी, लवकुश यादव, मंगेश असवले, गणेश गायकवाड,निखिल घाडगे, चिन्मय कदम, संकेत जगताप, चेतन फेंगसे,अभिषेक सुर्यवंशी, रोहन शिंदे, प्रज्वल क्षीरसागर, श्रीनिवास बिरादार,सागर ओरसे, अमोल पाटील इत्यादीसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, 13 September 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे शहरातील वडिलोपार्जित घरांच्या वाटपपत्राचा प्रश्न मार्गी*

.
वडीलोपार्जित घरांचे वाटपपत्र पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर ग्राह्य धरले जाणार*
आयुक्त शेखर सिंह यांचे आदेश


पिंपरी १३ सप्टेंबर : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील वडीलोपार्जित जमिनीवर बांधलेल्या घरांचे वाटपपत्र आता पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानुसार मिळकतीच्या नोंदी होऊन मिळकत कर भरणे सोपे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या नोंदी बंद केल्या होत्या त्यामुळे अनेकांचा कर थकीत दिसत होता. हि समस्या लक्षात घेऊन पाचशे रुपयांच्या स्टॅप पेपरवरील वाटणीपत्रानुसार मिळकत कराच्या नोंदी करून घेण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी दिला आहे.  
नव्याने  वाटपपत्र करून नोंदी करताना सामायिक जागेचे मुल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर  तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना दिल्यानंतर महापालिकेने नव्याने परिपत्रक काढून नोंदी करून घेणार असल्याचे आदेश दिला आहे. कोणत्याही प्रश्ना संदर्भात नागरिकांची अडवणूक करू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बहुतेक स्थानिक नागरीक सामायिक गट नंबर असलेल्या जागेमध्ये घरे बांधतात. त्यामुळे बहुतांश खरेदी विक्री या प्रक्रियेशिवाय स्थानिकांच्या घरांची बांधकामे होतात. यापुर्वी अशा घरांच्या नोंदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडे करण्यासाठी १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर वाटणीपत्र करुन नोंदी होत होत्या.
परंतु अलिकडच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत स्थानिक रहिवाशी यांच्या अशा नोंदी थांबविण्यात आल्या होत्या . घराची जागा अत्यंत कमी असुनसद्धी वाटपपत्राकरीता नागरीकांना संपुर्ण जागेची स्टैंप ड्युटी भरून वाटपपत्र करावे लागत होते . सामायिक जागेतील बांधकामाचे मुल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असे . तसेच स्थानिक नागरीकांच्या अंतर्गत वादामुळे सर्वजन एकत्र येऊन वाटणीपत्रासाठी उपस्थित रहात नसल्याची वेगळीच अडचण होती. परिणामी स्थानिक नागरीक मिळकत कराची नोंद होत नसल्याने कर भरु शकत नव्हते . त्यामुळे  स्थानिक नागरिकांकडून यामध्ये सुधारणा करण्याची आग्रही मागणी होती. प्रत्येक वेळी जादा स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असे. आता 500 रुपये च्या स्टॅम्प ड्युटी वर सुद्धा नागरिकांना नोंदी करता येतील. हा प्रश्न काळेवाडी, चिखली, तळवडे, मोशी, भोसरी व पूर्वीच्या गावांमध्ये होता.
नागरिकांची हि मागणी लक्षात घेऊन महापालिकेने आता  ५०० रुपयांच्या स्टॅप पेपरवरील वाटणीपत्रानुसार मिळकत कराच्या नोंदी करून घेण्याचा आदेश  आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.  
अजित गव्हाणे म्हणाले
*नव्याने वाटपपत्र करून नोंदी करताना सामायिक जागेचे मुल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालण्यात आला. त्यांनी तातडीने पिंपरी चिंचवड प्रशासनाला पूर्वी काय पद्धत होती आणि आता आपण काय करतो अशी विचारणा केली. पूर्वीच्या पद्धतीमध्ये हा प्रश्न मार्गी लागत असेल तर  अडवणूक कशाला करता असे म्हणत तातडीने जुनी पद्धत पुन्हा लागू करा अशी सूचना केली .त्यामुळे आता वडिलोपार्जित घरांचे वाटप पत्र तयार करण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना बसणार नाही.*

Tuesday, 12 September 2023

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर मोफत अध्यात्मिक कार्यक्रम

.चिंचवडमध्ये शिवमहापुराण कथा सोहळा
- भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती
पिंपरी( प्रतिनीधी ) दि .११ स्पटेंबर मानवी जीवनात ज्ञान, मोक्ष, त्याग, उपवास, तप आणि जप याचे महत्त्व अधोरेखित करणारी तसेच शिव-शक्ती आणि शिव- महिमा याची प्रचिती देणारे शिव चरित्र पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील भाविक-भक्तांना श्रवण करता यावे. यासाठी श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा भक्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

 

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवारच्यावतीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन दि. १५ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे केले आहे. परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिव पुराण कथा मोफत वाचन सोहळा आहे.

 

यावेळी माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापूरे, विलास मडिगेरी, निर्माल्य सेवा ट्रस्टचे  श्री.रामकृष्ण यादव आदी उपस्थित होते.


शंकर जगताप म्हणाले की, मध्यप्रदेश येथील प. पु. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडवासीयांना मिळणार आहे. पंडित मिश्रा यांचे लाखो  अनुयायी कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. या दिवसांमध्ये सुमारे आठ ते नऊ लाख श्रोते या कथेचे श्रवण करतील. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आलेल्या भाविकांसाठी प्रशस्त व्यवस्था केली आहे. पार्किंग, सुसज्ज बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, जेवन, नाष्टा, शुद्ध पिण्याचे पाणी, अग्निशमन यंत्रणा, स्वच्छता नियोजन, सुरक्षा, पोलीस बंदोबस्त, भाविकांची निवास व्यवस्था, आपतकालीन व्यवस्था अशी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त या कथा वाचन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत केली आहे.

 --------

पंडित प्रदीप मिश्रा यांच्याबाबत माहिती…

प . आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक म्हणून अध्यात्मिक क्षेत्रात ओळख आहे. भगवान महादेवाची शिव महापुराण कथा लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यातून लोकांना चांगल्या मार्गावर जगण्याची प्रेरणा मिळावी, या उद्दात्त हेतूने कार्य करीत आहेत. त्यांचे लाखो अनुयायी आहेत. ‘आस्था’ या अध्यात्मिक वाहिनीवर त्यांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण होते. शिव पुराण कथेसोबतच मानवी जीवनात येणाऱ्या समस्यांवर मार्गही ते सांगतात. त्यामुळे त्यांच्या कथा वाचन कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे, सनातन धर्माबाबत प्रचंड अभिमान असलेले अध्यात्मिक गुरू म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

 ------

अध्यात्मिक अनुभवाची मोफत पर्वणी...

भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत केली आहे. या समितीच्या बरोबरीने नियोजनासाठी २५ समित्यांची स्थापना करण्यात आलीं आहे. या समित्यांकडे सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण अध्यात्मिक सोहळा नागरिकांसाठी मोफत आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू अशा सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे.
---------------
भाविकांसाठी भव्य मंडप...

सभा मंडप येथे आगामी सात दिवसात भाविकांचा मोठा राबता असणार आहे. यासाठी सुसज्ज असा सभामंडप बांधण्यात आला असून यामध्ये सुमारे १ लाख भाविक एका वेळी बसून कथा ऐकू शकतील. तसेच आजूबाजूला देखील मिळून सुमारे ५० हजार म्हणजे एकून १.५ लाख लोक एकावेळी कथेचा आस्वाद घेवू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ५ ते १० हजार भाविकांचे ‘एक ब्रॅकेट्स’ अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे भाविकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच अँब्युलन्स थेट मंचापर्यंत जावू शकेल अशा प्रकारे मंडपाची बांधणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला येणारे सुमारे १५ ते २० हजार भाविक हे सभामंडपात मुक्कामी असतात. अशा भाविकांसाठी मैदानाच्या एकाबाजूला सुमारे ३०० शौचालयांची देखील व्यवस्था करण्यात आलीं आहे. याबरोबरीने पिण्याच्या तसेच वापरण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

Monday, 11 September 2023

शंकर जगताप म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने पवना थेट पाईपलाईन प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली.

.




पिंपरी( प्रतिनीधी )(दि. ११ सप्टेंबर २०२३)  पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी पवना थेट पाईपलाईन प्रकल्पावरील स्थगिती महायुती सरकारने उठवली. त्यामुळे भविष्यातील शहराची पाणी चिंता मिटली आहे. या प्रकल्पासाठी लोकनेते आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. याबद्दल महायुती सरकारचे आम्ही आभार व्यक्त करतो, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या.

शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे २०११ मध्ये पवना थेट पाईपलाईन प्रकल्पाला तत्कालीन राज्य सरकारने ‘जैसे थे’ आदेश दिला होता. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. या प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, विलास मडिगेरी, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सागर आंघोळकर, शशिकांत कदम, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे भाजपाचे राहुल जवळकर, संजय मराठे, अमर अभियान, रमेश काशीद, नवनाथ जांभुळकर, नवीन लायगुडे, विनायक भोंडवे, अजय दूधभाते, संतोष ढोरे, किरण सोनवणे, जवाहर ढोरे, सचिन सावंत, शांतराम पिंजन आदी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने पवना थेट पाईपलाईन प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली. शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण आणि भविष्यातील शहराची गरज लक्षात घेता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द करावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाने केली होती. त्याला यश मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादांचे पिंपरी-चिंचवडकरांना मोठे गिफ्ट पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला मिळणार गती; शहरवासियांची पाणीटंचाईतून होणार कायमची मुक्तता .



पिंपरी, दि. 11 :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या हितासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन हाती घेतलेला बंद पाईप लाईनचा प्रकल्प स्थगिती आदेशामुळे रखडला होता. मात्र सत्तेची सुत्रे हाती येताच शहरातील पाणीटंचाईचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पावरील स्थगिती आदेश उठविण्यात मोलाची भूमिका बजाविली आणि शहरवासियांना मोठे गिफ्ट दिले आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा विषय मार्गी लागल्याने शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेतील राष्ट्रवादीच्या तात्कालीन पदाधिकारी व नगरसेवकांनी पवना धरणातून बंद पाईप लाईनद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुढाकार घेत याला राज्य शासनाकडून मान्यता मिळवून दिली होती. मात्र, त्यावेळच्या विरोधकांनी शहरात एक आणि मावळ तालुक्यात एक भूमिका घेतल्याने या प्रकल्पावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. मावळात घडलेल्या एका घटनेनंतर प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती.
तब्बल 12 वर्षांपासून हा प्रकल्प स्थगिती आदेशामुळे रखडला होता. तर शहराची गेल्या 12 वर्षांत लोकसंख्या वाढल्याने शहरात पाणीटंचाईही निर्माण झाली होती. राज्यातील आणि महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर हा प्रकल्प बासणातच गेल्याचे मानले जात होते. मात्र, अवघ्या काही दिवसांपूर्वीच सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी पुन्हा पुढाकार घेऊन नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती.
हा प्रकल्प शहरवासियांसाठी महत्त्वाचा असल्याचेही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर पदाधिकाऱ्यांनी अजितदादांकडे पवना बंद पाईप लाईनचा प्रकल्प सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. यावर अजितदादांनी राज्यपातळीवर वेगवान हालचाली करत या प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याचा निर्णय शासनदरबारी घेतला. या निर्णयामुळे पुढील 25 वर्षे शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. अजितदादांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
कोट
पिंपरी-चिंचवड शहरवासियांच्या हिताचा उपमुख्यमंत्री अजितदादा व राष्ट्रवादीने नेहमीच विचार केला आहे. शहराची पुढील 25 वर्षांची पाण्याची गरज या निर्णयामुळे पूर्ण होणार आहे. महापालिका पातळीवर या प्रकल्पाबाबत आम्ही पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शहरहिताच्या दृष्टीने अजितदादांच्या माध्यमातून इतरही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार- आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

.आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध होण्यास चालना मिळाली.

पिंपरी ( प्रतिनिधी ) दि.११ स्पटेंबर पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाचा "जैसे थे" आदेश तब्बल 12 वर्षाच्या लढ्यानंतर उठवण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी 2014 पासून सुरू केलेला पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला. विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी सभागृहात वारंवार हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने हा ‘जैसे थे’ आदेश रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.

तत्कालीन राज्य सरकारने २०११ मध्ये या प्रकल्पला ‘जैसे थे’ आदेश दिला होता. त्यामुळे सुमारे १७० कोटी रुपयांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नुकसान होण्याचा धोका होता आणि हा प्रकल्प मार्गी लागल्यास  शहराचा किमान २०५० पर्यंतचा पाणीप्रश्न सुटणार आहे, अशी ठाम भूमिका आमदार लांडगे यांनी जुलै-२०२३ मध्ये झालेल्या मुंबईतील अधिवेशनात मांडली होती. त्याला त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
याबाबत बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पामुळे शहराला सुमारे ४८ एमएलडी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. २०११ मध्ये हा प्रकल्प राज्य सरकारने ‘जैसे थे’ आदेश देऊन थांबवला होता. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने प्रकल्पाचा खर्च उभा करावा. पवना धरणातून बंधाऱ्यापर्यंत पाणी आणताना पाण्याचे होणारे प्रदूषण आणि पाण्याची बचत, प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि खर्च याचा विचार करता बंद जलवाहिनी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांना विचारात घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करावे, अशी मागणी राज्य सरकारला करणार आहे.
**
प्रतिक्रिया:
पिंपरी- चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या याचा विचार करता आगामी ५० वर्षांचा विचार करुन नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध होण्यास चालना मिळाली. आता पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे कामही प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करावे आणि पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी अपेक्षा आहे. तसेच, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्यातील महायुती सरकारने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याबद्दल पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो.

Tuesday, 5 September 2023

पॅथर युवा मोर्चाचा दणका .संभाजी भिडेंसह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

.भिडे यांनी वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण


' त


पुणे दि.03 सप्टे पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
पाेलीस कर्माचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे  शनिवारी (२ सप्टेंबर) संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
भिडे यांनी वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. भिडे यांची सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा पॅथर युवा मोर्चाने देण्यात आला होता. याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परवानगी नाकारल्यानंतर भिडे यांची सभा झाल्याने पोलिसांनी रविवारी मध्यरात्री संयोजकांसह भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.


Monday, 4 September 2023

आम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वरावळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो’’! आ. महेश लांडगे

.भाजपा आमदार महेश लांडगे यांची भीमगर्जना
- पुणे महापालिका प्रशासनाला ४८ तासांची मुदत 

पुणे ( प्रतिनिधी )पुणे हे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील बेकायदा मस्जिद हटवण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले. 
‘‘आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे अनुयायी आहोत. आम्ही अयोध्येतील बाबरी मशीद पाडू शकतो. तर पुण्येश्वारला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी तिथे उभारलेली अनधिकृत मशीद पाडूच शकतो, अशी भीमगर्जना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. 

पुणे हे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील बेकायदा मस्जिद हटवण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले. 

यावेळी भाजपाचे आमदार महेश लांडगे, नितेश राणे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रखर हिंदूत्ववादी नेते डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

आमदार लांडगे म्हणाले की, पुण्यात श्री. पुण्येश्वर मंदिराजवळील अनधिकृत मस्जिदीचे बांधकाम ४८ तासांत हटवा... अन्यथा आम्ही हटवणार आहोत. पुणे शहराला ज्या मंदिराच्या नावावरुन ओळखले जाते. तो इतिहास कायम ठेवण्यासाठी आम्ही आता लढा सुरू केला आहे. पुण्येश्वराला अतिक्रमणातून मुक्त केले पाहिजे. न्यायालयाने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. पण, प्रशासन कारवाई करीत नाही. प्रशासनाने जी मुळमुळीत भूमिका घेतली आहे.

Saturday, 26 August 2023

कार्यक्षम नगरसेवक मा. श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ते २७ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन .

श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे


पिंपरी( प्रतिनीधी ) दि २५ ऑग .पिंपरी येथील मा. नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २६ ऑगस्ट व २७ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन आज मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदिप कापसे, नंदकुमार सातोर्डेकर, उस्ताद दत्तोबा नाणेकर, राजेंद्र वाघेरे, तानाजी वाघेरे, कुणाल सातव, कुणाल लांडगे, गणेश कस्पटे आदी मान्यवर व बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत जवळपास ५६७ नागरीकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि, स्पर्श हॉस्पिटल , वाय. सी. एम. रुग्णालय, स्टार हॉस्पिटल आकुर्डी , डॉ. दर्शन चाटे (डेंटल जिजामाता हॉस्पिटल), डॉ. चाकणे हॉस्पिटल (डोळे), डी.वाय. पाटील हॉस्पिटल हे हॉस्पिटल सहभागी झाले आहेत. या महाआरोग्य शिबिरात रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या मोफत करण्यात आलेल्या आहेत .

शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी एम.आर. आय. व सिटी स्कॅनसाठी २० ते ३० टक्के डिस्काउंट देण्यात आलेला आहे. हे शिबीर उद्या रविवार (दि.२७ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

कार्यक्रमाचे नियोजन हरीश वाघेरे , सचिन वाघेरे, गणेश गुंजाळ, रंजनाताई जाधव, मयुर कचरे, विकी नाईक, शितल पोतदार, दीपा काळे, अपूर्वा खोचाडे यांनी केले.

Friday, 25 August 2023

शहर फेरीवाला कायदयाची अंमलबजावणी करणे संदर्भात घेतली अजितदादांची भेट..

फेरीवाले, हातगाडी धारक, पथारीवाले वंचित राहूनयेत अध्यक्ष प्रल्हाद कांबळे

पिंपरी (प्रतिनीधी) दि . २५ आँगस्ट २०२३ रोजी
पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक, टपरीधारक यांचा सर्व्हे करण्यात आला होता. परंतु सर्व्हे नंतर फेरीवाल्याधोरणाचीअंमलबजावणी कायदावरच राहून गेली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फ त दिशाभुल केली जात आहे. शहर फे रीवाल्या सदस्य कमिटीची वर्षानुवर्षे मिटींग होत नाही.फेरीवाले यांचा सर्व्हे झाल्यानंतर लायसेन्स/ओळखपत्र महानगपालिकेने देणे बंधनकारक असल्याने याचीअंमलबजावणी आजतागायत झालेली दिसून येत नाही.माहे डिसेंबर २०२२ मध्येठेकेदारांमार्फत फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये
अनेक फेरीवाले, हातगाडी धारक, पथारीवाले वंचित राहिलेले आहेत. या संदर्भात केणताही निर्णय
आजतागायत घेण्यात आलेला नाही. एकीकडे हॉकर्स झोन तयार करण्याचे स्वप्न दाखवुन आमची दिशाभुल
केली जात असल्याने, याचा जाब विचारल्यास पिंपरी चिंचवड महानगरपलिकेतील संबंधित विभागातील
अधिकारी व कर्मचारी हे आम्हांस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे शहर फे रवाल्या धोरणावरील
कायदयाचा नागरिकांचा विश्वास उडालेला आहे. या संदर्भात शहर फेरीवाल्या सदस्यांची मा. आयुक्त सो.,
फेरीवाला कमिटी अध्यक्षेखाली इतर समस्या बाबत लवकरात लवकर मिटींग घेवुन मार्ग काढावा. व गेल्या
१४ वर्षापासून कागदावर फेरीवाल्यांना स्वप्न दखविण्यात येते. मात्र हक्काच्या गाळ्यांपासून फेरीवाल्यांना
वंचित रहावे लागत आहे. आदरणीय दादा, फेरीवाल्यांसाठी पक्के गाळे देण्यासाठी आपण विचार करावा, ही विनंती.फेरीवाला हॉकर्स महासंघ संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .

Thursday, 24 August 2023

मा. खासदार आढळराव पाटील यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्या बद्दल केले अभिनंदन,

पिंपरी (: प्रातिनिधी ) दि . २४ ऑगस्ट रोजी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभेचा नियोजित दौरा केला, विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेवून पक्ष बांधणी आणि संघटनेवर चर्चा केली, आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेवून भोसरी विधानसभेतील समस्या आणि विकास कामे  यावर चर्चा केली, पावसाचे दिवस असल्याने शहरात नागरिक आजारी पडण्याचे मोठ्या प्रमानात वाढले असल्याने त्यांना पालिका रुग्णालयात वेळेत चांगले उपचार मिळावेत, रुपीनगर तळवडे रेड झोन मध्ये येत असला तरी तेथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पालिकेकडून मिळाव्यात, अशी सूचना आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली, या भागात पालिका आरक्षित जागा ताब्यात घ्यावा व त्यांचा विकास जेणे करून नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल अशीही सूचना त्यांनी केली, भोसरी विधानसभेत समाविष्ट गावातील रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावावी, चिखली मध्ये नागरीकरण वाढले असून वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडतात, त्यामुळे ट्रॅफिकचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, तेथील रस्त्यांचा विकास पालिकेने लवकर करावा, समस्त देशाचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाच्या कामाची माहिती त्यांनी घेतली व याच ठिकाणी संभाजी महाराज यांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला आत्मसात करता येईल याचे रेखाटन करता येईल का ? यावर लक्ष देण्याची सूचना देखील त्यांनी केली, तसेच मोशी येथील हॉस्पिटल, बहुउद्देशीय स्टेडियम, नाशिक फाटा चांडोली कामाची माहिती, पिंपरी चिंचवड मधील मराठी अनुदानित शाळांना प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सूट देण्यात यावी,अशा अनेक विषयांवर त्यांनी पालिका आयुक्तांन बरोबर चर्चा केली. 
  पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आयुक्तांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या याप्रसंगी उपस्थित कामगार नेते मा. इरफान भाई सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान शेठ पोखरकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाट, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव सर, उपशहर प्रमुख रामदास गाढवे,बळीराम जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील पवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे, विधानसभा संघटिका जानवी पवार, वाहतूक आघाडी प्रमुख  मानसिंगराव जाधव , सुरेश सूर्यवंशी, संदीप जाधव,राहुल पिंगळे उपस्थित होते.

आर पि आय (खरात गट) ठाणे जिल्हाध्यक्षपदी दुर्गेश उघडे, शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली .

दि . २१ ऑगस्ट रोजी ठाणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ठाणे जिल्हाध्यक्षपदी दुर्गेश उघडे, शहराध्यक्षपदी मनोज कांबळे, सचिव पदी किरण देठे, राज्य उपाध्यक्षपदी प्रवीण खंडागळे, विद्यार्थी आघाडी राज्य उपाध्यक्षपदी रत्नशिल थोरात यांची निवड केली*

Monday, 21 August 2023

राहुलभाऊ भोसले यांनी केला जेष्ठ नागरिक दिनानिमित्त केला जेष्ठ नागरिकांचा सन्मान .

नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांनी जेष्ठ नागरिकांचा सन्मान केला, 



पिंपरी (प्रातिनीधी) २०ऑगस्ट रोजी  , जेष्ठ नागरिक दिनानिमित्त नेहरूनगर येथे नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांनी जेष्ठ नागरिकांचा सन्मान केला, यावेळी जेष्ठ नागरिक संघ, विठ्ठलनगरचे अध्यक्ष लक्ष्मण जोगदंड यांच्यासहीत बहुसंख्य सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
"जेष्ठ नागरिक यांच्याकडून मिळणारा कार्याचा अनुभव सदैव मार्गदर्शक ठरतो, जेष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवानुसार नव्या पिढीला मार्गदर्शन करत जावे."असे प्रतिपादन राहुलभाऊ भोसले यावेळी केले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जेष्ठ नागरिक संघांचे यासिन शेख, उत्तमराव जोगदंड, सल्लाउद्दीन शेख, शेख दाऊद, श्रावण जोगदंड,पांडुरंग सावंत, कल्याण कदम, साहेबराव इनकर, साहेबराव कदम, राजू हजारे, कल्याण वाळके यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर गवळी, दत्ता जाधव, शिवशंकर उबाळे, संजय जाधव, विनोद गायकवाड, बापू माने, मुन्ना ठाकूर उपस्थित होते.

Sunday, 20 August 2023

माजी नगरसेवक नेहरूननगर राहुल भोसले यांच्याप्रयत्नातून १३८ नागरिकांना मिळाली हक्काचे घरे .

.माजी महापौर हनुमंतराव भोसले (अण्णा) यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या .


पिंपरी, (प्रतिनिधी) दि २० ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड
माजी नगरसेवक नेहरूननगर राहुल भोसले यांच्या
प्रयत्नांना यश स्वातंत्र्यदिनी हक्काच्या घराचा ताबा माजी महापौर हनुमंतराव भोसले (अण्णा) यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या . सर्व सुविधा असलेले हक्काचे घर मिळाल्यामुळे झोपडपट्टीधारकामधे आनंदीमय वातावरण होते
.येथील राजीव गांधी वसाहतीत झोपडीत राहणाऱ्या १३८झोपडीधारकांना १५ नेहरूनगर प्रभागाचे राष्ट्रवादी
काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल भोसले यांच्या प्रयत्नातून नेहरूनगर प्रभागातील राजीव गांधी वसाहत झोपडपट्टीधारकांचे एसआरए झोपडपट्टी पुनर्वसन
प्रकल्पा अंतर्गत १३८ जणांचे पुनर्वसन घराचा ताबा घेण्यासाठी सर्वच लाभार्थी व राजकीय सामाजिक  कार्यकर्ते उपस्थित होते. 

Wednesday, 16 August 2023

विठ्ठलनगर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे ७६ वा ध्वजारोहण मा . विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले .

७६ वा ध्वजारोहण मा . विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या हस्ते .


पिंपरी (प्रतिनीधी) दि . १५ ऑगस्ट रोजी नेहरूनगर प्रभाग क्र १६ येथील विठ्ठल नगर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे सकाळी आठ वाजता पिंपरीवड महानगरपालिकेचे माजी विरुद्ध पक्ष नेते राहुल भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .



या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर लहान लहान बालकांना खाऊ वाटप करून .माजी विरुद्ध पक्ष नेते राहुल भाऊ भोसले यांनी स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या .


Tuesday, 15 August 2023

अरुण पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण, आयुष्यमान भारत, सुकन्या योजना आदी उपक्रमांनी उत्साहात साजरा .

वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस मोफत आयुष्यमान भारत योजनेचे उद्घाटन




पिंपरी (प्रतिनीधी ) दि १५ ऑगस्ट रोजी  मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष, वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस मोफत आयुष्यमान भारत योजनेचे उद्घाटन, सुकन्या योजनेच्या माध्यमातून ५२ मुलींचे खाते काढून रक्कम जमा, ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांचे वाटपाचे सुरुवात, तसेच सांगवी, पिंपळे गुरवमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
 मोफत आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सुमारे ७५० नागरिकांनी लाभ घेतला. ही योजना २० ऑगस्ट पर्यंत सुरु असून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून लुंबिनी बुद्ध विहार येथे, तसेच भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांच्या वाटपालाही सुरुवात करण्यात आली. सुकन्या योजनेच्या माध्यमातून ५२ मुलींचे बँकेत खाते उघडून प्रत्येकी अडीचशे रुपयांचा धनादेश जमा करण्यात आला.
             यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे, ह.भ.प.तुकाराम महाराज, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह . भ. प . भागवताचार्य शास्त्री महाराज ह.भ.प. राष्ट्रीय शिव कीर्तनकार गजानन वाव्हळ महाराज, डी.वाय.एस.पी. राम मांडुरके साहेब, वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजयअण्णा जगताप, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार, श्याम जगताप अभिमन्यू गाडेकर, , मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दयानंद जेवळे सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, संदेश नवले, पिंटू जवळकर  बळीराम माळी, नागेश जाधव, भरत शिंगोटे, युवराज नलावडे, राजू लोखंडे  महादेव बनसोडे, हरिभाऊ पाटील, बाळासाहेब धावणे, संतोष मोरे, राहुल चोथवे, शिवलाल कांबळे विकास आघाव, अमोल नागरगोजे, कैलास सानप हनुमंत घुगे, ज्ञाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पोपट बडे, प्रा. संपत गर्जे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते माधव मनोरे, दीपक जाधव, सुभाष  दराडे, सोमनाथ नवले, राजाभाऊ मिसाळ, बाळासाहेब साळुंखे, प्रकाश इंगोले, नंदू काटे, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, आण्णा सानप, शिवकुमार बायस, नितीन चिलवंत, अमोल लोंढे, सोमनाथ शेटे, आण्णा जोगदंड, धनाजी येळकर पाटील, अंगद जाधव, गणेश ढाकणे, सखाराम वालकोळी, पुनाजी रोकडे सुदाम मराठे, विष्णु शेळके, लुंबिनी बुद्ध विहारचे अध्यक्ष मोहन कांबळे, नाना धेंडे, अनंत भालेराव, श्याम घोडके, बाळासाहेब पिलेवार, बुद्धभूषण विहारचे सदस्य, रिक्षा ऑटो संघटना, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ या संघांचे सदस्य, संचालक मंडळ, सुदर्शन नगर पिंपळे गुरव या भागातील युवक वर्ग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जनसेवा फाउंडेशन देहूगावचे पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.   ह ,भ ,प ,संत महंत गुरुवर्य तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, या  मान्यवरांनी अरुण पवार यांच्या कार्याचा गौरव करीत वृक्षारोपण, सामाजिक क्षेत्रातील कामाची प्रशंसा केली. नुकताच राज्य शासनाचा शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार मिळाला आहे, ही याची पोचपावती असल्याचे गौरवोद्गार काढले. 

पिंपरीत भारतीय ७७ वा स्वातंत्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ध्वजारोहन करण्यात आले.

.पिंपरी (लोकहिताय न्युज प्रतिनीधी) दि १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचा ७७ वा स्वातंत्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ०८.४५ वाजता साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष श्री.अजित गव्हाणे आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही मानणारा देश आहे. भारत देशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याऱ्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे तसेच स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी  उपमहापौर राजू मिसाळ, मोहम्मद पानसरे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, वरिष्ठ महिला कार्याध्यक्षा कविता खराडे माजी नगरसेवक,अमिना पानसरे, गोरक्ष लोखंडे, विश्रांती पाडाळे, चंदा लोखंडे, गोरक्ष पाषाणकर, राजू लोखंडे, शहर खजिनदार दीपक साकोरे,  

प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष युसूफ कुरेशी, महिला मुख्य संघटक पुष्पा शेळके, अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ, महिला कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, व्ही.जे.एन.टी.सेल महीला अध्यक्षा निर्मला माने, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्षा दिपाली देशमुख, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, शक्रुल्ला पठाण, जहीर खान, महिला संघटक मीरा कदम, प्रवीण गव्हाणे, चिंचवड विधानसभा संघटीका पौर्णिमा पालेकर, देवी थोरात, कीर्ती माळी, सपना कदम, वंदना कांबळे, सुरेखा माळी, ऐश्वर्या पवार, शितल दुर्वे, उपाध्यक्ष गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, प्रसाद कोलते, निखिल घाडगे, माधव बिराजदार, राजू चांदणे, रमजान सय्यद, सुलेमान सय्यद, बी.के.कांबळे, शरद नवले, रामकृष्ण माने, इमरान शेख, रवींद्र सोनवणे, सहाजी आत्तार, हाजी गुलाम रसुल, आशिर शेख, रामप्रभु नखाते, अंकुश दिघे, नवनाथ डफळ, ॲड.दिलीप शिंगोटे, ॲड. ननावरे, दिलीप तापकिर, राजू म्हेत्रे, कार्यालयीन सेवक सुनील अडागळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे इत्यादींसह मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी, ही विनंती.

श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पिंपरी चिंचवड.महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री विठ्ठल ऊर्फ नाना काटे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लोक हिताय न्युज च्या वतिने.

Sunday, 30 July 2023

शहर कॉग्रेस तर्फे मनोहर कुलकर्णी (भिडे) चा तीव्र निषेध*



पिंपरी चिंचवड  शहर कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली


.पिंपरी (लोक हिताय न्युज) २९ जुलै २०२३ काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात जोडेमार आंदोलन .महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बडनेर गावामध्ये मनोहर कुलकर्णी (भिडे) याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुटूंबाबद्दल अवमानकारक व वादग्रस्त वक्तव्य केल आहे. या वक्तव्याचा विरोधात पिंपरी चिंचवड  शहर कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीव्र निषेध करत निदर्शने करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अनुदगार काढणाऱ्या मनोहर कुलकर्णी (भिडे) ला त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली. 
यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, मा. महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, माजी नगरसेवक मारुती भापकर, विश्वास गजरमल, माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, महिला अध्यक्षा सायली नढे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, कौशल्य व कला विकास विभागाचे अध्यक्ष रवि नांगरे, संदीपान झोंबाडे, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, प्रवीण कदम, निर्मला खैरे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, प्रा. किरण खाजेकर, बाबासाहेब बनसोडे, अर्जुन लांडगे, जुबेर खान, बाबा शेख, मेहबूब शेख, दहर मुजावर, पांडुरंग जगताप, तारीक रिजवी,  प्रदीप पवार, किरण नढे, सौरभ शिंदे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, जितेंद्र छाब्रा, सतीश भोसले, वसंत वारे, नितीन खोजेकर, गौतम ओव्हाळ आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, 27 July 2023

मा. खासदार उपनेते *शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुपीनगर तळवडे येथील नागरिकांशी साधला संवाद.

.भोसरी (लोक हिताय न्युज) भोसरी विधानसभा शिवसेनेच्या वतीने आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
 लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्याच धर्तीवर शिरूर लोकसभेत संघटन बांधणीचा जोर वाढला आहे, लोकसभेत बूथ प्रमुख, शिवदूत, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तसेच पक्षाचे संघटन बांधणी यावर मा. आढळराव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  
 तसेच मा. आढळराव पाटील यांनी तळवडे रूपीनगर येथे जाऊन तेथील प्रभागातील समस्स्या विषयी तेथील नागरिकांशी संवाद साधला.

 यावेळी उपनेते / कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर,जिल्हा संघटक  अशोकशेठ भुजबळ उपजिल्हा प्रमुख संभाजी शिरसाठ, प्रकाश वाडेकर,भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख बळीराम जाधव रामदास गाढवे, शहर प्रसिद्धी प्रमुख  सुनील पवार,महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे, महिला समन्वयक गौरीताई शेलार, संघटक किशोर सवाई,विभाग प्रमुख  दिनकर जाधव, राहुल पिंगळे, दादा बांगर,युवा सेना जिल्हा समन्व्यक सागर पाचारणे, प्रदीप बालघरे आशिष गौड  युवासेना संघटक इ पदाधिकारी  व रुपीनगर  येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

कौतुकास्पद; राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीची इर्शाळवाडीतील कुटुंबांना मदत .

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांचा पुढाकार


पिंपरी, (लोक हिताय न्युज ) दि .26 जुलै २०२३ रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात  इर्शाळवाडी  येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत  वित्त आणि जीवितहानी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीने संवेदनशीलता दाखवत इरशाळवाडीतील कुटुंबीयांना मदत केली. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही मदत केली आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी  येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली.  या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. जीवित आणि वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली. 

सामाजिक संवेदनशीलतेचे भान ठेवून आपदेत सापडलेल्या  कुटुंबांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  वाढदिवसाचे कुठेही कार्यक्रम न घेता दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडी वासियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी पुढाकार घेतला. तसेच वरीष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, ज्योती गोफणे,  चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे,  भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, पिंपरी विधानसभा  कार्याध्यक्ष  दिपाली देशमुख, मुख्य संघटिका मीरा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

याबाबत कविता आल्हाट म्हणाल्या यंदा ही नैसर्गिक आपदा आल्यामुळे राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड  शहर महिला कार्यकारिणीने 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये बुधवार (दि .26) मुंबई येथे जमा केला. 

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,  कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर , आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते.

Wednesday, 26 July 2023

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांची दुरावस्था*

 सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव 



पिंपरी (लोक हिताय न्युज) दि . २६ जुलै २०२३
पिंपळे सौदागर पोलीस चौकी बाजूकडील महादेव मंदिराकडून पि.के. इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, ह्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे त्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज येथे छोटे मोठे अपघात होत आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये कोणाला आयकॉन रोड पिंपळे सौदागर भागातील कैलास उशीर बाळासाहेब कुंजीर ग्राउंड लगत असलेल्या कन्स्ट्रक्शन साईट च्या बाजूचा रस्ता खचला होता तसेच अनेक ठिकाणी असे प्रकार भविष्यात घडतील. होणाऱ्या प्रकाराला फक्त प्रशासन जबाबदार असेल कारण प्रत्येक साईटचा परवाना हा पालिका जबाबदारी घेऊन देत असते. रस्ते, लाईट,

 पाणी, आरोग्य या सुविधा पुरवणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्यास कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी येत्या काळात जन आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे.

स्मार्ट सिटी आहे कि खड्डे सिटी आहे ते तर स्पष्ट करा.
आयुक्त तथा प्रशासक श्री.शेखरसिंह म्हणतात कि शहरातील खड्डे तातडीने आम्ही बुजविण्यात येणार आहे, मग गेल्या आठवड्यापासून येथे तर कोणी स्थापत्य विभागाचा एकही अभियंता फिरकला नाही असे येथील नागरिक सांगतात.
तातडीने येथील खड्डे बुजवा अन्यथा ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना तरुणांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी आयुक्तांना दिला आहे

Tuesday, 25 July 2023

अर्ज माघारी घेनाही तर तुझे तुकडे तुकडे करून फेकून देईल अशी धमकी नितिन धोत्रे यांनी दिली .

.पिंपरी (लोक हिताय न्युज)दि .२२ जुलै २०२३पिंपरी चौकात एका अवैध धंदा करणाऱ्या चालकाकडून जीव मारण्याची धमकी देण्यात आली ' गपचुप अर्ज माघारी घे नाही तर तुझे तुकडे तुकडे करून फेकून देईल.तुझ्या आई बापाला सुद्धा सापडणार नाही. तुझ्या अख्या कुटुंबाला घराबाहेर निघणे मुश्किल करीन .माझी बायको आणि तिची आईला ओळखतोना तू त्या दोघी तुझेवर विनयभंग बलात्कार सारखा गुन्हा दाखल करतील त्यामुळे अर्ज माघारी घे." असे म्हणून नितीन धोत्रे (अण्णा ) हॉटेल मधून बाहेर पडला तसेच गाडीत बसण्या अगोदर त्याचे गाडीतील इस्मांना बघून म्हणाला की “आपल्याला इथे मर्डर करायचा आहे, १२ वर्षे मी धंदा करतोय पण माझी तक्रार करण्याची हिंमत कुणी केली नाही, याने केली हिंमत त्यामुळे ह्याची गेम करायची याने अर्ज माघारी घेतला नाही तर".नितीन धोत्रे व त्याचे टोळी कडून माझ्या व माझ्या कुटुंबाचे जीवितास धोका निर्माण झाल्याने आमचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला, आमचा अपघात झाला व जीवितास काही
झाले तर याला जबाबदार नितीन धोत्रे व त्याची टोळी असेल, त्यांचेवर कार्यालयीन १० दिवसात कारवाई झाली नाही तर .नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई  सागर, बंगल्या समोर आमरण उपोषण करू असा इशारा  ज्ञानेश्वर सुरेश बोराटे यांनी दिला आहो .

Monday, 24 July 2023

शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ तळेगाव ते मंत्रालय पायी धडक मोर्चा .

जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे यांचा इशारा

पिंपरी, (लोक हिताय न्युज) दि. 24 - पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील जनरल मोटर्स ही एक नामांकित कंपनी असून, ती बंद करण्यात आली आहे. त्या ठिकाणी दुसरी कंपनी येणार आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीने पूर्वीच्याच कामगारांना कामगार युनियनसोबत असलेल्या वेतनवाढ करारानुसार कामावर घ्यावे. तसे न झाल्यास हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. शासनाच्या कामगार भूमिकेमुळे असे प्रकार घडत आहेत. या प्रकाराच्या निषेधार्थ तळेगाव ते मुंबई मंत्रालय अशी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा पायी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमंवशी, सरचिटणीस रोहित पवार, कार्याध्यक्ष विकास करपे, सॅण्डविक एशिया एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष संतोष कणसे, विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, मनोज पाटील, संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 22 July 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५३ हजार झाडांचे वृक्षारोपण महाअभियान .

.भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार
- शहरात तब्बल ५३ हजार वृक्षारोपणाचा शुभारंभ

पिंपरी( लोक हिताय न्युज) दि २२ जुलै २०२३
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘वृक्षारोपण महाअभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्या माध्यमातून परिसरात तब्बल ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,  प्रगतशील विकासाचे शिल्पकार मा.  देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने ‘‘सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले. पिंपळे निलख विशाल नगर येथे या अभियानाची सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी आमदार उमाताई खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा सदाशिवजी खाडे, मा.महापौर माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके, मा.नगरसेविका आरती चोंधे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, भाजपा निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस भाजपा राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे,  भाजपा नेते सचिन साठे, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, नितीन इंगवले, रणजीत कलाटे संजय दळवी, भुलेश्वर नांदगुडे पाटील, अनिल शेठ संचेती, मोहन शेठ कस्पटे, श्याम दंडे, काळुराम नांदगुडे, नागेश जाधव, बाळासाहेब इंगवले, सागर चौधरी, कछेश्वर साळुंखे, अरविंद शिरोडे, सुहास कस्पटे पिंपळवण ग्रुपचे चंद्रकांत ओवले, संदीप बोडके, विक्रम चाचकर, विनोद बोडके, गणेश गोमणे , स्वाती कुंभार, सोनाली पासलक,  शिवगंगा सरोटे, संदीप शेटे, प्रतापराव भोसले, रोहित अहिरे, बाळू कजबे तसेच भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते आणि पिंपळे निलख येथील विद्या निकेतन विद्यालयातील मुख्याध्यापक आनंद गर्जे सर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, शहर आणि परिसरात पर्यावरणाचे रक्षण, राष्ट्राचे संरक्षण या संकल्पनेतून  तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड करण्याचे महाअभियान राबविण्यात आले आहे. तसेच, आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्र अभियान, मोफत आरोग्य सेवा असे उपक्रम आयोजित केले आहे.




उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस लाडक्या नेत्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .



पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय माजी महापौर व -माजी नगरसेवक सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

पिंपरी चिंचवड शहराचा बुलंद आवाज अजितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

नेहरूनगर  प्रभागाच्या वतीने लाडक्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

नेहरूनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव प्रभाग या प्रभागात चारी नगर सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आणण्याची ताकद अजित दादा पवार यांनी दिली आणि व त्याला यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर हनुमंतराव अण्णा भोसले यांनी यशस्वी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून एक आगळीवेगळी ओळख या शहरात निर्माणकरणारे (श्री हनुमंत भोसले अण्णा ) सुपुत्र श्री राहुल भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादाचा शिलेदार म्हणून ओळख असणारे राहुल भाऊ भोसले यांच्याकडून श्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..