Friday 30 June 2023

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिकेसाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे, प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे महापालिका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे,

पिंपरी, दि.३० जून २०२३ :-* आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिकेसाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे, प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे महापालिका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे, तसेच महापालिकेस विविध सन्मान प्राप्त होत असून पालिकेच्या लौकीकात भर पडत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते माहे जून २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या ३४ तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १ अशा एकूण ३५ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.    
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी महादेव बोत्रे, मंगेश कलापुरे, नथा माथेरे, चारूशिला जोशी, विजया कांबळे, शेखर गावडे, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे जून २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ३४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, उपअभियंता शहाजी गायकवाड, मुख्याध्यापिका सुरेखा चोपडे, लेखापाल प्रविणकुमार देठे, भांडारपाल भास्कर रिकामे, मुख्य लिपीक ज्ञानेश्वर पिंगळे, जयकिसन कुंजीर, स्टाफ नर्स सीमा पवार, फार्मासिस्ट रमेश तापकीर, उपशिक्षिका कुमुदिनी मदने, उपशिक्षक कुमुद शिंदे, लिपीक अनिल राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक महादेव व्हटे, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट राजेंद्र नागपुरे, मिटर निरीक्षक अशोक भोसले, प्रमुख अग्निशमन विमोचक तानाजी चिंचवडे, अशोक इंगवले, क्रिडा पर्यवेक्षक सुभाष पवार, वीज पर्यवेक्षक राजेंद्र निपुंगे, दूरध्वनी पर्यवेक्षक निशिगंधा वारंग, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर रावण कसबे, वायरलेस ऑपरेटर गोरक्षनाथ विरकर, वाहनचालक अरूण भोसले, नारायण तापकीर, शहाजी भोसले, रखवालदार रंगनाथ वाल्हेकर, प्लंबर अनिल भोईर, मजूर शशिकांत हुलावळे, प्रकाश काटे, राजेंद्र पडवळ, सफाई कामगार चिंधू पारखी, वसंता नैनार, सफाई सेवक विमलाबाई वाल्मिकी, गटरकुली दिलीप केदारी यांचा समावेश आहे.               
       तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार कमल ओव्हाळ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले तर  सूत्रसंचालन आणि आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
   
      

आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला मिळाले अंशत: यश .

महापालिका प्रशासनाचा नगर विकास विभागाला प्रस्ताव
पिंपरी (प्रतिनिधी ) दि ३0 जून २०२३ .
पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर लादलेल्या उपयोगकर्ता शुल्काच्या दंडातून (शास्ती) सुटका होणार आहे. महापालिका प्रशासनाने २०१९ पासून ऐवजी एप्रिल- २०२३ पासून करवसुलीची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे. 
उपयोगकर्ता शुल्क आणि दंडाची रक्कम माफ करावी. या मागणीसाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे मागणी केली होती. या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापालिका भवन येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, जितेंद्र वाघ, चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत घनकचऱ्याची हाताळणी व व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील सर्व मालमत्तांकडून उपयोगकर्ता शुल्काची आकारणी सुरू केली आहे. सर्वसामान्य मिळकतधारक आणि लोकप्रतिनिधींचा या कर आकारणीला विरोध आहे. उपभोगकर्ता शुल्क आकारणीबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दि. १ जुलै २०१९ रोजी अधिसूचना जाहीर केली होती. मात्र, गेल्या चार वर्षात याबाबत प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. प्रशासकीय दप्तरदिरंगाईमुळे हा कर वसुली प्रलंबित राहीला आहे. याला सर्वसामान्य नागरिकांना जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. शहरातील प्रति मालमत्ता ६० रुपये प्रतिमहा अशा प्रमाणे वार्षिक ७२० रुपये अशी दि. १ जुलै २०१९ पासून ‘उपयोगकर्ता शुल्क व शास्ती’ वसुली सुरू केली आहे, याला शहरातील नागरिकांचा विरोध आहे, ही बाब प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली. 
राज्य सरकारने याबाबत दुसरी अधिसूचना दि. १ जुलै २०१९ रोजी काढली. त्यानुसार, प्रशासन गेल्या चार वर्षांचा एकत्रित दोन टप्प्यांमध्ये कर वसूल करीत आहे. सामान्य नागरिकांना यामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या चार वर्षांच्या शास्तीसह उपयोगकर्ता शुल्काची वसुली व्यवहार्य नाही.  त्यामुळे व्यापक जनहिताच्या दृष्टीने चार वर्षांचा कराची ‘शास्ती’ रद्द करुन एप्रिल- २०२३ पासून उपयोगकर्ता शुल्काची आकारणी करावी, अशी सूचना केली. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एप्रिल- २०२३ पासून कर आकारणी करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. 
विशेष म्हणजे, ‘झिरो वेस्ट’ धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या सोसायटीधारकांकडून उपयोगकर्ता शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. तसेच, पर्यावरणपूरक सोसायटींना मिळकतकरामध्ये सवलत देण्याकामी सवलत धोरणाच्या कक्षा विस्तारण्याची मागणी सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली
:
महापालिका प्रशासनाने २०१९ पासूनचा दंड रद्द करावा. २०१९ ते २०२३ पर्यंत वसुल केलेली दंडाची रक्कम समायोजित करावी. तसेच, झिरो वेस्टसह पर्यावरण पूरक सोसायटींसाठी मिळकत कर सवलत योजनेच्या कक्षा विस्ताराव्यात आदी मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत. तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आमच्या मागणीला काहीअंशी यश मिळाले आहे. तरीही उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
- महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड. 

Thursday 29 June 2023

चंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मीची दादरमध्ये निदर्शने

आजाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
मुंबई-(प्रतिनिधी)) दि . २९ जून २०२३ रोजी
भीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनेचे संस्थापक अॅड चंद्रशेखर आजाद यांच्यावर काल उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज मुंबईसह राज्यभरात उमटले.मुंबईत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर येथे जोरदार निदर्शने करीत आजाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली.
आजाद यांच्या गाडीवर काल सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला यात आजाद  गोळी लागून जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.भीम आर्मीसह विविध सामाजिक राजकीय पक्ष संघटनांनी सदर घटनेचा निषेध करतानाच पुणे, लातूर औरंगाबाद जालना नागपूर, बुलढाणा, अकोला,चंद्रपूर, अहमदनगर ,नाशिक,नंदूरबार, सह राज्यभरात रास्ता रोको तसेच निदर्शने केली.
मुबईतील स्वामी नारायण मंदीर दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात जोरदार निदर्शने केली.या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे ,महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड,दिनेश शर्मा,विजय कांबळे, संतोष वाकळे,सुशीलाताई कापुरे,सुरेश धाडी,
, बाळू साळे, रमेश बालेश, श्रीकांत धावारे, अविनाश समींदर, विजय कांबळे, प्रकाश पाईकराव ,अमोल निकाळजे,मिलिंद चिंचवलकर,
यांच्यासह जाती अंत चळवळीचे सुबोध मोरे ,शाहीर सुरेंद्र बर्वे,संदेश गायकवाड, सुनील कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. आजाद यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना त्वरीत अटक करून कडक कारवाई करावी ,सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच आजाद यांना त्वरीत झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन  आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीसांमार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
  दरम्यान  येत्या २४ तासात गुन्हेगार अटक न झाल्यास राज्यभरात सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटनांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी दिला आहे 
 सर्व आंदोलन कर्त्यांना  माटुंगा पोलीसांनी ताब्यात घेतले.

विजय जगताप लिखित प्रा. रामकृष्ण मोरे 'परामर्श एका शिल्पकाराचा' पुस्तकाचे प्रकाशन

विचार शून्यता ही मोठी समस्या - नितीन गडकरी

पिंपरी, (लोक हिताय न्युज) (दि. २९ जून २०२३) राजकीय जीवनामध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांचे साहित्य, संस्कृती चित्रपट, कला तसेच समाजसेवा याविषयीचे विचार पक्के होते. त्यामुळेच प्रा. मोरे यांनी सर्वच क्षेत्रात लीलया मुशाफिरी केली आणि आपल्या कार्य कतृत्वाचा ठसा उमटवला. सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता विचार शून्यता ही मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवनावरील 'परामर्श एका शिल्पकाराचा' ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आकुर्डी येथे करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. प्रकाशन समारंभास काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार, पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमा खापरे, ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे गजानन एकबोटे, लेखक विजय जगताप, अंशुल प्रकाशनच्या संचालिका तृप्ती विजय जगताप,
राजीव जगताप आदी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे पूर्वी तंत्रज्ञान विकसित नव्हते परंतु आता याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अत्याधुनिक सोयी सुविधा यांचा लाभ घेऊ शकतो त्यातून नव्या पिढीला ज्येष्ठ विचारवंत प्रतिभावंतांचे मार्गदर्शन मिळू शकते त्याचे दस्ताऐवजी करण होऊ शकते असे गडकरी यांनी सांगितले.
दिग्विजय म्हणाले की, प्रा. मोरे यांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली होते पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले कार्य केले व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेसचे दुर्भाग्य की त्यांचा लवकर मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मोठी हानी झाली.
यावेळी हर्षवर्धन पाटील, डॉ. सदानंद मोरे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
लेखक विजय जगताप यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली.
 स्वागत उल्हासदादा पवार यांनी केले. 

भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार आहे : आ. अश्विनी जगताप

चिंचवड भाजपाची टिफीन बैठक सांगवी येथे उत्साहात

पिंपरी,( प्रातिनीधी ) (दि. २९ जून २०२३) भारतीय जनता पार्टी जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतू भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार आहे हेच पक्षाच्या यशाचे गमक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श समोर ठेवून आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेश नुसार, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात ‘मोदी@9’ या अभियान अंतर्गत नागरिकांशी संवाद साधत केंद्र सरकारचे मागील नऊ वर्षातील काम पोहचविण्यात आले आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकी नंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे सरकार आणण्याचा निर्धार देशवासीयांनी केला आहे. त्यामध्ये चिंचवड भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व  कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केले.
   बुधवारी (दि. २८) जूनी सांगवी येथे भाजपा चिंचवड विधानसभा मतदारसंघाची ‘टिफिन बैठक आ. अश्विनी जगताप यांनी आयोजित केली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ. जगताप बोलत होत्या. 
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या संकल्पनेला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात 'महा-जनसंपर्क ‘मोदी@9’ हे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत येणारे सर्व कार्यक्रम जून महिन्यात प्रभावीपणे चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात
राबविण्यात आले. या सर्व अभियान व कार्यक्रमात विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यातील शेवटच्या टप्प्यातील महत्वाचा कार्यक्रम म्हणजे ‘टिफिन बैठक’ होती. यावेळी चिंचवड मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पक्षाचे प्रदेश, जिल्हा व मंडल पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख यांनी ‘टिफीन बैठक’ मध्ये सहभाग घेतला होता.
देशभरातील पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व सर्व लोक प्रतिनिधी कार्यकर्त्यांसमवेत टिफीन बैठकीत सहभागी होतात, हे संघटनेतील सर्व घटकांसाठी प्रेरणा देणारे आहे. या बैठकीच्या संकल्पनेनुसार आपल्या घरुन जेवणाचा डबा आणून सामूहिक भोजन केले जाते आणि पक्षाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते अशी माहिती यावेळी मोदी@9 चे चिंचवड विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी यावेळी दिली.
   या बैठकीत माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, हर्षल ढोरे, सागर आंघोळकर, बाळासाहेब ओव्हाळ, संतोष कांबळे, शेखर ओव्हाळ, सुरेश भोईर,  माजी नगरसेविका उषा मुंढे, आरती चौंधे, संगिता भोंडवे, निर्मला कुटे, अश्विनी चिंचवडे, शारदा सोनावणे, ज्योती भारती, प्रदेश सदस्य संतोष कलाटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ तसेच जवाहर ढोरे, अजित कुलथे, मधुकर बच्चे, संतोष ढोरे, जयदेव डेब्रा, हिरेन सोनावणे, रणजीत कलाटे, गणेश कस्पटे, संजय मराठे व चिंचवड विधानसभेतील सर्व नगरसेवक, पक्षाचे प्रदेश, जिल्हा व मंडल पदाधिकारी आणि सर्व शक्तीकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले व त्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
     

Wednesday 28 June 2023

हत्येचा कट उघड खंडणीविरोधी पथकांच्या कारवाईमुळे वाचले .माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ .

पिंपरी चिंचवड( प्रतिनिधी) दि . २८ जून २०२३ 
पिंपरी चिंचवड शहरातील माजी  नावाजलेले जमीन खरेदी विक्री व्यवसायिक . माजी . नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उघड खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमने त्यांच्या बातमीदार  मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुनावळे येथे मोठा गंभीर गुन्हा करण्यासाठी काही आरोपी येत आहेत हे समजताच सापळा रचून गुन्हा घडण्याआधीच आरोपींना ताब्यात घेतले मात्र तपासादरम्यान आरोपींनी शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई ०३ सराईत गुन्हेगारांना पिस्टल व रांऊडसह केली अटक,मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणाऱ्या इसमांची माहिती काढून, त्यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हेशाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे दिनांक २४जुन २०२३ रोजी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असतांना, पोलीस नाईक आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने, पुनावळे येथील स्मशान भुमी येथे येणार असून, त्यांचेकडे पिस्टल आहे. त्यावर खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून, १) किशोर बापू भोसले वय ३१ रा. पुनावळे गावठाण, ता. मुळशी, जि. पुणे २) अमित दत्तात्रय पाटुळे वय २३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत, पुणे यांना ताब्यात घेतले, त्यांच्या ताब्यातुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात कर. त्यांच्या विरुध्द रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २६८ / २०२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास दरम्यान
 त्यांनी सदरचे पिस्टल व राऊंड हे अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले राहणार पुनावळे, गावठाण, पुणे याचे सांगणेवरुन, तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याचेकडून आणले असल्याचे सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले वय ३४ रा. पुनावळे गावठाण, पुणे याचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक केली. खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार व सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांनी आरोपी अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याचेकडे सखोल व कौशल्यपुर्ण तपास केला असता, माथाडीच्या कामावरून वर्चस्वाचा वाद सुरू झाला गोरगले व त्याचे साथीदार भोसले पाटुळे यांचा इगो जागा झाला त्यांची दहशत संपल्यासारखे त्यांना वाटले  ओव्हाळ व त्यांचे काही नातेवाईक मित्रमंडळी यांच्या जागेत काम सुरू असल्याने तेथील माथाडीचे कामे त्यांना मिळावेत असा त्यांचाही आग्रह त्यामुळे काम घेण्याच्या वादावरून दहशत कमी होण्याची भीती आरोपी किशोर भोसले अमित पाटोळे व गोरगले यांना वाटली त्यामुळे त्यांनी थेट शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला असल्याचे समजले.
माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने आरोपी अमोल गोरगले याने साथीदारांकरवी पिस्टल व राऊंड आणले असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपोनि उध्दव खाडे हे करीत आहेत.

अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द हिंजवडी व वाकड पोलीस ठाणे येथे दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहे.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनिल कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.

Tuesday 27 June 2023

बार्टी UPSC निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ..

पुणे -- दिनांक 26 जुन (प्रतिनिधी लोक हिताय न्युज)
शिक्षणामुळेच विकास होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा  हा संदेश दिला लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी दीपस्तंभ प्रमाणे कार्य केले त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह सुरू केले वंचित घटकातील मुले मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना रोजगार मिळावा म्हणून तसेच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असून आमचे सरकार हे जनतेचे सरकार आहे आम्ही सामाजिक न्याय देण्याचे काम करतो  बार्टी,   नवनवीन कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार  उपलब्ध करून द्यावा असे प्रतिपादन राजाचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे  यांनी छत्रपती राजर्षी  शाहू महाराज  जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले .
दिनांक 26 जुन 2023 रोजी  मागासवर्गीय 250 मुलींचे शासकीय वस्तीग्रह,  चेंबूर, मुंबई उद्घाटन व लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला .

 डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,  पुणे अंतर्गत येरवडा संकुल पुणे येथील युपीएससीचे निवासी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ मा मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते (दूरदश्यप्रणालीद्वारे)  करण्यात आला.

यावेळी मा ना. मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर, तथा मंत्री पर्यटन, कौशल्य, रोजगार,  उद्योजकता व  न्याविन्यता , महिला व बालविकास,  मा राहुल शेवाळे, सदस्य लोकसभा, मा. सुमंत भांगे, सचिव - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मा दिनेश डिगळे, सहसचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन,  तसेच बार्टी, येरवडा संकुल पुणे येथील युपीएससी निवास प्रशिक्षण कार्यक्रमात   बार्टी संस्थेचे महासंचालक मा सुनिल वारे, विभागप्रमुख  डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, श्रीमती स्नेहल भोसले, सतिष पाटील, अनिल कांरडे, वॄषाली शिंदे , रविंन्द्र कदम,  आरती भोसले,  आदी   तसेच UPSC  चे प्रशिक्षणार्थी  विद्यार्थी , पालक व बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मा खासदार राहुल शेवाळे, मा.सुमंत भांगे, डॉ प्रशांत नारनवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
   मा महासंचालक सुनिल वारे यांनी UPSC चे निवासी प्रशिक्षण  घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी फुले शाहू आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून अभ्यास करावा यश निश्चित मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा बार्टी संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश  मिळवावे असाही आशावाद व्यक्त केला.
विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक  सतिष पाटील यांनी केले.सुत्रसंचलन श्रीमती प्रज्ञा मोहिते यांनी केले. आभार श्रीमती स्नेहल भोसले यांनी मानले..

भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त शाळेत वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

पिंपरी( प्रतिनीधी )दि .27/ 6 /2023 रोजी आमच्या भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त शाळेत वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय जाधव, विद्यालयाचे प्राचार्य श्री देशमुख दिलीप, उपप्राचार्य श्री राजेंद्र कोकणे, प्राध्यापक श्री संपत गर्जे, पालक संघाचे उपाध्यक्ष व सहसचिव व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. 

मुख्याध्यापक श्री संजय जाधव व पालक संघाचे प्रतिनिधी यांनी वृक्षदिंडी चे पूजन केले. संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आयुष्यात वृक्षाचे महत्व व वृक्ष लागवडी संबंधीची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याबाबत प्रतिज्ञा घेतली यावेळी झाडे लावा झाडे जगवा, पाण्याचा वापर जपून करा, हवी असेल शुद्ध हवा तर आजच झाडे लावा अशा विविध घोषणांनी परिसर भक्तीमय केला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम,जनाबाई,नामदेव, शंकर, विष्णू व मुक्ताबाई यांची वेशभूषा करून आले होते. वृक्षदिंडीचे शनी मंदिर मार्गे श्री स्वामी समर्थ यांच्या मठात मठाच्या अध्यक्षा सौ विजया मुळे यांनी पालखीचे पूजन करून स्वागत केले.

 याप्रसंगी श्री संगप्पा मुळे व श्री संजय तावडे मठाचे संचालक उपस्थित होते. स्वामी समर्थ मठाच्या अध्यक्षा सौ विजयामुळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. मठात सौ बर्वे शैला यांनी हरी तू आमच्या सवंगडी, मनात भरली हे
 प्रथम क्रमांक-  इयत्ता दुसरी ब 
द्वितीय क्रमांक- इयत्ता दुसरी अ
तृतीय क्रमांक- इयत्ता पहिली अ
 मोठ्या गटात 
प्रथम क्रमांक-  इयत्ता तिसरी अ
द्वितीय क्रमांक-  इयत्ता चौथी ब
तृतीय क्रमांक-  इयत्ता चौथी अ
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहलता वाडेकर यांनी केले व कुमठेकर अपर्णा यांनी आभार मानले. याप्रसंगी सावंत दीपिका, धिवार अरुणा, बोरसे प्रदीप,गुंजाळ विलास, भाग्यश्री भोईर, जाधव सुवर्णा,माने सायली व प्रणाली खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

आकुर्डी येथे होलार समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा घेण्यात आला.

पुणे प्रतिनीधी (दि.. २४/६/२०२३) आकुर्डी येथे होलार  समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा भारतीय होलार समाज जीवनसाथी यांच्या मार्फत घेण्यात आला. यात शेकडो उपवर तरुण-तरुणींनी हजेरी लावली. वधू-वर पालक परिचय मेळावे भरवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले तसेच होलार समाजासाठी अभ्यास आयोग नेमण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या आश्वासन दिले. होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ समाजभूषण विदा ऐवळे यांच्या नावाने करण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. समाजातील वाद्य कलावंतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळण्या साठी ही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


 कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसंगी बोलताना विधानसभा कसबा पुणे चे मानानिय आमदार रवींद्र भाऊ धंगेकर  यांनी केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून एस एस सी बोर्ड चे कक्ष अधिकारी श्री राजेश जावीर साहेब, स्वागताध्यक्ष पांडुरंग ऐवळे साहेब होते , होलार समाजातील अनेक जण नोकरी व व्यवसायासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्याले आहेत त्यांचे राहण्याचे ठिकाणही माहीत होत नाही. कोणाची मुले-मुली लग्नाची आहेत, हेही समजणे जिकिरीचे झाले. अशात मुलांचे लग्न जमवणे अवघड होऊन बसले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मेळावे घेणे आवश्यक असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेश जावीर साहेब म्हणाले. 
या मेळाव्यात मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर , नंदुरबार,यवतमाळ,धुळे,मध्यप्रदेश पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,येथून उपवर तरुणी-तरुण सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून मा. आमदार रवींद्र भाऊ धंगेकर,होलार समाजातील उद्योजक नवनाथ शेठ ऐवळे ,DRDO चे अधिकारी मा. भगवान ढोबळे साहेब, अप्पर सचिव सुनील भाजनवळे साहेब,उद्योजक अशोक नराळे साहेब,रमाकांत भजनावळे साहेब शिवाजीराव जावीर साहेब, होलार समाज यंग ब्रिगेड चे अध्यक्ष दादासाहेब नामदास, कार्यक्रमासाठी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व मार्गदर्शक श्री भगवान जावीर गुरुजी तसेच समाजातील जेष्ठ नेते  ,तानाजीराव भंडगे, माजी सरपंच कोळे चे मारुती हत्तेकर साहेब,शिवाजीराव ऐवळेसाहेब,सोमनाथ ऐवळेसाहेब, ॲड. डी एन भंडगे साहेब, ॲड. जी. एन. ऐवळेसाहेब, नाशिक येवला चे जितेंद्र जाधव,उद्योजक सचिन केंगार साहेब  ॲड.पांडुरंग भजनवाळे साहेब, रामचंद्र हातकट्टी हे उपस्थित होते,

 कार्यक्रमाचे आयोजन भारतीय होलार समाज जीवनसाथी चे कार्याध्यक्ष चंद्रकांत ऐवळे पाटील,महेश भंडगे,विक्रांत केंगार, शशिकांत गुळगे ऋषिकेश ऐवळे पाटील,जनार्दन केंगार प्रमोद पारसे  जयश्रीताई भजनावळे, शारदाताई हत्तीकट्टी,अनुराधा खांडेकर
 संचलन प्राचार्य सौ, प्रभावतीताई ढोबळे मॅम यांनी केले

खरंच सामाजिक न्याय प्रस्थापित झाला वास्तव्य खरं खोटं याबाबत बाबा कांबळे यांची भूमिका,

पिंपरी . (प्रतिनीधी दि .)26 जून 2023 हा दिवस माझ्यासाठी अत्यंत स्मरणात राहणारा दिवस आहे, आजचा पूर्ण दिवस हा शासकीय कार्यालय हेलपटे मारण्यामध्ये गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीय महिलांचे प्रश्न समस्या व्यथा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर  मांडण्यामध्ये गेला,

अर्थात हा दिवस सामाजिक न्याय दिण म्हणून साजरा केला जातो मंत्रालयामध्ये प्रत्येक शासकीय कार्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो लावलेले होते त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला होता आणि सर्व अधिकारी कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते, एका बाजूला हे चित्र तर दुसऱ्या बाजूला मी प्रत्यक्ष अनुभवलेलं सामाजिक विषमतेचे खरं रूप गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीय महिलांवरती ठेकेदारांच्या वतीने होणारा अन्याय अत्याचार, या दोन्ही अगदी टोकाच्या दोन घटना मी प्रत्यक्ष अनुभवल्या,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये  कंत्राटी पद्धतीने गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून रस्ते साफसफाई चे कामे करत आहेत, या महिलांचे प्रश्न समस्या अत्यंत बिकट असून 2020 पर्यंत या महिलांना अत्यंत तुटपुंज असे सात हजार ते आठ हजार पगार मिळत होता कष्टकरी कामगार पंचायत वतीने या प्रश्नांवरती लक्ष देऊन आवाज उठवण्याचे काम करण्यात आलं किमान वेतनाचा आग्रह धरण्यात आला यामुळे आता या महिलांना वीस हजार सातशे रुपये पगार मिळत आहे, परंतु त्यांचे अजून मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत त्यात बोनस मागील फरक व इतर सुविधा समान आणि किमान वेतन , प्रॉव्हिडंट फंड ,ई एस आय, वेळेवर पगार, या इतर विविध मागण्या प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, 

 वेळेवरती पगार झाला नाही म्हणून घराचं भाडं कसं भरायचं मुलांचे एडमिशन शिक्षण कसं करायचं हा प्रश्न समोर असल्यामुळे भोसरी येथे काम करणाऱ्या 20 ते 25 महिलांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ग क्षत्रिय अधिकारी यांची भेट घेऊन आम्हाला अजून पगार झाला नाही आम्हाला पगार द्यायला सांगा अशी मागणी केली, यावेळी संबंधित अधिकारी यांनी ठेकेदारांना फैलावर घेत महिलांचा ताबडतोब पगार करा असे आदेश दिले आणि अर्थातच महिलांचा ताबडतोब पगार करण्यात आला परंतु या घटनेचा राग मनात धरून आमच्या विरोधात अधिकाऱ्यांकडे तक्रार करता का ? असे म्हणत संबंधित ठेकेदार व त्यांचा मॅनेजर ने  महिलांचा छळ करण्यास सुरुवात केली मे तिरुपती इंटरप्राइजेस चा ठेकेदार व मॅनेजर अत्यंत जातीवादी, असून या बहादराने 26 जून सामाजिक न्याय दिनाच्या दिवशीच साइटवर जाऊन महिलांना जातिवादक शिवीगाळ  करत तुमची लायकी नाही आमच्या विरोधात बोलण्याची आम्ही पाटील आहोत आमच्याशी व्यवस्थित वागा व्यवस्थित बोला अन्यथा तुम्हाला कामावरून काढू तुमच्या बदल्या करू अशा प्रकारे छळ करत त्यांना कामावरून काढण्याची धमकी देत त्यांच्या इतरत्र बदल्या केल्या व काही महिलांना कामावरून काढण्यात आले, नुसता पगार मागितला याच कारणामुळे असा भयंकर खेळ व अन्याय  महिलांना सहन न झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आले त्या रडत होत्या आणि रडत त्या कष्टकरी कामगार पंचायत च्या कार्यालयामध्ये आल्या यावेळी  कष्टकरी कामगार पंचायत वतिने या प्रश्नावर काम करणाऱ्या मधुराताई डांगे, मी स्वतः आम्ही निवेदन बनवले व सर्वां महिलांची तक्रार देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, पिंपरी पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व संबंधित कार्यालयामध्ये धाव घेतली व महिलांची तक्रार दाखल केली,

अर्थातच एका बाजूला ज्या ज्या शासकीय कार्यालयामध्ये आम्ही गेलो त्या कारल्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा मध्यभागी ठेवलेले होते व त्या ठिकाणी पुष्पहार घालून सर्व अधिकारी मोठे मोठे भाषण देत होते सामाजिक समता न्याय बंधुत्व महिलांना समान अधिकार मागासवर्णांवरती होणारे अन्य अत्याचार थांबले पाहिजे अशा प्रकारचे भाषण देताना पाहिले व दुसऱ्या बाजूला होत गोरगरीब कष्टकरी महिलांचे शोषण त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार, सुरू असताना त्यांच्या घरांना ऐकण्यासाठी देखील कोणी उपस्थित नाही अशी परिस्थिती घटना
" सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी घडताना आम्ही स्वतः पाहिली व अनुभवली आहे,

लोकराजे छत्रपती शाहू महाराजांनी देशात सर्वप्रथम आरक्षणाची भूमिका मांडली  दुर्लक्षित दुर्बल घटकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली व त्यांना समान संधी प्राप्त करून देण्यासाठी आरक्षण देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले महिलांना समान दर्जा मिळाला पाहिजे त्यांच्यावरील होणारे अन्याय अत्याचार याबाबत देखील छत्रपती शाहू महाराजांनी आवाज उठवला व आपल्या कृतीतून अनेक भूमिका मांडल्या महिलांना समान दर्जा देण्याची भूमिका घेतली, म्हणूनच छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते, परंतु प्रत्यक्ष सामाजिक न्याय दिन म्हणून हा दिवस साजरा करणे व छत्रपती शाहू महाराजांनी अंगीकरलेले विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून देखील अमलात आणले, सामाजिक न्यायाची भूमिका प्रत्यक्ष अमला मध्ये आली पाहिजे,

परंतु आता मात्र आपण फक्त सामाजिक न्याय दिन साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही तर प्रत्यक्ष कृती मधून सामाजिक न्याय देण्याची भूमिका घेणे आवश्यक आहे, परंतु आज मात्र आपण फक्त सामाजिक न्याय दिन साजरे करणे इतपतच, मर्यादित राहत असून, दुर्बल दुर्लक्षित गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीय जनतेला समान संधी न्यायाची भूमिका घेताना कमी पडत आहोत हे वास्तव्य आणि कटू सत्य आहे,
सामाजिक न्याय दिन हा खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक घटकांना सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी साजरा केला जावा व यानिमित्ताने समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांचे जीवनमान त्यांचे आर्थिक सामाजिक हे प्रश्न सोडवण्यासाठी  व्हावा एवढीच या निमित्ताने इच्छा.

Monday 26 June 2023

ARY (आंबेडकर राईट्स युथ)संघटना राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने घोषणा करण्यात आली .

.पिंपरी (प्रतिनीधी ) दि २७ जून २०२३ रोजी . पिंपरी चिंचवड शहरात नव्या संघटनेची घोषणा करण्यात आली आहे .
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद जगन्नाथ गायकवाड आणि त्यांचे सहकारी सहीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक व राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी

 ARY (आंबेडकर राईट्स युथ)संघटना राजश्री शाहू महाराज यांच्या 149 द्या जयंती  निमित्त यांची घोषणा करण्यात आली यावेळी शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करून तसेच मोतीचूर लाडू वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.तसेच शहरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी संकल्पना मांडण्यात आली यावेळी शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणारे सन्माननीय उपस्थित होते व संघटनेच्या कार्यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा देण्यात .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने के. एस. बी. चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली .

. .पिंपरी, प्रतिनीधी .दि. २६ जून २०२३-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील नागरिकांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड शहराचे पदाधिकारी मिलिंद वेल्हाळ, नामदेव शिंत्रे, सुनिल पाटील, पांडूरंग पाटील, जगदीश पाटील, पी. बी. पाटील, ईश्वरा शिंदे, अतुल सरदार, कृष्णात पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने के. एस. बी. चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उप आयुक्त विठ्ठल जोशी आणि रविकिरण घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सतिश काळे, गणेश दहिभाते, रविंद्र चव्हाण, धनाजी येळकर, देवेंद्र तायडे, कुशाग्र कदम, पांडुरंग पाटील, जगदीश परीट, ज्ञानेश्वर लोभे, कृष्णा पाटील, बंडोपंत कोटकर, विश्वनाथ स्वामी, सखाराम रेडेकर, अशोक दुर्गुळे, लहु पवार, मनोहर चौगुले, विलास सपकाळ, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे थोर समाजसुधारक, लोकांच्या मनातील एक आदर्श राजे होते. त्यांनी त्यांच्या कुशल प्रशासक नेतृत्वामुळे लोकोपयोगी अनेक उपाययोजना केल्या, सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. लोककला, संस्कृती यांची जपणूक करण्यासाठी कलाकारांना मदत आणि प्रोत्साहन दिले, धरणे, विविध शाळा, विहीरी, कारखाने उभारण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपुर्ण योजना राबविल्या. खऱ्या अर्थाने प्रशासकीय व्यवस्थेत काम करत असताना आपण सर्वांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे व्यापक विचार जोपासावेत असे मत महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन २५ ते २६ जून रोजी करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन काल सायंकाळी महापालिकेच्या साई उद्यान, संभाजीनगर चिंचवड येथे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते आणि यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमातून डॉ. बबन जोगदंड यांनी दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान या विषयावर भर देऊन शिक्षण घ्यावे, परदेशातील विविध भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळवावे जेणेकरून परदेशात नोकरी किंवा व्यवसायासाठी चांगल्या संधी मिळू शकतील, स्वत:चे पारपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड अशी महत्वाची कागदपत्रे नेहमी अद्यावत ठेवावीत. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, वर्तमानपत्रातील बातम्या वाचन करून आपले ज्ञान अद्यावत ठेवावे असे मार्गदर्शन केले. 
यानंतर कोल्हापूर येथील गीतराधाई या संस्थेचे राजमोहन शिंदे आणि ज्ञानेश कोळी दिग्दर्शित ३५ कलाकारांसह महाराष्ट्रातील लोप पावत असलेली लोककला व संस्कृती यावर तीन तासाचा विशेष कार्यक्रम सादर केला. यामध्ये जुनी ग्रामीण गीते, शहरी गीते, शेतकरी गीते, वासुदेव, पिंगळा अशा विविध लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. के. एस. बी. चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती तसेच साई उद्यान येथे उद्यान विभागाकडून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या

पिंपरी, प्रतिनीधी . दि. २६ जून २०२३- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ६३ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १०, ६, ४, ८, ८, ८, १० आणि ९ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.    
अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते. 
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते, त्याबाबत उपाययोजना करणेत यावी, रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करावेत, कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

Sunday 25 June 2023

पिंपरी आणि आकुर्डी येथील तब्बल ९३८ घरांसाठी पालिकेने अर्ज मागविले*

पिंपरी, २५ जून : केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आकुर्डी आरक्षण क्र.२८३ व पिंपरी आरक्षण क्र.७७ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवून, छाननी करुन लाभार्थी निश्चित करण्याचे  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नियोजन आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 28 जून पासून प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. 
---------------------
 प्रकल्पांची संक्षिप्त माहिती  
प्रकल्पाचे नाव /एकुण सदनिका /लाभार्थी हिस्सा /केंद्र शासन हिस्सा /राज्य शासन हिस्सा /  किंमत
 
आकुर्डी          ५६८       ७,३५,२५५    १,५०,०००    १,००,०००    ९,८५,२५५
पिंपरी             ३७०        ७,९२,६९९    १,५०,०००    १,००,०००    १०,४२,६९९

-------------

 प्रकल्पांकरिता सर्वसाधारण अटी व शर्ती  
१) प्रकल्पांकरिता नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अ) सदर प्रकल्पांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिक अर्ज करु शकतात.
ब) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत येणाऱ्या अर्जदारांच्या कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न र.रु.३,००,०००/- (अक्षरी – तीन लाख रुपये) पर्यंत असावे.
क) अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी.
ड) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत यापुर्वी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु, सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करु शकतात.

----------------------------------

२) प्रकल्पांतील सदनिकांचे आरक्षण

प्रकल्पाचे नाव  सर्वसाधारण (Open-५०%)/अनुसूचित जाती (SC-१३%)/अनुसूचित जमाती (ST-७%)/इतर मागास प्रवर्ग (OBC-३०%)/ एकुण

आकुर्डी /   २७० /७० /३८ /१६२ /५४०
दिव्यांग प्रवर्ग (PH)* १४/ ४/ २/ ८/ २८
एकूण : २८४/ ७४/ ४० / १७०/ ५६८
-----------------------
पिंपरी १७६ /४६/ २५/ १०५/ ३५२
दिव्यांग प्रवर्ग (PH)* ९/  २/  १/ ६/  १८
एकुण :१८५/ ४८ /२६/ १११ /३७०
----------------------
* ५% दिव्यांग समांतर आरक्षण आहे 
--------------------

अशी आहे प्रक्रिया 

प्रकल्पांसाठी ऑनलाईन अर्ज करणेस व अनामत रक्कम भरणेकामी नागरिकांना दि.२८/०६/२०२३ ते दि.२८/०७/२०२३ पर्यंत (१ महिना) कालावधी देण्यात येईल. सदर कालावधीतच अर्ज केलेल्या नागरिकांचे पात्रतेविषयक कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. अर्जदारांनी अर्जकरण्यासाठी https://pcmc.pmay.org संकेतीक स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण करावी.
 नागरिकांकडून अर्जासोबत र.रु.१०,०००/- इतकी अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. तसेच नोंदणी शुल्क र.रु.५००/- असे एकुण र.रु.१०,५००/- जमा करायचे आहे. नागरीकांकडुन सर्वसाधारण कागदपत्रे उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर (सर्व कुंटुंबाचे) Upload झाल्यानंतर त्यांना अनामत व नोंदणी शुल्क असे एकुण र.रु.१०,५००/- ही ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. सदर रक्कम यशस्वीरित्या भरल्यानंतर पुढील उर्वरीत कागदपत्रे Upload करावयाची आहे. सोडतीमध्ये ९३८ सदनिकांचे विजेता यादी असेल व प्रतीक्षा यादी १ असणार आहे. सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतिक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांचे अनामत रक्कम नमुद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने र.रु.१०,०००/- परत (Refund) करण्यात येणार आहे. आकुर्डी व पिंपरी येथील प्रकल्पांकरिता ऑनलाईन अर्ज करताना नागरिकांनी खालील तक्त्यामधील नमुद कागदपत्रे Upload करावयाचे आहेत व सोडतीनंतर निश्चित झालेल्या लाभार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे नाव निवड यादीमधून वगळण्यात येईल.

--------------पिंपरी, २५ जून : केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आकुर्डी आरक्षण क्र.२८३ व पिंपरी आरक्षण क्र.७७ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवून, छाननी करुन लाभार्थी निश्चित करण्याचे  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नियोजन आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 28 जून पासून प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. 
---------------------
 प्रकल्पांची संक्षिप्त माहिती  
प्रकल्पाचे नाव /एकुण सदनिका /लाभार्थी हिस्सा /केंद्र शासन हिस्सा /राज्य शासन हिस्सा /  किंमत
 
आकुर्डी          ५६८       ७,३५,२५५    १,५०,०००    १,००,०००    ९,८५,२५५
पिंपरी             ३७०        ७,९२,६९९    १,५०,०००    १,००,०००    १०,४२,६९९

-------------

 प्रकल्पांकरिता सर्वसाधारण अटी व शर्ती  
१) प्रकल्पांकरिता नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अ) सदर प्रकल्पांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिक अर्ज करु शकतात.
ब) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत येणाऱ्या अर्जदारांच्या कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न र.रु.३,००,०००/- (अक्षरी – तीन लाख रुपये) पर्यंत असावे.
क) अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी.
ड) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत यापुर्वी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु, सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करु शकतात.

----------------------------------

२) प्रकल्पांतील सदनिकांचे आरक्षण

प्रकल्पाचे नाव  सर्वसाधारण (Open-५०%)/अनुसूचित जाती (SC-१३%)/अनुसूचित जमाती (ST-७%)/इतर मागास प्रवर्ग (OBC-३०%)/ एकुण

आकुर्डी /   २७० /७० /३८ /१६२ /५४०
दिव्यांग प्रवर्ग (PH)* १४/ ४/ २/ ८/ २८
एकूण : २८४/ ७४/ ४० / १७०/ ५६८
-----------------------
पिंपरी १७६ /४६/ २५/ १०५/ ३५२
दिव्यांग प्रवर्ग (PH)* ९/  २/  १/ ६/  १८
एकुण :१८५/ ४८ /२६/ १११ /३७०
----------------------
* ५% दिव्यांग समांतर आरक्षण आहे 
--------------------

अशी आहे प्रक्रिया 

प्रकल्पांसाठी ऑनलाईन अर्ज करणेस व अनामत रक्कम भरणेकामी नागरिकांना दि.२८/०६/२०२३ ते दि.२८/०७/२०२३ पर्यंत (१ महिना) कालावधी देण्यात येईल. सदर कालावधीतच अर्ज केलेल्या नागरिकांचे पात्रतेविषयक कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. अर्जदारांनी अर्जकरण्यासाठी https://pcmc.pmay.org संकेतीक स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण करावी.
 नागरिकांकडून अर्जासोबत र.रु.१०,०००/- इतकी अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. तसेच नोंदणी शुल्क र.रु.५००/- असे एकुण र.रु.१०,५००/- जमा करायचे आहे. नागरीकांकडुन सर्वसाधारण कागदपत्रे उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर (सर्व कुंटुंबाचे) Upload झाल्यानंतर त्यांना अनामत व नोंदणी शुल्क असे एकुण र.रु.१०,५००/- ही ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. सदर रक्कम यशस्वीरित्या भरल्यानंतर पुढील उर्वरीत कागदपत्रे Upload करावयाची आहे. सोडतीमध्ये ९३८ सदनिकांचे विजेता यादी असेल व प्रतीक्षा यादी १ असणार आहे. सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतिक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांचे अनामत रक्कम नमुद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने र.रु.१०,०००/- परत (Refund) करण्यात येणार आहे. आकुर्डी व पिंपरी येथील प्रकल्पांकरिता ऑनलाईन अर्ज करताना नागरिकांनी खालील तक्त्यामधील नमुद कागदपत्रे Upload करावयाचे आहेत व सोडतीनंतर निश्चित झालेल्या लाभार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे नाव निवड यादीमधून वगळण्यात येईल.

---------------
कागदपत्रे काय हवीत 

उत्पन्न दाखला, तहसिलदार यांचे स्वाक्षरीने (सन २०२२-२३ आर्थिक वर्ष) किंवा १ वर्षाचा इनकम टॅक्स रिटर्न (ITR) किंवा फॉर्म १६/१६अ (सन २०२२-२३ आर्थिक वर्ष)
जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय) (फक्त अर्जदाराचे, कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही) - फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
जात वैधता प्रमाणपत्र - फक्त अर्जदाराचे (उपलब्ध असल्यास) .  आधार कार्ड (अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे).  पॅनकार्ड (अर्जदार व सह अर्जदार).  बँक पासबुक (अर्जदार) पासबुक खाते तपशिल पृष्ठ व रद्द केलेला चेक.  मतदान ओळखपत्र (अर्जदार).  भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी – किमान र.रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर). संमतीपत्र (नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान र.रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र).  विज बिल (चालु महिन्याचे राहत्या पत्त्यावरील).  अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल दाखला) – फक्त महाराष्ट्रातील रहिवासी.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विजेता यादीमध्ये नाव आलेल्या लाभार्थ्यांच्या नावे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावे संपुर्ण भारतात पक्के घर नसावे. जर आढळल्यास सदर लाभार्थ्याचे नाव विजेता यादीमधून वगळण्यात येईल.  सदर प्रकल्पांकरिता अर्ज करणारा नागरीक हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार जर महिला असेल तर जात प्रमाणपत्र सुध्दा त्यांचेच सादर करावा लागणार. इतर कुटुंबातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार महिला जर लग्नाच्या अगोदर अर्ज केला असेल आणि दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न झाले असतील तसेच अर्जदार महिला लग्नाच्या अगोदर अर्ज करताना जे नाव नमुद केली असेल तर नाव बदल झालेबाबत मुळ गॅजेट व मुळ मॅरेज सर्टिफीकेट सादर करावा लागणार आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना ज्या नागरिकांनी SBC (विशेष मागास प्रवर्ग) प्रवर्गातून अर्ज केला असेल आणि त्यांचे नाव विजेता यादीमध्ये OBC (इतर मागास प्रवर्ग) प्रवर्गामध्ये निवड झाला असेल आणि जर सदर अर्जदार SBC चे जात प्रमाणपत्र सादर करत असेल तर तो अर्जदार ग्राह्य धरला जाणार आहे.  सदर प्रकल्पाकरिता ऑनलाईन अर्जामध्ये माहिती नमुद करताना नागरिकांकडून कोणतीही चूक (उदा. नाव, जात आरक्षण माहिती, उत्पन्न, दिव्यांग बाबत माहिती इ.) झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार अर्जदार राहणार आहे.  लाभार्थी स्वहिश्श्याच्या १०% रक्कम सोडतीनंतर १५ दिवसांच्या आत भरल्यानंतरच सदनिका वाटपपत्र (Allotment Letter) देण्यात येईल.  तदनंतर उर्वरित ९०% रक्कम १ महिन्याच्या आत भरावयाचे आहे. तसेच सोडतीनंतर ४५ दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरणा करणे बंधनकारक राहील.  उर्वरित ९०% रक्कम भरणेकामी बँक लोन करुन घेणे ही सर्वस्वी लाभार्थ्याची जबाबदारी असून यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठलीही हमी घेणार नाही.  लाभार्थ्यांना लोन करिता आवश्यक असलेले No Objection Certificate (NOC) देणेकामी बँकेमार्फत Loan Sanction Letter महानगरपालिकेस प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांस महानगरपालिकेमार्फत No Objection Certificate (NOC) देण्यात येईल.  जर लाभार्थ्यांचे लोन होणेकामी काही अडचणी असल्यास व लोन करिता आवश्यक असलेल्या Cibil Score चा काही अडचण असल्यास त्यांनी परस्पर बँकेशी संपर्क साधावा. सदर कारणांमुळे लाभार्थ्यांचा लोन होण्यास काही अडचण आल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. तसेच होम लोन किंवा स्वहिस्सा रक्कम मुदतीत न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ रद्द करण्यात येणार आहे.  सोडत दिनांकापासून १५ दिवसाच्या आत लाभधारकाने स्वहिश्श्यामधील १०% रक्कम न भरल्यास किंवा लाभधारकाने सदनिका Surrender केल्यास त्याचा लाभ रद्द करुन तो प्रतीक्षा यादी १ मधील प्राधान्य क्रमानुसार लाभधारकास देण्यात येईल.  तसेच आवश्यक कागदपत्रे (उदा. जातीचा दाखला), योजनेचे पात्रतेचे निकषाची पुर्तता न केल्यास तथा सदनिकेची रक्कम निर्धारित टप्प्यानुसार न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ रद्द झाल्यास अशा लाभार्थीच्या सदनिका प्रतीक्षा यादी क्र.१ मधील प्राधान्य क्रमानुसार आरक्षणानुसार वितरित करणेत येईल.  विजेता यादी व प्रतिक्षा यादी क्र.१ मधील लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम न भरलेस सदर लाभार्थ्यांचा लाभ रद्द करुन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदनिका वितरित करणेत येतील.
 जर लाभार्थ्यांने सदनिकेचा ताबा घेणेपर्यंत स्वहिस्सा रक्कम भरलेनंतर सदनिका घेणेस इच्छुक नसेल तर Cancellation Charges म्हणून स्वहिस्सा रकमेमधील १०% रक्कम वजावट करणेत येईल व उर्वरित रक्कम लाभार्थ्यास देणेत येईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेळोवेळी जाहिर केलेल्या तरतुदीनुसार असल्याने १० वर्षांपर्यंत सदनिकेची विक्री करता येणार नाही. अगर भाडे पट्ट्याने देता येणार नाही. सदनिकेची अनधिकृत विक्री, हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्यास लाभार्थ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच १० वर्षांनंतर सदनिका विक्री करावाचे झाल्यास त्यावेळच्या बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या ५०% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देणे क्रमप्राप्त आहे.  या सोडतीसाठी सदनिकेचे आरक्षण तक्त्यामध्ये नमुद प्रमाणे सामाजिक आरक्षण राहिल व ५% दिव्यांग समांतर आरक्षण असेल.
-
कागदपत्रे काय हवीत 

उत्पन्न दाखला, तहसिलदार यांचे स्वाक्षरीने (सन २०२२-२३ आर्थिक वर्ष) किंवा १ वर्षाचा इनकम टॅक्स रिटर्न (ITR) किंवा फॉर्म १६/१६अ (सन २०२२-२३ आर्थिक वर्ष)
जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय) (फक्त अर्जदाराचे, कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही) - फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
जात वैधता प्रमाणपत्र - फक्त अर्जदाराचे (उपलब्ध असल्यास) .  आधार कार्ड (अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे).  पॅनकार्ड (अर्जदार व सह अर्जदार).  बँक पासबुक (अर्जदार) पासबुक खाते तपशिल पृष्ठ व रद्द केलेला चेक.  मतदान ओळखपत्र (अर्जदार).  भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी – किमान र.रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर). संमतीपत्र (नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान र.रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र).  विज बिल (चालु महिन्याचे राहत्या पत्त्यावरील).  अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल दाखला) – फक्त महाराष्ट्रातील रहिवासी.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विजेता यादीमध्ये नाव आलेल्या लाभार्थ्यांच्या नावे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावे संपुर्ण भारतात पक्के घर नसावे. जर आढळल्यास सदर लाभार्थ्याचे नाव विजेता यादीमधून वगळण्यात येईल.  सदर प्रकल्पांकरिता अर्ज करणारा नागरीक हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार जर महिला असेल तर जात प्रमाणपत्र सुध्दा त्यांचेच सादर करावा लागणार. इतर कुटुंबातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार महिला जर लग्नाच्या अगोदर अर्ज केला असेल आणि दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न झाले असतील तसेच अर्जदार महिला लग्नाच्या अगोदर अर्ज करताना जे नाव नमुद केली असेल तर नाव बदल झालेबाबत मुळ गॅजेट व मुळ मॅरेज सर्टिफीकेट सादर करावा लागणार आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना ज्या नागरिकांनी SBC (विशेष मागास प्रवर्ग) प्रवर्गातून अर्ज केला असेल आणि त्यांचे नाव विजेता यादीमध्ये OBC (इतर मागास प्रवर्ग) प्रवर्गामध्ये निवड झाला असेल आणि जर सदर अर्जदार SBC चे जात प्रमाणपत्र सादर करत असेल तर तो अर्जदार ग्राह्य धरला जाणार आहे.  सदर प्रकल्पाकरिता ऑनलाईन अर्जामध्ये माहिती नमुद करताना नागरिकांकडून कोणतीही चूक (उदा. नाव, जात आरक्षण माहिती, उत्पन्न, दिव्यांग बाबत माहिती इ.) झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार अर्जदार राहणार आहे.  लाभार्थी स्वहिश्श्याच्या १०% रक्कम सोडतीनंतर १५ दिवसांच्या आत भरल्यानंतरच सदनिका वाटपपत्र (Allotment Letter) देण्यात येईल.  तदनंतर उर्वरित ९०% रक्कम १ महिन्याच्या आत भरावयाचे आहे. तसेच सोडतीनंतर ४५ दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरणा करणे बंधनकारक राहील.  उर्वरित ९०% रक्कम भरणेकामी बँक लोन करुन घेणे ही सर्वस्वी लाभार्थ्याची जबाबदारी असून यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठलीही हमी घेणार नाही.  लाभार्थ्यांना लोन करिता आवश्यक असलेले No Objection Certificate (NOC) देणेकामी बँकेमार्फत Loan Sanction Letter महानगरपालिकेस प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांस महानगरपालिकेमार्फत No Objection Certificate (NOC) देण्यात येईल.  जर लाभार्थ्यांचे लोन होणेकामी काही अडचणी असल्यास व लोन करिता आवश्यक असलेल्या Cibil Score चा काही अडचण असल्यास त्यांनी परस्पर बँकेशी संपर्क साधावा. सदर कारणांमुळे लाभार्थ्यांचा लोन होण्यास काही अडचण आल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. तसेच होम लोन किंवा स्वहिस्सा रक्कम मुदतीत न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ रद्द करण्यात येणार आहे.  सोडत दिनांकापासून १५ दिवसाच्या आत लाभधारकाने स्वहिश्श्यामधील १०% रक्कम न भरल्यास किंवा लाभधारकाने सदनिका Surrender केल्यास त्याचा लाभ रद्द करुन तो प्रतीक्षा यादी १ मधील प्राधान्य क्रमानुसार लाभधारकास देण्यात येईल.  तसेच आवश्यक कागदपत्रे (उदा. जातीचा दाखला), योजनेचे पात्रतेचे निकषाची पुर्तता न केल्यास तथा सदनिकेची रक्कम निर्धारित टप्प्यानुसार न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ रद्द झाल्यास अशा लाभार्थीच्या सदनिका प्रतीक्षा यादी क्र.१ मधील प्राधान्य क्रमानुसार आरक्षणानुसार वितरित करणेत येईल.  विजेता यादी व प्रतिक्षा यादी क्र.१ मधील लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम न भरलेस सदर लाभार्थ्यांचा लाभ रद्द करुन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदनिका वितरित करणेत येतील.
 जर लाभार्थ्यांने सदनिकेचा ताबा घेणेपर्यंत स्वहिस्सा रक्कम भरलेनंतर सदनिका घेणेस इच्छुक नसेल तर Cancellation Charges म्हणून स्वहिस्सा रकमेमधील १०% रक्कम वजावट करणेत येईल व उर्वरित रक्कम लाभार्थ्यास देणेत येईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेळोवेळी जाहिर केलेल्या तरतुदीनुसार असल्याने १० वर्षांपर्यंत सदनिकेची विक्री करता येणार नाही. अगर भाडे पट्ट्याने देता येणार नाही. सदनिकेची अनधिकृत विक्री, हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्यास लाभार्थ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच १० वर्षांनंतर सदनिका विक्री करावाचे झाल्यास त्यावेळच्या बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या ५०% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देणे क्रमप्राप्त आहे.  या सोडतीसाठी सदनिकेचे आरक्षण तक्त्यामध्ये नमुद प्रमाणे सामाजिक आरक्षण राहिल व ५% दिव्यांग समांतर आरक्षण असेल.