शिक्षणामुळेच विकास होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी दीपस्तंभ प्रमाणे कार्य केले त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह सुरू केले वंचित घटकातील मुले मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना रोजगार मिळावा म्हणून तसेच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असून आमचे सरकार हे जनतेचे सरकार आहे आम्ही सामाजिक न्याय देण्याचे काम करतो बार्टी, नवनवीन कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा असे प्रतिपादन राजाचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले .
दिनांक 26 जुन 2023 रोजी मागासवर्गीय 250 मुलींचे शासकीय वस्तीग्रह, चेंबूर, मुंबई उद्घाटन व लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे अंतर्गत येरवडा संकुल पुणे येथील युपीएससीचे निवासी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ मा मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते (दूरदश्यप्रणालीद्वारे) करण्यात आला.
यावेळी मा ना. मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर, तथा मंत्री पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व न्याविन्यता , महिला व बालविकास, मा राहुल शेवाळे, सदस्य लोकसभा, मा. सुमंत भांगे, सचिव - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मा दिनेश डिगळे, सहसचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, तसेच बार्टी, येरवडा संकुल पुणे येथील युपीएससी निवास प्रशिक्षण कार्यक्रमात बार्टी संस्थेचे महासंचालक मा सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, श्रीमती स्नेहल भोसले, सतिष पाटील, अनिल कांरडे, वॄषाली शिंदे , रविंन्द्र कदम, आरती भोसले, आदी तसेच UPSC चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी , पालक व बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मा खासदार राहुल शेवाळे, मा.सुमंत भांगे, डॉ प्रशांत नारनवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
मा महासंचालक सुनिल वारे यांनी UPSC चे निवासी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी फुले शाहू आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून अभ्यास करावा यश निश्चित मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा बार्टी संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश मिळवावे असाही आशावाद व्यक्त केला.
विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सतिष पाटील यांनी केले.सुत्रसंचलन श्रीमती प्रज्ञा मोहिते यांनी केले. आभार श्रीमती स्नेहल भोसले यांनी मानले..
No comments:
Post a Comment