Tuesday 27 June 2023

खरंच सामाजिक न्याय प्रस्थापित झाला वास्तव्य खरं खोटं याबाबत बाबा कांबळे यांची भूमिका,

पिंपरी . (प्रतिनीधी दि .)26 जून 2023 हा दिवस माझ्यासाठी अत्यंत स्मरणात राहणारा दिवस आहे, आजचा पूर्ण दिवस हा शासकीय कार्यालय हेलपटे मारण्यामध्ये गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीय महिलांचे प्रश्न समस्या व्यथा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर  मांडण्यामध्ये गेला,

अर्थात हा दिवस सामाजिक न्याय दिण म्हणून साजरा केला जातो मंत्रालयामध्ये प्रत्येक शासकीय कार्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो लावलेले होते त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला होता आणि सर्व अधिकारी कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते, एका बाजूला हे चित्र तर दुसऱ्या बाजूला मी प्रत्यक्ष अनुभवलेलं सामाजिक विषमतेचे खरं रूप गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीय महिलांवरती ठेकेदारांच्या वतीने होणारा अन्याय अत्याचार, या दोन्ही अगदी टोकाच्या दोन घटना मी प्रत्यक्ष अनुभवल्या,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये  कंत्राटी पद्धतीने गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून रस्ते साफसफाई चे कामे करत आहेत, या महिलांचे प्रश्न समस्या अत्यंत बिकट असून 2020 पर्यंत या महिलांना अत्यंत तुटपुंज असे सात हजार ते आठ हजार पगार मिळत होता कष्टकरी कामगार पंचायत वतीने या प्रश्नांवरती लक्ष देऊन आवाज उठवण्याचे काम करण्यात आलं किमान वेतनाचा आग्रह धरण्यात आला यामुळे आता या महिलांना वीस हजार सातशे रुपये पगार मिळत आहे, परंतु त्यांचे अजून मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत त्यात बोनस मागील फरक व इतर सुविधा समान आणि किमान वेतन , प्रॉव्हिडंट फंड ,ई एस आय, वेळेवर पगार, या इतर विविध मागण्या प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, 

 वेळेवरती पगार झाला नाही म्हणून घराचं भाडं कसं भरायचं मुलांचे एडमिशन शिक्षण कसं करायचं हा प्रश्न समोर असल्यामुळे भोसरी येथे काम करणाऱ्या 20 ते 25 महिलांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ग क्षत्रिय अधिकारी यांची भेट घेऊन आम्हाला अजून पगार झाला नाही आम्हाला पगार द्यायला सांगा अशी मागणी केली, यावेळी संबंधित अधिकारी यांनी ठेकेदारांना फैलावर घेत महिलांचा ताबडतोब पगार करा असे आदेश दिले आणि अर्थातच महिलांचा ताबडतोब पगार करण्यात आला परंतु या घटनेचा राग मनात धरून आमच्या विरोधात अधिकाऱ्यांकडे तक्रार करता का ? असे म्हणत संबंधित ठेकेदार व त्यांचा मॅनेजर ने  महिलांचा छळ करण्यास सुरुवात केली मे तिरुपती इंटरप्राइजेस चा ठेकेदार व मॅनेजर अत्यंत जातीवादी, असून या बहादराने 26 जून सामाजिक न्याय दिनाच्या दिवशीच साइटवर जाऊन महिलांना जातिवादक शिवीगाळ  करत तुमची लायकी नाही आमच्या विरोधात बोलण्याची आम्ही पाटील आहोत आमच्याशी व्यवस्थित वागा व्यवस्थित बोला अन्यथा तुम्हाला कामावरून काढू तुमच्या बदल्या करू अशा प्रकारे छळ करत त्यांना कामावरून काढण्याची धमकी देत त्यांच्या इतरत्र बदल्या केल्या व काही महिलांना कामावरून काढण्यात आले, नुसता पगार मागितला याच कारणामुळे असा भयंकर खेळ व अन्याय  महिलांना सहन न झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आले त्या रडत होत्या आणि रडत त्या कष्टकरी कामगार पंचायत च्या कार्यालयामध्ये आल्या यावेळी  कष्टकरी कामगार पंचायत वतिने या प्रश्नावर काम करणाऱ्या मधुराताई डांगे, मी स्वतः आम्ही निवेदन बनवले व सर्वां महिलांची तक्रार देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, पिंपरी पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व संबंधित कार्यालयामध्ये धाव घेतली व महिलांची तक्रार दाखल केली,

अर्थातच एका बाजूला ज्या ज्या शासकीय कार्यालयामध्ये आम्ही गेलो त्या कारल्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा मध्यभागी ठेवलेले होते व त्या ठिकाणी पुष्पहार घालून सर्व अधिकारी मोठे मोठे भाषण देत होते सामाजिक समता न्याय बंधुत्व महिलांना समान अधिकार मागासवर्णांवरती होणारे अन्य अत्याचार थांबले पाहिजे अशा प्रकारचे भाषण देताना पाहिले व दुसऱ्या बाजूला होत गोरगरीब कष्टकरी महिलांचे शोषण त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार, सुरू असताना त्यांच्या घरांना ऐकण्यासाठी देखील कोणी उपस्थित नाही अशी परिस्थिती घटना
" सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी घडताना आम्ही स्वतः पाहिली व अनुभवली आहे,

लोकराजे छत्रपती शाहू महाराजांनी देशात सर्वप्रथम आरक्षणाची भूमिका मांडली  दुर्लक्षित दुर्बल घटकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली व त्यांना समान संधी प्राप्त करून देण्यासाठी आरक्षण देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले महिलांना समान दर्जा मिळाला पाहिजे त्यांच्यावरील होणारे अन्याय अत्याचार याबाबत देखील छत्रपती शाहू महाराजांनी आवाज उठवला व आपल्या कृतीतून अनेक भूमिका मांडल्या महिलांना समान दर्जा देण्याची भूमिका घेतली, म्हणूनच छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते, परंतु प्रत्यक्ष सामाजिक न्याय दिन म्हणून हा दिवस साजरा करणे व छत्रपती शाहू महाराजांनी अंगीकरलेले विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून देखील अमलात आणले, सामाजिक न्यायाची भूमिका प्रत्यक्ष अमला मध्ये आली पाहिजे,

परंतु आता मात्र आपण फक्त सामाजिक न्याय दिन साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही तर प्रत्यक्ष कृती मधून सामाजिक न्याय देण्याची भूमिका घेणे आवश्यक आहे, परंतु आज मात्र आपण फक्त सामाजिक न्याय दिन साजरे करणे इतपतच, मर्यादित राहत असून, दुर्बल दुर्लक्षित गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीय जनतेला समान संधी न्यायाची भूमिका घेताना कमी पडत आहोत हे वास्तव्य आणि कटू सत्य आहे,
सामाजिक न्याय दिन हा खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक घटकांना सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी साजरा केला जावा व यानिमित्ताने समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांचे जीवनमान त्यांचे आर्थिक सामाजिक हे प्रश्न सोडवण्यासाठी  व्हावा एवढीच या निमित्ताने इच्छा.

No comments:

Post a Comment