Friday, 7 July 2023

तब्बल आठ वर्षे एकाच विभागात राहण्यासाठी .कनिष्ठ अभि., स्थापत्य नाव - पडलवार अमोल यांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे?

.पिंपरी ( प्रतिनीधी लोक हिताय) दि . ०७ जुलै २०२३ मागील काही दिवसांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या ( मनपा) अखेर झाल्या आहेत. 15 विभागातील अधिकारी, कर्मचारी अशा 235 जणांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत.
महापालिकेच्या बदली धोरणानुसार एकाच विभागात 3 किंवा 6 वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या विभागात  महिन्यात बदल्या केल्या जातात.  अनेक अधिकारी, कर्मचारी बदलीसाठी पात्र असताना त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. त्यामुळे पालिकेतील लाचखोरी, भ्रष्टाचाराला बळ मिळत होते. सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत होत्या. शासनाने बदल्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते.
तब्बल आठ वर्षे एकाच विभागात  राहण्यासाठी .कनिष्ठ अभि., स्थापत्य नाव - पडलवार अमोल यांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे
बांधकाम परवानगी व अनधिकृत ०८/०१/२०१५ 
बांधकाम नियंत्रण०२/०८/२०२० ते
पदनाम कनिष्ठ अभि., स्थापत्य नाव - पडलवार अमोल इरना सध्याचा रुजू पासून  एकच विभागात का ठेवण्यात आले आहे
इतर कर्मचारी अधिकाऱ्यांना वेळेनुसार बदली होती  ,माहिती अधिकारानुसार  मिळालेली माहिती सा.कार्यकर्ते विष्णू सरपते यांनीही माहिती माध्यमांसमोर  आणली आहे ' ?




जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी रात्री उशिरा बदल्या केल्या आहेत. त्यात भांडारपाल 5, सहायक भांडारपाल 5, मुख्य लिपिक 28, लिपिक 79, मजूर 30, शिपाई 17, कार्यकारी अभियंता (विद्युत) 1, उपअभियंता (विद्युत) 2, उपअभियंता (स्थापत्य) 12, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 3, कॉप्युटर ऑपरेटर 11, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 2, लघुलेखक 2 आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 30 अशा 235 कर्मचा-यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या विभागात तत्काळ रूजू व्हावे. रूजू अहवाल सामान्य प्रशासन विभागास पाठवावे. जुलै महिन्याचे वेतन नव्या विभागातून काढले जाणार आहे, असे सामान्य प्रशासना विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Monday, 3 July 2023

ओबीसी समाजाचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार - आ. उमा खापरे

पिंपरी चिंचवड ओबीसी विकास परिषदेची स्थापना
पिंपरी, ( प्रतिनीधी लोकहिताय न्युज) (दि. ३ जुलै २०२३) भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने भारतातील सर्व उपेक्षित, वंचित, इतर मागास वर्गीय समाज घटकांच्या विकासासाठी धेय्य धोरणे राबविले आहेत.  महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे प्रलंबित प्रश्न आगामी पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार उमा खापरे यांनी केले.
  पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी समाजातील विविध जातींच्या प्रतिनिधींची बैठक (दि. २ जुलै) थरमॅक्स चौक, चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शहरातील तीस पेक्षा जास्त ओबीसी समाजातील जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पिंपरी चिंचवड ओबीसी विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी आ. उमा खापरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
  यावेळी आ. खापरे यांनी सांगितले की, ओबीसी समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासलेला असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी विकास परिषदेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहे. ओबीसी समाजातील सर्व जातींना एकत्र करून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवले जाण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून काम केले जाईल. ओबीसी विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक उन्नतीसाठी नॉन क्रिमीजर दाखल्याची मर्यादा वाढविणे, जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी असणाऱ्या जाचक अटी कमी करणे तसेच ओबीसी समाजातील व्यवसायिकांना लघुउद्योजकांना विशेष पतधोरण तयार करून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामध्ये झालेले अतिक्रमण काढून टाकून ओबीसींना राजकीय न्याय देण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार आहे. ओबीसी मधील प्रत्येक जातीच्या तज्ञ व अभ्यासू व्यक्तींची लवकरच बैठक घेऊन ओबीसी विकास परिषदेचे अधिवेशन बोलवले जाईल. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ओबीसी समाजासाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राष्ट्रीय ओबीसी आयोग यांच्या मदतीने ओबीसी समाजासाठी गरीब कल्याणकारी योजना राबविण्यासाठी चालना देण्यात येईल असे आ. खापरे यांनी सांगितले. 
   यावेळी सुवर्णकार, वंजारी, धनगर, माळी, बारा बलुतेदार, साळी,कोष्टी, कोळी, गुरव, शिकलगार, लोहार, सुतार, वडार,  तेली, लेवा पाटील अशा ओबीसीतील जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी पक्षनेते नामदेव ढाके आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, माऊली थोरात, राजाभाऊ दुर्गे, शारदा सोनवणे तसेच कैलास सानप, गणेश वाळुंजकर, दिपक नागरगोजे, अण्णा गर्जे, सतीश नागरगोजे, राजेश्वरी सोनवणे जायभाय, आशाताई काळे, राहुल खाडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, मनोज ब्राह्मणकर, विजय शिनकर, पोपट हजारे, दादा कवितके,  संजय मंगोडेकर, नरेश कदम, प्रशांत आगन्यान, प्रकाश लोहार, धर्मा पवार, सुरेश शिरोडे, चंदू पाटील, गौरव लोहार, पुष्कर पाटील, हनुमंत घुगे आदी या बैठकीस उपस्थित होते.

Saturday, 1 July 2023

आषाढी एकादशी आणि बकरी ईद या सणाच्या निमित्ताने आधिकारी श्री अजित पवार यांच्या विठ्ठल रुक्मिणी मुर्ती देऊन सन्मान करून हिंदु-मुस्लीम बांधवांना एकतेचा संदेश दिला .

बिड (प्रतिनीधी  लोक हिताय न्युज )दि ०१ जुलै २०२३
 आषाढी एकादशी आणि बकरी ईद या दोन्ही दोन समाज्याचे महत्वाचे समजले जानारे सण यांचे महत्व लक्षात घेत आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी  श्री .अजित पवार यांचा पि.चि.महानगर पालिकेतील पुर्वाश्रमिचा जनते प्रति घेतलेल्या निर्णयाचा केंद्रीय मंञी रामदास आठवले याच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांचा हिंदु-मुस्लीम एैक्याचे पाइक म्हनुन शाल, श्रिफळ, पुणेरी पगडी ,आणि विठ्ठल रुक्मिणी ची मुर्ती देऊन यथोचित सन्मान करन्यात आला ,सन्मानाला ऊत्तर देत अजित पवार मह्नाले अजिज शेख हे मुस्लिम समाजाचे असुन ही मला पांडुरंगाचे प्रतिरुप विठ्ठल रखुमानी यांची  मुर्ती देऊन हिंदुत्वाची निशानी भगवी शाल व पगडी देऊन माझा सन्मान सत्कार केला आणी तो ऐका मुस्लीम कार्यकर्त्या कडुन सन्मान होणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे या सन्मानामुळे बीड जिल्ह्यातील हिंदु मुस्लिम समाजामध्ये ऐक्याचा संदेश जाईल याची मला खाञी आहे असे भावनात्मक ऊदगार अजिज शेख यांच्या कार्याबद्ल केले 
या प्रसंगी रि पा ई वाहतुक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिज शेख .महाराष्ट्र २४तास न्युज चँनल चे मुख्यसंपादक संजय धुतडमल, प्रतिकार न्युज चे मुख्यसंपादक माणिक पौळ ,खेड तालुकाध्यक्ष अभिमान डिसले, सय्यद मुमताज मँडम(मुख्याध्यापिका), संध्याताई भोसले, (अंगनवाडी बीड जिल्हाध्यक्षा ) खान फिरदौस सर, रियाज सिध्दिकी , फाईम इनामदार पञकार,मिसाळ शिवाजी, मिसाळ सुधाकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते

पीसीएमसी सी अँड टी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा अगदी आनंदात पार पडला .

पिंपरी ( प्रतिनीधी) दि ०१ जुलै २०२३  चिंचवड महानगरपालिका अंकित ए जी एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. आज आपल्या पीसीएमसी सी अँड टी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा अगदी आनंदात पार पडला कंपनीचे असिस्टंट मॅनेजर प्रतीक तावरे ,देविका शेळके मॅडम, अनिता मोरे, धनाजी शिंदे, आशिष साळुंखे ,अंकुश त्रिभुवन, गणेश शिंदे ,अविनाश थिटे, दीपक पाटोळे, अभिषेक गोवंडे, नानासाहेब गायकवाड व इतर अधिकारी पदाधिकारी व ग्रुपचे सर्व सफाई कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व कामगारांना यावेळी अल्पोपहार देण्यात आला  प्रतीक तावरे सरांनी चांगले मार्गदर्शन  केले धनाजी शिंदे यांनी  सर्वांचेआभार मानले अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले अभिषेक गोंवंडे यांनी मार्गदर्शक सूचना करून या कार्यक्रमाची सांगता केली

मोशी क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प तात्काळ रद्द करा .माजी विरोधी पक्षनेते नाना काटे .

नेहरु नगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमच् काय 

पिंपरी प्रतिनीधी . दि . ०१ जुलै २०२३पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभार नेहरु नगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियम नव्यानेउभी करण्याच्या नावाने विल्हेवाट लावली आणि ,शहराच्या प्रमुख ठिकाणावर असणाऱ्या स्टेडियमला सोडून मोशी येथे स्टेडियम साठी मंजुरी देणे म्हणजेच भोंगळ कारभार '
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
मोशी क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प तात्काळ रद्द करा, अन्यथा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा (संग्रहित छायाचित्र)
पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा घाट कशासाठी घातला आहे. सल्लागाराच्या नावाखाली ७ कोटी ९६ लाख रुपयांची उधळण आयुक्त कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ४०० कोटींचा खर्च गृहीत धरून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. याला जवळपास १.९९ (निविदा पूर्व १.९८ टक्के तर निविदा पश्‍चात ०.१ टक्के) ओम टेक्‍नॉलिक्‍स कंपनीला देण्याचे ठरविले आहे. मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र.१/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे. या कामासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे, गहुंजे व बारामती अशी तीन क्रिकेट स्टेडियम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरालगत गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना नव्याने क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट कोणाच्या सांगण्यावरून घातला जात आहे. यामागे राज्यातील सत्तेत असणारे खोके सरकार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी हे अंतर्गत आर्थिक तडजोडी करून प्रशासनाला हाताशी धरून शहरातील जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा संशय नाना काटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नव्याने विकसित करणारे क्रिकेट स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी की पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नसले तरी त्यांच्या सल्लागारासाठी कोट्यावधीची उधळपट्टी आणि क्रिकेट स्टेडियमचा घातलेला घाट तात्काळ रद्द करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभारणार, असा निर्वाणीचा इशारा नाना काटे यांनी दिला आहे.

सब हेड - अवघ्या 90 दिवसांत 447 कोटी महापालिका तिजोरीत जमा .

.पिंपरी (प्रतिनीधी) दि ०१ जुलै २०२३  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने पालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच दमदार अशी कामगिरी केली आहे. विभागाने अवघ्या 90 दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांकडून तब्बल 447 कोटी रुपयांचा कर वसूल करून महापालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. तर प्रामाणिकपणे कर भरुन शहरविकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा  6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ता आहेत.  या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या अवघ्या पहिल्या तिमाहीतच 447 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.

6 लाख 2 हजार 203 मालमत्ता धारकांना पैकी 3 लाख 3 हजार 350 मालमत्ता धारकांनी म्हणजे पन्नास टक्के मालमत्ता धारकांनी तीन महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी 447 कोटी 3 लाख   96 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.

'वृध्दीकडे नेणारा प्रकल्प सिद्धी

पालिकेने यंदा मालमत्ता करांची बिले वाटप महिला बचत गटांतील महिलांना देण्याचे ठरवले. याला प्रकल्प सिद्धी असे नाव देण्यात आले. हा निर्णय पालिकेसाठी खरोखर 'सिद्धिकडून वृध्दिकडे' नेणारा ठरला. जवळपास चारशे महिलांनी निव्वळ चाळीस दिवसात उन्हातान्हाची पर्वा न करता शंभर टक्के बिलाचे वाटप केले. यंदा नागरिकांना वेळेत बिले मिळाल्यामुळे नागरिकांनी 30 जून पर्यंत असलेल्या सवलतींचा फायदा घेतला आहे. त्यामुळे महिला बचत गट नावीन्यपूर्ण स्वरूपाचे काम पण करू शकतो असा संदेश गेला. या महिलांसाठी हा एक नवा अनुभव असला तरी त्यांनी यात यशस्वी सहभाग नोंदवला आहे. त्यांनी बिले वाटप करताना संकलित केलेल्या माहितीचा आता पालिकेला दीर्घ काळ फायदा होणार आहे. यातून बचत गट महिलांना अजून वेगवेगळ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

 

चौकट-2

आकडे बोलतात

तीन महिन्यांत वसूल झालेला कर संकलनाचा वाढता आलेख

वर्ष.        करदात्यांची संख्या रक्कम

2020-21 : 1,15,851 : 148 कोटी

2021-22 : 1,39,649 : 171 कोटी

2022-23 : 1,96,839   : 253 कोटी

2023-24 :  303350 : 447 कोटी

 

चौकट-3

30 जून 2023 ठरला 'विक्रमी दिवस'

 

नेहमी वर्षाअखेर 31 मार्च रोजी सर्वाधिक कराचा भरणा होत असतो. यंदा मात्र 30 जूनला सर्वच कर संकलन विभागीय कार्यालयात मालमत्ता धारकांची तुफान गर्दी होती. 30 जूनला यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले. या एकाच दिवसात तब्बल 14 हजार 620 नागरिकांनी तब्बल 30 कोटी 85 लाख रुपयांचा भरणा केला. त्यात 21 कोटी निव्वळ ऑनलाईन भरणा आहे.

 

चौकट -4

असा आला रूपया

ऑनलाईन - 291 कोटी  81 लाख

विविध ॲप - 4 कोटी 68 लाख

रोख.       -  52 कोटी 47 लाख

धनादेशाद्वारे - 37 कोटी 74 लाख

इडीसी- 4 कोटी 8 लाख

आरटीजीएस - 21 कोटी 70 लाख

डीडी-     1 कोटी 36 लाख

चौकट-5
कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी
3 लाख 3 हजार 350 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 2 लाख 68 हजार 6 निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 23 हजार 916 बिगर निवासी, 7 हजार 130 मिश्र, 2 हजार 246 औद्योगिक तर  2018 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे . 

चौकट-6

वाकड, सांगवी, चिंचवड, थेरगावमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या अधिक
कर संकलनासाठी शहरात 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 39 हजार 600, सांगवीमध्ये 34 हजार 694, चिंचवडमध्ये 29 हजार 303 थेरगावमध्ये 28 हजार 368 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 4 हजार 131 मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.

 

चौकट-7

अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसुलीचे टार्गेट

 

तीन महिन्यांत 50 टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आता आर्थिक वर्षातील 9 महिन्यात उर्वरित 50 टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसूल आणि चालू कर 100 टक्के वसुली करणे हेच विभागाचे एकमेव ध्येय असणार आहे.

 

कोट-1
कर संकलन विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व श्रेय जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्या नागरिकांना आहे. त्याबद्दल या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. हा सर्व कररुपी पैसा शहराच्या शाश्वत विकासाचा पाया राहील याची मी ग्वाही देतो. या शहराच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील यावर मी वैयक्तिक लक्ष देत आहे.

: श्री .शेखर सिंह, आयुक्त पिंपरी-चिंचवड           महानगरपालिका
 

कोट-2
गत वर्षीपासून आम्ही राबवत असलेल्या अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमाचे हे सांघिक यश आहे. हे करत असताना आम्हाला काही जप्तीसारख्या अप्रिय कारवाया कराव्या लागल्या असल्या तरी त्यामागे शहराच्या विकासाचे सूत्र आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यातून हे शहर अधिक सर्वांगसुंदर, राहण्यासाठी सुखद होईल याची दक्षता घेतली जाईल.

१ ) प्रदीप जांभळे-पाटील
     अतिरिक्त आयुक्त

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

कोट-3

माहितीचे शुध्दीकरण, बीलांचे वेळेवर वाटप यासाठी आमचा प्रकल्प सिद्धी एक मैलाचा दगड ठरला आहे. "सिद्धीकडून वृद्धिकडे" ही टॅगलाईन बचत गटांच्या महिलांनी अक्षरशः खरी करून दाखवली. कर संकलन विभाग त्यांचा शतशः आभार आहे. या प्रकल्पाला आम्ही भविष्यात अजून उंचीवर नेणार आहोत. माहिती विश्लेषण, त्यावर सर्जनशील आकर्षक जनजागृती यासाठी फॉक्सबेरी यंत्रणेची आम्हाला भरीव मदत झाली आहे. शेवटी आमच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक कामगिरी मोलाची ठरली आहे. विभागातील कार्यक्षम कर्मचारी अधिकारी यांचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी एक भाग्ययोग आहे असे मी समजतो.
:नीलेश देशमुख
सहायक आयुक्त,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Friday, 30 June 2023

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिकेसाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे, प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे महापालिका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे,

पिंपरी, दि.३० जून २०२३ :-* आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिकेसाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे, प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे महापालिका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे, तसेच महापालिकेस विविध सन्मान प्राप्त होत असून पालिकेच्या लौकीकात भर पडत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते माहे जून २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या ३४ तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १ अशा एकूण ३५ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.    
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी महादेव बोत्रे, मंगेश कलापुरे, नथा माथेरे, चारूशिला जोशी, विजया कांबळे, शेखर गावडे, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे जून २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ३४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, उपअभियंता शहाजी गायकवाड, मुख्याध्यापिका सुरेखा चोपडे, लेखापाल प्रविणकुमार देठे, भांडारपाल भास्कर रिकामे, मुख्य लिपीक ज्ञानेश्वर पिंगळे, जयकिसन कुंजीर, स्टाफ नर्स सीमा पवार, फार्मासिस्ट रमेश तापकीर, उपशिक्षिका कुमुदिनी मदने, उपशिक्षक कुमुद शिंदे, लिपीक अनिल राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक महादेव व्हटे, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट राजेंद्र नागपुरे, मिटर निरीक्षक अशोक भोसले, प्रमुख अग्निशमन विमोचक तानाजी चिंचवडे, अशोक इंगवले, क्रिडा पर्यवेक्षक सुभाष पवार, वीज पर्यवेक्षक राजेंद्र निपुंगे, दूरध्वनी पर्यवेक्षक निशिगंधा वारंग, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर रावण कसबे, वायरलेस ऑपरेटर गोरक्षनाथ विरकर, वाहनचालक अरूण भोसले, नारायण तापकीर, शहाजी भोसले, रखवालदार रंगनाथ वाल्हेकर, प्लंबर अनिल भोईर, मजूर शशिकांत हुलावळे, प्रकाश काटे, राजेंद्र पडवळ, सफाई कामगार चिंधू पारखी, वसंता नैनार, सफाई सेवक विमलाबाई वाल्मिकी, गटरकुली दिलीप केदारी यांचा समावेश आहे.               
       तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार कमल ओव्हाळ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले तर  सूत्रसंचालन आणि आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.