Monday, 3 July 2023

ओबीसी समाजाचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार - आ. उमा खापरे

पिंपरी चिंचवड ओबीसी विकास परिषदेची स्थापना
पिंपरी, ( प्रतिनीधी लोकहिताय न्युज) (दि. ३ जुलै २०२३) भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने भारतातील सर्व उपेक्षित, वंचित, इतर मागास वर्गीय समाज घटकांच्या विकासासाठी धेय्य धोरणे राबविले आहेत.  महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे प्रलंबित प्रश्न आगामी पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार उमा खापरे यांनी केले.
  पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी समाजातील विविध जातींच्या प्रतिनिधींची बैठक (दि. २ जुलै) थरमॅक्स चौक, चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शहरातील तीस पेक्षा जास्त ओबीसी समाजातील जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पिंपरी चिंचवड ओबीसी विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी आ. उमा खापरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
  यावेळी आ. खापरे यांनी सांगितले की, ओबीसी समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासलेला असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी विकास परिषदेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहे. ओबीसी समाजातील सर्व जातींना एकत्र करून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवले जाण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून काम केले जाईल. ओबीसी विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक उन्नतीसाठी नॉन क्रिमीजर दाखल्याची मर्यादा वाढविणे, जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी असणाऱ्या जाचक अटी कमी करणे तसेच ओबीसी समाजातील व्यवसायिकांना लघुउद्योजकांना विशेष पतधोरण तयार करून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामध्ये झालेले अतिक्रमण काढून टाकून ओबीसींना राजकीय न्याय देण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार आहे. ओबीसी मधील प्रत्येक जातीच्या तज्ञ व अभ्यासू व्यक्तींची लवकरच बैठक घेऊन ओबीसी विकास परिषदेचे अधिवेशन बोलवले जाईल. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ओबीसी समाजासाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राष्ट्रीय ओबीसी आयोग यांच्या मदतीने ओबीसी समाजासाठी गरीब कल्याणकारी योजना राबविण्यासाठी चालना देण्यात येईल असे आ. खापरे यांनी सांगितले. 
   यावेळी सुवर्णकार, वंजारी, धनगर, माळी, बारा बलुतेदार, साळी,कोष्टी, कोळी, गुरव, शिकलगार, लोहार, सुतार, वडार,  तेली, लेवा पाटील अशा ओबीसीतील जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी पक्षनेते नामदेव ढाके आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, माऊली थोरात, राजाभाऊ दुर्गे, शारदा सोनवणे तसेच कैलास सानप, गणेश वाळुंजकर, दिपक नागरगोजे, अण्णा गर्जे, सतीश नागरगोजे, राजेश्वरी सोनवणे जायभाय, आशाताई काळे, राहुल खाडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, मनोज ब्राह्मणकर, विजय शिनकर, पोपट हजारे, दादा कवितके,  संजय मंगोडेकर, नरेश कदम, प्रशांत आगन्यान, प्रकाश लोहार, धर्मा पवार, सुरेश शिरोडे, चंदू पाटील, गौरव लोहार, पुष्कर पाटील, हनुमंत घुगे आदी या बैठकीस उपस्थित होते.

No comments:

Post a Comment