Saturday, 15 July 2023

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन मुंबई आझाद मैदानावर .

.मुंबई ( लोक हिताय न्युज)दि. १५ जुलै. २०२३
एप्रिल 2015 ते शैक्षनिक वर्ष 2019 पर्यंतच्या सर्व बंधपत्रित नर्सेस च्यासेवा नियमित करण्यात याव्यात या मागणी साठी सोमवार दि. 10 जुलै 2023 पासून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बंधपत्रित नर्सेस सहभागी झाल्या आहेत.
जो पर्यंत आम्हाला सेवेत कायम करण्यात येत नाही तोपर्यंत हा संघर्षाचा लढा अविरतपणे कास्ट्राईब महासंघाच्या वतीने सुरू ठेवला जाईल असे अंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महा सचिव एस. टी. गायकवाड व राज्य अध्यक्ष प्रा अरुण गाडे यांच्या कणखर
नेतृत्वात हे बेमुदत आंदोलन सुरू आहे.2019 च्या कोरोना काळात देखील बंधपत्रित नर्सेस नी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. त्यांना देखील आरोग्य विभागाकडून
या ना त्या कारणाने सेवेत कायम करण्यापासून डावलले जात आहे. त्याच बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून आमचा हा लढा सुरू आहे. , शिंदे, फडणवीस, पवार सरकार देखील आमच्या या मागणी कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार नेते एस. टी. गायकवाड यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागात सध्या काय काय सावळा गोंधळ चालला आहे हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे असे त्यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment