Thursday, 26 November 2020
केऱ्हाळा गावामध्ये, पुणे बार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला
सिल्लोड. दिनांक:- 26/11/2020.(लोक हिताय न्यूज.). सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे), अंतर्गत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर संविधान सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने के-हाळा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बार्टीचे उमाकांत बोराडे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष श्री राजेंद्र मस्के यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे D. O. के. एस. दांडगे, व प्रमुख पाहुणे मनोहर आपार हे होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर देहाडे, संतोष देहाडे, नंदाबाई धनेधर, भास्कर देहाडे, वंदना मस्के, कमलबाई देहाडे, अलकाबाई देहाडे, आधी ग्रामस्थांनी कठोर परिश्रम घेतले. सदरील सविधान सप्ताह बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिल्लोड तालुक्यात साजरा करण्यात येत आहे.
Monday, 2 November 2020
चाकण मधील विटेक्सो कंपनीमध्ये एकवीस हजार रुपयांचा वेतनवाढ करार संपन्न...
पिंपरी (दि. 2 नोव्हेंबर 2020... (लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे ) कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे देशभर औद्योगिक व व्यापार विषयक मंदीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांची एकजूट व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे चाकण येथील विटेक्सो टेक्नोलॉजीस कंपनीमध्ये 21,000 रुपयांच्या वेतन वाढीचा करार नुकताच संपन्न झाला. त्यामुळे चाकण औदयोगिक पट्यातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या करारात कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक अनुराग गर्ग आणि हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी कंपनीचे शाखा प्रमुख रामचंद्रन रामनाथन, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख अर्चना श्रीवास्तव, मनुष्यबळ विकास अधिकारी सचिन महिंद्र, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, युनिट प्रतिनिधी विजय राणे, सुरेश सांदुर, विकास धवन, नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.
1 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीसाठी हा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या वेतनवाढ करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष मासिक 15,000 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अप्रत्यक्ष मासिक 6000 रुपये असे एकूण मासिक 21,000 रुपयांचा लाभ कामगारांना होणार आहे. तसेच एकूण वार्षिक पगाराच्या 17 टक्के बोनससह डी.ए., घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, वाहन भत्ता, गणवेश भत्ता अधिक इतर भत्ते अशी अप्रत्यक्ष 6000 रुपये मासिक वेतन वाढ मिळणार आहे. वैद्यकीय विमा तीन लाख रुपये वार्षिक आणि वैदयकीय विमामध्ये आई, वडीलांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कामगारांसाठी वाहतूक व कॅन्टिन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच कामगार किंवा त्यांचा कुटूंब सदस्य मयत झाल्यास 35,000 रुपये अत्यावश्यक मदत म्हणून देण्यात येणार आहेत. या आस्थापनेत हिंद कामगार संघटना मान्यता प्राप्त संघटना असल्यामुळे कराराचा लाभ सर्व कायम कामगारांना होणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दार माहिती दिली
Friday, 23 October 2020
नामदेव ढाके यांनी आपल्या उंची इतकेच बोलावे- सतीश दरेकरभ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली....
पिंपरी-दि.२३..(Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे )
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र शासन यांच्यावर आरोप करण्यापूर्वी आपल्या राजकीय उंचीचा विचार करावयास हवा होता. नामदेव ढाके यांनी आपल्या उंचीइतकेच बोलावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी नगरसदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेलचे निरिक्षक सतीश दरेकर यांनी ढाके यांना लगावला आहे.
जाम्बो कोविड सेंटरच्या परिचारिकांचे वेतन ठेकेदार कंपनीने दिले नसल्याने एका राजकीय पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे.
कोरोनाच्या कालावधीत लोकांना वाचविण्याचे निर्णय घेण्यापेक्षा करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात पिंपरी चिंचवड शहराचे सत्ताधारी भाजपाचे नेते मशगुल होते. रात्रीच्या अंधारात निविदा प्रक्रीया पार पाडणार्या भाजपाच्या या कारभाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहिर केल्याने शहरातील भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे यामुळे आता ते अजितदादा पवारांवर आरोप करु लागले असल्याचे सतीश दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाला रोखण्यात महापालिका प्रशासन आपयशी ठरले होते तर सत्ताधारी भाजपाचे लोक मलीदा लाटण्यात गुंतले होते. त्यामुळे लोकांना वाचविण्यासाठी अजितदादा पवार यांनी सातत्याने लक्ष दिले व शहरात कोरोना रोखण्यात त्यांच्या प्रयत्नांमुळे यश आले आहे. असे असताना भाजपा ना. अजितदादा पवारांवर व महाराष्ट्र शासनावर भोंगळपणाचा आरोप करत असेल तर त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असे वाटते असा आरोप सतीश दरेकर यांनी केला आहे.
कोविड सेंटर मधिल परिचारिकांना वेतन देण्याची जबाबदारी संपूर्णपणे महापालिकेची असून त्यांनी ते दिलेच पाहिजे असेही सतीश दरेकर यांनी आपल्या पत्रकांत म्हंटले आहे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालयात क्षयरोगनिदान करणाऱ्या ट्रूनॅट मशिनचे उद्घाटन "
पिंपरी-दि २३:-(Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे. )
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालय,चिंचवड येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या क्षयरोग निदान करणाऱ्या ट्रूनॅट मशिनचे उद्घाटन अतिरिक्त आरोग्य वैदयकीय आधिकारी डॉ.पवन साळवे यांच्या हस्ते झाले.
"क्षयरूग्णांना बेडका तपासणीसाठी व क्षयरोगाच्या जलद निदानासाठी हि मशिन नवसंजीवनी ठरेल." असे प्रतिपादन डॉ.साळवे यांनी केले.
सदर कार्यक्रमावेळी आरसीएच वैदयकीय आधिकारी डॉ.वर्षा डांगे,सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सुनिल जॉन,शहर क्षयरोग नियंत्रण आधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर,शहर क्षयरोग दुरीकरण केंद्राच्या वैदयकीय आधिकारी डॉ.अंजली ढोणे. अन्य कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Sunday, 4 October 2020
रिपब्लिकन सेनेचे पिंपरी चिंचवड शहर महिला शहराध्यक्ष भीमा ताई धुळे यांची निवड सेनेचे अध्यक्ष धनाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले..
पिंपरी. दि.4/10/2020. Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे... पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष पदि भिमाताई तुळवे यांची नियुक्ती करण्यात आली व
मोठ्या संख्येने महिलांनी जाहीर प्रवेश केला
*राष्ट्रीय अध्यक्ष मा सरसेनानी.आनंदराज आंबेडकर साहेब व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब*पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ साहेब * रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धुराजी*शिंदे यांच्या हस्ते सौ. भिमाताई तुळवे यांची पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष पदि निवड करण्यात आली व तसेच मोठय़ा संख्येने महिलांनी जाहीर प्रवेश केला या वेळी उपस्थिती उपध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर हिरभाऊ लांडगे महासचिव पिंपरी चिंचवड शहर अरुण मैराळे प्रेवक्ते पिंपरी चिंचवड शहर हौवसराव शिंदे प्रभारी पिंपरी चिंचवड शहर वर्षाताई शेलार उपध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर उमाताई शेख सचिव पिंपरी चिंचवड शहर राहुलभाऊ विटकर प्रभाग अध्यक्ष गोगलबाई सोनकांबळे रेखाताई जावेर सलमाताई सय्यद प्रतिभाताई थोरात आणिताताई ठोंबरे बलभीम मस्के अदी उपस्थित मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी येथे प्रवेश घेण्यात आला पिंपरी चिंचवड शहरात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध रहावे....
Wednesday, 30 September 2020
पिंपरी. मनपा आयुक्त यांना निवेदन पत्रद्वारे इशारा देण्यात आला आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कुत्रे सोडण्यात येईल,,, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष, धुराजी शिंदे
Lok hitay new(. प्र दिलीप देहाडे ) दि.0१/,पिंपरी चिंचवड पालिकेत चौथ्यामजल्या जाऊन वरुन खाली सोडणार अनेक भटके कुत्री. रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे.यांनी प्रशिध्दी पत्रकात दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुञ्यांचा सुळसुळाट सुटला असल्याने गेली दोन वर्षापासुन रिपब्लिकन सेनेचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष करतायत भटक्या कुञ्यां विषया संदर्भात पालिकेत पाठपुरावा करत आहे.परंतु भटक्या कुञ्याची विलेवाट लावण्यात पालिका कर्मचारी अपयशी ठरले आहेत.जानेवारी2019 ते जुन 2019 पर्यंत मनपा आयुक्त, पशुवैद्यकीय अधिकारी यांना शिंदे यांनी पत्रव्यवहार केला आहे.पण त्याचा काहीही परिणाम प्रशासनावर होताना दिसत नाही.विशेष म्हणजे काल (दि.29) कुत्रा चावल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे शिंदे आणखी संतापले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील श्वान प्रेमींच्या दबावामुळे गेली दोन वर्ष झाले भटकी कुत्री पकडणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात कुत्रीच कुत्री झाली आहेत. याला जबाबदार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना हे सर्वस्वी जबाबदार आहेत असा अरोप देखील शहरध्यक्ष शिंदे यांनी केला आहे. त्यामुळेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या पालिकेतील ऑफिस मध्येच थेट रिपब्लिकन सेनेच्या वतीने भटकी कुत्री सोडण्यात येणार आहेत असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे.भाजपची महापालिकेत सत्ता येवून साडेतीन वर्षे झाली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून पशुवैद्यकीय विभागाने भटकी कुत्री पकडणे बंद केले आहे. सारथीवर भटक्या कुत्र्यांची तक्रार केल्यास चार दिवसांनी तक्रारीचे निवारण न करता तक्रार क्लोज केली जाते. शहरात नागरिकांचे फिरणे मुश्कील झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा जास्त त्रास होत आहे. दुचाकीच्या मागे कुत्री लागल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळेला कामावरून घरी जाणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याची जाणीव आयुक्त श्रावण हर्डीकर यांना व्हावी यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयुक्तांच्या पालिकेतील ऑफिस मध्ये भटकी कुत्री सोडण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी असे पञ देखील शिंदे यांनी आयुक्तानां दिले आहे. यावर शहरात चांगलीच चर्चा रंगली असुन पालिका प्रशासन या विषयाचा गांभिर्याने विचार करणार का की हा विषय वार्यावर सोडणार का याकडे सर्वपक्षीय आणि शहरातील नागरिकांचे लक्ष आहे.
Tuesday, 29 September 2020
भारिप-बहुजन महासंघाच्या पिंपरी-चिंचवडच्या मा. शहराध्यक्षा, भीमाताई तुळवे, यांचा रिपब्लिकन सेनेचा जाहीर प्रवेश, सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला.
पिंपरी, दि. २९ सप्टेंबर Lok hitay news.. प्र. दिलीप देहाडे........ जाहीर प्रवेश, जाहीर प्रवेश, कुशल नेटवर्क असणाऱ्या महिला दाही दिशेने सक्षम असणाऱ्या यांचा जाहीर प्रवेश रिपब्लिकन सेना मध्ये भारिप बहुजन महासंघा च्या माजी महिला अध्यक्षा सौ. भिमाताई तुळवे रिपब्लिकन सेना मध्ये यांचा जाहीर प्रवेश करण्यात आल, राष्ट्रीय अध्यक्ष मा सरसेनानी...आनंदराज आंबेडकर साहेब व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब.पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ साहेब. रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या हस्ते सौ. भिमाताई तुळवे भारिप बहुजन महासंघाच्या माजी अध्यक्षा यांचा रिपब्लिकन सेना मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला या वेळी उपस्थिती हौवसराव शिंदे प्रवक्ते पिंपरी चिंचवड शहर त्रिंबक मस्के उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर प्रभारी वर्षा ताई शेलार रेखा जावेर सलमा सय्यद अदी उपस्थित मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी येथे प्रवेश घेण्यात आला पिंपरी चिंचवड शहरात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध रहावे व पक्षाची बांधनी करावी हि विनंती धुराजी शिंदे
.
Subscribe to:
Posts (Atom)