Tuesday, 29 December 2020

वाकड येथे बुधवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने टेनिस बॉल नाईट स्पर्धापिंपरी ....


पिंपरी (दि. 29 डिसेंबर 2020) (लोक हिताय न्यूज )युवकांच्या कला व क्रिडा गुणांना संधी मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि विशालभाऊ वाकडकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने टेनिस बॉल नाईट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
   बुधवारी (दि. 30 डिसेंबर 2020) सायंकाळी 5:30 वाजता वाकड, भुजबळ चौक, रानजाई हॉटेलच्या मागे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, तसेच भाऊसाहेब भोईर, हणुमंत गावडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, मंगलाताई कदम, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे तसेच जगदिश शेट्टी, प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, संदिप उर्फ लाला चिंचवडे, शहर राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख आदी उपस्थित राहणार आहे.
     बुधवारी (दि. 6 जानेवारी 2021) सायंकाळी 6 वाजता विजेत्या संघांना रोख पारितोषिक ‘विशाल चषक 2020 - 21’ देऊन गौरविण्यात येईल. प्रथम क्रमांक मिळविणा-या संघास रुपये 33,000=00; व्दितीय क्रमांक रुपये 22,000=00; तृतीय क्रमांक रुपये 11,000=00 आणि चतुर्थ क्रमांक मिळविणा-या संघास रुपये 5,000=00 बक्षिस देण्यात येणार आहे. साखळी पध्दतीने होणा-या या टेनिस बॉल नाईट स्पर्धेत 80 हून जास्त संघांनी सहभाग नोंदविला आहे. ज्या संघांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी 9850999997 या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन विशाल वाकडकर यांनी केले आहे.
-------------------------

Sunday, 20 December 2020

ताई तुझ्या वेदना मी जाणून घेऊ शकतो,पिंपरी चिंचवड चे उपमहापौर मा,केशव घोळवे. ऊसतोड कामगारांच्या हाकेला आले धावून



पिंपरी-दि.20 दिसें (लोकहितायन्यूज  )
ताई तुझ्या वेदना मीच जाणू शकतो. ऊस तोडणी कामगारांच्या वेदना मी स्वतः अनुभवल्या आहेत आणि तू तुझी मुलगी गमावली आहेस. हे दुःख खूप मोठे आहे अशा शब्दात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव हनुमंतराव घोळवे यांनी निरगुडसर (मंचर) येथील ऊस तोडणी कामगार कुटुंबियांचे सांत्वन केले.
दोन दिवसापूर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगाराची आठ वर्षाची मुलगी तेजश्री रामेश्वर पवार ही खेळताना विहिरीत पडली व तीचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी निरगुडसर येथे प्रत्यक्ष जावून या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस दीपक नागरगोजे होते.
केशव घोळवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी भेट दिली व तेथील प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली व त्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे निरगुडसर पारगांव विभागाचे गट अधिकारी बाळसीराम टाव्हरे व नवनाथ चव्हाण यांच्यासह ऊस तोडणी कामगारांच्या पालावर जावून मृत पावलेल्या मुलीची आई कल्पना रामेश्वर पवार, आजोबा ज्ञानेश्वर मलकांत राठोड, आजी मथुराबाई ज्ञानेश्वर राठोड या दुःखी कुटुंबियांची भेट घेतली.
पालावर असलेल्या लोकांशी व चर्चा करुन तेथे कारखान्याच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सुविधा व सोईंचीही केशव घोळवे यांनी माहिती घेतली.
यावेळी संबंधित अधिकार्‍यांसह कारखान्याचे संचालक नामदेव काशिनाथ थोरात यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली व चर्चा केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्याशीही दुरध्वनीवरुन उपमहापौर केशव घोळवे यांनी संवाद साधला.
संचालक नामदेव थोरात यांच्याशी बोलताना केशव घोळवे यांनी मृत मुलीच्या गरीब कुटुंबावर खूप मोठा आघात झाला आहे. यामुळे कारखान्याने तातडीने त्यांना आर्थिक मदत करावी. ऊस तोडणी कामगारांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचा वीमा उतरविण्यात यावा. ज्या विहिरीत हा अपघात झाला आहे त्या विहिराला संरक्षक कठडा नाही, त्यामुळे सदर विहिरीची कारखान्याने तातडीने दुरुस्ती करावी. ऊस तोडणी कामगार जेथे वास्तव्यास आहेत त्याठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात यावे अशा मागण्या केल्या या सर्व मागण्यांचा विचार करण्याचे अश्वासन नामदेव थोरात व चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी दिले.
या दौर्‍यात उपमहापौर केशव घोळवे यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांचीही त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली व भीमा शंकर साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांच्यासंदर्भातही सविस्तर माहिती घे

Tuesday, 15 December 2020

वंचीत बहूजन आघाडी च शेतकऱ्यांना न्याय हक्का साठी.आंदोलन. दि.17. डिसें रोजी. पिंपरी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर सर्वानी उपस्थित दाखवावी

पिंपरी.. दि.15/डिसें.(  लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे..)   प्रभाग क्रमांक 9 तसेच विठ्ठलनगर मधील सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच नागरिक यांना कळविण्यात येत आहे की दिनांक 17/12/2020 गुरुवार रोजी सकाळी ठीक 12: 30 वाजता वंचित बहुजनआघाडी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी शेतकरी आंदोलन घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवास न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. आंदोलनाला जाण्यासाठी सर्वांनी विठ्ठलनगर पुनर्वसन येथील बिल्डिंगच्या गेट समोर 12 :15 वाजता जमा व्हावे असे  वंचित बहुजन वॉर्ड शाखेच्या वतीने आपणासर्वांना आवाहन करतो. आपलाच
अमोल लक्ष्मण माने अध्यक्ष:- वंचीत बहुजन आघाडी
           (विठ्ठल नगर वॉर्ड शाखा)
जय जवान जय किसान स्थळ :- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी

Thursday, 26 November 2020

केऱ्हाळा गावामध्ये, पुणे बार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला

                                     सिल्लोड.   दिनांक:- 26/11/2020.(लोक हिताय न्यूज.).  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे), अंतर्गत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर संविधान सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने के-हाळा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे  संविधान दिन साजरा करण्यात आला.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बार्टीचे उमाकांत बोराडे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष श्री राजेंद्र मस्के यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे D. O. के. एस. दांडगे, व प्रमुख पाहुणे मनोहर आपार हे होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर देहाडे, संतोष देहाडे, नंदाबाई धनेधर, भास्कर देहाडे, वंदना मस्के, कमलबाई देहाडे, अलकाबाई देहाडे, आधी ग्रामस्थांनी कठोर परिश्रम घेतले. सदरील सविधान सप्ताह  बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिल्लोड तालुक्यात साजरा करण्यात येत आहे.

Monday, 2 November 2020

चाकण मधील विटेक्सो कंपनीमध्ये एकवीस हजार रुपयांचा वेतनवाढ करार संपन्न...


पिंपरी (दि. 2 नोव्हेंबर 2020...   (लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे )       कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे देशभर औद्योगिक व व्यापार विषयक मंदीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांची एकजूट व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे चाकण येथील विटेक्सो टेक्नोलॉजीस कंपनीमध्ये 21,000 रुपयांच्या वेतन वाढीचा करार नुकताच संपन्न झाला. त्यामुळे चाकण औदयोगिक पट्यातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या करारात कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक अनुराग गर्ग आणि हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी कंपनीचे शाखा प्रमुख रामचंद्रन रामनाथन, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख अर्चना श्रीवास्तव, मनुष्यबळ विकास अधिकारी सचिन महिंद्र, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, युनिट प्रतिनिधी विजय राणे, सुरेश सांदुर, विकास धवन, नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.
         1 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीसाठी हा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या वेतनवाढ करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष मासिक 15,000 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अप्रत्यक्ष मासिक 6000 रुपये असे एकूण मासिक 21,000 रुपयांचा लाभ कामगारांना होणार आहे. तसेच एकूण वार्षिक पगाराच्या 17 टक्के बोनससह डी.ए., घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, वाहन भत्ता, गणवेश भत्ता अधिक इतर भत्ते अशी अप्रत्यक्ष 6000 रुपये मासिक वेतन वाढ मिळणार आहे. वैद्यकीय विमा तीन लाख रुपये वार्षिक आणि वैदयकीय विमामध्ये आई, वडीलांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कामगारांसाठी वाहतूक व कॅन्टिन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच कामगार किंवा त्यांचा कुटूंब सदस्य मयत झाल्यास 35,000 रुपये अत्यावश्यक मदत म्हणून देण्यात येणार आहेत. या आस्थापनेत हिंद कामगार संघटना मान्यता प्राप्त संघटना असल्यामुळे कराराचा लाभ सर्व कायम कामगारांना होणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दार माहिती दिली