Saturday, 9 November 2019

शिव सेनेला पाठिंबा देणाचे मा कांग्रेस पक्षाचे च्या अध्यक्ष सोनिया गांधीयांनी दिला सल्ला

सेनेला मदत करा : सोनियांची सूचना   lok hitay news 9 Nov. 2019 09:28


नवी दिल्‍ली/मुंबई : /विशेष प्रतिनिधी
शिवसेना-भाजपमध्ये निकराचा संघर्ष भडकला आणि भाजपला रोखण्याची ‘हीच ती वेळ’ हे ओळखून शिवसेनेला मदत करण्याच्या सूचना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सोनियांचा हा निरोप घेऊनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगिलते.
लोक हिताय  मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसारच पृथ्वीराज चव्हाण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत पोहोचले. स्वत: शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना सरकार स्थापण्याचा दावा करण्याचा सल्‍ला द्यावा, असे सोनियांनी स्पष्ट सूचित केले आहे. उद्धव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घ्यावी म्हणून त्यांना आग्रह करावा, असेही सोनियांकडून सांगण्यात आले.
सुरुवातीला सोनिया गांधी यांची भूमिका ही शिवसेनेला पाठिंबा देण्याची नव्हती. मात्र मध्यंतरी आमदार सुनील केदार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या व आमदारांच्या शिष्टमंडळाने सोनियांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तो आता यशस्वी झाल्याचे दिसते.
उद्धव यांनी फडणवीस वा अमित शहा कुणाशीही मला बोलायचे नाही सांगून युतीचे जहाज पेटवून दिलेले आहे. आता उद्धव यांना सरकार स्थापनेसाठी मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाला वाटत असल्याने सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाचारण केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आता भाजप सरकार नाहीच : चव्हाण
सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आता भाजपा सरकार सत्तेवर येणार नसल्याची कबुलीच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या राजीनाम्यातून दिली आहे. गेल्या पाच वर्षांमधील निष्क्रिय काराभारामुळे जनतेने भाजपाला नाकारले आहे. आता राज्यापालांनी योग्य निर्णय घेतला पाहीजे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे राज्यात घटनात्मक सरकार आले पाहीजे. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी या पक्षाचे सरकार येणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपला रोखण्याची रणनिती
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत राजकीय खलबते झाली आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनिती आखण्यात आल्याचे समजते.
तेराव्या विधानसभेची मुदत संपल्यामुळे फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री पदाचा औपचारीक राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे शिवसेनेची भूमिका काहीशी मवाळ होईल, अशी चर्चा होती. पण त्यामध्ये काहीही बदल झाला नाही. भाजपाच सरकार स्थापन करील, असे फडणवीस यांनी सांगितल्यानंतर शिवसेनेनेही मुख्यमंत्री आमचाच असेल, असा पुर्नरुच्चार केल्यामुळे युतीमध्ये आणखी भडका उडाला.
सुशीलकुमारांच्या येण्याचा अर्थ
दोन्ही बाजुंनी एकमेकांवर वार-प्रतिवार सुरु असताना सांयकाळी पवारांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरु झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पवारांमध्ये चर्चा सुरु असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे व सुशीलकुमार शिंदे तेथे आले. दोन दिवसांपुर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस हा सेक्युलर पक्ष असल्याचे सांगत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठींबा देण्यास विरोध केला होता. पण तेसुध्दा काँग्रेस नेत्यांसोबत आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिंदेच्या उपस्थितीवरुन काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्याचे तसेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मान्य केल्याचे समजते.
भाजपामुळे राज्यात बिकट राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले, राजीनामा देण्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे शपथविधीसाठी राजभवनवर जातील, असे वाटले होते. पण त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षाला जनमताचा पाठींबा नसल्याचे स्पष्ट केले

Friday, 8 November 2019

आज राम मंदिर व बाबरी मशीद च्या निर्णय फायन देणयात आले असून सर्वांना समाधानी असावी

योध्या निकाल लाईव्ह...
नवी दिल्ली : अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता या खटल्याचा निकाल येणार असून संपूर्ण सुप्रीम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Live Update...
11.15 - मंदिर बनवण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश
11.12 - रामजन्मभूमी न्यासला वाद असलेली जमीन देण्याचे आदेश
11.10 - मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा देण्याचे आदेश
11.08 - सुन्नी बोर्डाला अयोध्येत दुसरी जागा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.06 - मुस्लीम वर्गाला दुसरी जागा देण्याच आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.05 - रामाचा जन्म त्याच जागी झाला होता याचे पुरावे - कोर्ट
11.04 - 1885 पासून हिंदू चौथाऱ्यावर पूजा करत होते.
11.03 - हिंदू सीता स्वयंपाकघरातपूजा करत होते. - कोर्ट
11.01 - इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज वाचली जात होती असा पुरावा नाही - कोर्ट
11.00 - मुस्लीम पक्ष जमिनीवर एकाधिकार नाही सिद्ध नाही करु शकला.
10.55 - आस्था आणि विश्वासच्या आधारावर नाही तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल - कोर्ट
10.52 - 12 व्या आणि 16 व्या शतकात काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही - कोर्ट
10.50 - मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही- कोर्ट
10.49 - एएसआयच्या रिपोर्टनुसार मशीदच्या जागी आधी मंदिर होतं असं देखील निर्णयात म्हटलं गेल्याचं कळतं आहे.
10.47 - आस्था आणि विश्वासवर कोणताही वाद नाही होऊ शकत - कोर्ट
10.46 - जमीन विवादाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय दिला जाईल - कोर्ट
10.45 - रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही. - कोर्ट
10.42 - बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसल्याचं कोर्टाने निर्णयात म्हटलं आहे. याचा अर्थ बाबरी मशीदच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं.

Monday, 28 October 2019

सर्प मित्रा मुळे दोन प्राण्याना मिळाले जीवनदान

पिंपरी

  1. दि 27/10रोजी (lok hitay live news )

 पिंपरी येथे अण्णासाहेब मगर शाळेमध्ये बिनविषारी सापाला व बेडूक त्यांना जीवनदान देण्याचे काम सर्पमित्र राहुल कांबळे व बाबा त्रिभुवन विनोद यांच्यामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये नागरिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुले क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेट  साठी सायंकाळी पाचच्या सुमारास हा बिनविषारी साप धामिन या जातीचा साप सुमारे आठ फूट सहा किलो वजनाचा असणारा साप त्या ठिकाणी आढळला होता तेथील सुरक्षा रक्षक यांनी पाहिल्यानंतर सर्पमित्र विनोद व राहुल यांना फोन करून त्यांना कळविण्यात आले तेव्हा राहुल लय मोठ्या चपळाईने राहुल त्याचा बेडूक खात खाण्याचा प्रयत्न धामिन जातीच साफ करत होता ते पाहून राहुल नाही प्राणी मित्र या नात्याने बेडूक व सापाला सुरक्षित बंदिस्त करून टाटा मोटर याठिकाणी जंगलामध्ये सोडण्यात आले कोणालाही जीवनी झाला नसून अशा पद्धतीने राहुलने त्याठिकाणी कामगिरी बजावली

News एव्हरी day

रोजगार चिया नवीन batmiya