Thursday, 6 February 2020
देशात पहिले रिक्षा स्टेशन पिंपरी चिंचवड मध्ये
देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्डचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन.
//Lok hitay news.
( महिला रिक्षाचालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन)
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने निगडी भक्ती-शक्ती येथील अण्णाभाऊ साठे स्मारक जवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, नगरसेवक सचिन चिखले , उत्तम केंदळे , पंकज भालेकर, कमल घोलप, शर्मिला बाबर, पोर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक सुलभाताई उबाळे, तानाजी खाडे, उर्मिला काळभोर, घरकाम महिला सभा अध्यक्ष सौ आशा कांबळे ,संजय बोराडे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत, आणि त्यांनी स्वतःचे रिक्षा स्टँड निर्माण केले आहे हे शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल महिलांच्या रिक्षा स्टॅण्डवर वाचनालय,पानपोई आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील असे यावेळी महापौर यांनी सांगितले,
*महाराष्ट्र रिक्षा पंचायती* आणि घरकाम महिला सभेच्या यांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स, बॅच, परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या. यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षाचालक झाल्या असून, आता महिलाही रिक्षा चालवणार आहेत.
महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे, त्यांनाही हक्काचे रिक्षा स्टँड मिळावे यासाठी *महिलांचे देशातील पहिले रिक्षा स्टँड* क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला, देशातील महिलांचे पहिले रिक्षा स्टँडचे उद्घाटन
*दिनांक ०६/०२/२०२० रोजी* निगडी अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ भक्ती-शक्ती ,या ठिकाणी करण्यात आले ,
रिक्षा स्टँड वरती सर्व महिलांनी फेटे घालून अत्यंत उत्साह साजरा केला
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष : सरस्वती गुजलोर,
यमुना काटकर, विजयलक्ष्मी हडपद, जयश्री मोरे, जयश्री साळुंखे, संगीता कांबळे, आयशा सोळसे, अक्षता गावडे, सविता ओव्हाळ, रेखा ठेळके, कविता मैदाड, रूपाली तिकोने, दिपाली तिकोने, मीना रंधवे

एस बी. पाटील अर्की टेकट मध्ये पदवी प्रदान सोहळा उत्साहत संपन्न
पिंपरी
--Lok hitay news
--Lok hitay news
कल्पकतेचा ध्यास, शिकण्याची इच्छा असणाराच उत्कृष्ठ रचनाकार.....महेश नामपूरकर
‘राहण्यायोग्य शहर’ मध्ये वरच्याक्रमांकासाठी पर्यावरणपूरक वास्तूंची गरज.....महेश नामपूरकर
एस.बी.पाटील आर्किटेक्ट मध्ये पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी/ पुणे (दि. 6 फेब्रुवारी 2020) नाविण्याचा आणि कल्पकतेचा ध्यास व कायम नवीन शिकण्याची इच्छा असणारी व्यक्तीच उत्कृष्ठ रचना उभारु शकते. प्रत्येक वेळी कलात्मक दृष्टीकोन ठेवला तर वेगळेपणा जपणारी वास्तू तयार होईल. मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी कल्पकतेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक वास्तू उभाराव्यात. अशा वास्तूंमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होईल तसेच ‘राहण्यायोग्य शहर’ या वर्गवारीत आपल्या शहराचा क्रमांक आणखी वरचा येईल. यासाठी वास्तूरचनाकारांनी काम करावे असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तूविशारद आणि सुमांशल वास्तूसंस्थेचे संचालक महेश नामपूरकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस.बी.पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयातील पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा आकुर्डीत बुधवारी (दि. 5) नामपूरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, पीसीईटीचे कुलसचिव प्रा. योगेश भावसार, प्रा. शिल्पा पाटील आदी उपस्थित होते. वास्तूविशारद परिक्षेत 43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 6 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वैदेही कड हिचा महाविद्यालयात प्रथम व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 9 वा क्रमांक आल्याबदल विशेष गौरव करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नामपूरकर यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नामपूरकर म्हणाले की, खंडप्राय भारत देशात उत्तरेत असणारे हवामान दक्षिणेत तसेच असेल असे नाही. हवामानातील बदल स्थानिक नागरिकांच्या गरजा, आर्थिक पुरवठा, वास्तू रचनेची गरज या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकीय नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक वास्तू उभारली पाहिजे. अशा वास्तूंचा देखभाल खर्च कमीत कमी असावा. चोहोबाजूंनी खेळती हवा, स्वच्छ सुर्यप्रकाश आवश्यक ठिकाणी सजावट, रंग - रंगोटी, हिरवळ याचा विचार करुन उभारलेली वास्तू सर्वांनाच प्रसन्नदायक वाटते. भारताची लोकसंख्या विचारात घेता कमी खर्चात जास्त सुखसोयी देणा-या निवासी वास्तूंची गरज आहे. वास्तूरचनाकारांनी त्या दृष्टीने संशोधन व प्रयत्न करावेत असे नामपूरकर म्हणाले.
विश्वस्त भाईजान काझी यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, देशाच्या जीडीपीमध्ये अभियंत्यांचा लक्षणीय सहभाग असतो. कोणतीही रचना, वास्तू तयार करताना अभियांत्रिकीच्या अनेक शाखांचा एकमेकांशी संबंध येतो. 21 व्या शतकात अभियांत्रिकी एवढे इतर कोणतेही क्षेत्र वेगाने विकसित झालेले नाही. सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखदायी, आरामदायी, आरोग्य संपन्न होण्यासाठी अभियंत्यांनी आणखी संशोधन करायला हवे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अशा नव संशोधकांना नेहमीच पाठबळ देत आली आहे. प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन प्रा. अनघा लवाटे, प्रा. प्रियांका लोखंडे, आभार प्रा. शिल्पा पाटील यांनी मानले. तसेच दर वर्षी प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना फिरता चषक देण्यात येईल अशी घोषणा महेश नामपूरकर यांनी केली.
-------------------------
फोटो ओळ : एस.बी.पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयातील पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ ज्येष्ठ वास्तूविशारद महेश नामपूरकर यांच्या उपस्थित झाला. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
----------------------
--------------------Saturday, 9 November 2019
शिव सेनेला पाठिंबा देणाचे मा कांग्रेस पक्षाचे च्या अध्यक्ष सोनिया गांधीयांनी दिला सल्ला
सेनेला मदत करा : सोनियांची सूचना lok hitay news 9 Nov. 2019 09:28

नवी दिल्ली/मुंबई : /विशेष प्रतिनिधी
शिवसेना-भाजपमध्ये निकराचा संघर्ष भडकला आणि भाजपला रोखण्याची ‘हीच ती वेळ’ हे ओळखून शिवसेनेला मदत करण्याच्या सूचना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सोनियांचा हा निरोप घेऊनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगिलते.
लोक हिताय मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसारच पृथ्वीराज चव्हाण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत पोहोचले. स्वत: शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना सरकार स्थापण्याचा दावा करण्याचा सल्ला द्यावा, असे सोनियांनी स्पष्ट सूचित केले आहे. उद्धव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घ्यावी म्हणून त्यांना आग्रह करावा, असेही सोनियांकडून सांगण्यात आले.

सुरुवातीला सोनिया गांधी यांची भूमिका ही शिवसेनेला पाठिंबा देण्याची नव्हती. मात्र मध्यंतरी आमदार सुनील केदार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या व आमदारांच्या शिष्टमंडळाने सोनियांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तो आता यशस्वी झाल्याचे दिसते.
उद्धव यांनी फडणवीस वा अमित शहा कुणाशीही मला बोलायचे नाही सांगून युतीचे जहाज पेटवून दिलेले आहे. आता उद्धव यांना सरकार स्थापनेसाठी मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाला वाटत असल्याने सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाचारण केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आता भाजप सरकार नाहीच : चव्हाण
सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आता भाजपा सरकार सत्तेवर येणार नसल्याची कबुलीच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या राजीनाम्यातून दिली आहे. गेल्या पाच वर्षांमधील निष्क्रिय काराभारामुळे जनतेने भाजपाला नाकारले आहे. आता राज्यापालांनी योग्य निर्णय घेतला पाहीजे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे राज्यात घटनात्मक सरकार आले पाहीजे. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी या पक्षाचे सरकार येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपला रोखण्याची रणनिती
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत राजकीय खलबते झाली आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनिती आखण्यात आल्याचे समजते.

तेराव्या विधानसभेची मुदत संपल्यामुळे फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री पदाचा औपचारीक राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे शिवसेनेची भूमिका काहीशी मवाळ होईल, अशी चर्चा होती. पण त्यामध्ये काहीही बदल झाला नाही. भाजपाच सरकार स्थापन करील, असे फडणवीस यांनी सांगितल्यानंतर शिवसेनेनेही मुख्यमंत्री आमचाच असेल, असा पुर्नरुच्चार केल्यामुळे युतीमध्ये आणखी भडका उडाला.
सुशीलकुमारांच्या येण्याचा अर्थ
दोन्ही बाजुंनी एकमेकांवर वार-प्रतिवार सुरु असताना सांयकाळी पवारांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरु झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पवारांमध्ये चर्चा सुरु असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे व सुशीलकुमार शिंदे तेथे आले. दोन दिवसांपुर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस हा सेक्युलर पक्ष असल्याचे सांगत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठींबा देण्यास विरोध केला होता. पण तेसुध्दा काँग्रेस नेत्यांसोबत आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिंदेच्या उपस्थितीवरुन काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्याचे तसेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मान्य केल्याचे समजते.

भाजपामुळे राज्यात बिकट राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले, राजीनामा देण्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे शपथविधीसाठी राजभवनवर जातील, असे वाटले होते. पण त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षाला जनमताचा पाठींबा नसल्याचे स्पष्ट केले
Friday, 8 November 2019
आज राम मंदिर व बाबरी मशीद च्या निर्णय फायन देणयात आले असून सर्वांना समाधानी असावी
योध्या निकाल लाईव्ह...
नवी दिल्ली : अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता या खटल्याचा निकाल येणार असून संपूर्ण सुप्रीम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Live Update...
11.15 - मंदिर बनवण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश
11.12 - रामजन्मभूमी न्यासला वाद असलेली जमीन देण्याचे आदेश
11.10 - मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा देण्याचे आदेश
11.08 - सुन्नी बोर्डाला अयोध्येत दुसरी जागा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.06 - मुस्लीम वर्गाला दुसरी जागा देण्याच आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.05 - रामाचा जन्म त्याच जागी झाला होता याचे पुरावे - कोर्ट
11.04 - 1885 पासून हिंदू चौथाऱ्यावर पूजा करत होते.
11.03 - हिंदू सीता स्वयंपाकघरातपूजा करत होते. - कोर्ट
11.01 - इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज वाचली जात होती असा पुरावा नाही - कोर्ट
11.00 - मुस्लीम पक्ष जमिनीवर एकाधिकार नाही सिद्ध नाही करु शकला.
10.55 - आस्था आणि विश्वासच्या आधारावर नाही तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल - कोर्ट
10.52 - 12 व्या आणि 16 व्या शतकात काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही - कोर्ट
10.50 - मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही- कोर्ट
10.49 - एएसआयच्या रिपोर्टनुसार मशीदच्या जागी आधी मंदिर होतं असं देखील निर्णयात म्हटलं गेल्याचं कळतं आहे.
10.47 - आस्था आणि विश्वासवर कोणताही वाद नाही होऊ शकत - कोर्ट
10.46 - जमीन विवादाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय दिला जाईल - कोर्ट
10.45 - रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही. - कोर्ट
10.42 - बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसल्याचं कोर्टाने निर्णयात म्हटलं आहे. याचा अर्थ बाबरी मशीदच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं.
Subscribe to:
Posts (Atom)