Thursday, 6 February 2020

देशात पहिले रिक्षा स्टेशन पिंपरी चिंचवड मध्ये

देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्डचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन.
//Lok hitay news.
 ( महिला रिक्षाचालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन)

 महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न  आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने  निगडी  भक्ती-शक्ती येथील अण्णाभाऊ साठे स्मारक जवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराच्या  महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, नगरसेवक सचिन चिखले , उत्तम केंदळे , पंकज भालेकर, कमल घोलप, शर्मिला बाबर, पोर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक सुलभाताई उबाळे, तानाजी खाडे, उर्मिला काळभोर, घरकाम महिला सभा अध्यक्ष सौ आशा कांबळे ,संजय बोराडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत, आणि त्यांनी स्वतःचे रिक्षा स्टँड निर्माण केले आहे हे शहराच्या   दृष्टीने अभिमानाची बाब आहे,  रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल महिलांच्या रिक्षा स्टॅण्डवर वाचनालय,पानपोई  आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील असे यावेळी महापौर यांनी सांगितले,
*महाराष्ट्र रिक्षा पंचायती* आणि घरकाम महिला सभेच्या  यांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स, बॅच, परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या. यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षाचालक झाल्या असून, आता महिलाही रिक्षा चालवणार आहेत.
महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे, त्यांनाही हक्काचे रिक्षा स्टँड मिळावे यासाठी  *महिलांचे देशातील पहिले रिक्षा स्टँड*  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी  मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला, देशातील महिलांचे पहिले रिक्षा स्टँडचे उद्घाटन
*दिनांक ०६/०२/२०२० रोजी* निगडी अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ भक्ती-शक्ती ,या ठिकाणी करण्यात आले ,
रिक्षा स्टँड वरती सर्व महिलांनी  फेटे घालून अत्यंत उत्साह साजरा केला

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष : सरस्वती गुजलोर,
यमुना काटकर, विजयलक्ष्मी हडपद, जयश्री मोरे, जयश्री साळुंखे, संगीता कांबळे, आयशा सोळसे, अक्षता गावडे, सविता ओव्हाळ, रेखा ठेळके, कविता मैदाड, रूपाली तिकोने, दिपाली तिकोने, मीना रंधवे

No comments:

Post a Comment