Thursday 27 February 2020

केंद्र शासनाच्या सी ए ए. विरोधात दिल्ली दन्गल झाली. यामध्ये मुत्यू मुखी पडलेल्याना. पि. चि. मधील विविध संघटनांच्या वतीने कँडल मार्च काढून पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चॊकात श्रद्धांजली वाहण्यात आली

Lok hitay news

.प्र. दिलीप देहाडे( लोक हिताय न्यूज )
 दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी संध्याकाळी सात वाजता महात्मा फुले पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला.


दिल्ली येथे झालेल्या हिंसाचार घटनांच्या निषेध करून जे हिंसाचारामध्ये बळी पडले त्यांना श्रद्धांजली वाहिली.

या कॅन्डल मार्च मध्ये ॲडवोकेट अब्दुल करिम यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली के ज्यांनी-ज्यांनी हिंसाचाराला अगोदर चिथावणीखोर वक्तव्य करून हिंसाचाराला चालना दिली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

शहाबुद्दीन शेख यांनी हिंसाचारामध्ये बळी पडलेल्या लोकांना सरकार मार्फत आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे याची विनंती केली.

अन्वर सय्यद यांनी हिंसाचारामध्ये पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले व पोलीस प्रशासन हिंसाचाराला थांबण्यास असमर्थ होते असे मनोगत व्यक्त केले.

मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवडच्या वेगवेगळ्या भागातून सोशल ऍक्टिव्हिस्ट उपस्थित होते. व्ही एम कबीर, शोएब मुजावर, अहमद शेख, उमरफारूक पठाण, आमिर मुल्ला, नूर मुल्ला, जावेद मुजावर, हुसेन भाई, हमीद शेख व इतर उपस्थित होते आणि महिलांमध्ये एडवोकेट जैनब, एडवोकेट यास्मीन, एडवोकेट जिया शेख, डॉक्टर मशमुम व इतर उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment