Sunday, 23 February 2020

हिरकणी महीला संघाचा रॉप्य्महोत्सवी वृद्धपनदिना निमताने आमदार गोगावले म्हणाले पक्ष वेगळा असलेतरी मन एकच आहे

.Lok hitay news
.लोक हिताय न्युज )
पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात.....आमदार भरत गोगावले
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ आणि हिरकणी महिला संघाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाच्या वतीने आमदार गोगावले यांचा सत्कार
पिंपरी (दि. 23 फेब्रुवारी 2020) राजकीय प्रतिनिधींचे पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात. हे कोकणवासीयांकडून सर्वांनी बोध घेण्यासारखे आहे. असे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी केले.
      महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर आणि हिरकणी महिला संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनादिनानिमित्त काळेवाडी पिंपरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाड - पोलादपूर - माणगावचे आमदार भरत गोगावले बोलत होते. यावेळी कोकण विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते आ. गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.
       यावेळी नगरसेविका निता पाडाळे, पौर्णिमा सोनवणे, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर सामाजिक कार्यकर्त्या शितल गोगावले, संस्थेचे अध्यक्ष गणेश मालुसरे, कार्याध्यक्ष रविंद्र भोसले, उपाध्यक्ष अविनाश उत्तेकर, सचिव गणेश मोरे, खनिजदार प्रभाकर निकम तसेच मधुकर सोनगरे, सुभाष पवार, मनोहर भोसले, शिवाजी सोनाटे, कृष्णा सोनगरे, शिवसेनेच्या माजी जिल्हा संघटीका सुशिला पवार, भाजपाचे नेते दिलीप आंब्रे, संतोष चिकणे, संदीप पवार, गिता जगदाळे, माया पवार, स्वाती भालेकर आदींसह कोकणवासीय बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. 
    सत्काराला उत्तर देताना आ. गोगावले म्हणाले की, मी शिवसेनेचा आमदार आहे. माझा सत्कार कॉंग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेत्याच्या हस्ते भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत झाला आहे. हे कोकणवासीयांच्या ऐकीचे उदाहरण आहे. मला तिस-यांदा आमदार करण्यात कैलास कदम व पिंपरी चिंचवड मधील कोकणवासीयांचे मोठे योगदान आहे. उद्योग, व्यवसायासाठी जन्मभूमीपासून विस्थापित झाले तरी कोकणभूमीला विसरु नका. महाड - पोलादपूर - माणगाव या मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड किल्ला, शिवथरघळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे सत्याग्रह केला ते चवदाळ तळे हि ऐतिहासिक स्थळे आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणचा विकास करण्यात येईल. त्याचबरोबर पाणी, दळणवळण, रोजगार व सिंचन या प्रश्नांसाठी उद्यापासून सुरु होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरघोस निधी मिळेल असा आशावाद आ. गोगावले यांनी व्यक्त केला.
     डॉ. कैलास कदम म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात बहुउद्देशीय कोकण भवन उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कदम यांनी केले.
हिरकणी महिला संघाने पारंपारिक खेळ महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदी कुंकू हे कार्यक्रम आयोजित केले होते.
स्वागत गणेश मालूसरे, प्रास्ताविक रविंद्र भोसले आणि आभार अविनाश उत्तेकर यांनी मानले.
----------------

No comments:

Post a Comment