Friday, 7 February 2020

त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 122 वि जयंती पिंपरी येथे मोठ्या आनंदानी साजरी

Lok hitay news #त्यागमूर्ती_रमा_भीमराव_आंबेडकर_यांची_122_वी_जयंती_उत्साहात_साजरी.//Lok hitay live news
प्रतिनिधी.. दिलीप देहाडे..
 पिंपरी ( 7 फेब्रुवारी) : महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 122 वी जयंती पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन #धुराजी_शिंदे , संतोष जोगदंड , धम्मराज साळवे व सर्व समाज बांधव यांनी केले.
" सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
त्यागमूर्ती माता रमाई यांनी आपल्या आयुष्यात बाबासाहेबांच्या सावलीप्रमाणे त्याच्या पाठीशी उभी राहून त्यांना साथ दिली अतिशय कठीण व  खडतर प्रसंगी बाबासाहेबांना सावरून समाजाप्रती लढण्याची ऊर्जा निर्माण केली त्या जिद्दीच्या जोरावर भारताने बाबासाहेबांनी या संपूर्ण विश्वावर आपल्या प्रकांड ज्ञानाच्या आधारे  कार्य केले जगाला हेवा वाटावा अशा विद्वत्तेची  राज्यघटना या देशाला दिली यामागे सुद्धा रमाईचे खूप मोठे  योगदान बाबासाहेबाना होते बाबासाहेबांच्या पाठीमागे संसाराचा गाडा हाकताना रमा मातेने बाबासाहेबांना कधीही घरची उणीव भासू दिली नाही याच गोष्टीमुळे बाबासाहेब आज समाजाचा उद्धार करू शकले यासारखे अनेक प्रसंग या मातेने उभ्या आयुष्यात गेले झेलले आजच्या मातेची जयंती समाजातील महिला भगिनींनी व विशेषता तरुण मुलींनी या मातेचा आदर्श घ्यावा येणारी पिढी सुसंस्कृत बलशाली व संघर्षमय घडवावी असे प्रतिपादन मानव जी कांबळे " यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर , शरद जी जाधव,  ओबीसी कृती समितीचे आनंदा कुदळे, लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे, संतोष जोगदंड, एमआयएमच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अंजना  गायकवाड,  धर्मराज साळवे ,युवक काँग्रेसचे विशाल कसबे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नितीन घोलप ,वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील, राजू साळवे , कांचन जावळे ,अरुण मैराळे ,अनिल मखरे,मनोज गजभार , अशोक जावळे, सर्वहारा उत्कर्ष संघटनाचे प्रा.बी.बी. शिंदे, राजू धुरंधरे आदी कार्यकर्ते व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment