Thursday, 13 February 2020

इंडूरो स्टुडन्ट इंडिया 2020राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचे वर्चस्व

‘इंडुरो स्टुडंट इंडिया 2020’ राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचे वर्चस्व....Lok hitay news..
पिंपरी, पुणे (दि. 13 फेब्रुवारी 2020) देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहन निर्मितीचा, चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. या उद्देशाने दरवर्षी स्प्लिट सेकंड इंजिनिअरींग ही संस्था इंडुरो स्टुडंट इंडिया ही राष्ट्रीय पातळीवरील एकमेव स्पर्धा आयोजित करते. या वर्षीची ही स्पर्धा तळेगाव दाभाडे येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) संघाने ‘ऑल टेरेन व्हेइकल’ प्रकारात ‘रेड बॅरन’ संघाने ‘इंजिनिअर डिझाईन’ या प्रकारात प्रथम क्रमांक, कॉस्ट प्रकारात प्रथम क्रमांक आणि इंडुरंन्स रेस प्रकारात दुसरा क्रमांक मिळवून स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. तसेच या संघाला सर्व साधारण गटातील उपविजेते पद आणि फास्टेस्ट लॅप गटातील विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.   
          ‘इंडुरो स्टुडंट इंडिया 2020’ राष्ट्रीय स्पर्धेतील पीसीसीओईचे हे दैदिप्यमान यश म्हणजे महाविद्यालयाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी विजेत्या संघाचा आणि संघाचे मार्गदर्शक प्रा. उम्मीद शेख, संघाचा कप्तान प्रतीक हुले, उपकप्तान सुप्रित पाटील, मंदार कदम यांचा गौरव करताना सांगितले.
पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे, पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
---------------------------------

No comments:

Post a Comment