Thursday 27 February 2020

बामसेफचे संस्थापक डी. के. खापर्डे साहेब यांच्या स्मुती दिनानिमित्त 29 फेब्र कार्यक्रमा चे सांगवी येथे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख उपस्थित. मा वामन मेश्राम यांची लाभणार आहे

Lok hitay news
प्र. दिलीप देहाडे. लोक हिताय न्युज )
(दिनांक 28 फेब्रुवारी 2020)

महापुरुष जीवन संदेश अभियानांतर्गत बामसेफचे संस्थापक मान्यवर डी.के.खापर्डे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेत जुनी सांगवी येथे शनिवारी २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यस्तरीय विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहासकार प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्तेेे होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड येथील भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी हर्षद रुपवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बोपोडी येथे राहायला असलेले डी.के. खापर्डे यांच्या राहत्या घरी त्यांचे सहकारी मान्यवर कांशीराम यांचे देखील अनेकदा वास्तव्य होते. याच ठिकाणी बामसेफ या देशव्यापी सामाजिक संघटनेचा पाया रोवला गेला त्याच परिसरात ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.
व्यवस्था परिवर्तन हा उद्देश घेऊन बामसेफ देशभरात जनजागृतीचे कार्य करीत आहे. बामसेफचे संस्थापक डी.के. खापर्डे सामाजिक परिवर्तनाबद्दल असे म्हणतात की, कोणत्याही मुद्द्याचे प्रथम आकलन होणे आवश्यक आहे, जर आकलन बरोबर असेल तर विश्लेषण बरोबर करता येईल, विश्लेषण बरोबर असेल तर ऐकणाऱ्यांचे आकलन बरोबर होईल. जर त्यांचे आकलन योग्य असेल तर विश्लेषणामुळे योग्य अर्थ प्राप्त होईल. जर विश्लेषण समजले असेल तर प्रबोधन योग्य दिशेने जाईल. आणि प्रबोधनामुळे चित्र स्पष्ट होईल. जर चित्र स्पष्ट असेल तर डोक्यात प्रकाश पडेल, जेव्हा डोक्यात प्रकाश पडतो तेव्हा जागृती होते, जर तुम्ही जागृत झालात तर तुमच्या मनात परिवर्तन होईल. मग कोण म्हणू शकेल की परिवर्तन शक्य नाही? मन परिवर्तन झाल्यास समाज परिवर्तन होणे शक्य आहे आणि समाज परिवर्तन झाल्यावरच व्यवस्था परिवर्तन होऊ शकते, म्हणून आम्हाला जागृतीची ज्योत पेटवीत पुढे जाणे आवश्यक आहे. त्यांच्या याच विचारातून गेल्या चाळीस वर्षांपासून "बामसेफ" ही सामाजिक संघटना मूलनिवासी बहुजन समाजाला आपल्या उद्देशासाठी आणि ध्येयासाठी अर्थात "संपूर्ण व्यवस्था परिवर्तनासाठी" तयार करण्याच्या कामात सतत कार्यरत आहे. बर्‍याच अडचणी, चढउतार आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही संघटनेचे निष्ठावंत, प्रामाणिक आणि समर्पित कार्यकर्ते आणि संघटनेचे नेतृत्व नेहमीच उद्देश पूर्तीच्या दिशेने पुढे गेले आहे. बामसेफच्या प्रारंभीच्या टप्प्यात मान्यवर कांशीरामजी नंतर डी.के. खापर्डे साहेब आणि सध्या वामन मेश्राम साहेबांनी त्यांच्या अथक परिश्रमाने व त्यागाने आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने आपल्या उद्देशाप्रति कोणत्याही प्रकारचा समझोता न करता, संपूर्ण आवेशाने चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले आहे, या सर्व कालावधीत आज तिसर्‍या पिढीने बामसेफमध्ये प्रवेश केला आहे. आजच्या परिस्थितीत बामसेफ प्रणित फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीने विशालकाय रुप धारण केले आहे. आणि ही चळवळ आता एका निर्णायक काठावर आली आहे. असे दूरदृष्टीचेे नेतृत्व दिवंगत खापर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत १)NRC, CAA हा कायदा केवळ मुसलमानांच्या विरोधात नसून तो अनु.जाती, अनु.जमाती, भटके विमुक्त व ओबीसी यांच्या विरोधात आहे. २)NPR चा कायदा हाच खरा NRC कायदा आहे. ३)EVM मध्ये गडबडी करून आलेल्या सरकारमुळेच NRC लागू होत आहे. ४)राष्ट्रव्यापी जनआंदोलनासाठी संघटनांचे जाळे निर्माण केले पाहिजे, तरच युरेशियन ब्राम्हणांची व्यवस्था नष्ट होईल.  ५)बामसेफ संस्थापक मान्यवर डी.के.खापर्डे साहेब यांच्या जीवन संघर्षातून कार्यकर्त्यांनी घ्यावयाची प्रेरणा. अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असून, मा.डी.डी.अंबादे मान्यवर खापर्डे साहेबांचे जुने सहकारी व राष्ट्रीय कोषाध्यक्ष बामसेफ, प्रो. विलास खरात  डायरेक्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली. ॲड.राजकुमार थोरात राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन लॉयर आसोसिएशन हे प्रमुख वक्ते सहभागी होणार आहेत. तर अध्यक्षता वामन मेश्राम हे करणार आहेत.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या पिंपरी चिंचवड युनिटचे पदाधिकारी भीमराव गेडाम, विजय आराख, सूर्यकांत वराडकर, पी.बी.उबाळे, बनकर साहेब, टी.एस.कांबळे, राजेश लिगाडे, हर्षद रुपवते यांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment