Saturday 29 February 2020

प्रदूषण नियंत्रण पर्यावरण आरोग्यरक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज,,, डॉक्टर कार्ल पेरीन

.Lok hitay news

प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण, आरोग्य रक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज.....डॉ. कार्ल पेरिन
केपीआयटी स्पार्कल स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.
(लोक हिताय न्युज. प्र. आकाश शिंदे )
पिंपरी, पुणे (दि. 29 फेब्रुवारी 2020) संपुर्ण जगाला प्रदुषणाचा आणि पर्यावरण बदलाचा सामना करावा लागत आहे. मानवाच्या रक्षणासाठी अपारंपरिक ऊर्जा, प्रदुषण नियंत्रण, आरोग्य आणि पर्यावरण रक्षण व संवर्धनावर अधिक संशोधन करुन योग्य दिशेने नियोजन करण्याची गरज आहे, असे मत इन्स्टिट्युट फॉर फ्युचर ट्रान्सपोर्ट, सिटी कन्व्हेटरी विद्यापीठाचे संचालक डॉ. कार्ल पेरिन यांनी व्यक्त केले.
       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल स्पर्धेचे’ उद्‌घाटन डॉ. पेरिन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले. यावेळी केपीआयटीचे राहुल उपल, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, ब्रिटन मधील कोन्व्हेंटरी विद्यापीठाच्या इलेक्ट्रो केमिकल ऊर्जा विभागाचे प्रमुख प्रा. रोहित भगत, ऑडी एजीच्या स्टॅटर्जी सस्टेनिबिलीटीचे उपाध्यक्ष डॉ. पिटर ट्रोपेच्यू, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल पाटील, समन्वयक प्रा. केतन देसले आदी उपस्थित होते.
      डॉ. पेरिन म्हणाले, ब्रिटनस्थित कोन्व्हेंटरी विद्यापीठाला 175 वर्षांची परंपरा असून विद्यापीठात जागतिक हवामान बदलामुळे होणारे परिणाम, त्यावरील उपाय, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरणपूरक वाहतूक, आरोग्य, रस्ते, जलमार्ग, लोहमार्ग, हवाई वाहतूक आदी विषयांवर सखोल संशोधन करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणारी वाहने, मोनोरेल यासारख्या आधुनिक आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे.
         प्रा. रोहित भगत म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत्रांचा वापर अधिक प्रमाणात करण्याचे महत्व सर्वांनाच समजले आहे. म्हणून जगभरात बॅटरीवर, विजेवर चालणा-या वाहनांचा वापर गेल्या काही वर्षात वाढला आहे. बॅटरीवर चालणा-या वाहनांमध्ये लिथिनियमचा वापर करण्यात येत आहे. लिथिनियममुळे बॅटरीची काम करण्याची क्षमता, तिचे आयुष्य वाढते. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते, असे प्रा. भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
      डॉ. पिटर ट्रॉमचूह यांनी, ॲटोनॉमस, कनेक्टेड, इलेक्ट्रिक, शेअर या प्रमुख चार मुद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ई - वेस्टची समस्या, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वाहनांमध्ये वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते. तसेच कृत्रिम बुध्दिमतेचा वापर यापुढील काळात मोठ्या प्रमाणात विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या परिस्थितीचे, सामान्यांना भेडसावणा-या समस्या, प्रश्न यांचा विचार करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्या कशा सोडवता येतील व जीवन अधिक सुखकर कसे होईल याचा विचार करुन संशोधन करावे, अशीहि अपेक्षा डॉ. ट्रॉमचूह यांनी व्यक्त केली.
       स्वागत करताना प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांनी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मध्ये विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणा-या विविध सुविधा, प्राध्यापक, विभाग प्रमुखांचे प्रयत्न, सहभाग या विषयी माहिती दिली.
       केपीआयटी स्पार्कल मध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रकल्प मांडले. त्यामधून 100 प्रकल्पांची निवड महाअंतिम फेरीसाठी करण्यात आली. त्यातून 30 प्रकल्प अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. यामधून प्रथम, व्दितीय, तृतिय व उत्तेजनार्थ दोन अशी पोरितोषिके देण्यात येणार आहेत. एकूण 21 लाखांची विविध बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती प्रा. केतन देसले यांनी दिली.
प्रास्ताविक केपीआयटीचे राहुल उपल यांनी केले. सुत्रसंचालन विनिला बेडेकर यांनी तर आभार प्रा. राहुल पाटील यांनी मानले.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक प्रा. केतन देसले यांनी दिली.
-----------

No comments:

Post a Comment