Thursday, 6 February 2020

एस बी. पाटील अर्की टेकट मध्ये पदवी प्रदान सोहळा उत्साहत संपन्न

पिंपरी
--Lok hitay news
कल्पकतेचा ध्यास, शिकण्याची इच्छा असणाराच उत्कृष्ठ रचनाकार.....महेश नामपूरकर
‘राहण्यायोग्य शहर’ मध्ये वरच्याक्रमांकासाठी पर्यावरणपूरक वास्तूंची गरज.....महेश नामपूरकर
एस.बी.पाटील आर्किटेक्ट मध्ये पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी/ पुणे (दि. 6 फेब्रुवारी 2020) नाविण्याचा आणि कल्पकतेचा ध्यास व कायम नवीन शिकण्याची इच्छा असणारी व्यक्तीच उत्कृष्ठ रचना उभारु शकते. प्रत्येक वेळी कलात्मक दृष्टीकोन ठेवला तर वेगळेपणा जपणारी वास्तू तयार होईल. मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी कल्पकतेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक वास्तू उभाराव्यात. अशा वास्तूंमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होईल तसेच ‘राहण्यायोग्य शहर’ या वर्गवारीत आपल्या शहराचा क्रमांक आणखी वरचा येईल. यासाठी वास्तूरचनाकारांनी काम करावे असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तूविशारद आणि सुमांशल वास्तूसंस्थेचे संचालक महेश नामपूरकर यांनी केले.
       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस.बी.पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयातील पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा आकुर्डीत बुधवारी (दि. 5) नामपूरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, पीसीईटीचे कुलसचिव प्रा. योगेश भावसार, प्रा. शिल्पा पाटील आदी उपस्थित होते. वास्तूविशारद परिक्षेत 43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 6 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वैदेही कड हिचा महाविद्यालयात प्रथम व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 9 वा क्रमांक आल्याबदल विशेष गौरव करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नामपूरकर यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
       नामपूरकर म्हणाले की, खंडप्राय भारत देशात उत्तरेत असणारे हवामान दक्षिणेत तसेच असेल असे नाही. हवामानातील बदल स्थानिक नागरिकांच्या गरजा, आर्थिक पुरवठा, वास्तू रचनेची गरज या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकीय नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक वास्तू उभारली पाहिजे. अशा वास्तूंचा देखभाल खर्च कमीत कमी असावा. चोहोबाजूंनी खेळती हवा, स्वच्छ सुर्यप्रकाश आवश्यक ठिकाणी सजावट, रंग - रंगोटी, हिरवळ याचा विचार करुन उभारलेली वास्तू सर्वांनाच प्रसन्नदायक वाटते. भारताची लोकसंख्या विचारात घेता कमी खर्चात जास्त सुखसोयी देणा-या निवासी वास्तूंची गरज आहे. वास्तूरचनाकारांनी त्या दृष्टीने संशोधन व प्रयत्न करावेत असे नामपूरकर म्हणाले.
           विश्वस्त भाईजान काझी यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, देशाच्या जीडीपीमध्ये अभियंत्यांचा लक्षणीय सहभाग असतो. कोणतीही रचना, वास्तू तयार करताना अभियांत्रिकीच्या अनेक शाखांचा एकमेकांशी संबंध येतो. 21 व्या शतकात अभियांत्रिकी एवढे इतर कोणतेही क्षेत्र वेगाने विकसित झालेले नाही. सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखदायी, आरामदायी, आरोग्य संपन्न होण्यासाठी अभियंत्यांनी आणखी संशोधन करायला हवे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अशा नव संशोधकांना नेहमीच पाठबळ देत आली आहे. प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन प्रा. अनघा लवाटे, प्रा. प्रियांका लोखंडे, आभार प्रा. शिल्पा पाटील यांनी मानले. तसेच दर वर्षी प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना फिरता चषक देण्यात येईल अशी घोषणा महेश नामपूरकर यांनी केली.
-------------------------
फोटो ओळ : एस.बी.पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयातील पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ ज्येष्ठ वास्तूविशारद महेश नामपूरकर यांच्या उपस्थित झाला. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
----------------------
--------------------

No comments:

Post a Comment