Monday, 10 February 2020

म्हाळसाकांत विघालय माजी विध्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला

*माजी विद्यार्थी स्नेह मेळावा*
.//Lok hitay news... प्र. दिलीप देहाडे..
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री.म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी या शाळेच्या १९८४—८५ वर्षाच्या माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा ३५ वर्षांनी दि. ०९/०२/२०२० रोजी सकाळी  ९ ते ४ या वेळेत संपन्न झाला.
१० वी अ, ब, क मधून १७३ मुले मुली शिकत होत्या. १० वी उत्तीर्ण नंतर सर्व जण पुढील करिअर करिता बाहेर पडले ते पुन्हा ३५ वर्षांनीच भेटले. आज विविध क्षेत्रात ते उच्च पदावर कार्यरत आहेत. अॅड.उर्मिला काळभोर, आप्पा बागल, राजू दुर्गे, बाळासाहेब हिंदळकर नगरसेवक झाले. ८ वकील, काही डाॅक्टर, व्यवसायिक झाले.
प्रारंभी कै. बा. रा. घोलफसाहेब (संस्थापक), सावित्रीबाई फुले, देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन श्री.गोविंदराव काळभोर पाटिल यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे प्रा.जे.एम.डुंबरेसर (मा.प्राचार्य श्री म्हाळसाकांत विद्यालय) तसेच श्री. शेख सर उपस्थित होते.
वर्गशिक्षिक सेवानीवृती नंतर विद्यार्थ्यांना आशिर्वाद देणे करिता आवर्जून उपस्थित होते. सर्वश्री श्री. एस. के. ताकवले, श्री.भरगुडे, श्री.शितोळे, श्री.फुगे, श्री.कदम, सौ.ढमढेरे, सौ.पन्हाळे, डॉ.वंदना पिंपळे हे होय.
प्रास्ताविक गौतम जाधव यांनी केले.  प्रथम दिवंगत संस्था पदाधिकारी, दिवंगत अध्यापक, दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विद्यार्थी मनोगत राजू सुतार, भास्कर भोर यांनी केले.
या कार्यक्रमात मा.पर्यवेक्षक श्री.बी.एम.भसेसर, यांना "मानपत्र"  प्रदान केले. मानपत्र वाचन श्री आप्पा बागल यांनी केले.
सत्कारार्थी डॉ.वंदना पिंपळे, सौ.मंदा बारणे, भूषण ओझर्डे, संतोष मुंगसे, बाबा बागल हे विशेष होते.
अॅड.उर्मिला काळभोर यांनी शाळेबद्दल विस्तृत स्वरूपात माहिती देऊन उत्कृष्ट भाषण केले. राजू दुर्गे  यांनी आभार मानले.
परिश्रम घेणारे राजू सुतार, रानडे, सौ.किरण पाटील, अजय भोसले, प्रविण मोरे, मारूती साने, हमीद शेख, विश्वनाथ मठपती, भास्कर भोर, उदय जोशी, अजय अहिरेकर, मधुसूदन नेहरे, बाळासाहेब उदावंत होत.
 शिस्तप्रिय व संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे  जीवनाचे साध्य असावे असे मनोगत मा.जे. एम. डुंबरेसर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
माझ्या जीवनाचे सार्थक झाले मला विद्यार्थ्यांनी ३५ वर्षांनी निमंत्रित करून मला मानपत्र दिले यामुळे मी भारावून गेलो असे भावनिक शब्द मा.बी.एम.भसेसर यांनी व्यक्त केले.
सुत्रसंचालन आप्पा बागल, गौतम जाधव यांनी केले. त्यानंतर विद्यार्थी परिचय व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न  झाला.
कार्यक्रमाचे सुरवात राष्ट्रगीताने समारोप वंदे मातरम ने करण्यात आला.

No comments:

Post a Comment