Monday, 2 March 2020

राष्ट्रीय स्थरावर इनोव्हेशन क्लस्टर स्थापन करावेत असे डॉ अनिल काकोडकरम्हणाले

.Lok hitay news



राष्ट्रीय स्थरावर ‘इनोव्हेशन क्लस्टर’ स्थापन करावेत.....डॉ. अनिल काकोडकर
केपीआयटी स्पार्कलचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न
टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे..
 यांना गोल्ड ॲवार्ड. (लोक हिताय न्युज. प्र. दिलीप देहाडे )
पिंपरी (दि. 1 मार्च 2020) भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बौध्दिक कुशलता आहे. त्याला अधिक चालना मिळण्यासाठी व त्या बौध्दिकतेचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी केला पाहिजे. या युवा अभियंत्यांच्या नाविण्यपुर्ण संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी व्यापक व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे. यासाठी राष्ट्रीय स्थरावर ‘इनोव्हेशन क्लस्टर’ स्थापन केल्यास त्यातून रोजगारनिर्मितीस चालना मिळेल तसेच राष्ट्रीय जीडीपी वाढण्यास मदत होईल. असे प्रतिपादन भारतीय अणूऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल स्पर्धेचा’ बक्षिस वितरण समारंभ रविवारी (दि. 1 मार्च) डॉ. काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केपीआयटीचे रवि पंडीत, अनुप साबळे, अटल फाऊंडेशनचे उन्नत पंडीत, डॉ. अनिता गुप्ता, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे आदी उपस्थित होते.
      यावेळी स्पर्धेक विजेत्यांना मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर म्हणाले की, भारतामध्ये वैयक्तिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वायु प्रदूषण व पर्यावरणाची समस्या उग्ररुप धारण करीत आहे. यावर उपाय म्हणून अपारंपरिक ऊर्जास्त्रोत्रांचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत व छोट्या मोठ्या वाहनांसाठी वाढला पाहिजे. तर प्रदूषणाच्या परिणामांपासून पुढच्या पिढीला थोडाफार दिलासा मिळेल. केपीआयटी स्पार्कल या स्पर्धेत प्रकल्प सादर करताना विद्यार्थ्यांनी भरपूर तयारी केल्याचे दिसले. सर्व सामान्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेतले तर त्यावर उपाय सापडेल असे डॉ. काकोडकर म्हणाले.
       उन्नत पंडीत म्हणाले की, विद्यार्थ्यांचा प्रत्येक प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिवसेंदिवस विकसित होत आहे. ते प्रश्न  सोडविण्यासाठी कमी खर्चातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. केंद्र सरकारच्या अटल स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आर्थिक मदत करण्यात येते. अनिता गुप्ता, अनुप साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
       ही राष्ट्रीय स्पर्धा पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
     गेल्या तीन वर्षांपासून पीसीसीओई व केपीआयटी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रवेश घेतला होता. यातून शंभर टिमने महाअंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना पाच लाखांचे गोल्ड अॅवार्ड, झिंक एअर व टीम व्हर्टेक्स यांना प्रत्येकी अडीच लाखांचे सिव्हर ॲवार्ड आणि मोस्ट पॉप्युलर ॲवार्ड बायो टिमला तसेच उत्तेजनार्थ बक्षिस टीम व्हिल, टीम युव्ही आणि ऊर्जा यांना देण्यात आले. एकूण एकवीस लाख रुपयांचे बक्षिसे देण्यात आली.
स्वागत रवि पंडीत, सुत्रसंचालन डॉ. विनिला बेडेकर, आभार प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांनी मानले. 
----------------------------------------

Sunday, 1 March 2020

वाहतूक समस्येबाबत पोलीस अधिकाऱ्यांची अनास्था आमदार लक्ष्मण जगताप यांनी कारवाईचा दिला इशारा

Lok hitay news

(लोक हिताय न्युज.. प्र दिलीप देहाडे )
 
वाहतूक समस्येबाबत पोलिस अधिकाऱ्यांची अनास्था; आमदार लक्ष्मण जगताप यांनी कारवाईचा दिला इशारा
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्येबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. २९) वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दांडी मारल्याने आमदार जगताप यांनी वाहतूक विभागातील पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील वाहतूक समस्येबाबत काही देणेघेणे आहे की नाही?, असा सवाल केला. या महत्त्वाच्या विषयांवर आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी दुर्लक्ष करतात की काय?, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. तसेच वारंवार सूचना करूनही शहरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजविणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात विधानसभेत हक्कभंग उपस्थित करण्याचा इशाराही त्यांनी दिला.  
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते प्रशस्त असले तरी ट्रॅव्हल्स, खासगी बसेस व अन्य वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना चिंता व्यक्त करणारे पत्र दिले होते. शहरातील वाहतूक सुरळित सुरू राहावी तसेच अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांच्या बाजूला बेशिस्तपणे पार्किंग केले जाणारे खासगी ट्रॅव्हल्स, खासगी कंपन्यांच्या गाड्यांना शिस्त लावावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २९) चिंचवड येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला वाहतूक विभागाचे सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व वाहतूक पोलिस निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांवरील बैठकीला दांडी मारली. वरिष्ठ अधिकाऱ्यालाच शहरातील वाहतूक समस्येबाबत काहीच देणेघेणे नसेल तर शहराच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याची चिंता आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली. वाहतूक समस्येबाबत वारंवार सूचना करूनही वाहतूक विभागाचे अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहेत. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी असे वागत आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.
शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. परंतु, वाहतूक विभागाचे अधिकारी बेफिकीरपणे वागत असतील तर विधानसभेत हक्कभंग उपस्थित करण्याचा इशारा आमदार जगताप यांनी दिला. अधिकाऱ्यांचा असा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नसल्याचे त्यांनी पोलिस आयुक्तांना ठणकावून सांगितले. तसेच बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले 

एकुणत्या एक मुलाला देश सेवेसाठी पाठवण्यात येणाऱ्या अभिजित भारत लोंढे यांच्या सन्मान पि. चि. शहराचे माजी महापौर. हनुमंत. भोसले.( अण्णा)यांच्या वतीने करण्यात आला )

.

लोक हिताय न्युज


दि. 1.मार्च.. Lok hitay news. (प्र. दिलीप देहाडे. )
गरिब परिस्थितीवर मात करत आसाम रायफल्स मध्ये देशप्रेमाखातर भरती झालेल्या विठ्ठलनगर येथील अभिजित लोंढे व त्याच्या आईवडिलांचा सन्मान माजी महापौर हनुमंतराव भोसले व मा.विरोधी पक्षनेते,विदयमान नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
"देशसेवेसाठी लष्करी सेवेचा मार्ग निवडणारा अभिजित गौरवास पात्र आहे" असे प्रतिपादन हनुमंतराव भोसले यांनी केले.
सत्कारास उत्तर देताना अभिजितने केलेल्या अभ्यासाची व मैदानी चाचणीची माहिती दिली. यावेळी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन विनोद गायकवाड,महादेव आडसुळे,बालाजी थोरात,अशोक देवकर,ज्ञानोबा धावारे,संजय जाधव,सुनिता पाटोळे,नवनाथ कांबळे यांनी केले.किशोर गवळी यांनी सुत्रसंचालन केले.

Saturday, 29 February 2020

प्रदूषण नियंत्रण पर्यावरण आरोग्यरक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज,,, डॉक्टर कार्ल पेरीन

.Lok hitay news

प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण, आरोग्य रक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज.....डॉ. कार्ल पेरिन
केपीआयटी स्पार्कल स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.
(लोक हिताय न्युज. प्र. आकाश शिंदे )
पिंपरी, पुणे (दि. 29 फेब्रुवारी 2020) संपुर्ण जगाला प्रदुषणाचा आणि पर्यावरण बदलाचा सामना करावा लागत आहे. मानवाच्या रक्षणासाठी अपारंपरिक ऊर्जा, प्रदुषण नियंत्रण, आरोग्य आणि पर्यावरण रक्षण व संवर्धनावर अधिक संशोधन करुन योग्य दिशेने नियोजन करण्याची गरज आहे, असे मत इन्स्टिट्युट फॉर फ्युचर ट्रान्सपोर्ट, सिटी कन्व्हेटरी विद्यापीठाचे संचालक डॉ. कार्ल पेरिन यांनी व्यक्त केले.
       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल स्पर्धेचे’ उद्‌घाटन डॉ. पेरिन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले. यावेळी केपीआयटीचे राहुल उपल, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, ब्रिटन मधील कोन्व्हेंटरी विद्यापीठाच्या इलेक्ट्रो केमिकल ऊर्जा विभागाचे प्रमुख प्रा. रोहित भगत, ऑडी एजीच्या स्टॅटर्जी सस्टेनिबिलीटीचे उपाध्यक्ष डॉ. पिटर ट्रोपेच्यू, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल पाटील, समन्वयक प्रा. केतन देसले आदी उपस्थित होते.
      डॉ. पेरिन म्हणाले, ब्रिटनस्थित कोन्व्हेंटरी विद्यापीठाला 175 वर्षांची परंपरा असून विद्यापीठात जागतिक हवामान बदलामुळे होणारे परिणाम, त्यावरील उपाय, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरणपूरक वाहतूक, आरोग्य, रस्ते, जलमार्ग, लोहमार्ग, हवाई वाहतूक आदी विषयांवर सखोल संशोधन करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणारी वाहने, मोनोरेल यासारख्या आधुनिक आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे.
         प्रा. रोहित भगत म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत्रांचा वापर अधिक प्रमाणात करण्याचे महत्व सर्वांनाच समजले आहे. म्हणून जगभरात बॅटरीवर, विजेवर चालणा-या वाहनांचा वापर गेल्या काही वर्षात वाढला आहे. बॅटरीवर चालणा-या वाहनांमध्ये लिथिनियमचा वापर करण्यात येत आहे. लिथिनियममुळे बॅटरीची काम करण्याची क्षमता, तिचे आयुष्य वाढते. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते, असे प्रा. भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
      डॉ. पिटर ट्रॉमचूह यांनी, ॲटोनॉमस, कनेक्टेड, इलेक्ट्रिक, शेअर या प्रमुख चार मुद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ई - वेस्टची समस्या, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वाहनांमध्ये वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते. तसेच कृत्रिम बुध्दिमतेचा वापर यापुढील काळात मोठ्या प्रमाणात विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या परिस्थितीचे, सामान्यांना भेडसावणा-या समस्या, प्रश्न यांचा विचार करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्या कशा सोडवता येतील व जीवन अधिक सुखकर कसे होईल याचा विचार करुन संशोधन करावे, अशीहि अपेक्षा डॉ. ट्रॉमचूह यांनी व्यक्त केली.
       स्वागत करताना प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांनी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मध्ये विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणा-या विविध सुविधा, प्राध्यापक, विभाग प्रमुखांचे प्रयत्न, सहभाग या विषयी माहिती दिली.
       केपीआयटी स्पार्कल मध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रकल्प मांडले. त्यामधून 100 प्रकल्पांची निवड महाअंतिम फेरीसाठी करण्यात आली. त्यातून 30 प्रकल्प अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. यामधून प्रथम, व्दितीय, तृतिय व उत्तेजनार्थ दोन अशी पोरितोषिके देण्यात येणार आहेत. एकूण 21 लाखांची विविध बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती प्रा. केतन देसले यांनी दिली.
प्रास्ताविक केपीआयटीचे राहुल उपल यांनी केले. सुत्रसंचालन विनिला बेडेकर यांनी तर आभार प्रा. राहुल पाटील यांनी मानले.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक प्रा. केतन देसले यांनी दिली.
-----------

आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत अश्विनी इंटरनॅशनल स्कूल आणि एस बी पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक

.Lok hitay news




एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञानदिना निमित्त आंतरशालेय विज्ञान स्पर्धा
आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत अश्विनी इंटरनॅशनल स्कूल आणि एसबी पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक
..(लोक हिताय न्युज )पिंपरी (दि. 29 फेब्रवारी 2020) इस्त्रो या अवकाश संशोधन केंद्रात गुगल पेक्षाही जास्त वेगाने काम करु शकणारे जीपीआरएस तंत्रज्ञान लवकरच विकसित होईल. अवकाश संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांनी लक्षवेधी गगनभरारी मारली आहे. आतापर्यंत भारतासह अनेक देशांनी अवकाशात सोडलेले निष्क्रिय उपग्रह परत पृथ्वीवर आणण्यासाठी जागतिक स्थरावर मोठे प्रयत्न सुरु आहेत. आजचे भारतीय विद्यार्थी आगामी काही वर्षांत यावर संशोधन करुन नक्कीच यश मिळवतील, असा आशावाद इस्त्रोतील ज्येष्ठ माजी वैज्ञानिक डॉ. ए. के. सिन्हा यांनी व्यक्त केला.
         राष्ट्रीय विज्ञानदिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘अविष्कार’ ही आंतरशालेय विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. दिलीप देशमुख, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, पर्यवेक्षिका पद्मावती बंडा, शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
       या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी अवकाश, कृषी आणि अंतराळ या तीन विषयांत आपल्या प्रतिकृती आणि त्यांच्या संकल्पना सादर केल्या. कृषी विभागांमध्ये आधुनिक शेती, मातीच्या वापराशिवाय शहरांमध्ये कमीत कमी पाण्यावरच्या पालेभाज्या आणि फळे, भाज्यांचे उत्पादन, स्मार्ट ॲप व्दारे मातीतील ओलाव्याचे प्रमाण परीक्षण करून शेतीला यंत्राव्दारे पाणीपुरवठा, गणितातील अपूर्णांक, गुणाकार, भागाकार हसत-खेळत शिकत गणिताच्या विविध युक्त्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
       स्पर्धेचे विजेते पाचवी ते सहावी प्रथम क्रमांक अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, व्दितीय क्रमांक विभागून एसबी पाटील पब्लिक स्कूल आणि सिटी प्राइड स्कूल, पाचवी ते सहावी प्रथम क्रमांक - एसबी पाटील पब्लिक स्कूल, व्दितीय क्रमांक - सेंट जोसेफ स्कूल, सातवी ते नववी - प्रथम क्रमांक - एसबी पाटील पब्लिक स्कूल, व्दितीय क्रमांक अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, नावीन्यपूर्व प्रयोग - आझम कॅम्पस आणि विशेष पर्यावरण पूरक पुरस्कार - सीएमएस स्कूल या संघांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संयोजनात वर्षा देशमुख, दर्शना कामत यांनी सहभाग घेतला होता.
स्वागत पद्मावती बंडा, सूत्रसंचालन स्वलेहा मुजावर आणि आभार निवेदिता विश्वास यांनी केले.
-------------------------




--
----
with thanx & regards
Tulshidas Shinde
Cell : 9552530271 / 9822491684
18, Saikrupa Bhavan, Kharalwadi, Pimpri, Pune - 18
E-mail : sanketmedias@gmail.com

Friday, 28 February 2020

LOK HITAY NEWS


डोंगरगाव,सिल्लोड मधील मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या हत्येच्या घटनेला १२ दिवस उलटुनही,अरोपी मोकाटच*

सिल्लोड,दि.28 फेब्रुवारी2020)Lok hitay news              ( लोक हिताय न्युज. प्रतिनिधी):-
डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक  मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या  अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येची घटना घडली ही अत्यंत निंदनीय घटना आहे,त्यामुळे दि.24 फेब्रुवारी ला पुण्याहुन रमाई महिला मंच(महा.राज्य) च्या अध्यक्षा भीमाताई तुळवे,समाजसेविका रंजनामाई कांबळे,रमाई महिला मंचच्या कार्यध्यक्षा मनीषाताई साळवे,आंबेडकर चळवळीतील महाराष्र्टाच्या सुप्रसिद्ध गायिका साधनाताई मेश्राम,बबीता चक्रनारायण,प्रजेचा विकास चे संपादक व लाॅर्ड बुद्धा टि.व्ही चॅनलचे प्रतिनिधी विकास कडलक,वंचीतचे नेते व आदिवासी भटका बहुजन संघटनेचे महाराष्र्ट राज्य अध्यक्ष माऊली तथा ज्ञानदेव सोनवणे,येडेश्वरी टुर्स ट्रव्हलचे विकास वनकळस पाटील,परमेश्वर जगताप,विश्वनाथ सरोदे,राजु प्रधान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डोंगर गाव येथे भेट दिली,पिडीत कुंटुबाशी भेटुन चर्चा करुन तेथील पोलीस प्रशासनाला भेटुन जाब विचारत चर्चा करुन निषेर्धात लवकरात लवकर दोषीना पकडुन कडक शासन करावे,अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन अर्ज सर्व संघटने वतीने  दिले.रंजनामाई कांबळे यांनी पिडित कुटुबांतील मुलास 5000रु चा चेक मदत म्हणुन दिला व आपणही सर्वानी मदत करावी व समाजातील या लहान मुलास शिक्षणासाठी आणि होतकरु होईपर्यंत सर्वानी साथ द्यावी असे अहवान कांबळे यांनी केले,माऊली सोनवणे यांनी खासदार आमदार सभापती व इतर स्थानीक नेत्यानी भेट न दिल्याची खंत व्यक्त केली व आमदार सत्तार यांना मंबई ला लोणावळ्यातुन जावे लागते लोणावळ्यात गाडी आडवुन धडा शिकवला जाईल,असे खुले अहवान सत्तार यांना दिले,तर भीमाताई तुळवे यांनी खंत व्यक्त करत पिडित कुटुबांना सात्वन पर मत व्यक्त केले.व सर्वानी दुखःद अंतकरणानी दोघी मायलेकींना श्रद्धांजली अर्पण केली,व लवकरच त्यांना न्याय मिळावा हि अपेक्षा व्यक्त केली.या भेटीत वंचीतचे सिल्लोड तालुका अध्यक्ष  कडुबा जगताप यांनी माहीती दिली,डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक  मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या  अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येची घटना घडली दि.17 फेब्रुवारी  2020 रोजी  शहरातील घाटी वैद्यकीय  रुग्णालयात डोंगरगाव  ता. सिल्लोड  जि. औरंगाबाद  येथील मृतदेह  शवविच्छेदनासाठी  नेण्यात  आला.सदर दुदैर्वी घटना कळाली  असता तिथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ,  खालेद  पटेल जिल्हा उपाध्य वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कडुबा जगताप आदि कार्यकर्ते  सोबत  जावून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून परिस्थिती जाणून घेतली.एक 32 वर्षाची महिला नाव वंदना रेऊबा बनकर/ साळवे व तीची लहान मुलगी भारती विलास साळवे (वय 7)  यांच्या वर बलात्कार व खुन करुन त्यांच्या गुप्तांगात  काड्या खुपसलेल्या अवस्थेत व डोळे , जीभ बाहेर निघालेले आहेत. त्यांची बाॅडी फाशी देवून खुन करुन  तिन दिवसापूर्वी  विहिरित टाकले  व ती फुगून बाहेर आल्या नंतर हि गोष्ट उघडकीस आली आहे.  सदर प्रकरणात मयतांच्या नातेवाईकांनी  3 दिवसापूर्वी मिसिंग  तक्रार केल्यावर पण पोलिस प्रशासनाने  निष्काळजी पणा केल्याचे दिसून आले आहे.  अजुन आरोपींचा शोध लागला नाही, वंचित बहुजन आघाडीने मागणी केल्यानुसार   सकाळी  ईन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.सिल्लोड तालुक्यात ही 8ते 15 दिवसातली दुसरी घटना आहे. जर अश्या नराधमांना कायद्याची जरब नसेल तर असे प्रकार वारंवार होतील. सिल्लोड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून , मागासवर्गीय/दलितांवर अन्याय व अत्याचार वाढल्याचे दिसून येत आहे. 
सदर प्रकरणात पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर दोषी व्यक्तींना शोधुन अटक करण्यात यावी अन्यथा  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल  पोलिस प्रशासनाच्या १० दिवस उलटून गेले तरी पोलीसानी कोणताही तपास  केल्याचे  दिसून येत नसुन प्रशासनाच्या  विरूध्द आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  दिला आहे.असे प्रजेचा विकासचे प्रतिनिधीशी बोलताना कडुबा जगताप यांनी सांगीतले.
*तपास आधिकारी,ए पी आय किरण बिडवे(सिल्लोड पोलिस ठाणे)- पी एम रिपोर्ट आलेले आहे त्यात दोघींचा मृत्यू पाण्यात बुडुन झाला आहे,काही टेस्ट आहेत त्या मंबई वरुन सीए आॅफिस जे तिकडे पाठवल्या आहेत ते आल्यावर पुढील गोष्टी समजतील व त्या अनुषंगाने तपासाची गती वाढेल, डोंगरगाव मधील विहिरीत पडुन मृत्यु झालेली महिला आणि लहान मुलगी ही घटना निंदनीय आहे,मी स्वतः तपास अधिकारी असून साक्षीदार गावातील लोक संशीयीत याकडे तपासाच्या दृष्टीने विचारपुस चालु आहे सर्व अँगलने पोलीस तपास करतील बलात्कार असेल मर्डर असेल अनेक बाबी असतील ह्या तपासले जातील व कायदेशीर कारवाई कायद्याच्या मार्गाने दोषींवर आरोपीवर केली जाईल त्यामुळे जनतेने पोलिसांना सहकार्य करावे व पोलिसांवर विश्वास ठेवा पोलिस नक्कीच ह्या गोष्टीचा छडा लावून दोषीवर कारवाई करतील.*

Thursday, 27 February 2020

केंद्र शासनाच्या सी ए ए. विरोधात दिल्ली दन्गल झाली. यामध्ये मुत्यू मुखी पडलेल्याना. पि. चि. मधील विविध संघटनांच्या वतीने कँडल मार्च काढून पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चॊकात श्रद्धांजली वाहण्यात आली

Lok hitay news

.प्र. दिलीप देहाडे( लोक हिताय न्यूज )
 दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी संध्याकाळी सात वाजता महात्मा फुले पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला.


दिल्ली येथे झालेल्या हिंसाचार घटनांच्या निषेध करून जे हिंसाचारामध्ये बळी पडले त्यांना श्रद्धांजली वाहिली.

या कॅन्डल मार्च मध्ये ॲडवोकेट अब्दुल करिम यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली के ज्यांनी-ज्यांनी हिंसाचाराला अगोदर चिथावणीखोर वक्तव्य करून हिंसाचाराला चालना दिली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

शहाबुद्दीन शेख यांनी हिंसाचारामध्ये बळी पडलेल्या लोकांना सरकार मार्फत आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे याची विनंती केली.

अन्वर सय्यद यांनी हिंसाचारामध्ये पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले व पोलीस प्रशासन हिंसाचाराला थांबण्यास असमर्थ होते असे मनोगत व्यक्त केले.

मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवडच्या वेगवेगळ्या भागातून सोशल ऍक्टिव्हिस्ट उपस्थित होते. व्ही एम कबीर, शोएब मुजावर, अहमद शेख, उमरफारूक पठाण, आमिर मुल्ला, नूर मुल्ला, जावेद मुजावर, हुसेन भाई, हमीद शेख व इतर उपस्थित होते आणि महिलांमध्ये एडवोकेट जैनब, एडवोकेट यास्मीन, एडवोकेट जिया शेख, डॉक्टर मशमुम व इतर उपस्थित होत्या.