Sunday 30 July 2023

शहर कॉग्रेस तर्फे मनोहर कुलकर्णी (भिडे) चा तीव्र निषेध*



पिंपरी चिंचवड  शहर कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली


.पिंपरी (लोक हिताय न्युज) २९ जुलै २०२३ काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात जोडेमार आंदोलन .महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बडनेर गावामध्ये मनोहर कुलकर्णी (भिडे) याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुटूंबाबद्दल अवमानकारक व वादग्रस्त वक्तव्य केल आहे. या वक्तव्याचा विरोधात पिंपरी चिंचवड  शहर कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीव्र निषेध करत निदर्शने करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अनुदगार काढणाऱ्या मनोहर कुलकर्णी (भिडे) ला त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली. 
यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, मा. महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, माजी नगरसेवक मारुती भापकर, विश्वास गजरमल, माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, महिला अध्यक्षा सायली नढे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, कौशल्य व कला विकास विभागाचे अध्यक्ष रवि नांगरे, संदीपान झोंबाडे, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, प्रवीण कदम, निर्मला खैरे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, प्रा. किरण खाजेकर, बाबासाहेब बनसोडे, अर्जुन लांडगे, जुबेर खान, बाबा शेख, मेहबूब शेख, दहर मुजावर, पांडुरंग जगताप, तारीक रिजवी,  प्रदीप पवार, किरण नढे, सौरभ शिंदे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, जितेंद्र छाब्रा, सतीश भोसले, वसंत वारे, नितीन खोजेकर, गौतम ओव्हाळ आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday 27 July 2023

मा. खासदार उपनेते *शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुपीनगर तळवडे येथील नागरिकांशी साधला संवाद.

.भोसरी (लोक हिताय न्युज) भोसरी विधानसभा शिवसेनेच्या वतीने आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
 लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्याच धर्तीवर शिरूर लोकसभेत संघटन बांधणीचा जोर वाढला आहे, लोकसभेत बूथ प्रमुख, शिवदूत, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तसेच पक्षाचे संघटन बांधणी यावर मा. आढळराव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  
 तसेच मा. आढळराव पाटील यांनी तळवडे रूपीनगर येथे जाऊन तेथील प्रभागातील समस्स्या विषयी तेथील नागरिकांशी संवाद साधला.

 यावेळी उपनेते / कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर,जिल्हा संघटक  अशोकशेठ भुजबळ उपजिल्हा प्रमुख संभाजी शिरसाठ, प्रकाश वाडेकर,भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख बळीराम जाधव रामदास गाढवे, शहर प्रसिद्धी प्रमुख  सुनील पवार,महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे, महिला समन्वयक गौरीताई शेलार, संघटक किशोर सवाई,विभाग प्रमुख  दिनकर जाधव, राहुल पिंगळे, दादा बांगर,युवा सेना जिल्हा समन्व्यक सागर पाचारणे, प्रदीप बालघरे आशिष गौड  युवासेना संघटक इ पदाधिकारी  व रुपीनगर  येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

कौतुकास्पद; राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीची इर्शाळवाडीतील कुटुंबांना मदत .

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांचा पुढाकार


पिंपरी, (लोक हिताय न्युज ) दि .26 जुलै २०२३ रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात  इर्शाळवाडी  येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत  वित्त आणि जीवितहानी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीने संवेदनशीलता दाखवत इरशाळवाडीतील कुटुंबीयांना मदत केली. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही मदत केली आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी  येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली.  या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. जीवित आणि वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली. 

सामाजिक संवेदनशीलतेचे भान ठेवून आपदेत सापडलेल्या  कुटुंबांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  वाढदिवसाचे कुठेही कार्यक्रम न घेता दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडी वासियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी पुढाकार घेतला. तसेच वरीष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, ज्योती गोफणे,  चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे,  भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, पिंपरी विधानसभा  कार्याध्यक्ष  दिपाली देशमुख, मुख्य संघटिका मीरा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

याबाबत कविता आल्हाट म्हणाल्या यंदा ही नैसर्गिक आपदा आल्यामुळे राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड  शहर महिला कार्यकारिणीने 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये बुधवार (दि .26) मुंबई येथे जमा केला. 

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,  कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर , आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते.

Wednesday 26 July 2023

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांची दुरावस्था*

 सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव 



पिंपरी (लोक हिताय न्युज) दि . २६ जुलै २०२३
पिंपळे सौदागर पोलीस चौकी बाजूकडील महादेव मंदिराकडून पि.के. इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, ह्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे त्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज येथे छोटे मोठे अपघात होत आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये कोणाला आयकॉन रोड पिंपळे सौदागर भागातील कैलास उशीर बाळासाहेब कुंजीर ग्राउंड लगत असलेल्या कन्स्ट्रक्शन साईट च्या बाजूचा रस्ता खचला होता तसेच अनेक ठिकाणी असे प्रकार भविष्यात घडतील. होणाऱ्या प्रकाराला फक्त प्रशासन जबाबदार असेल कारण प्रत्येक साईटचा परवाना हा पालिका जबाबदारी घेऊन देत असते. रस्ते, लाईट,

 पाणी, आरोग्य या सुविधा पुरवणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्यास कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी येत्या काळात जन आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे.

स्मार्ट सिटी आहे कि खड्डे सिटी आहे ते तर स्पष्ट करा.
आयुक्त तथा प्रशासक श्री.शेखरसिंह म्हणतात कि शहरातील खड्डे तातडीने आम्ही बुजविण्यात येणार आहे, मग गेल्या आठवड्यापासून येथे तर कोणी स्थापत्य विभागाचा एकही अभियंता फिरकला नाही असे येथील नागरिक सांगतात.
तातडीने येथील खड्डे बुजवा अन्यथा ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना तरुणांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी आयुक्तांना दिला आहे

Tuesday 25 July 2023

अर्ज माघारी घेनाही तर तुझे तुकडे तुकडे करून फेकून देईल अशी धमकी नितिन धोत्रे यांनी दिली .

.पिंपरी (लोक हिताय न्युज)दि .२२ जुलै २०२३पिंपरी चौकात एका अवैध धंदा करणाऱ्या चालकाकडून जीव मारण्याची धमकी देण्यात आली ' गपचुप अर्ज माघारी घे नाही तर तुझे तुकडे तुकडे करून फेकून देईल.तुझ्या आई बापाला सुद्धा सापडणार नाही. तुझ्या अख्या कुटुंबाला घराबाहेर निघणे मुश्किल करीन .माझी बायको आणि तिची आईला ओळखतोना तू त्या दोघी तुझेवर विनयभंग बलात्कार सारखा गुन्हा दाखल करतील त्यामुळे अर्ज माघारी घे." असे म्हणून नितीन धोत्रे (अण्णा ) हॉटेल मधून बाहेर पडला तसेच गाडीत बसण्या अगोदर त्याचे गाडीतील इस्मांना बघून म्हणाला की “आपल्याला इथे मर्डर करायचा आहे, १२ वर्षे मी धंदा करतोय पण माझी तक्रार करण्याची हिंमत कुणी केली नाही, याने केली हिंमत त्यामुळे ह्याची गेम करायची याने अर्ज माघारी घेतला नाही तर".नितीन धोत्रे व त्याचे टोळी कडून माझ्या व माझ्या कुटुंबाचे जीवितास धोका निर्माण झाल्याने आमचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला, आमचा अपघात झाला व जीवितास काही
झाले तर याला जबाबदार नितीन धोत्रे व त्याची टोळी असेल, त्यांचेवर कार्यालयीन १० दिवसात कारवाई झाली नाही तर .नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई  सागर, बंगल्या समोर आमरण उपोषण करू असा इशारा  ज्ञानेश्वर सुरेश बोराटे यांनी दिला आहो .

Monday 24 July 2023

शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ तळेगाव ते मंत्रालय पायी धडक मोर्चा .

जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे यांचा इशारा

पिंपरी, (लोक हिताय न्युज) दि. 24 - पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील जनरल मोटर्स ही एक नामांकित कंपनी असून, ती बंद करण्यात आली आहे. त्या ठिकाणी दुसरी कंपनी येणार आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीने पूर्वीच्याच कामगारांना कामगार युनियनसोबत असलेल्या वेतनवाढ करारानुसार कामावर घ्यावे. तसे न झाल्यास हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. शासनाच्या कामगार भूमिकेमुळे असे प्रकार घडत आहेत. या प्रकाराच्या निषेधार्थ तळेगाव ते मुंबई मंत्रालय अशी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा पायी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमंवशी, सरचिटणीस रोहित पवार, कार्याध्यक्ष विकास करपे, सॅण्डविक एशिया एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष संतोष कणसे, विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, मनोज पाटील, संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 22 July 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५३ हजार झाडांचे वृक्षारोपण महाअभियान .

.भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार
- शहरात तब्बल ५३ हजार वृक्षारोपणाचा शुभारंभ

पिंपरी( लोक हिताय न्युज) दि २२ जुलै २०२३
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘वृक्षारोपण महाअभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्या माध्यमातून परिसरात तब्बल ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,  प्रगतशील विकासाचे शिल्पकार मा.  देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने ‘‘सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले. पिंपळे निलख विशाल नगर येथे या अभियानाची सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी आमदार उमाताई खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा सदाशिवजी खाडे, मा.महापौर माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके, मा.नगरसेविका आरती चोंधे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, भाजपा निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस भाजपा राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे,  भाजपा नेते सचिन साठे, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, नितीन इंगवले, रणजीत कलाटे संजय दळवी, भुलेश्वर नांदगुडे पाटील, अनिल शेठ संचेती, मोहन शेठ कस्पटे, श्याम दंडे, काळुराम नांदगुडे, नागेश जाधव, बाळासाहेब इंगवले, सागर चौधरी, कछेश्वर साळुंखे, अरविंद शिरोडे, सुहास कस्पटे पिंपळवण ग्रुपचे चंद्रकांत ओवले, संदीप बोडके, विक्रम चाचकर, विनोद बोडके, गणेश गोमणे , स्वाती कुंभार, सोनाली पासलक,  शिवगंगा सरोटे, संदीप शेटे, प्रतापराव भोसले, रोहित अहिरे, बाळू कजबे तसेच भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते आणि पिंपळे निलख येथील विद्या निकेतन विद्यालयातील मुख्याध्यापक आनंद गर्जे सर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, शहर आणि परिसरात पर्यावरणाचे रक्षण, राष्ट्राचे संरक्षण या संकल्पनेतून  तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड करण्याचे महाअभियान राबविण्यात आले आहे. तसेच, आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्र अभियान, मोफत आरोग्य सेवा असे उपक्रम आयोजित केले आहे.




उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस लाडक्या नेत्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .



पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय माजी महापौर व -माजी नगरसेवक सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

पिंपरी चिंचवड शहराचा बुलंद आवाज अजितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

नेहरूनगर  प्रभागाच्या वतीने लाडक्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

नेहरूनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव प्रभाग या प्रभागात चारी नगर सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आणण्याची ताकद अजित दादा पवार यांनी दिली आणि व त्याला यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर हनुमंतराव अण्णा भोसले यांनी यशस्वी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून एक आगळीवेगळी ओळख या शहरात निर्माणकरणारे (श्री हनुमंत भोसले अण्णा ) सुपुत्र श्री राहुल भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादाचा शिलेदार म्हणून ओळख असणारे राहुल भाऊ भोसले यांच्याकडून श्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..

Friday 21 July 2023

आमदार लांडगेंची लक्षवेधी अन्‌ उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती .

.

पिंपरी ( लोक हिताय न्युज) दि २१ जुलै २०२३
पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली उपयोगकर्ता शुल्काची दंड वसुलीला अखेर स्थगिती मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल आणि तोपर्यंत ही वसुली थांबवावी, असा मोठा निर्णय कॅबिनेट मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतला. त्यामुळे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे. 

आमदार महेश लांडगे यांनी उपयोगकर्ता शुल्क रद्द करावे आणि वसुल केलेली दंडाची रक्कम रद्द करावी. या मागणीसाठी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सादर केली आणि प्रखरपणे भूमिका मांडली. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागला.

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने घनकचऱ्याची हाताळणी व व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपयोगकर्ता शुल्क आकारणी करावी, अशी अधिसूचना दि. १ जुलै २०१९ रोजी जाहीर केली होती. मात्र, गेल्या चार वर्षात याबाबत महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. आता दंडासहीत उपयोगकर्ता शुल्क वसुली सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा नवा संघर्ष निर्माण झाला आहे. याबाबत आमदार लांडगे यांनी आक्रमकपणे शहरवासीसांची बाजू सभागृहात मांडली.
महापालिका प्रशासन शहरातील प्रति मालमत्ता ६० रुपये प्रतिमहा अशा प्रमाणे वार्षिक ७२० रुपये अशी दि. १ जुलै २०१९ पासून ‘उपयोगकर्ता शुल्क व दंड’ वसुली सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ३५ कोटी रुपये दंड वसुली झाली आहे. गेल्या चार वर्षांतील सुमारे १५३ कोटी रुपये थकीत वसुलीची आकडेवारी आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे या वसुलीला आता स्थगिती मिळाली आहे. 

उपयोगकर्ता शुल्क आकारणीबाबत दि.१ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र सरकारने अधिसूचना जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवडमध्ये २०२३ मध्ये केली जात आहे, या विलंबाला जबाबदार कोण? लोकांचे प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी सभागृहात येतो. तुम्ही आमचा प्रश्न ऐकून घेतला पाहिजे. आम्हाला लोकांनी अन्य मतदार संघातील प्रश्न ऐकून घेण्यासाठी नव्हे, तर त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे सभागृहाला माझी भूमिका ऐकून घ्यावी लागेल, आक्रमक पवित्रा आमदार लांडगे यांनी घेतला. 
*****

अतिरिक्त शुल्क रद्द करा : आमदार लांडगे
पिंपरी-चिंचवडमधील प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांवर २०१९ पासून २०२३ पर्यंत चार वर्षांचा उपयोगकर्ता शुल्क आकारण्यात आला. नवी मुंबई, ठाणे महापालिकेत हे शुल्क आकारले जात नाही, मग पिंपरी-चिंचवड शहरातच का लागू केला जातो. चार वर्षांचा कर मिळकतकर पावतीमध्ये समाविष्ट केला आणि त्यावर दंड लावला, याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. तसेच, पर्यावरणपूरक सोसायटीधारक मिळकतधारकांना हा कर का लावला आहे? असा प्रश्न उपस्थित केला. ३ लाखांहून अधिक कुटुंबांवर लादलेला हे अतिरिक्त शुल्क  रद्द करावे, अशी ठाम भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली. 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब आपण्यास वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा .

पिंपरी चिंचवड शहराचे विकापर्व
महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि डॅशिंग
उपमुख्यमंत्री श्री अजित दादा
पवार  साहेब आपण्यास  वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा .
 :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष अजित गव्हाणे .कार्याध्यक्ष राहुल भोसले .कार्याध्यक्ष फजल शेख .कार्याध्यक्ष मोरेश्वर भोंडवे .कार्याध्यक्ष शाम लांडे . कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी . माजी विरुद्ध पक्ष नेते नाना काटे .महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट .तसेच सर्व
आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी
कार्यकर्ते आणि सर्व सेलचे अध्यक्ष..

महानगरपालिकांच्या शाळांमध्ये उत्तमोत्तम शिक्षण देण्यात येत असून त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होतील .आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांनी व्यक्त केले.

.पिंपरी, (लोक हिताय न्युज)दि . २० जुलै २०२३ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या शाळांमध्ये उत्तमोत्तम शिक्षण देण्यात येत असून त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन तसेच लागणाऱ्या सोयी सुविधा देण्याचे नियोजन महापालिकेने केले असल्याचे मत आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या केशवनगर येथील माध्यमिक विद्यालय आणि भागशाळा रावेत यांच्या वतीने इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या साहिल कांबळे याने रेखाटलेल्या निसर्ग चित्रांचे भव्य प्रदर्शन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे २० ते २२ जुलै यादरम्यान भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  
या प्रदर्शनाला माजी नगरसदस्य सुरेश भोईर, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे तसेच केशवनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास चपटे, रामेश्वर पवार, विविध विषयांचे शिक्षक, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. 
यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, या प्रदर्शनाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे महानगरपालिकेच्या विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साहिलसारख्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यामुळे वाव मिळत आहे तसेच हा एक इतिहास घडवणारा उपक्रम पालिकेच्या मार्फत राबविण्यात येत आहे याचा महापालिकेला सार्थ अभिमान वाटत आहे.  
महापालिकेच्या शाळेतील रावेत येथील विद्यार्थीनी साक्षी गायकवाड हिला जिल्हा चित्र पुरस्कार मिळालेला असून आयुक्त शेखर सिंह यांनी साहिलसोबत तिचेही कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी दोघांना शुभेच्छा दिल्या. साक्षी गायकवाड तसेच विविध विद्यार्थ्यांनी देखील रेखाटलेली चित्र प्रदर्शनात मांडलेली आहेत.
निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनासोबत विद्यार्थ्यांनी वर्तमान पत्रापासून बनवलेली विठ्ठल मुर्तीही येथे ठेवण्यात आली आहे जी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या उपक्रमांची संकल्पना कलाशिक्षिका अस्मिता गुरव यांची होती यासाठी त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास चपटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.  
महापालिकेच्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचे छंद जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे, पर्यावरणपूरक वस्तू बनविणे, वर्तमानपत्रांपासून सुंदर शिल्प तयार करणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. 


Thursday 20 July 2023

जवळपास 900 बंधपत्रित नर्सेस या कायम स्वरुपी शासकीय सेवेत रुजू होणार . आरोग्यमंत्री तानाजी सावंत

2016
पासून प्रलंबित होता. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने .

मुंबई (लोक हिताय न्युज) दि.20 जुलै. रोजी कास्ट्राईब महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. अरुण गाडे व राज्य महासचिव एस टी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मंत्री प्रा तान्हाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यामध्ये 2016 ते 2019 पर्यंतच्या सर्व बंडपत्रित नर्सेसना शासकीय सेवेत कायम करण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी दिले आहेत. जवळपास 900 बंधपत्रित नर्सेस या कायम स्वरुपी शासकीय सेवेत रुजू होणार आहेत.
राज्यभरातील जवळपास 900 बंधपात्रित नर्सेस चा प्रश्न 2016
पासून प्रलंबित होता. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने
कायम स्वरूपी सातत्याने लढा दिला व 2016 ते 2019 पर्यंत च्या सर्व नर्सेस यांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाला भाग पाडले. कास्ट्राईब महासंघाच्या आंदोलनाला अखेर यश आले.
सदरील बंधपत्रित नर्सेस ना विशेष परीक्षा देवून शासन सेवेत कायम करण्यासाचे आदेश मंत्री तान्हाजी सावंत यांनी दिले.
19 जुलै रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मिलिंद मैस्कर ,
आयुक्त आरोग्य विभाग धीरज कुमार, आरोग्य विभाग संचालक डॉ. स्वप्नील लांडे व आरोग्य विभाग चे सर्व अधिकारी तसेच बंधपत्रित नर्सेस उपस्थित होते.
यावेळी डॉ. सावंत यांनी घेतलेल्या निर्णया बद्दल कास्ट्राईब चे राज्य अध्यक्ष प्रा अरुण गाडे व राज्य महासचिव एस टी गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री तान्हाजी सावंत यांचे अभिनंदन करून आभार वेक्त केले.

Wednesday 19 July 2023

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे*

राहूल भोसले, शाम लांडे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख कार्याध्यक्ष*

पिंपरी, दि. 19 ( लोक हिताय न्युज) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी (दि. 19) निवडीचे पत्र दिले. यावेळी राहूल भोसले, शाम लांडे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडी सुरू केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. शहरातील राष्ट्रवादीच्या बहुतांशी सर्वच आजी-माजी नगरसेवकांनी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली अजित पवार यांना पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केल्या आहेत. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, राहूल भोसले, शाम लांडे, प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते.
अजित गव्हाणे यांच्याकडेच शहराध्यक्षपदाची धुरा सोपविल्याने राष्ट्रवादीला नव्याने उभारी घेण्यास तसेच अजित पवार गटाची ताकद शहरात वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.

कोट :- पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासाची अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू.

Saturday 15 July 2023

९ ऑगस्ट ला जंतर मंतर दिल्ली येथे राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे होणार आंदोलन*

भारत हा सर्वधर्म समभावाचं प्रतीक*
बिशप थॉमस डाबरे.

पुणे (लोक हिताय न्युज) दि .१६ जुलै २०२३ जगासमोर भारत देशाला अतिशय महत्त्वाचा देश समजला जातो कारण या देशात विविध जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात म्हणून भारत देशाला सर्वधर्म समभावाचे प्रतीक समजले जाते .असे मत बिशप थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले .पुण्यात आज राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेच्या वतीने समान नागरी कायदा व अल्पसंख्यांक वरील हल्ले यावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळी डाबरे बोलत होते . भारतीय समाजव्यवस्था समान नागरी कायद्यासाठी तयार नाही तसेच *निवडणुका आल्याने समान नागरी कायदा आणला जात आहे* असे मत माजी आय पी एस अधिकारी अब्दुर रहेमान यांनी व्यक्त केले .पुढे ते म्हणाले की ,समान नागरी कायदा संविधानाचे महत्त्व कमी करण्यासाठी आणला जाऊ नये याची काळजी घ्यावी लागेल .घटनेने धर्म स्वातंत्र्य दिले आहे प्रत्येक व्यक्तीला पूर्ण अधिकार दिले आहेत .देशासमोर अनेक प्रश्न असताना ते सोडवणे महत्त्वाचे आहे परंतु राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आणले जात असल्याचे मत अब्दुर रहेमान यांनी व्यक्त केले .अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील दलित समाज कायम बरोबर राहील असा विश्वास दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक भारती यांनी व्यक्त केला . जनमत हे समान नागरी कायद्या विरोधात आहे तसेच अल्पसंख्यांकांवरील देशभरातील हल्ले हा चिंतेचा विषय असल्याचे नमुद करुन राहुल डंबाळे यांनी यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेने केलल्या कार्य सांगितले तसेच ९ ऑगष्ट रोजी जंतर मंतर दिल्ली येथे अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले .तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये गोलमेज परिषद घेणार असल्याचे जाहीर केले .
समान नागरी कायदा व अल्पसंख्यकांवरील आत्याचारासंदर्भात पुणे येथे चर्चा सत्र पुणे 
प्रस्ताविक समान नागरी कायदा तसेच देशभर होत असलेल्या - अल्पयंख्यांक समाजावर होत असलेल्या आत्याचारासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने आज पुणे येथे राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते .नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचे अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र झाले यावेळी बिषप थॉमस डाबरे, माजी आयपीएस अधिकारी अब्दुर्र रेहमान, दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते, अशोक भारती, बलिग नौमानी, तेलंगना येथील सामाजिक कार्यकर्ता खालिदा परविन, दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य ए.सी. मायकल ,कारी इद्रीस, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, रशिद शेख, बिशप प्रदीप चांदेकर ,बिशप सॅम्युअल , जलील शेख , प्रशांत म्हस्के, सुवर्णा डंबाळे, जाहीद शेख , मु्फ्ती शाहीद , स्नेहा माने , अर्चना केदारी , स्वाती गायकवाड , छाया कांबळे ,अब्दुल माजिद , किरण सोनावणे , किरण गायकवाड , नागेश भोसले यांचेसह देशभरातील मान्यवर उपस्थित होते .सदर चर्चासत्राचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राहुल डंबाळे,लूकस केदारी व जुबेर मेमन यांनी केले होते .कार्यक्रमास अल्प संख्यांक समूदायासाठी काम करणारे प्रमुख विचारवंत ,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन मुंबई आझाद मैदानावर .

.मुंबई ( लोक हिताय न्युज)दि. १५ जुलै. २०२३
एप्रिल 2015 ते शैक्षनिक वर्ष 2019 पर्यंतच्या सर्व बंधपत्रित नर्सेस च्यासेवा नियमित करण्यात याव्यात या मागणी साठी सोमवार दि. 10 जुलै 2023 पासून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बंधपत्रित नर्सेस सहभागी झाल्या आहेत.
जो पर्यंत आम्हाला सेवेत कायम करण्यात येत नाही तोपर्यंत हा संघर्षाचा लढा अविरतपणे कास्ट्राईब महासंघाच्या वतीने सुरू ठेवला जाईल असे अंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महा सचिव एस. टी. गायकवाड व राज्य अध्यक्ष प्रा अरुण गाडे यांच्या कणखर
नेतृत्वात हे बेमुदत आंदोलन सुरू आहे.2019 च्या कोरोना काळात देखील बंधपत्रित नर्सेस नी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. त्यांना देखील आरोग्य विभागाकडून
या ना त्या कारणाने सेवेत कायम करण्यापासून डावलले जात आहे. त्याच बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून आमचा हा लढा सुरू आहे. , शिंदे, फडणवीस, पवार सरकार देखील आमच्या या मागणी कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार नेते एस. टी. गायकवाड यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागात सध्या काय काय सावळा गोंधळ चालला आहे हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे असे त्यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

Friday 14 July 2023

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटप जाहीर करण्यात आले .

.मुंबई, (लोक हिताय न्युज)दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग 

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे* गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे* वित्त व नियोजन हे खाते राहील. 

*इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:*

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), 
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.


वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते .

.पिंपरी, (लोक हिताय न्युज) १४ जुलै २०२३*:-  शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून वाहनप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुमारे ७९ इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी २२ इलेक्ट्रिक वाहने कार्यरत आहेत. आज टाटा नेक्सॉन वर्गातील ७ इलेक्ट्रिक वाहने महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागात दाखल झाली आहेत. या वाहनांच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीत करण्यात आले होते. 
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, कैलास दिवेकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने ५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्व करारावर वाहने घेणेत आली असून गरज पडल्यास वाहनांची संख्या वाढविण्याचे अथवा कमी करण्याचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये २५ टाटा नेक्सॉन आणि ५४ टाटा टिगोर इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. 
महानगरपालिकेच्या धोरणानुसार अधिकारी व पदाधिकारी यांना एकुण ९५ वाहने मंजूर असून सद्यस्थितीतील पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या कमी करून जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहन वापरावर भर दिला जाणार आहे. टाटा नेक्सॉन या वर्गातील वाहने एका चार्जिंगनंतर ३१२ किलोमीटर अंतर पार पाडतात. त्यासाठी ३० युनिट तर टाटा टिगोर ही वाहने एका चार्जिंगमध्ये १७० किलोमीटर अंतर पार पाडत असून त्यासाठी २६ युनिट इतकी वीज खर्ची पडते.
आज दाखल झालेली टाटा नेक्सॉन वाहने ही आधुनिक प्रणालीची असून या सर्व वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकर सिस्टीम बसवण्यात आली आहे. तसेच या प्रकारच्या वाहनांचा देखभाल व दुरूस्तीचा खर्च पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा अत्यंत कमी असल्याने महापालिकेच्या वाहन खर्चात बचत होणार असल्याची माहिती सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी दिली.   

Friday 7 July 2023

तब्बल आठ वर्षे एकाच विभागात राहण्यासाठी .कनिष्ठ अभि., स्थापत्य नाव - पडलवार अमोल यांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे?

.पिंपरी ( प्रतिनीधी लोक हिताय) दि . ०७ जुलै २०२३ मागील काही दिवसांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या ( मनपा) अखेर झाल्या आहेत. 15 विभागातील अधिकारी, कर्मचारी अशा 235 जणांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत.
महापालिकेच्या बदली धोरणानुसार एकाच विभागात 3 किंवा 6 वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या विभागात  महिन्यात बदल्या केल्या जातात.  अनेक अधिकारी, कर्मचारी बदलीसाठी पात्र असताना त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. त्यामुळे पालिकेतील लाचखोरी, भ्रष्टाचाराला बळ मिळत होते. सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत होत्या. शासनाने बदल्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते.
तब्बल आठ वर्षे एकाच विभागात  राहण्यासाठी .कनिष्ठ अभि., स्थापत्य नाव - पडलवार अमोल यांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे
बांधकाम परवानगी व अनधिकृत ०८/०१/२०१५ 
बांधकाम नियंत्रण०२/०८/२०२० ते
पदनाम कनिष्ठ अभि., स्थापत्य नाव - पडलवार अमोल इरना सध्याचा रुजू पासून  एकच विभागात का ठेवण्यात आले आहे
इतर कर्मचारी अधिकाऱ्यांना वेळेनुसार बदली होती  ,माहिती अधिकारानुसार  मिळालेली माहिती सा.कार्यकर्ते विष्णू सरपते यांनीही माहिती माध्यमांसमोर  आणली आहे ' ?




जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी रात्री उशिरा बदल्या केल्या आहेत. त्यात भांडारपाल 5, सहायक भांडारपाल 5, मुख्य लिपिक 28, लिपिक 79, मजूर 30, शिपाई 17, कार्यकारी अभियंता (विद्युत) 1, उपअभियंता (विद्युत) 2, उपअभियंता (स्थापत्य) 12, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 3, कॉप्युटर ऑपरेटर 11, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 2, लघुलेखक 2 आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 30 अशा 235 कर्मचा-यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या विभागात तत्काळ रूजू व्हावे. रूजू अहवाल सामान्य प्रशासन विभागास पाठवावे. जुलै महिन्याचे वेतन नव्या विभागातून काढले जाणार आहे, असे सामान्य प्रशासना विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Monday 3 July 2023

ओबीसी समाजाचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार - आ. उमा खापरे

पिंपरी चिंचवड ओबीसी विकास परिषदेची स्थापना
पिंपरी, ( प्रतिनीधी लोकहिताय न्युज) (दि. ३ जुलै २०२३) भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने भारतातील सर्व उपेक्षित, वंचित, इतर मागास वर्गीय समाज घटकांच्या विकासासाठी धेय्य धोरणे राबविले आहेत.  महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे प्रलंबित प्रश्न आगामी पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार उमा खापरे यांनी केले.
  पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी समाजातील विविध जातींच्या प्रतिनिधींची बैठक (दि. २ जुलै) थरमॅक्स चौक, चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शहरातील तीस पेक्षा जास्त ओबीसी समाजातील जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पिंपरी चिंचवड ओबीसी विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी आ. उमा खापरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
  यावेळी आ. खापरे यांनी सांगितले की, ओबीसी समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासलेला असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी विकास परिषदेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहे. ओबीसी समाजातील सर्व जातींना एकत्र करून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवले जाण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून काम केले जाईल. ओबीसी विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक उन्नतीसाठी नॉन क्रिमीजर दाखल्याची मर्यादा वाढविणे, जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी असणाऱ्या जाचक अटी कमी करणे तसेच ओबीसी समाजातील व्यवसायिकांना लघुउद्योजकांना विशेष पतधोरण तयार करून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामध्ये झालेले अतिक्रमण काढून टाकून ओबीसींना राजकीय न्याय देण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार आहे. ओबीसी मधील प्रत्येक जातीच्या तज्ञ व अभ्यासू व्यक्तींची लवकरच बैठक घेऊन ओबीसी विकास परिषदेचे अधिवेशन बोलवले जाईल. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ओबीसी समाजासाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राष्ट्रीय ओबीसी आयोग यांच्या मदतीने ओबीसी समाजासाठी गरीब कल्याणकारी योजना राबविण्यासाठी चालना देण्यात येईल असे आ. खापरे यांनी सांगितले. 
   यावेळी सुवर्णकार, वंजारी, धनगर, माळी, बारा बलुतेदार, साळी,कोष्टी, कोळी, गुरव, शिकलगार, लोहार, सुतार, वडार,  तेली, लेवा पाटील अशा ओबीसीतील जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी पक्षनेते नामदेव ढाके आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, माऊली थोरात, राजाभाऊ दुर्गे, शारदा सोनवणे तसेच कैलास सानप, गणेश वाळुंजकर, दिपक नागरगोजे, अण्णा गर्जे, सतीश नागरगोजे, राजेश्वरी सोनवणे जायभाय, आशाताई काळे, राहुल खाडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, मनोज ब्राह्मणकर, विजय शिनकर, पोपट हजारे, दादा कवितके,  संजय मंगोडेकर, नरेश कदम, प्रशांत आगन्यान, प्रकाश लोहार, धर्मा पवार, सुरेश शिरोडे, चंदू पाटील, गौरव लोहार, पुष्कर पाटील, हनुमंत घुगे आदी या बैठकीस उपस्थित होते.

Saturday 1 July 2023

आषाढी एकादशी आणि बकरी ईद या सणाच्या निमित्ताने आधिकारी श्री अजित पवार यांच्या विठ्ठल रुक्मिणी मुर्ती देऊन सन्मान करून हिंदु-मुस्लीम बांधवांना एकतेचा संदेश दिला .

बिड (प्रतिनीधी  लोक हिताय न्युज )दि ०१ जुलै २०२३
 आषाढी एकादशी आणि बकरी ईद या दोन्ही दोन समाज्याचे महत्वाचे समजले जानारे सण यांचे महत्व लक्षात घेत आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी  श्री .अजित पवार यांचा पि.चि.महानगर पालिकेतील पुर्वाश्रमिचा जनते प्रति घेतलेल्या निर्णयाचा केंद्रीय मंञी रामदास आठवले याच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांचा हिंदु-मुस्लीम एैक्याचे पाइक म्हनुन शाल, श्रिफळ, पुणेरी पगडी ,आणि विठ्ठल रुक्मिणी ची मुर्ती देऊन यथोचित सन्मान करन्यात आला ,सन्मानाला ऊत्तर देत अजित पवार मह्नाले अजिज शेख हे मुस्लिम समाजाचे असुन ही मला पांडुरंगाचे प्रतिरुप विठ्ठल रखुमानी यांची  मुर्ती देऊन हिंदुत्वाची निशानी भगवी शाल व पगडी देऊन माझा सन्मान सत्कार केला आणी तो ऐका मुस्लीम कार्यकर्त्या कडुन सन्मान होणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे या सन्मानामुळे बीड जिल्ह्यातील हिंदु मुस्लिम समाजामध्ये ऐक्याचा संदेश जाईल याची मला खाञी आहे असे भावनात्मक ऊदगार अजिज शेख यांच्या कार्याबद्ल केले 
या प्रसंगी रि पा ई वाहतुक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिज शेख .महाराष्ट्र २४तास न्युज चँनल चे मुख्यसंपादक संजय धुतडमल, प्रतिकार न्युज चे मुख्यसंपादक माणिक पौळ ,खेड तालुकाध्यक्ष अभिमान डिसले, सय्यद मुमताज मँडम(मुख्याध्यापिका), संध्याताई भोसले, (अंगनवाडी बीड जिल्हाध्यक्षा ) खान फिरदौस सर, रियाज सिध्दिकी , फाईम इनामदार पञकार,मिसाळ शिवाजी, मिसाळ सुधाकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते

पीसीएमसी सी अँड टी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा अगदी आनंदात पार पडला .

पिंपरी ( प्रतिनीधी) दि ०१ जुलै २०२३  चिंचवड महानगरपालिका अंकित ए जी एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. आज आपल्या पीसीएमसी सी अँड टी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा अगदी आनंदात पार पडला कंपनीचे असिस्टंट मॅनेजर प्रतीक तावरे ,देविका शेळके मॅडम, अनिता मोरे, धनाजी शिंदे, आशिष साळुंखे ,अंकुश त्रिभुवन, गणेश शिंदे ,अविनाश थिटे, दीपक पाटोळे, अभिषेक गोवंडे, नानासाहेब गायकवाड व इतर अधिकारी पदाधिकारी व ग्रुपचे सर्व सफाई कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व कामगारांना यावेळी अल्पोपहार देण्यात आला  प्रतीक तावरे सरांनी चांगले मार्गदर्शन  केले धनाजी शिंदे यांनी  सर्वांचेआभार मानले अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले अभिषेक गोंवंडे यांनी मार्गदर्शक सूचना करून या कार्यक्रमाची सांगता केली

मोशी क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प तात्काळ रद्द करा .माजी विरोधी पक्षनेते नाना काटे .

नेहरु नगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमच् काय 

पिंपरी प्रतिनीधी . दि . ०१ जुलै २०२३पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभार नेहरु नगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियम नव्यानेउभी करण्याच्या नावाने विल्हेवाट लावली आणि ,शहराच्या प्रमुख ठिकाणावर असणाऱ्या स्टेडियमला सोडून मोशी येथे स्टेडियम साठी मंजुरी देणे म्हणजेच भोंगळ कारभार '
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
मोशी क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प तात्काळ रद्द करा, अन्यथा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा (संग्रहित छायाचित्र)
पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा घाट कशासाठी घातला आहे. सल्लागाराच्या नावाखाली ७ कोटी ९६ लाख रुपयांची उधळण आयुक्त कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ४०० कोटींचा खर्च गृहीत धरून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. याला जवळपास १.९९ (निविदा पूर्व १.९८ टक्के तर निविदा पश्‍चात ०.१ टक्के) ओम टेक्‍नॉलिक्‍स कंपनीला देण्याचे ठरविले आहे. मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र.१/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे. या कामासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे, गहुंजे व बारामती अशी तीन क्रिकेट स्टेडियम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरालगत गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना नव्याने क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट कोणाच्या सांगण्यावरून घातला जात आहे. यामागे राज्यातील सत्तेत असणारे खोके सरकार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी हे अंतर्गत आर्थिक तडजोडी करून प्रशासनाला हाताशी धरून शहरातील जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा संशय नाना काटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नव्याने विकसित करणारे क्रिकेट स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी की पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नसले तरी त्यांच्या सल्लागारासाठी कोट्यावधीची उधळपट्टी आणि क्रिकेट स्टेडियमचा घातलेला घाट तात्काळ रद्द करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभारणार, असा निर्वाणीचा इशारा नाना काटे यांनी दिला आहे.