Wednesday 30 September 2020

पिंपरी. मनपा आयुक्त यांना निवेदन पत्रद्वारे इशारा देण्यात आला आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कुत्रे सोडण्यात येईल,,, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष, धुराजी शिंदे

Lok hitay new(. प्र दिलीप देहाडे ) दि.0१/,पिंपरी चिंचवड पालिकेत चौथ्यामजल्या जाऊन वरुन खाली सोडणार अनेक भटके कुत्री. रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे.यांनी प्रशिध्दी पत्रकात दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुञ्यांचा सुळसुळाट सुटला असल्याने गेली दोन वर्षापासुन रिपब्लिकन सेनेचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष करतायत भटक्या कुञ्यां विषया संदर्भात पालिकेत पाठपुरावा करत आहे.परंतु भटक्या कुञ्याची विलेवाट लावण्यात पालिका कर्मचारी अपयशी ठरले आहेत.जानेवारी2019 ते जुन 2019 पर्यंत मनपा आयुक्त, पशुवैद्यकीय अधिकारी यांना शिंदे यांनी पत्रव्यवहार केला आहे.पण त्याचा काहीही परिणाम प्रशासनावर होताना दिसत नाही.विशेष म्हणजे काल (दि.29) कुत्रा चावल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे शिंदे आणखी संतापले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील श्वान प्रेमींच्या दबावामुळे गेली दोन वर्ष झाले भटकी कुत्री पकडणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात कुत्रीच कुत्री झाली आहेत. याला जबाबदार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना हे सर्वस्वी जबाबदार आहेत असा अरोप देखील शहरध्यक्ष शिंदे यांनी केला आहे. त्यामुळेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या पालिकेतील ऑफिस मध्येच थेट रिपब्लिकन सेनेच्या वतीने भटकी कुत्री सोडण्यात येणार आहेत असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे.भाजपची महापालिकेत सत्ता येवून साडेतीन वर्षे झाली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून पशुवैद्यकीय विभागाने भटकी कुत्री पकडणे बंद केले आहे. सारथीवर भटक्या कुत्र्यांची तक्रार केल्यास चार दिवसांनी तक्रारीचे निवारण न करता तक्रार क्लोज केली जाते. शहरात नागरिकांचे फिरणे मुश्कील झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा जास्त त्रास होत आहे. दुचाकीच्या मागे कुत्री लागल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळेला कामावरून घरी जाणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याची जाणीव आयुक्त श्रावण हर्डीकर यांना व्हावी यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयुक्तांच्या पालिकेतील ऑफिस मध्ये भटकी कुत्री सोडण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी असे पञ देखील शिंदे यांनी आयुक्तानां दिले आहे. यावर शहरात चांगलीच चर्चा रंगली असुन पालिका प्रशासन या विषयाचा गांभिर्याने विचार करणार का की हा विषय वार्‍यावर सोडणार का याकडे सर्वपक्षीय आणि शहरातील नागरिकांचे लक्ष आहे.

Tuesday 29 September 2020

भारिप-बहुजन महासंघाच्या पिंपरी-चिंचवडच्या मा. शहराध्यक्षा, भीमाताई तुळवे, यांचा रिपब्लिकन सेनेचा जाहीर प्रवेश, सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला.

 पिंपरी, दि. २९  सप्टेंबर   Lok hitay news.. प्र. दिलीप देहाडे........ जाहीर प्रवेश, जाहीर प्रवेश, कुशल नेटवर्क असणाऱ्या महिला दाही दिशेने सक्षम असणाऱ्या यांचा जाहीर प्रवेश रिपब्लिकन सेना मध्ये भारिप बहुजन महासंघा च्या माजी  महिला अध्यक्षा सौ. भिमाताई तुळवे रिपब्लिकन सेना मध्ये यांचा जाहीर प्रवेश करण्यात आल, राष्ट्रीय अध्यक्ष मा सरसेनानी...आनंदराज आंबेडकर साहेब  व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब.पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ साहेब.  रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष  धुराजी शिंदे यांच्या हस्ते सौ. भिमाताई तुळवे भारिप बहुजन महासंघाच्या माजी अध्यक्षा यांचा रिपब्लिकन सेना मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला या वेळी उपस्थिती हौवसराव शिंदे प्रवक्ते पिंपरी चिंचवड शहर त्रिंबक मस्के उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर प्रभारी वर्षा ताई शेलार रेखा जावेर सलमा सय्यद अदी उपस्थित मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी  येथे  प्रवेश घेण्यात आला पिंपरी चिंचवड शहरात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध रहावे व पक्षाची बांधनी करावी हि विनंती धुराजी शिंदे

.


Monday 28 September 2020

आंबेडकर चळवळीतील पिंपरी-चिंचवडशहरातील संघर्षशील व्यक्तिमत्व, सुरेश निकाळजे यांच्यावरील अन्यायकारक तडीपारी रद्द करावी, रिपाई नेते, मा. बाळासाहेब भागवत.

पिंपरी. दि. २८. सप्टेंबर.(Lok hitay news. प्र. दिलीप देहाडे )........... सत्याग्रह आंदोलन.....
रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते मा. सुरेश निकाळजे यांच्यावरील अन्याय कारक तडीपारी रद्द व्हावी व त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब भागवत यांच्या नेतृत्वाखाली आज अप्पर तहसील कार्यालय निगडी येथे निदर्शनांचा आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनातून आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील तडीपारी विशेषता राजकीय आंदोलनाचे गुन्हे यांचा आधार घेऊन करणे अत्यंत चुकीची आहे जे गुन्हे मागे घेण्याचे शासनाचे धोरण आहे त्याच्याशीही अधिकाऱ्यांनी केलेली प्रातरणा आहे असे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.या आंदोलनात रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबासाहेब कांबळे,भीमा कोरेगाव फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनिताताई सावळे, खाजा भाई शेख, अमोल डंबाळे, यशवंत सूर्यवंशी, आदी मान्यवर सहभागी झाले होते...........


Sunday 27 September 2020

रिपब्लिकन सेनेच्या दळवीनगर प्रभाग अध्यक्ष, सौ, गोगलबाई सोनकांबळे यांची निवड.. पिंपरी-चिं.शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी केली

पिंपरी.दि. २७. सप्टेंबर,  (Lok hitay news.. प्र. दिलीप देहाडे. )रिपब्लिकन सेना दळवी नगर प्रभाग अध्यक्ष पदि निवड करण्यात आली गोगलबाई सोनकांबळे दळवी नगर चिंचवड राष्ट्रीय अध्यक्ष मा सरसेनानी. आनंदराज आंबेडकर साहेब  व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब.पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ साहेब  रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष  धुराजी शिंदे यांच्या हस्ते*गोगलबाई सोनकांबळे प्रभाग अध्यक्ष दळवी नगर पदी यांची निवड करण्यात आली  चिंचवड या वेळी उपस्थित उपध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर त्रिंबक मस्के, वर्षाताई शेलार, बलभीम मस्के बायडाबाई कांबळे, आक्कुबाई गाडे निलंम घाडे, सुमीत्रा जसवाल उपस्थित होते पिंपरी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी  येथे  प्रवेश घेण्यात आला . 
पिंपरी चिंचवड शहरात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध रहावे व पक्षाची बांधनी करावी.... 

Friday 25 September 2020

मा. सुरेश निकाळजे यांची तडीपारी न्यायालयीन चौकशी करावी, विविध आंबेडकरी पक्ष संघटनेची मागणी.....



पिंपरी : 25.सप्टेंबर.. (Lok hitay news. )रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेश निकाळजे यांच्यावर करण्यात आलेली तडीपारीची कारवाई अन्यायकारक असून याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने आज घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.
आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचे शासनाचे धोरण असताना तसे आदेशही वेळोवेळी निर्गमित केलेल्या असताना त्यातून यांचा आधार घेऊन सुरेश निकाळजे यांच्यावर करण्यात आलेली तडीपारी हा शासनाच्या निर्देशानुसार भंग असून कायद्यापेक्षा पोलीस मोठे हे वाचवण्याचा प्रयत्न असल्याची टीका या बैठकीत करण्यात आली. दरम्यान सुरेश निकाळजे यांच्यावरील तडीपारीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. व इतर मागण्यांसाठी सोमवार दिनांक रोजी अप्पर तहसील कार्यालय निगडी येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास निदर्शनांचे आंदोलन करण्यात येणार आहे.
आज झालेल्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब भागवत, युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे, ......................  आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.


Sunday 20 September 2020

पिंपरी-चिंचवड, रिपब्लिकन सेना वाहतूक आघाडी शहराध्यक्षपद गिरीश साबळे नियुक्ती करण्यात आली,. शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या हस्ते

 पिंपरी दिनांक 20 सप्टेंबर,, (Lok hitay news )***पिंपरी चिंचवड शहर रिपब्लिकन सेना वाहतूक आघाडीच्या शहर अध्यक्ष पदि निवड राष्ट्रीय अध्यक्ष मा सरसेनानी *आनंदराज आंबेडकर साहेब  व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब*पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ साहेब * रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष  धुराजी शिंदे यांच्या हस्ते गिरीश दिलिप साबळे रिपब्लिकन सेना वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदि निवड करण्यात आली त्यांच्या सह  मोठय़ा संख्येने चालक व मालक  यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला या वेळी उपस्थित हौवसराव शिंदे प्रवक्ते पिंपरी चिंचवड शहर हिरभाऊ लांडगे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर राहुल विटकर सचिव पिंपरी चिंचवड शहर दिलीप कांबळे अधी *उपस्थित होते पिंपरी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी येथे प्रवेश घेण्यात आला .. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागामध्ये अत्यंत लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व गिरीश साबळे यांच्या विभागाला शहर कार्यकारणी मधील लाभलेला एक व्यक्तिमत्व यांच्या रूपाने वाहतूक आघाडी सह रिपब्लिकन सेनेची ताकद वाढवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक सेनेचे  त्यांच्या माध्यमातून काम करण्यास इच्छुक आहे हे सर्व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या लक्षात येतात यांनी वरिष्ठांचा सल्ला घेऊन, वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर करण्याचा संकल्प आयोजित केला वाहतूक आघाडी निर्माण करण्यात आली,,, 
पिंपरी चिंचवड शहरात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध रहावे व पक्षाची बांधनी करावी असे *धुराजी शिंदे* यांनी मत व्यक्त केले. 

Tuesday 15 September 2020

विराज जगताप, संतोष अंगरक त्यांच्या मारेकऱ्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करावी, जगताप परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावी., आरपीआयचे अध्यक्ष सुरेश निकाळजे

,दि. १५. सप्टेंबर,,( Lok hitay news ) प्र.. दिलीप देहाडे,, ) मा. कृष्ण प्रकाश साहेब पोलीस, आयुक्त,,   विराज जगताप. संतोष अंगरख  यांच्या मारेकऱ्यांना वर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी,, शहराध्यक्ष सुरेश निकाळजे,,  पिंपरी, चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्राला हादरून ठेवणारी घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये दिनांक 7 मे 2020 रोजी घडली होती त्यामध्ये मागासवर्गीय तरुण युवकाचे हत्या घडून आणली होती या त्यातील सर्व आरोपी यांच्यावरती मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि या त्यातील दोन आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे विराज जगताप च्या परिवाराला या आरोपीकडून जीवाला धोका असण्याची दाट शक्यता आहे विराज जगताप चा संपूर्ण परिवाराला कायमस्वरूपी चा पोलीस संरक्षण देण्यात यावी अशी विनंती व,,  16 ऑगस्ट 2020 वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संतोष अंगरख  या तरुणाचे अपहरण करून जातिवाद आतून निर्घुण खून करून त्याचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करणारे आरोपी यांच्यावरती  मोक्का अंतर्गत कारवाई करावी ही मागणी पोलीस आयुक्तालय कृष्णप्रकाश सर यांच्याकडे लेखी निवेदन पत्र द्वारे,  आर पी आय पक्षाच्या वतीने करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, आरपीआयचे पश्‍चिम महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब भागवत, यांच्यासह युवक आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन पत्र देण्यात आले..... 

Friday 11 September 2020

"देशासमोरच सर्वात मोठं संकट कोरोना आहे. परंतु लक्ष दुसरीकडेच दिले जात आहे."...संतोष पवार

"देशासमोरच सर्वात मोठं संकट   कोरोना आहे. परंतु लक्ष दुसरीकडेच दिले जात आहे."
मावळ.. दि ११..(.Lok hitay news ..)
.विचार वन्त. पत्रकार:-संतोष पवार..? 
सध्याच्या काळात तरी भारतासमोरील सर्वात मोठं संकट हे कोरोना आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. काही तरुणांच्या तर नोकऱ्या देखिल गेलेल्या आहेत. कोरोना रुग्णाच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे सामान्य माणूस खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
परंतु सध्याची परिस्थिती पाहता म्हणाव तसं या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. मीडिया देखील या गोष्टीवर जास्त प्रमाणात बोलताना दिसत नाही. सध्या कंगना, सुशांत, रिया, या विषयांकडे जास्त प्रमाणात मीडियाचे लक्ष आहे. अर्थ व्यवस्थेविषयी मीडिया जास्त बोलत नाही. कोरोना झाल्यानंतर  उपचार व्यवस्थित मिळत नसल्यामुळे लोक मरत आहेत. कोरोना रुग्णांना बेड कमी पडत आहेत. व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. या समस्यांकडे लक्ष देणे खूप गरजेचे असून देखील. हवं तेवढं लक्ष या समस्यांकडे दिले जात नाही. मीडियाला फक्त आणि फक्त रिया आणि कंगना यांच पडलेल आहे. या सर्व समस्यांकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष द्यायला हव.......... लोक हिताय न्यूज 

Wednesday 9 September 2020

आकुर्डी येथे खन्डोबा मंदिर प्रवेशकरण्यासाठी . आर पी आय (आ.गट ) पक्षाच्यावतीने आंदोलन आरपीआयचे पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सुरेश भाई निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली

पिंपरी. Lok hitay news -दिनांक ०९/०९/२०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आकुर्डी खंडोबा माळ चौक येथील खंडोबा मंदिरात प्रवेश  आंदोलन घेणत  आले  
        कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आता मात्र अनलॉक सुरू झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून मंदिर मस्जिद चर्च बुद्धविहार गुरुद्वारा देरासार अशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत  यासाठी  दि. 9 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने  देशभर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी सकाळी ११:०० वाजता  आकुर्डी खंडोबा माळ चौक येथील खंडोबा  मंदिर प्रवेश आंदोलन घेण्यात आले. सदर आंदोलनास पिंपरी चिंचवड रिपाई अध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. प्रमुख उपस्थिती रिपाई महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, अल्पसंख्याक पिंपरी चिंचवड अध्यक्ष शेखलाल नदाफ, युवा नेते कुणाल वाव्हळकर, दुर्गप्पा देवकर, हरी नाय्यर, विनोद लाडी, शुभम शिंदे, दिनकर म्हस्के, सुजित कांबळे, विशाल कदम, शंकर इंगळे, बापू गायकवाड, छोटू शिंदे अक्षय दुनघाव, मयूर जाधव मनोज जगताप. इत्यादी उपस्थित होते 

  

Saturday 5 September 2020

 पिंपरी चिंचवड - कोरोना मुक्त पोलीस कर्मचारी यांनी प्लाझ्मा दान करावे... सुरेश निकाळजे..



पिंपरी चिंचवड .. दि. 6.Lok hitay news.... प्र. दिलीप देहाडे 
- कोरोना मुक्त पोलीस कर्मचारी यांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत.   वरील विषयास अनुसरून मी आपणास नम्र निवेदन करतो की पिंपरी चिंचवड शहरात कोरोना आजार हा धुमाकूळ घालत आहे पिंपरी चिंचवड ची कोरोना रूग्ण संख्या 54000 झाली आहे व कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ही 43000 असून. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लॉकडाऊन च्या काळात पिंपरी चिंचवड शहर वासियांसाठी खूप चांगले काम केले आहे पिंपरी चिंचवड शहरवासिय सुरक्षित राहावे म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी खूप मेहनत घेतली आहे. नागरिकांची सुरक्षा करता करता पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो पोलिसांना कोरोनाची लागण झाली त्यात दुर्दैवी एक पोलीस कर्मचारी चा मृत्यू ही झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील असंख्य शेकडो पोलीस कर्मचारी हे कोरोना मुक्त ही झाले. व काही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. प्लाझ्मा थेरपी ही अस्थव्यस्थ  कोरोनारुग्णांसाठी संजीवनी बुटी ठरत आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची संख्या खूपच कमी आहे. आज च्या परिस्थितीत प्लाझ्मा दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून आताच रुजू झाला आहात. तरी आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना मुक्त पोलीस कर्मचाऱ्यांचे प्लाझ्मा दान शिबीर घेऊन शेकडो गंभीर कोरोना रुग्णांचे प्राण वाचवू शकता. तरी आपण लवकरात लवकर पोलीस कर्मचाऱ्यांचे प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करावे ही नम्र विनती...... 

कोरोना विरोधात आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावर उतरले आहे,, आपल्या आरोग्य तपासून घ्या ही मोहीम चालू केली आहे,,,,

पिंपरी. दि. 5 . आम आदमी पार्टी , पिंपरीचिंचवड. 
Lok hitay news........ प्र. दिलीप देहाडे.. 
कोरोना विरुद्ध लढाईत आज आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली आहे. आप तर्फे पिंपरीचिंचवड शहरात  ऑक्सयमित्र मोहीम सुरू करण्यात आली. आप च्या कार्यकर्त्यांनी पिंपरी अंबेडकर पुतळा चौक, चिंचवड स्टेशन , आकुर्डी अश्या भागात oxymeter घेऊन नागरिकांचे oxygen तपासणी केली. या वेळी अनेक रिक्षाचालक, पोलीस आणि सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या मोहिमे अंतर्गत पूर्ण शहरात प्रत्येक भागात आप चे कार्यकर्ते ऑक्सिमित्र बनून लोकांचे oxygen तपासणी साठी उपलब्द असतील. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला oximeter दिला जाईल व शहरातील कोरोना बाबतीत महत्वाचे संपर्क व्यवस्था ची माहिती त्यांच्याकडे असेल. नागरिकांना कोरोना संदर्भात अडचण आल्यास हा ऑक्सिमित्र त्यांना शक्य ती मदत करेल.
 या वेळी आप चे शराध्यक्ष अनुप शर्मा, महिला अध्यक्ष सौ स्मिता पवार, उपाध्यक्ष महेश बिराजदार, Dr अमर डोंगरे, युवा  शहराध्यक्ष प्रसंन्न अर्बुज, सचिव राघवेंद्र राव,  अल्पसंख्याक पुणे अध्यक्ष वहाब शेख , स्वप्नील जेवेळे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Friday 4 September 2020

बुद्ध समाजाच्या युवकांची अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना, फाशी द्या अशी मागणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कृष्णा प्रकाश साहेब यांच्याकडे केली आहे, आरपीआयचे अध्यक्ष सुरेश निकाळजे

मा. कृष्णप्रकाश साहेब 
  पोलीस आयुक्त 
पिंपरी दि. 3.(लोक हिताय न्यूज ) :-अनुसूचित जाती तील मागासवर्गीय तरुण संतोष शेषेराव अंगरख यांच्या खून प्रकरणातील आरोपीन वर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपींना फाशी ची शिक्षा देण्यात यावी याबाबत. 
महोदय 
        वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास नम्र निवेदन करतो की पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी पोलीस कॉलनी तील तरुण संतोष शेषेराव अंगरख वय ४२ यांचा निर्घृण खून दिनांक १६/०८/२०२० रोजी अपहरण करून खून करण्यांत आला खून केल्या नंतर मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जमिनीत पुरण्यात आला, सदर घटनेतील तरुण हा अनुसूचित जाती बौद्ध समाजातील अत्यंत मेहनती व सुशिक्षित होता आरोपी हे सवर्ण समाजातील असल्याने अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा हा वाकड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाला असून अंगारख कुटुंबिय व  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब यांच्या कडे मागणी करण्यात येत आहे की सदर खून हा अतिशय थंड डोक्या ने केला असून खून करण्याच्या एक दिवस अगोदर कासारसाई या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला होता मृत संतोष अंगरख यास अतिशय निर्घृण खून करण्यात आला आहे व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खून करून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला  आहे तरी आम्ही रिपब्लिकन पक्ष व अंगरख कुटुंबियांच्या वतीने आपणास नम्र निवेदन करतो की सदर खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, सदर खून खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, व आरोपींना फाशी ची शिक्षा व्हाव्ही ही नम्र विनंती... (lok hitay news )
रामनाथ पोकळे साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले 
   कळावे 
1)सुरेश निकाळजे (अध्यक्ष पिं. चिं. शहर जिल्हा )
2)बाळासाहेब भागवत (रिपाई महाराष्ट्र सचिव )
3)खाजाभाई शेख (रिपाई अल्पसंख्याक  प्रदेशउपाध्यक्ष )
4)विनोद चांदमारे (रिपाई एम्प्लॉइस फेडरेशन अध्यक्ष पुणे जिल्हा )
5) कमलताई कांबळे (रिपाई महिला आघाडी पिं. चिं. अध्यक्ष )
6)शेखलाल नदाफ (अल्पसंख्याक अध्यक्ष पिं. चिं. शहर )
7) सुनिता शेषेराव अंगरख (मयत  संतोष अंगरख यांची आई )
8)कुणाल वाव्हळकर (रिपाई युवा नेते पिं. चिं. )
9)यशवंत सूर्यवंशी (रिपाई अध्यक्ष चिंचवड विधानसभा )
10)हरी नायर (प्रभाग १९ रिपाई अध्यक्ष )
11) मनोज जगताप(प्रभाग २१ रिपाई अध्यक्ष )