पिंपरी : 25.सप्टेंबर.. (Lok hitay news. )रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेश निकाळजे यांच्यावर करण्यात आलेली तडीपारीची कारवाई अन्यायकारक असून याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने आज घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.
आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचे शासनाचे धोरण असताना तसे आदेशही वेळोवेळी निर्गमित केलेल्या असताना त्यातून यांचा आधार घेऊन सुरेश निकाळजे यांच्यावर करण्यात आलेली तडीपारी हा शासनाच्या निर्देशानुसार भंग असून कायद्यापेक्षा पोलीस मोठे हे वाचवण्याचा प्रयत्न असल्याची टीका या बैठकीत करण्यात आली. दरम्यान सुरेश निकाळजे यांच्यावरील तडीपारीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. व इतर मागण्यांसाठी सोमवार दिनांक रोजी अप्पर तहसील कार्यालय निगडी येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास निदर्शनांचे आंदोलन करण्यात येणार आहे.
आज झालेल्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब भागवत, युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे, ...................... आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment