Friday 11 September 2020

"देशासमोरच सर्वात मोठं संकट कोरोना आहे. परंतु लक्ष दुसरीकडेच दिले जात आहे."...संतोष पवार

"देशासमोरच सर्वात मोठं संकट   कोरोना आहे. परंतु लक्ष दुसरीकडेच दिले जात आहे."
मावळ.. दि ११..(.Lok hitay news ..)
.विचार वन्त. पत्रकार:-संतोष पवार..? 
सध्याच्या काळात तरी भारतासमोरील सर्वात मोठं संकट हे कोरोना आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. काही तरुणांच्या तर नोकऱ्या देखिल गेलेल्या आहेत. कोरोना रुग्णाच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे सामान्य माणूस खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
परंतु सध्याची परिस्थिती पाहता म्हणाव तसं या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. मीडिया देखील या गोष्टीवर जास्त प्रमाणात बोलताना दिसत नाही. सध्या कंगना, सुशांत, रिया, या विषयांकडे जास्त प्रमाणात मीडियाचे लक्ष आहे. अर्थ व्यवस्थेविषयी मीडिया जास्त बोलत नाही. कोरोना झाल्यानंतर  उपचार व्यवस्थित मिळत नसल्यामुळे लोक मरत आहेत. कोरोना रुग्णांना बेड कमी पडत आहेत. व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. या समस्यांकडे लक्ष देणे खूप गरजेचे असून देखील. हवं तेवढं लक्ष या समस्यांकडे दिले जात नाही. मीडियाला फक्त आणि फक्त रिया आणि कंगना यांच पडलेल आहे. या सर्व समस्यांकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष द्यायला हव.......... लोक हिताय न्यूज 

No comments:

Post a Comment