पिंपरी. Lok hitay news -दिनांक ०९/०९/२०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आकुर्डी खंडोबा माळ चौक येथील खंडोबा मंदिरात प्रवेश आंदोलन घेणत आले
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आता मात्र अनलॉक सुरू झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून मंदिर मस्जिद चर्च बुद्धविहार गुरुद्वारा देरासार अशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत यासाठी दि. 9 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने देशभर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी सकाळी ११:०० वाजता आकुर्डी खंडोबा माळ चौक येथील खंडोबा मंदिर प्रवेश आंदोलन घेण्यात आले. सदर आंदोलनास पिंपरी चिंचवड रिपाई अध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. प्रमुख उपस्थिती रिपाई महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, अल्पसंख्याक पिंपरी चिंचवड अध्यक्ष शेखलाल नदाफ, युवा नेते कुणाल वाव्हळकर, दुर्गप्पा देवकर, हरी नाय्यर, विनोद लाडी, शुभम शिंदे, दिनकर म्हस्के, सुजित कांबळे, विशाल कदम, शंकर इंगळे, बापू गायकवाड, छोटू शिंदे अक्षय दुनघाव, मयूर जाधव मनोज जगताप. इत्यादी उपस्थित होते
No comments:
Post a Comment