Saturday, 5 September 2020

 पिंपरी चिंचवड - कोरोना मुक्त पोलीस कर्मचारी यांनी प्लाझ्मा दान करावे... सुरेश निकाळजे..



पिंपरी चिंचवड .. दि. 6.Lok hitay news.... प्र. दिलीप देहाडे 
- कोरोना मुक्त पोलीस कर्मचारी यांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत.   वरील विषयास अनुसरून मी आपणास नम्र निवेदन करतो की पिंपरी चिंचवड शहरात कोरोना आजार हा धुमाकूळ घालत आहे पिंपरी चिंचवड ची कोरोना रूग्ण संख्या 54000 झाली आहे व कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ही 43000 असून. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लॉकडाऊन च्या काळात पिंपरी चिंचवड शहर वासियांसाठी खूप चांगले काम केले आहे पिंपरी चिंचवड शहरवासिय सुरक्षित राहावे म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी खूप मेहनत घेतली आहे. नागरिकांची सुरक्षा करता करता पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो पोलिसांना कोरोनाची लागण झाली त्यात दुर्दैवी एक पोलीस कर्मचारी चा मृत्यू ही झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील असंख्य शेकडो पोलीस कर्मचारी हे कोरोना मुक्त ही झाले. व काही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. प्लाझ्मा थेरपी ही अस्थव्यस्थ  कोरोनारुग्णांसाठी संजीवनी बुटी ठरत आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची संख्या खूपच कमी आहे. आज च्या परिस्थितीत प्लाझ्मा दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून आताच रुजू झाला आहात. तरी आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना मुक्त पोलीस कर्मचाऱ्यांचे प्लाझ्मा दान शिबीर घेऊन शेकडो गंभीर कोरोना रुग्णांचे प्राण वाचवू शकता. तरी आपण लवकरात लवकर पोलीस कर्मचाऱ्यांचे प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करावे ही नम्र विनती...... 

No comments:

Post a Comment