Friday, 4 September 2020

बुद्ध समाजाच्या युवकांची अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना, फाशी द्या अशी मागणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कृष्णा प्रकाश साहेब यांच्याकडे केली आहे, आरपीआयचे अध्यक्ष सुरेश निकाळजे

मा. कृष्णप्रकाश साहेब 
  पोलीस आयुक्त 
पिंपरी दि. 3.(लोक हिताय न्यूज ) :-अनुसूचित जाती तील मागासवर्गीय तरुण संतोष शेषेराव अंगरख यांच्या खून प्रकरणातील आरोपीन वर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपींना फाशी ची शिक्षा देण्यात यावी याबाबत. 
महोदय 
        वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास नम्र निवेदन करतो की पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी पोलीस कॉलनी तील तरुण संतोष शेषेराव अंगरख वय ४२ यांचा निर्घृण खून दिनांक १६/०८/२०२० रोजी अपहरण करून खून करण्यांत आला खून केल्या नंतर मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जमिनीत पुरण्यात आला, सदर घटनेतील तरुण हा अनुसूचित जाती बौद्ध समाजातील अत्यंत मेहनती व सुशिक्षित होता आरोपी हे सवर्ण समाजातील असल्याने अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा हा वाकड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाला असून अंगारख कुटुंबिय व  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब यांच्या कडे मागणी करण्यात येत आहे की सदर खून हा अतिशय थंड डोक्या ने केला असून खून करण्याच्या एक दिवस अगोदर कासारसाई या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला होता मृत संतोष अंगरख यास अतिशय निर्घृण खून करण्यात आला आहे व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खून करून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला  आहे तरी आम्ही रिपब्लिकन पक्ष व अंगरख कुटुंबियांच्या वतीने आपणास नम्र निवेदन करतो की सदर खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, सदर खून खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, व आरोपींना फाशी ची शिक्षा व्हाव्ही ही नम्र विनंती... (lok hitay news )
रामनाथ पोकळे साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले 
   कळावे 
1)सुरेश निकाळजे (अध्यक्ष पिं. चिं. शहर जिल्हा )
2)बाळासाहेब भागवत (रिपाई महाराष्ट्र सचिव )
3)खाजाभाई शेख (रिपाई अल्पसंख्याक  प्रदेशउपाध्यक्ष )
4)विनोद चांदमारे (रिपाई एम्प्लॉइस फेडरेशन अध्यक्ष पुणे जिल्हा )
5) कमलताई कांबळे (रिपाई महिला आघाडी पिं. चिं. अध्यक्ष )
6)शेखलाल नदाफ (अल्पसंख्याक अध्यक्ष पिं. चिं. शहर )
7) सुनिता शेषेराव अंगरख (मयत  संतोष अंगरख यांची आई )
8)कुणाल वाव्हळकर (रिपाई युवा नेते पिं. चिं. )
9)यशवंत सूर्यवंशी (रिपाई अध्यक्ष चिंचवड विधानसभा )
10)हरी नायर (प्रभाग १९ रिपाई अध्यक्ष )
11) मनोज जगताप(प्रभाग २१ रिपाई अध्यक्ष )

No comments:

Post a Comment