Saturday 29 February 2020

प्रदूषण नियंत्रण पर्यावरण आरोग्यरक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज,,, डॉक्टर कार्ल पेरीन

.Lok hitay news

प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण, आरोग्य रक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज.....डॉ. कार्ल पेरिन
केपीआयटी स्पार्कल स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.
(लोक हिताय न्युज. प्र. आकाश शिंदे )
पिंपरी, पुणे (दि. 29 फेब्रुवारी 2020) संपुर्ण जगाला प्रदुषणाचा आणि पर्यावरण बदलाचा सामना करावा लागत आहे. मानवाच्या रक्षणासाठी अपारंपरिक ऊर्जा, प्रदुषण नियंत्रण, आरोग्य आणि पर्यावरण रक्षण व संवर्धनावर अधिक संशोधन करुन योग्य दिशेने नियोजन करण्याची गरज आहे, असे मत इन्स्टिट्युट फॉर फ्युचर ट्रान्सपोर्ट, सिटी कन्व्हेटरी विद्यापीठाचे संचालक डॉ. कार्ल पेरिन यांनी व्यक्त केले.
       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल स्पर्धेचे’ उद्‌घाटन डॉ. पेरिन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले. यावेळी केपीआयटीचे राहुल उपल, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, ब्रिटन मधील कोन्व्हेंटरी विद्यापीठाच्या इलेक्ट्रो केमिकल ऊर्जा विभागाचे प्रमुख प्रा. रोहित भगत, ऑडी एजीच्या स्टॅटर्जी सस्टेनिबिलीटीचे उपाध्यक्ष डॉ. पिटर ट्रोपेच्यू, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल पाटील, समन्वयक प्रा. केतन देसले आदी उपस्थित होते.
      डॉ. पेरिन म्हणाले, ब्रिटनस्थित कोन्व्हेंटरी विद्यापीठाला 175 वर्षांची परंपरा असून विद्यापीठात जागतिक हवामान बदलामुळे होणारे परिणाम, त्यावरील उपाय, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरणपूरक वाहतूक, आरोग्य, रस्ते, जलमार्ग, लोहमार्ग, हवाई वाहतूक आदी विषयांवर सखोल संशोधन करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणारी वाहने, मोनोरेल यासारख्या आधुनिक आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे.
         प्रा. रोहित भगत म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत्रांचा वापर अधिक प्रमाणात करण्याचे महत्व सर्वांनाच समजले आहे. म्हणून जगभरात बॅटरीवर, विजेवर चालणा-या वाहनांचा वापर गेल्या काही वर्षात वाढला आहे. बॅटरीवर चालणा-या वाहनांमध्ये लिथिनियमचा वापर करण्यात येत आहे. लिथिनियममुळे बॅटरीची काम करण्याची क्षमता, तिचे आयुष्य वाढते. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते, असे प्रा. भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
      डॉ. पिटर ट्रॉमचूह यांनी, ॲटोनॉमस, कनेक्टेड, इलेक्ट्रिक, शेअर या प्रमुख चार मुद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ई - वेस्टची समस्या, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वाहनांमध्ये वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते. तसेच कृत्रिम बुध्दिमतेचा वापर यापुढील काळात मोठ्या प्रमाणात विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या परिस्थितीचे, सामान्यांना भेडसावणा-या समस्या, प्रश्न यांचा विचार करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्या कशा सोडवता येतील व जीवन अधिक सुखकर कसे होईल याचा विचार करुन संशोधन करावे, अशीहि अपेक्षा डॉ. ट्रॉमचूह यांनी व्यक्त केली.
       स्वागत करताना प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांनी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मध्ये विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणा-या विविध सुविधा, प्राध्यापक, विभाग प्रमुखांचे प्रयत्न, सहभाग या विषयी माहिती दिली.
       केपीआयटी स्पार्कल मध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रकल्प मांडले. त्यामधून 100 प्रकल्पांची निवड महाअंतिम फेरीसाठी करण्यात आली. त्यातून 30 प्रकल्प अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. यामधून प्रथम, व्दितीय, तृतिय व उत्तेजनार्थ दोन अशी पोरितोषिके देण्यात येणार आहेत. एकूण 21 लाखांची विविध बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती प्रा. केतन देसले यांनी दिली.
प्रास्ताविक केपीआयटीचे राहुल उपल यांनी केले. सुत्रसंचालन विनिला बेडेकर यांनी तर आभार प्रा. राहुल पाटील यांनी मानले.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक प्रा. केतन देसले यांनी दिली.
-----------

आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत अश्विनी इंटरनॅशनल स्कूल आणि एस बी पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक

.Lok hitay news




एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञानदिना निमित्त आंतरशालेय विज्ञान स्पर्धा
आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत अश्विनी इंटरनॅशनल स्कूल आणि एसबी पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक
..(लोक हिताय न्युज )पिंपरी (दि. 29 फेब्रवारी 2020) इस्त्रो या अवकाश संशोधन केंद्रात गुगल पेक्षाही जास्त वेगाने काम करु शकणारे जीपीआरएस तंत्रज्ञान लवकरच विकसित होईल. अवकाश संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांनी लक्षवेधी गगनभरारी मारली आहे. आतापर्यंत भारतासह अनेक देशांनी अवकाशात सोडलेले निष्क्रिय उपग्रह परत पृथ्वीवर आणण्यासाठी जागतिक स्थरावर मोठे प्रयत्न सुरु आहेत. आजचे भारतीय विद्यार्थी आगामी काही वर्षांत यावर संशोधन करुन नक्कीच यश मिळवतील, असा आशावाद इस्त्रोतील ज्येष्ठ माजी वैज्ञानिक डॉ. ए. के. सिन्हा यांनी व्यक्त केला.
         राष्ट्रीय विज्ञानदिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘अविष्कार’ ही आंतरशालेय विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. दिलीप देशमुख, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, पर्यवेक्षिका पद्मावती बंडा, शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
       या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी अवकाश, कृषी आणि अंतराळ या तीन विषयांत आपल्या प्रतिकृती आणि त्यांच्या संकल्पना सादर केल्या. कृषी विभागांमध्ये आधुनिक शेती, मातीच्या वापराशिवाय शहरांमध्ये कमीत कमी पाण्यावरच्या पालेभाज्या आणि फळे, भाज्यांचे उत्पादन, स्मार्ट ॲप व्दारे मातीतील ओलाव्याचे प्रमाण परीक्षण करून शेतीला यंत्राव्दारे पाणीपुरवठा, गणितातील अपूर्णांक, गुणाकार, भागाकार हसत-खेळत शिकत गणिताच्या विविध युक्त्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
       स्पर्धेचे विजेते पाचवी ते सहावी प्रथम क्रमांक अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, व्दितीय क्रमांक विभागून एसबी पाटील पब्लिक स्कूल आणि सिटी प्राइड स्कूल, पाचवी ते सहावी प्रथम क्रमांक - एसबी पाटील पब्लिक स्कूल, व्दितीय क्रमांक - सेंट जोसेफ स्कूल, सातवी ते नववी - प्रथम क्रमांक - एसबी पाटील पब्लिक स्कूल, व्दितीय क्रमांक अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, नावीन्यपूर्व प्रयोग - आझम कॅम्पस आणि विशेष पर्यावरण पूरक पुरस्कार - सीएमएस स्कूल या संघांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संयोजनात वर्षा देशमुख, दर्शना कामत यांनी सहभाग घेतला होता.
स्वागत पद्मावती बंडा, सूत्रसंचालन स्वलेहा मुजावर आणि आभार निवेदिता विश्वास यांनी केले.
-------------------------




--
----
with thanx & regards
Tulshidas Shinde
Cell : 9552530271 / 9822491684
18, Saikrupa Bhavan, Kharalwadi, Pimpri, Pune - 18
E-mail : sanketmedias@gmail.com

Friday 28 February 2020

LOK HITAY NEWS


डोंगरगाव,सिल्लोड मधील मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या हत्येच्या घटनेला १२ दिवस उलटुनही,अरोपी मोकाटच*

सिल्लोड,दि.28 फेब्रुवारी2020)Lok hitay news              ( लोक हिताय न्युज. प्रतिनिधी):-
डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक  मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या  अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येची घटना घडली ही अत्यंत निंदनीय घटना आहे,त्यामुळे दि.24 फेब्रुवारी ला पुण्याहुन रमाई महिला मंच(महा.राज्य) च्या अध्यक्षा भीमाताई तुळवे,समाजसेविका रंजनामाई कांबळे,रमाई महिला मंचच्या कार्यध्यक्षा मनीषाताई साळवे,आंबेडकर चळवळीतील महाराष्र्टाच्या सुप्रसिद्ध गायिका साधनाताई मेश्राम,बबीता चक्रनारायण,प्रजेचा विकास चे संपादक व लाॅर्ड बुद्धा टि.व्ही चॅनलचे प्रतिनिधी विकास कडलक,वंचीतचे नेते व आदिवासी भटका बहुजन संघटनेचे महाराष्र्ट राज्य अध्यक्ष माऊली तथा ज्ञानदेव सोनवणे,येडेश्वरी टुर्स ट्रव्हलचे विकास वनकळस पाटील,परमेश्वर जगताप,विश्वनाथ सरोदे,राजु प्रधान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डोंगर गाव येथे भेट दिली,पिडीत कुंटुबाशी भेटुन चर्चा करुन तेथील पोलीस प्रशासनाला भेटुन जाब विचारत चर्चा करुन निषेर्धात लवकरात लवकर दोषीना पकडुन कडक शासन करावे,अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन अर्ज सर्व संघटने वतीने  दिले.रंजनामाई कांबळे यांनी पिडित कुटुबांतील मुलास 5000रु चा चेक मदत म्हणुन दिला व आपणही सर्वानी मदत करावी व समाजातील या लहान मुलास शिक्षणासाठी आणि होतकरु होईपर्यंत सर्वानी साथ द्यावी असे अहवान कांबळे यांनी केले,माऊली सोनवणे यांनी खासदार आमदार सभापती व इतर स्थानीक नेत्यानी भेट न दिल्याची खंत व्यक्त केली व आमदार सत्तार यांना मंबई ला लोणावळ्यातुन जावे लागते लोणावळ्यात गाडी आडवुन धडा शिकवला जाईल,असे खुले अहवान सत्तार यांना दिले,तर भीमाताई तुळवे यांनी खंत व्यक्त करत पिडित कुटुबांना सात्वन पर मत व्यक्त केले.व सर्वानी दुखःद अंतकरणानी दोघी मायलेकींना श्रद्धांजली अर्पण केली,व लवकरच त्यांना न्याय मिळावा हि अपेक्षा व्यक्त केली.या भेटीत वंचीतचे सिल्लोड तालुका अध्यक्ष  कडुबा जगताप यांनी माहीती दिली,डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक  मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या  अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येची घटना घडली दि.17 फेब्रुवारी  2020 रोजी  शहरातील घाटी वैद्यकीय  रुग्णालयात डोंगरगाव  ता. सिल्लोड  जि. औरंगाबाद  येथील मृतदेह  शवविच्छेदनासाठी  नेण्यात  आला.सदर दुदैर्वी घटना कळाली  असता तिथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ,  खालेद  पटेल जिल्हा उपाध्य वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कडुबा जगताप आदि कार्यकर्ते  सोबत  जावून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून परिस्थिती जाणून घेतली.एक 32 वर्षाची महिला नाव वंदना रेऊबा बनकर/ साळवे व तीची लहान मुलगी भारती विलास साळवे (वय 7)  यांच्या वर बलात्कार व खुन करुन त्यांच्या गुप्तांगात  काड्या खुपसलेल्या अवस्थेत व डोळे , जीभ बाहेर निघालेले आहेत. त्यांची बाॅडी फाशी देवून खुन करुन  तिन दिवसापूर्वी  विहिरित टाकले  व ती फुगून बाहेर आल्या नंतर हि गोष्ट उघडकीस आली आहे.  सदर प्रकरणात मयतांच्या नातेवाईकांनी  3 दिवसापूर्वी मिसिंग  तक्रार केल्यावर पण पोलिस प्रशासनाने  निष्काळजी पणा केल्याचे दिसून आले आहे.  अजुन आरोपींचा शोध लागला नाही, वंचित बहुजन आघाडीने मागणी केल्यानुसार   सकाळी  ईन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.सिल्लोड तालुक्यात ही 8ते 15 दिवसातली दुसरी घटना आहे. जर अश्या नराधमांना कायद्याची जरब नसेल तर असे प्रकार वारंवार होतील. सिल्लोड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून , मागासवर्गीय/दलितांवर अन्याय व अत्याचार वाढल्याचे दिसून येत आहे. 
सदर प्रकरणात पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर दोषी व्यक्तींना शोधुन अटक करण्यात यावी अन्यथा  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल  पोलिस प्रशासनाच्या १० दिवस उलटून गेले तरी पोलीसानी कोणताही तपास  केल्याचे  दिसून येत नसुन प्रशासनाच्या  विरूध्द आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  दिला आहे.असे प्रजेचा विकासचे प्रतिनिधीशी बोलताना कडुबा जगताप यांनी सांगीतले.
*तपास आधिकारी,ए पी आय किरण बिडवे(सिल्लोड पोलिस ठाणे)- पी एम रिपोर्ट आलेले आहे त्यात दोघींचा मृत्यू पाण्यात बुडुन झाला आहे,काही टेस्ट आहेत त्या मंबई वरुन सीए आॅफिस जे तिकडे पाठवल्या आहेत ते आल्यावर पुढील गोष्टी समजतील व त्या अनुषंगाने तपासाची गती वाढेल, डोंगरगाव मधील विहिरीत पडुन मृत्यु झालेली महिला आणि लहान मुलगी ही घटना निंदनीय आहे,मी स्वतः तपास अधिकारी असून साक्षीदार गावातील लोक संशीयीत याकडे तपासाच्या दृष्टीने विचारपुस चालु आहे सर्व अँगलने पोलीस तपास करतील बलात्कार असेल मर्डर असेल अनेक बाबी असतील ह्या तपासले जातील व कायदेशीर कारवाई कायद्याच्या मार्गाने दोषींवर आरोपीवर केली जाईल त्यामुळे जनतेने पोलिसांना सहकार्य करावे व पोलिसांवर विश्वास ठेवा पोलिस नक्कीच ह्या गोष्टीचा छडा लावून दोषीवर कारवाई करतील.*

Thursday 27 February 2020

केंद्र शासनाच्या सी ए ए. विरोधात दिल्ली दन्गल झाली. यामध्ये मुत्यू मुखी पडलेल्याना. पि. चि. मधील विविध संघटनांच्या वतीने कँडल मार्च काढून पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चॊकात श्रद्धांजली वाहण्यात आली

Lok hitay news

.प्र. दिलीप देहाडे( लोक हिताय न्यूज )
 दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी संध्याकाळी सात वाजता महात्मा फुले पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला.


दिल्ली येथे झालेल्या हिंसाचार घटनांच्या निषेध करून जे हिंसाचारामध्ये बळी पडले त्यांना श्रद्धांजली वाहिली.

या कॅन्डल मार्च मध्ये ॲडवोकेट अब्दुल करिम यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली के ज्यांनी-ज्यांनी हिंसाचाराला अगोदर चिथावणीखोर वक्तव्य करून हिंसाचाराला चालना दिली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

शहाबुद्दीन शेख यांनी हिंसाचारामध्ये बळी पडलेल्या लोकांना सरकार मार्फत आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे याची विनंती केली.

अन्वर सय्यद यांनी हिंसाचारामध्ये पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले व पोलीस प्रशासन हिंसाचाराला थांबण्यास असमर्थ होते असे मनोगत व्यक्त केले.

मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवडच्या वेगवेगळ्या भागातून सोशल ऍक्टिव्हिस्ट उपस्थित होते. व्ही एम कबीर, शोएब मुजावर, अहमद शेख, उमरफारूक पठाण, आमिर मुल्ला, नूर मुल्ला, जावेद मुजावर, हुसेन भाई, हमीद शेख व इतर उपस्थित होते आणि महिलांमध्ये एडवोकेट जैनब, एडवोकेट यास्मीन, एडवोकेट जिया शेख, डॉक्टर मशमुम व इतर उपस्थित होत्या.

बामसेफचे संस्थापक डी. के. खापर्डे साहेब यांच्या स्मुती दिनानिमित्त 29 फेब्र कार्यक्रमा चे सांगवी येथे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख उपस्थित. मा वामन मेश्राम यांची लाभणार आहे

Lok hitay news
प्र. दिलीप देहाडे. लोक हिताय न्युज )
(दिनांक 28 फेब्रुवारी 2020)

महापुरुष जीवन संदेश अभियानांतर्गत बामसेफचे संस्थापक मान्यवर डी.के.खापर्डे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेत जुनी सांगवी येथे शनिवारी २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यस्तरीय विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहासकार प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्तेेे होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड येथील भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी हर्षद रुपवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बोपोडी येथे राहायला असलेले डी.के. खापर्डे यांच्या राहत्या घरी त्यांचे सहकारी मान्यवर कांशीराम यांचे देखील अनेकदा वास्तव्य होते. याच ठिकाणी बामसेफ या देशव्यापी सामाजिक संघटनेचा पाया रोवला गेला त्याच परिसरात ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.
व्यवस्था परिवर्तन हा उद्देश घेऊन बामसेफ देशभरात जनजागृतीचे कार्य करीत आहे. बामसेफचे संस्थापक डी.के. खापर्डे सामाजिक परिवर्तनाबद्दल असे म्हणतात की, कोणत्याही मुद्द्याचे प्रथम आकलन होणे आवश्यक आहे, जर आकलन बरोबर असेल तर विश्लेषण बरोबर करता येईल, विश्लेषण बरोबर असेल तर ऐकणाऱ्यांचे आकलन बरोबर होईल. जर त्यांचे आकलन योग्य असेल तर विश्लेषणामुळे योग्य अर्थ प्राप्त होईल. जर विश्लेषण समजले असेल तर प्रबोधन योग्य दिशेने जाईल. आणि प्रबोधनामुळे चित्र स्पष्ट होईल. जर चित्र स्पष्ट असेल तर डोक्यात प्रकाश पडेल, जेव्हा डोक्यात प्रकाश पडतो तेव्हा जागृती होते, जर तुम्ही जागृत झालात तर तुमच्या मनात परिवर्तन होईल. मग कोण म्हणू शकेल की परिवर्तन शक्य नाही? मन परिवर्तन झाल्यास समाज परिवर्तन होणे शक्य आहे आणि समाज परिवर्तन झाल्यावरच व्यवस्था परिवर्तन होऊ शकते, म्हणून आम्हाला जागृतीची ज्योत पेटवीत पुढे जाणे आवश्यक आहे. त्यांच्या याच विचारातून गेल्या चाळीस वर्षांपासून "बामसेफ" ही सामाजिक संघटना मूलनिवासी बहुजन समाजाला आपल्या उद्देशासाठी आणि ध्येयासाठी अर्थात "संपूर्ण व्यवस्था परिवर्तनासाठी" तयार करण्याच्या कामात सतत कार्यरत आहे. बर्‍याच अडचणी, चढउतार आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही संघटनेचे निष्ठावंत, प्रामाणिक आणि समर्पित कार्यकर्ते आणि संघटनेचे नेतृत्व नेहमीच उद्देश पूर्तीच्या दिशेने पुढे गेले आहे. बामसेफच्या प्रारंभीच्या टप्प्यात मान्यवर कांशीरामजी नंतर डी.के. खापर्डे साहेब आणि सध्या वामन मेश्राम साहेबांनी त्यांच्या अथक परिश्रमाने व त्यागाने आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने आपल्या उद्देशाप्रति कोणत्याही प्रकारचा समझोता न करता, संपूर्ण आवेशाने चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले आहे, या सर्व कालावधीत आज तिसर्‍या पिढीने बामसेफमध्ये प्रवेश केला आहे. आजच्या परिस्थितीत बामसेफ प्रणित फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीने विशालकाय रुप धारण केले आहे. आणि ही चळवळ आता एका निर्णायक काठावर आली आहे. असे दूरदृष्टीचेे नेतृत्व दिवंगत खापर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत १)NRC, CAA हा कायदा केवळ मुसलमानांच्या विरोधात नसून तो अनु.जाती, अनु.जमाती, भटके विमुक्त व ओबीसी यांच्या विरोधात आहे. २)NPR चा कायदा हाच खरा NRC कायदा आहे. ३)EVM मध्ये गडबडी करून आलेल्या सरकारमुळेच NRC लागू होत आहे. ४)राष्ट्रव्यापी जनआंदोलनासाठी संघटनांचे जाळे निर्माण केले पाहिजे, तरच युरेशियन ब्राम्हणांची व्यवस्था नष्ट होईल.  ५)बामसेफ संस्थापक मान्यवर डी.के.खापर्डे साहेब यांच्या जीवन संघर्षातून कार्यकर्त्यांनी घ्यावयाची प्रेरणा. अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असून, मा.डी.डी.अंबादे मान्यवर खापर्डे साहेबांचे जुने सहकारी व राष्ट्रीय कोषाध्यक्ष बामसेफ, प्रो. विलास खरात  डायरेक्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली. ॲड.राजकुमार थोरात राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन लॉयर आसोसिएशन हे प्रमुख वक्ते सहभागी होणार आहेत. तर अध्यक्षता वामन मेश्राम हे करणार आहेत.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या पिंपरी चिंचवड युनिटचे पदाधिकारी भीमराव गेडाम, विजय आराख, सूर्यकांत वराडकर, पी.बी.उबाळे, बनकर साहेब, टी.एस.कांबळे, राजेश लिगाडे, हर्षद रुपवते यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Wednesday 26 February 2020

मा देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी.. विशाल वाकडकरयांची मागणी





.लोक हिताय न्युज


Lok hitay news.
फडणवीस यांनी शेतक-यांची माफी मागावी.....विशाल वाकडकर
पिंपरी (दि. 26 फेब्रुवारी 2020) महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांना कर्ज माफी दिल्याची पहिली यादी जाहिर होताच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिध्दीचा स्टंट करीत ‘मेडिया स्पेस’ भरून काढण्यासाठी शेतक-याने रक्ताने लिहिलेले एक पत्र आणि इतर काही पत्रे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली. स्वत:ची नामुष्की झाकण्यासाठी बळीराजाचे रक्त शोषण करणा-या ‘ शोषित भाजपाचा’ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे. असे पत्र पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर आणि राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
     मागील पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाणे पुसली. मागील विधानसभा निवडणूका होण्यापूर्वी कर्जमाफी जाहिर करण्याचा दिखावा केला आणि शेतक-यांच्या मागे ऑनलाईन कागदपत्रे जमा करण्याचा ससेमीरा लावला. राज्यपालांना दिलेले एक पत्र मानवी रक्ताचेच असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिका-याने माध्यमांसमोर दिला. हे जर खरोखरच मानवी रक्त असेल तर ते एका गरजू रुग्णाला देण्याऐवजी अशा प्रसिध्दीसाठी वापरणे हा प्रकार लांछणास्पद आणि शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा आहे. सुरु झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अनेक लोकोपयोगी विधेयके पास होणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार रावसाहेब दानवे यांना आपण सत्तेबाहेर आहोत हे अजून पचनी पडले नाही. त्यामुळे ते रोजच महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशा वल्गना करीत आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीमंडळ हे शेतकरी, कामगार, व्यापारी, गृहिणी, विद्यार्थी, लघुउद्योजक अशा समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारे निर्णय घेत आहेत. त्यामुळेच फडणवीस, पाटील आणि दानवे या त्रिकुटांना सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्यांची स्वप्ने कदापी पुर्ण होणार नाहीत. त्यामुळे फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध करण्याऐवजी अधिवेशनात मांडल्या जाणा-या विधेयकांवर समाज उपयोगी चर्चा घडवून आणावी. असे आवाहन विशाल वाकडकर यांनी केली आहे.
-------------------------

Tuesday 25 February 2020

राज्य व केंद्र सरकारने भटकी मुक्ती जन जाती-जमातीच्याआपल्या मागण्या मान्य करावे यासाठी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये क्रांती मोर्चा काढण्यात आला होता

.
Lok hitay news
(प्र. दिलीप देहाडे )लोक हिताय न्युज
भटक्या समाजाला राष्ट्रीय स्थरावर ‘डिएनटी’ कॅटेगरीत स्थान मिळावे.....संजय कदम
भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाचा पिंपरीत क्रांतीमोर्चा
भटक्या विमुक्तांना इदाते कमिशनच्या शिफारशी लागू करा.....संजय कदम
(लोक हिताय न्युज )
पिंपरी (दि. 25 फेब्रुवारी 2020) भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाला राष्ट्रीय स्थरावर ‘डिएनटी’ (डि नोटिफाईट ट्राईब) या स्वतंत्र्य कॅटेगरीत स्थान मिळावे. केंद्रीय अर्थसंकल्पात या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वतंत्र्य पंचवीस हजार कोटींच्या निधीची तरतूद करावी. तसेच ‘दादा भिकू इदाते कमिशन’च्या अहवालातील शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात अन्यथा आगामी अधिवेशन काळात मुंबईतील आझाद मैदानात हे मुदत धरणे आंदोलन करु असा इशारा भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय मारुती कदम यांनी दिला.
      मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) ‘भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांतीमोर्चा’  या संस्थेच्या वतीने आकुर्डी खंडोबा माळ ते पुणे मुंबई महामार्गाने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंत क्रांतीमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पांरपारिक वेष व वाद्य घेऊन नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मारुती शंकर कदम, रजनीताई पाचंगे, दिलीप भोरे, तुकाराम महाजन, धर्मा महाजन, संतोष थिटे, ॲड. कैलास भोसले, राम इंगळे, गोरख लगस, संतोष कदम, शामराव वाकोडे, विशाल जाधव, शाहिर श्रीकांत रेणके, बलराज भाटे, सोमनाथ इंगळे, मनाली भोसले, ज्ञानेश्वर साळवे, भारत भोसले, महादेव कांबळे शाहिर शिवाजी थिटे, चंदन अटक, संतोष वाघमारे, मिनाक्षी चव्हाण आदी उपस्थित होते.
    या निवेदनात पुढे म्हणाले की, भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजासाठी स्वतंत्र्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्राकडून शंभर एकर जमीन व अर्थसहाय्य मिळावे, केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय नोक-यांमध्ये असणारे एनटीबीचे आरक्षण वाढवून मिळावे व त्या जागा ताबडतोब भराव्यात. ‘दादा भिकू इदाते कमिशन’ नेमले होते. या कमिशनने सादर केलेला अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यातील शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय नोक-यांमध्ये असणारे एनटीबीचे आरक्षण वाढवून मिळावे व देशभर सुरु असणा-या मेट्रो प्रकल्पातील कामगार भरतीमध्ये या समाजाला स्वतंत्र जागा मिळाव्यात व त्या जागा ताबडतोब भराव्यात. जनगणनेत एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, ओबीसी समाजाची स्वतंत्र जातवार जनगणना करावी. एनटी (बी) चे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवावे.
       भटक्या विमुक्त समाजाचा एकही खासदार व विधानसभेवर आमदार नाही व आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी नाही. हा समाज पारंपरिक पध्दतीने आपले जीवन व्यथित करीत असून शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, उद्योग, व्यापार यापासून या वंचित समाजाला न्याय मिळावा. राष्ट्रीय स्थरावर या समाजाला ‘DNT’ (डि नोटिफाईट ट्राईब) या स्वतंत्र्य कॅटेगरीत स्थान मिळावे. या सामाजाच्या 217 जाती आहेत. त्यांना शैक्षणिक, व्यवसायीक मार्गदर्शन मिळावे. महाराष्ट्रात ‘वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जनजाती महामंडळ’ अंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मागील सरकारने या महामंडळाला 300 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. परंतू त्याची अमंलबजावणी झाली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच महामंडळाचे नाव बदलून ‘बहुजन विकास कल्याण विभाग’ असे केले. हा एक प्रकारे भटक्या समाजावर अन्याय आहे. या समाजाला उद्योग, व्यवसायासाठी, नोकरीत आरक्षण, राजकीय आरक्षण, वाढीव शैक्षणिक आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा आगामी अधिवेशन काळात मुंबईतील आझाद मैदानात हे मुदत धरणे आंदोलन करु असा इशारा भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय मारुती कदम यांनी दिला. अशीही माहिती संजय कदम यांनी दिली.
----------------------------------------

Sunday 23 February 2020

हिरकणी महीला संघाचा रॉप्य्महोत्सवी वृद्धपनदिना निमताने आमदार गोगावले म्हणाले पक्ष वेगळा असलेतरी मन एकच आहे

.Lok hitay news
.लोक हिताय न्युज )
पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात.....आमदार भरत गोगावले
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ आणि हिरकणी महिला संघाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाच्या वतीने आमदार गोगावले यांचा सत्कार
पिंपरी (दि. 23 फेब्रुवारी 2020) राजकीय प्रतिनिधींचे पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात. हे कोकणवासीयांकडून सर्वांनी बोध घेण्यासारखे आहे. असे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी केले.
      महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर आणि हिरकणी महिला संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनादिनानिमित्त काळेवाडी पिंपरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाड - पोलादपूर - माणगावचे आमदार भरत गोगावले बोलत होते. यावेळी कोकण विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते आ. गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.
       यावेळी नगरसेविका निता पाडाळे, पौर्णिमा सोनवणे, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर सामाजिक कार्यकर्त्या शितल गोगावले, संस्थेचे अध्यक्ष गणेश मालुसरे, कार्याध्यक्ष रविंद्र भोसले, उपाध्यक्ष अविनाश उत्तेकर, सचिव गणेश मोरे, खनिजदार प्रभाकर निकम तसेच मधुकर सोनगरे, सुभाष पवार, मनोहर भोसले, शिवाजी सोनाटे, कृष्णा सोनगरे, शिवसेनेच्या माजी जिल्हा संघटीका सुशिला पवार, भाजपाचे नेते दिलीप आंब्रे, संतोष चिकणे, संदीप पवार, गिता जगदाळे, माया पवार, स्वाती भालेकर आदींसह कोकणवासीय बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. 
    सत्काराला उत्तर देताना आ. गोगावले म्हणाले की, मी शिवसेनेचा आमदार आहे. माझा सत्कार कॉंग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेत्याच्या हस्ते भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत झाला आहे. हे कोकणवासीयांच्या ऐकीचे उदाहरण आहे. मला तिस-यांदा आमदार करण्यात कैलास कदम व पिंपरी चिंचवड मधील कोकणवासीयांचे मोठे योगदान आहे. उद्योग, व्यवसायासाठी जन्मभूमीपासून विस्थापित झाले तरी कोकणभूमीला विसरु नका. महाड - पोलादपूर - माणगाव या मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड किल्ला, शिवथरघळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे सत्याग्रह केला ते चवदाळ तळे हि ऐतिहासिक स्थळे आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणचा विकास करण्यात येईल. त्याचबरोबर पाणी, दळणवळण, रोजगार व सिंचन या प्रश्नांसाठी उद्यापासून सुरु होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरघोस निधी मिळेल असा आशावाद आ. गोगावले यांनी व्यक्त केला.
     डॉ. कैलास कदम म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात बहुउद्देशीय कोकण भवन उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कदम यांनी केले.
हिरकणी महिला संघाने पारंपारिक खेळ महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदी कुंकू हे कार्यक्रम आयोजित केले होते.
स्वागत गणेश मालूसरे, प्रास्ताविक रविंद्र भोसले आणि आभार अविनाश उत्तेकर यांनी मानले.
----------------

Friday 21 February 2020

सीएए विरोधात कायदा हातात घेणाऱयांवर कायदेशीर कारवाई करावी मिलिंद परांडे







Lok hitay news


सीएए विरोधात कायदा हातात घेणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी.....मिलिंद परांडे
शरद पवारांचा स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा डाव.....मिलिंद परांडे
बजरंग दलाची अखिल भारतीय बैठक शुक्रवारी, शनिवारी चिंचवडमध्ये
पिंपरी, पुणे (दि. 21 फेब्रुवारी 2020) ‘सीएएच्या’ विरोधामध्ये जे अनेक हिंसक आंदोलने देशभर सुरु आहेत. त्या पाठीमागे काही अल्पसंख्यांक तुष्टीकरण करणाऱ्या काही राजनीतिक दल, साम्यवादी दल व शक्‍ती, पीएफआय सारखे हिंसक मुस्लीम संघटन आणि मुस्लीम समाजाच्या एका मोठ्या गटाचा हात स्पष्टपणे दिसतो आहे. जे तथाकथित अहिंसक आंदोलने सुरु आहेत. उदा. दिल्ली, चेन्नई, मुंबई ई. त्यामध्ये ज्याप्रकारे देशविरोधी, हिंदुविरोधी घोषणा व भाषणे सुरु आहेत त्यावरून देशविरोधी शक्‍ती सुद्‌धा त्यांच्या पाठीशी आहेत का असे वाटते. अश्या सर्व प्रकारच्या हिंसक व देशविरोधी आंदोलनांची विश्‍व हिंदू परिषद निंदा करते व कायदा हातात घेणाऱ्या व तोडणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करते, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पिंपरी येथे केले.
      विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 21) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस विश्व हिंदू परिषद, पश्चिम प्रांत अध्यक्ष पांडूरंग राऊत, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे, विभाग मंत्री नितीन वाटकर आदी उपस्थित होते. यावेळी मिलिंद परांडे यांनी बजरंग दलाची अखिल भारतीय बैठक उद्या शनिवार व रविवारी (दि. 22,23 फेब्रुवारी) चिंचवड येथे आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा केली. विश्व हिंदू परिषदेने जे देशभर हितचिंतक अभियान केले आहे त्यामध्ये ३० लाखांपेक्षा 'अधिक आणि विशेषतः महाराष्ट्रात ३ लाखांपेक्षा अधिक हिंदू विश्व हिंदू परिषदेशी जुळले आहेत. आज शिक्षण, स्वास्थ्य, आर्थिक स्वावलंबन, कौशल विकास, महिला सशक्तीकरण इत्यादी क्षेत्रामध्ये १ लाखांपेक्षा अधिक सेवा कार्य सुरु आहेत. महाराष्ट्रात सुद्धा या सेवा कार्याची वाढ करण्याची योजना बनली आहे. कार्य वाढीच्या व आगामी कार्ययोजना बनविण्यच्या दृष्टीने दरवर्षी विश्व हिंदू परिषदेच्या विविध कार्यविभागांची (आयामांची) केंद्रीय बैठक आयोजित केली जाते. अशीच बैठक चिंचवडमध्ये होणार आहे.
       तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लखनौ येथे मशिदीसाठीच्या न्यास निर्माणाचा जो विषय अनावश्यक समोर आणला आहे. यावरून नवीन - नवीन विवादाचे मुद्दे निर्माण करून समाजातील तेढ जाणीवपूर्वक कशी वाढेल असाच स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरण यांचा डाव वाटतो. सुप्रीम कोर्टामध्ये श्रीराम जन्मभूमीच्या ऐतिहासिक सत्याची प्रतिस्थापना झाल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभर २५ मार्च २०२० वर्षप्रतीपदा ते ८ एप्रिल २०२० श्री हनुमान जयंतीपर्यंत भव्य रथायात्रांचे आयोजन करून किमान २ लाख स्थानांपर्यंत भव्य रामोत्सवाचे आयोजन करण्याचा निश्चय केला आहे. त्याचबरोबर "दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची पहिली व महत्वाची 'बैठक संपन्न झाली. प.पू. श्री नृत्यगोपालदासजी महाराज यांची विश्वस्त व न्यासाचे पहिले अध्यक्ष म्हणून तसेच श्री चंपतरायजी यांची विश्वस्त व महासचिव म्हणून व आपल्यां महाराष्ट्रातील प.पू. श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली. याबद्दल विश्व हिंदू परिषद आनंद व्यक्‍त करते. आंदोलनाच्या दरम्यान जे मंदिराचे प्रारूप बनले त्याच स्वरूपामध्ये व ज्या दगडांची घडाई मागील अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये सुरु आहे त्यांचा उपयोग करूनच श्रीराम जन्मभूमी मंदिराचे निर्माण व्हावे. ही हिंदू समाजाची अपेक्षा आहे. ती हा नवनिर्मित न्यास पूर्ण करेल हा विश्‍वास वाटतो. आर्थिक संबंधी व अन्य जे महत्वाचे निर्णय प्रथम बैठकीतच या नवनिर्मित न्यासाने घेतले आहेत. या गतिशील कृतीबद्दल न्यासाचे अभिनंदन. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे निर्माण लवकरच सुरु होईल असा विश्‍वास वाटतो, असेही विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पिंपरी येथे सांगितले.
--------------

Thursday 20 February 2020

गँस दरवाढीचा युवक राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने केंद्र सरकार च्या जाहीर निषेध

जाहिरातींचा खर्च अनुदानासाठी वापरा, गॅस दरवाढ मागे घ्या.....
Lok hitay news.
( प्र दिलीप देहाडे )
पिंपरी (दि. 20 फेब्रुवारी 2020) युपीए सरकारच्या काळात 410 रुपयांना मिळणा-या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत भाजप सरकारने दुप्पटीहून जास्त केली. महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक करणारी उज्ज्वला गॅस योजनेची हजारो कोटी रुपयांची जाहिरात केली. या जाहिरातीवर झालेला खर्च अनुदानासाठी वापरला असता तरी गॅस दरवाढ करण्याची गरज पडली नसती. देशभर उद्योग, व्यवसाय ठप्प झाले असून बेरोजगारीने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यात गॅस दरवाढ म्हणजे नागरिकांना महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करील. असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला.
        गुरुवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने गॅस दरवाढ विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व वाकडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी चुलीवर भाकरी बनवून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फजल शेख, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, राष्ट्रवादी श्रमिक कामगार संघटना (महिला) प्रदेश अध्यक्षा मीनाताई मोहिते, सामाजिक न्याय अध्यक्ष विनोद कांबळे, युवक उपाध्यक्ष अलोक गायकवाड, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष यतिन पारेख, रशिद सय्यद, अमोल पाटील, भागवत जवळकर, शादाब खान, निखिल दळवी, राजेंद्र थोरात, निलेश निकाळजे, प्रतिक साळुंखे, चंद्रकांत जाधव, सनी डहाळे, अकबर मुल्ला, बाळासाहेब पिल्लेवार, नाना धेंडे, संजय औसरमल, सुलेमान शेख, जहीर खान, अशोक भडकुंबे, चेतन फेंगसे, रमनजितसिंग कोहली, अक्षय माचरे, धनंजय जगताप, सरफराज शेख, विजय गायकवाड, सनी काळे, गोरोबा गुजर, सुनिल अडागळे आदी उपस्थित होते.
----------------------------

एम आय डी सी भोसरी पोलीस ठाणे पथकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचीजबरदस्त कामगिरी





दिनांक -२०/०२/२०२०...
LOK HITAY NEWS.
भोसरी पोलीस ठाणे तपास पथक पिपरी चिंचवड आयुक्तालय यांची कामगिरी
सराईत गुन्हेगाराकड्न ५ मोटरसायकल चोरीचे १ अॅटोरिक्षा चोरीचा व एक रॉबरीचा अर्ज
गुन्हे उघडकिस
कास पथकाचे अधिकारी व कर्मचारी एमआयडीसी
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणेकडील त
भोसरी पो.स्टे. हद्दीत मोबाईल स्नॅचिंग गुन्हयाचे
नशंगाने फिरत असतांना तपास पथकातील पोलीस
अळालेल्या बातमी वरुन एमआयडीसी भोसरी पोलीस
कर्मचारी विजय दौंडकर व नवनाथ पोटे यांना ।
जऊर्फ सुरज्या चंद्रकांत कु-हाडे, वय २१ वर्ष, रा.
स्टेशन अभिलेखावरील तडीपार गुन्हेगार सुरज 7
बालाजी नगर झोपडपट्टी भोसरी पूणे यास ताब्यात घन त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस
गु.जि.न.६३/२०२० महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई करून
केला असता,त्याने एमआयडीसी,फुलेनगर,शाहुनगर,नेहरुनगर,पिंपरी अशा
नेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरलेल्या पाच मोपड गाडया व एक अॅटोरिक्षा अॅप्पल मीन
सेल्यलर मनगटी वॉच व रोख रक्कम असा एकुण २,६०,०००/- मुद्देमाल हस्त करुन खालील प्रमाणे ८
गुन्हे उघउकिस आणले आहेत.
१) एमआयडिसी भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ३२/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे
२) एमआयडिसी भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ५६/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे
3) एमआयडिसी भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ६३/२०२० महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ प्रमाणे
४) एमआयडिसी भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ६७/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे
५) एमआयडिसी भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ६८/२०२० भादवि कलम ३९२ प्रमाणे
६) एमआयडिसी भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ७२/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे
७) पिंपरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं १०९/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे
पिंपरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ११३/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाण
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे मा.पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई साो,
मा.अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे सो, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ- १ स्मिता पाटील मॅडम,
मा.सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री राम जाधव साो यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस
निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सतीश नांदुरकर एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन
तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार रविंद्र तिटकारे,
पो.ना.भोर, पो.शि.नवनाथ पोटे, पो.शि.विजय दौंडकर, पो.शि.करन विश्वासे, पो.शि. आनल
जोशी,पो.शि अमोल निघोट यांनी केली आहे. पढील तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनचे
पोलीस उप-निरीक्षक रावसाहेब बांबळे हे करीत आहेत.

Wednesday 19 February 2020

गगनभरारी महीला संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

Lok hitay news
भोसरी.. प्र दिलीप देहाडे

दि  19 फेब्रुवारी 2020 , शिव जयंती निमित्त गगन भरारी महिला संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्ष सौ मेघा हणमंत पवार यांच्याकडून महिलांच्या टू व्हीलर रॅली च आयोजन करण्यात आले , गगन भरारी महिला विकास संस्था महिलांच्या सक्षमीकरण आणी सशक्ती कारणाच्या दृष्टीने नेहमी प्रयत्न शील असते , नवीन बचतगट तयार करणे , बचतगटांचे संघटन करणे , समजतील वंचित महिलांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग चालवणे , नैसर्गिक आपत्ती मधे मदत करणे , महिलांसाठी मोफत व्यावसायिक कार्यशाळा घेणे , मासिक पाळी आणी महिला व मुलींच्या सुरक्षे च्या दृष्टीने जनजागृती करण्याचे काम करत आहॆ . या वर्षी शिवजयंती च्या माध्यमातून एक शिवसंदेश समाजात द्यावा या दृष्टीने रॅली चे नियोजन केले , लांडेवाडी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शिवसंदेशाचे 1000 पत्रक लोकांमध्ये वाटण्यात आले . या शिवसंदेशामध्ये आज वाढत असलेल्या महिला व मुलींविषयी च्या चुकीच्या घटना आणी मुलांची बदलत चाललेली मानसिक वृत्ती या विषयी आता पालकांनी ,महिलांनी जागृत व्हावं तसेच ,शिवजयंती पुरते महिलांचा सन्मान करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे विचार कायम मनात रुजवावे व महिलांना सन्मानाने जगु द्यावं हा संदेश समाजात देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमची संस्था करत आहॆ ... आजच्या या शिवजयंती साठी महिलांनी हि चांगला प्रतिसाद दिला . , सौ ऋतुजा खोतकर , सौ धनश्री भामरे ,सौ उषा पवार , कु .पूजा चंडियल ,सौ मनीषा मलखंडे या संस्थेच्या पदाधिकारी महिला तसेच इतर सभासद महिला उपस्थित होत्या अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष सौ मेघा पवार यांनी दिली ..

Monday 17 February 2020

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं शिव शाही व्यापारी संघाकडून अभिवादन करण्यात आले

चिंचवड
Lok hitay news ...
१७/२/२०२०रोजी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य व पिंपरी-चिंचवड महानगर विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने  चिंचवड स्टेशन येथील *क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या अधाॕकृती पुतळ्यास मातंग समाज प्रबोधनकार लहुश्री आसाराम कसबे.यांच्या शुभ हस्ते पुष्पहार आपॕन करून आभिवादन करण्यात आले.*

यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महानगर विकास अघाडी सचिव तथा कायाॕध्यक्ष युवराज दाखले यांनी महापौर माई ढोरे यांना पुळ्याला पुष्पहार आपॕन करण्यासाठी येणारा आडथळा लोखंडी र्यांप तयार करून दुर करण्याची मागणी केली.या प्रसंगी असाराम कसबे,विलास उत्तम माने,संजय ससाने,विशाल कसबे,सरपंच संदिप जा
धव,सतिष भवाळ,आदी उपस्थित होते.

Saturday 15 February 2020

पिंपरी तिरंगी रॅली च्या सभेत धर्म निरपेक्षता ही संकल्पनाच रद्द करण्याचा कुटील डाव.... डॉक्टर.सुषमा अंधारे

भाजप सरकारने चहा बरोबर देशही विकायला काढला.....डॉ. सुषमा अंधारे
‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा कुटील डाव.....डॉ. सुषमा अंधारे.
//Lok hitay news. )
पिंपरी (दि. 14 फेब्रुवारी 2020) एनआरसी सर्व्हेला घरी येणा-या अधिका-यांना आपले कागदी पुरावे देण्याअगोदर त्यांना पुढील प्रश्न विचारा, तुमचे सरकार आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करणार होते, त्याचे काय झाले? मेक इन इंडियाचे काय झाले? देशाचा जीडीपी वाढणार होता त्याचे काय झाले? तुम्ही चहा विका पण एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी विकायचे ठरले नव्हते. पंतप्रधान मोदी - गृहमंत्री शहा तुम्ही तर चहा बरोबर देशही विकायला काढला आहे. तुमचा हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी तुम्ही सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) च्या कागदी घोड्यात नागरिकांना अडकवू पहात आहेत. देशाची ‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा आणि ‘संविधानात’ हवा तसा बदल करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने रचला आहे. हे हाणून पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन डॉ. सुषमा अंधारे यांनी केले.
       शुक्रवारी (दि. 14) सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) विरोधात संविधान बचाव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या सभेत डॉ. सुषमा अंधारे बोलत होत्या.
      तत्पुर्वी सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) विरोधात संविधान बचाव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निगडीतील भक्ती शक्ती चौकातून पुणे - मुंबई महामार्गाने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत हजारो नागरिकांनी तिरंगा रॅली काढली. या रॅलीचे डॉ. आंबेडकर पुतळा चौकात सभेत रुपांतर झाले. यावेळी उलेमा कौन्सिल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मौलाना फैज अहमद फैजी, कुलजमाती तंजीमचे मार्गदर्शक मौलाना अब्दुल गफार अशरफी, मौलाना नय्यर नूरी, मौलाना अलीम अन्सारी, हाजी गुलाम रसुल, एस. अझीम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच प्रताप गुरव, डॉ. सुरेश बेरी, धम्मराज साळवे, संतोष जोगदंड, ॲड. मनिषा महाजन, कॉ. गणेश दराडे, हाजी युसूफ कुरेशी, मौलाना अब्दुल गफार, कारी इक्बाल उस्मानी, मनोहर पद्मन, राम नलावडे, विशाल जाधव, कपील मोरे, संजय बनसोडे, चंद्रकांत यादव, गोकूळ बंगाळ, सुधीर मुरुडकर आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.
        डॉ. अंधारे म्हणाले की, मोदी - शहा हे महात्मा गांधी यांच्या भाषणांचे अशोक वाजपेयी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला देतात. पण ते अर्धवट सांगतात. त्यातील महात्मा गांधींची पुर्ण भाषणे त्यांनी जनतेला सांगावी. मत मागताना महात्मा गांधींचे दाखले देता आणि निवडणूक संपताच महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालता, हा तुमचा कसला राष्ट्रवाद. असा प्रश्न डॉ. अंधारे यांनी भाजपा सरकारला विचारला. सीएए, एनआरसी, एनपीआरचा त्रास अल्पसंख्यांक पेक्षा भटक्या जाती जमातीच्या लोकांना जास्त होणार आहे. दहा पंधरा वर्षापुर्वी ग्रामिण भागात अनेक महिलांची प्रसूती घरी होत होती. त्या महिला, ते कुटूंब जन्म नोंदणीचे दाखले कसे आणणार. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित केलेल्या भारतीय संविधानात कलम 14 प्रमाणे कोणत्याही भारतीय नागरिकाला जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, प्रांत याच्या आधारावर नागरिकत्व नाकारण्याची तरतूद नाही. 1955च्या नागरिकत्व कायद्यानुसार जी व्यक्ती त्या देशात जन्मली किंवा ज्या व्यक्तीचे वास्तव्य गेली 11 वर्षे भारतात आहे. अशा व्यक्तीला भारताचे नागरिकत्व देण्यात येते. यामध्ये धर्माच्या आधारावर कोणताही जातीभेद केला जात नाही. म्हणूनच भारत देश जगातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष देश आहे. देशाची ‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा आणि ‘संविधानात’ हवा तसा बदल करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने रचला आहे. हे हाणून पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे
असे आवाहन डॉ. सुषमा अंधारे यांनी केले.
   तुम्ही कितीही भडकविले तरी आम्ही अहिंसेनेच एनआरसी विरोधातला लढा लढू आणि आम्ही जिंकूच. सीएए, एनआरसी, एनपीआर साठी खर्च करण्यापेक्षा चांगल्या शिक्षण संस्था उभारा, शिक्षण आरोग्यासाठी जास्त निधीची तरतूद करा, सच्चर कमिशनची अंमलबाजवणी करा अशी मागणी डॉ. अंधारे यांनी यावेळी केली.
---------------------------------------
फोटो ओळ : शुक्रवारी (दि. 14) सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) विरोधात संविधान बचाव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या सभेत डॉ. सुषमा अंधारे बोलत होत्या.
-------------------

Friday 14 February 2020

पर्यावरण जनजागृती साठी कामगार इन्व्हायर्मेंट रन 2020मॅरेथॉन. पिंपरी चिंचवड शहरात

पर्यावरण जनजागृतीसाठी ‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ मॅरेथॉन.....भारती चव्हाण..
Lok hitay news
पिंपरी (दि. 14 फेब्रुवारी 2020) देशातील विविध राज्यातून व जिल्ह्यातून उद्योग, व्यवसायासाठी नागरिक पिंपरी चिंचवड मध्ये स्थायिक झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहर आता वेगाने मेट्रो सिटी म्हणून विकसित होत आहे. शहराचा सर्वांगिण विकास होत असताना पर्यावरणाबाबत देखील सर्व नागरिकांनी जागृत रहावे आणि हा संदेश कामगारांमार्फत देशभर पोहचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि गुणवंत कामगार कल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारी ‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ ही मॅरेथॉन 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      या उपक्रमात इंडस्ट्रिअल स्पोर्टस असोशिएशन, मानिनी फाऊंडेशन, प्रोजेक्ट 100 आणि बी द चेंज (Be the change), पिंपरी चिंचवड डॉक्टर स्पोर्टस फेडरेशन, ॲथलेटिक्स असोशिएशन ऑफ पिंपरी चिंचवड, कै. शंकर आण्णा गावडे प्रतिष्ठान, ब्लॅक कोब्रा कमांडो, पीसीएमसी डिवाईन एचआर लेडीज, विशेष पोलिस मित्र, फूल हेड्स बाईक ग्रुप आदी या संस्थांनी सहसंयोजक म्हणून सहभाग घेतला आहे.
     पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोशिएशनच्या मान्यतेने 15 मार्च 2020 रोजी सकाळी 7 वाजता मदनलाल धिंग्रा स्टेडियम, निगडी प्राधिकरण येथे होणा-या या ‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ मॅरेथॉनचे उद्‌घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, अमर साबळे, नागपूर विदयापीठाचे माजी कुलगूरु व ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. एस. एन. पठाण, सह्याद्रि देवराई संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे कामगार कल्याण आयुक्त महेंद्र तायडे आदी प्रमुख पाहुणे मान्यवरांना निमंत्रित करणार आहोत.
     पिंपरी येथे शुक्रवारी (दि. 14) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशनते डॉ. प्रमोद कुबडे, शेखर शंकर (अण्णा) गावडे, विशेष पोलीस मित्र संघटनेचे संदिप जाधव, मानिनी फाऊंडेशनच्या सुनिता शिंदे, ब्लॅक कोब्रा कमांडोचे सागर ढोबळे, पीसीएमसी डिवाईन एचआर लेडीज संस्थेच्या प्रिती साखरे, फूल हेडस बाईक ग्रुपचे अक्षय रसाळ, पिंपरी चिंचवड गुणवंत कामगार परिषदेचे अण्णा जोगदंड, कल्पना भाईंगडे, संजय गोळे, भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, काळूराम लांडगे आदी उपस्थित होते.
   ‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध आणि विशेष मुलांची दोन किलोमीटरची स्पर्धा होणार आहे व त्यांना मुक्त प्रवेश आहे. इतर गटात सहभागी होणा-या विद्यार्थी व महिलांना 50 रुपये व पुरुषांना 100 रुपये प्रवेश फी आहे.
   सहभागी गट मुले 12 वर्षाखालील अंतर 3 कि.मी., मुली 12 वर्षाखालील अंतर 2 कि.मी.; मुले 14 वर्षाखालील अंतर 4 कि.मी., मुली 14 वर्षाखालील अंतर 3 कि.मी.; मुले 20 वर्षाखालील अंतर 10 कि.मी., मुली 20 वर्षाखालील अंतर 4 कि.मी.; महिला खुला गट अंतर 2 कि.मी.; कामगार अंतर 5 कि.मी.; पुरुष खुला गट अंतर 10 कि.मी., जेष्ठ नागरिक पुरुष आणि महिला अंतर 2 की. मी. अशा एकूण 11 गटात स्पर्धा होतील.
         मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणा-या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि टी शर्ट देण्यात येईल. तसेच सर्व गटातील पहिल्या सहा विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे त्याचा बक्षिस वितरण समारंभ मॅरेथॉन संपल्यानंतर 10:30 वाजता मदनलाल धिंग्रा स्टेडियम, निगडी प्राधिकरण येथे होईल. यावेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या खेळाडूंचा देखील विशेष गौरव करण्यात येणार आहे. अशा प्रकारची मॅरेथॉन गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या वतीने येथून पुढे दरवर्षी करण्याचा संकल्प आहे.
सहभागी होऊ इच्छिणा-यांनी आपली नाव नोंदणी www.kamgarmarathon2020.com किंवा कामगार कल्याण केंद्र संभाजीनगर, उद्योगनगर, पिंपळे गुरव आणि संत तुकाराम नगर येथे दिनांक 5 मार्च 2020 पर्यंत करावी. आवश्यक असल्यास  सुमित शिंदे  8855883851, 7038036608 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क : भारती चव्हाण - 9763039999. (अध्यक्ष, गुणवंत कामगार कल्याण परिषद;माजी सदस्य, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई;माजी सदस्य, केंद्रीय कामगार कल्याण मंडळ नवी दिल्ली भारत सरकार).
.................

Thursday 13 February 2020

इंडूरो स्टुडन्ट इंडिया 2020राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचे वर्चस्व

‘इंडुरो स्टुडंट इंडिया 2020’ राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचे वर्चस्व....Lok hitay news..
पिंपरी, पुणे (दि. 13 फेब्रुवारी 2020) देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहन निर्मितीचा, चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. या उद्देशाने दरवर्षी स्प्लिट सेकंड इंजिनिअरींग ही संस्था इंडुरो स्टुडंट इंडिया ही राष्ट्रीय पातळीवरील एकमेव स्पर्धा आयोजित करते. या वर्षीची ही स्पर्धा तळेगाव दाभाडे येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) संघाने ‘ऑल टेरेन व्हेइकल’ प्रकारात ‘रेड बॅरन’ संघाने ‘इंजिनिअर डिझाईन’ या प्रकारात प्रथम क्रमांक, कॉस्ट प्रकारात प्रथम क्रमांक आणि इंडुरंन्स रेस प्रकारात दुसरा क्रमांक मिळवून स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. तसेच या संघाला सर्व साधारण गटातील उपविजेते पद आणि फास्टेस्ट लॅप गटातील विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.   
          ‘इंडुरो स्टुडंट इंडिया 2020’ राष्ट्रीय स्पर्धेतील पीसीसीओईचे हे दैदिप्यमान यश म्हणजे महाविद्यालयाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी विजेत्या संघाचा आणि संघाचे मार्गदर्शक प्रा. उम्मीद शेख, संघाचा कप्तान प्रतीक हुले, उपकप्तान सुप्रित पाटील, मंदार कदम यांचा गौरव करताना सांगितले.
पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे, पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
---------------------------------

Wednesday 12 February 2020

pimpri-bhosari मुख्य रस्त्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या साठी भिम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने राहुल वडमारे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहे

पिंपरी, दिनांक 12 फेब्रुवारी
LOK HITAY NEWS.
 भिम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने 11 फेब्रुवारी रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन चालू असून या आंदोलनाचे प्रमुख मागण्या पिंपरी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामागे बस स्टॅन्ड पिम्परी भोसरी  मुख्य रस्त्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब महापौर यांना लेखी निवेदन देऊन या नावाची विधिमंडळामध्ये ठराव मंजूर करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती प्रभागातील प्रतिनिधी त्यांच्याकडे देखील लेखी निवेदन सात जानेवारी रोजी देण्यात आले होते प्रभाग समिती मध्ये देखील हा विषय घेण्यात आला होता वारंवार पत्रव्यवहार करून देखील या विषयावर ते ठराव मंजूर होत नसेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यासाठी प्रशासन विभाग विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असेल असेही राहुल वाघमारे यांनी लेखी पत्रामध्ये म्हटले आहे आमचा संघर्ष नाव जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत चालूच असेल असेही राहुल वडमारे म्हणाले. आंदोलन करते भिम संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे सुरेंद्र जाधव आनंद साळवे उमेश वाघमारे नसरीन शेख मिलिंद तायडे विशाल सरोदे दीपक ढावरे हे सर्व पदाधिकारी आंदोलनात बसले आहे

Tuesday 11 February 2020

दिल्लीमध्ये विधानसभेत पुन्हा आम आदमी पार्टीची सत्ता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल च्या कामापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी झुकावे लागले

LOK HITAY NEWS

पिंपरी. दि. 11. फेब्रुवारी
आम आदमी पार्टी चा दिल्ली येथील ऐतिहासिक विजय आज पिंपरी चिंचवड मध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला
कार्यकर्त्यांनी
1. सामान्य माणसांना साखर वाटप केले व
2.   ढोल ताशा च्या गजरात bike रॅली काढून  आनंद साजरा केला.
हा विजय सामन्यांच्या विकास विरुद्ध भाजप चे ध्रुवीकरण असा असल्याचे मत आपचे शहर अध्यक्ष अनुप शर्मा यांनी व्यक्त केला.
या वेळी आप चे सचिव राघवेंद्र राव यांनी हा विजय पिंपरी चिंचवड मध्ये ही बदल घडवेल अशी आशा व्यक्त केली
या वेळी आपचे राज चकने, minority wing चे वहाब shaikh, महेश बिराजदार, सुजय शेठ, प्रज्ञेश शितोळे, सुशील अजमेरा, कपिल मोरे, आशुतोष शेळके, रणधीर नायडू उपस्थित होते

पुणे समाज कल्याण अपंग आयुक्त कार्यलय समोर बेमुदत प्राणांतिक आमरण उपोषण डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ यांच्यासह सर्व सहकारी

LOK HITAY NEWS

पुणे
प्र. दिलीप देहाडे..
*दिनांक- 11 /2 /2020*

               *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने पुणे समाज कल्याण अपंग कल्याण आयुक्त समोर आजपासून बेमुदत प्राणांतिक अमरण उपोषण सुरू*
           *महोद. साहेब उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येत आहे की गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने गेले अनेक दिवस खालील मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे*
*1)बीड जिल्ह्यातील स्थलांतरित हस्तांतरित सतरा अपंग शाळांची आर जानेवारीला सुनावणी घेतली त्यावर तात्काळ कार्यवाही करून शाळा बंद करून कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे*
*२)मुख्याध्यापक क्लार्क त्वरिता देवी निवासी मतिमंद विद्यालय बीड बायपास औरंगाबाद यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार सेवेतून बडतर्फ करून वसुली करून गुन्हे दाखल करावेत व दोषी समाजकल्याण अधिकाऱ्यावर कारवाई करावी*
*३)राजमाता सेवाभावी संस्था संचलित मतिमंद निवासी विद्यालय मांजरी (ह)पुणे या शाळेच्या गैरव्यवहार व रक्कम अपहारप्रकरणी उपायुक्त संजय कदम यांच्यावर गुन्हे दाखल करावे व या शाळेच्या सर्व कागदपत्रांची चौकशी तात्काळ करावी*
*४) अरुणा तुरुकमारे यांचे समायोजन तात्काळ काय करावे*
*५) उस्मानाबाद जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये काही उद्धवजी पाटील अस्थिव्यंग निवासी विद्यालय व इतर सहा अपंग शाळांची सुनावणी घेतली यात एक शाळा बंद केली बाकीच्या अजून चालूच आहेत  त्यांच्यावर कारवाई का नाही ?*
*६) सन 2012 ते आजपर्यंतच्या सर्व नूतनीकरण व एनओसी प्रमाणपत्राची चौकशी करावी*
*७) माननीय आयुक्तांनी एनओसी दिली नाही नूतनीकरण दिलं नाही मग दाखल प्रमाणपत्राच काय केलं ?*
*८) बॅग डिटेलमध्ये श्री ढगे यांनी दिलेली सर्व कागदपत्रांची चौकशी करा*
 *या व इतर अनेक मागण्यांसाठी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे या उपोषणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकासकामांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ, प्रशांत काटे,संजय वाव्हळ, पंडित सुतार,शाम पंडित, सुनील जोगदंड,रमेश थोरात दीपक काटे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत*

Monday 10 February 2020

म्हाळसाकांत विघालय माजी विध्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला

*माजी विद्यार्थी स्नेह मेळावा*
.//Lok hitay news... प्र. दिलीप देहाडे..
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री.म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी या शाळेच्या १९८४—८५ वर्षाच्या माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा ३५ वर्षांनी दि. ०९/०२/२०२० रोजी सकाळी  ९ ते ४ या वेळेत संपन्न झाला.
१० वी अ, ब, क मधून १७३ मुले मुली शिकत होत्या. १० वी उत्तीर्ण नंतर सर्व जण पुढील करिअर करिता बाहेर पडले ते पुन्हा ३५ वर्षांनीच भेटले. आज विविध क्षेत्रात ते उच्च पदावर कार्यरत आहेत. अॅड.उर्मिला काळभोर, आप्पा बागल, राजू दुर्गे, बाळासाहेब हिंदळकर नगरसेवक झाले. ८ वकील, काही डाॅक्टर, व्यवसायिक झाले.
प्रारंभी कै. बा. रा. घोलफसाहेब (संस्थापक), सावित्रीबाई फुले, देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन श्री.गोविंदराव काळभोर पाटिल यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे प्रा.जे.एम.डुंबरेसर (मा.प्राचार्य श्री म्हाळसाकांत विद्यालय) तसेच श्री. शेख सर उपस्थित होते.
वर्गशिक्षिक सेवानीवृती नंतर विद्यार्थ्यांना आशिर्वाद देणे करिता आवर्जून उपस्थित होते. सर्वश्री श्री. एस. के. ताकवले, श्री.भरगुडे, श्री.शितोळे, श्री.फुगे, श्री.कदम, सौ.ढमढेरे, सौ.पन्हाळे, डॉ.वंदना पिंपळे हे होय.
प्रास्ताविक गौतम जाधव यांनी केले.  प्रथम दिवंगत संस्था पदाधिकारी, दिवंगत अध्यापक, दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विद्यार्थी मनोगत राजू सुतार, भास्कर भोर यांनी केले.
या कार्यक्रमात मा.पर्यवेक्षक श्री.बी.एम.भसेसर, यांना "मानपत्र"  प्रदान केले. मानपत्र वाचन श्री आप्पा बागल यांनी केले.
सत्कारार्थी डॉ.वंदना पिंपळे, सौ.मंदा बारणे, भूषण ओझर्डे, संतोष मुंगसे, बाबा बागल हे विशेष होते.
अॅड.उर्मिला काळभोर यांनी शाळेबद्दल विस्तृत स्वरूपात माहिती देऊन उत्कृष्ट भाषण केले. राजू दुर्गे  यांनी आभार मानले.
परिश्रम घेणारे राजू सुतार, रानडे, सौ.किरण पाटील, अजय भोसले, प्रविण मोरे, मारूती साने, हमीद शेख, विश्वनाथ मठपती, भास्कर भोर, उदय जोशी, अजय अहिरेकर, मधुसूदन नेहरे, बाळासाहेब उदावंत होत.
 शिस्तप्रिय व संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे  जीवनाचे साध्य असावे असे मनोगत मा.जे. एम. डुंबरेसर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
माझ्या जीवनाचे सार्थक झाले मला विद्यार्थ्यांनी ३५ वर्षांनी निमंत्रित करून मला मानपत्र दिले यामुळे मी भारावून गेलो असे भावनिक शब्द मा.बी.एम.भसेसर यांनी व्यक्त केले.
सुत्रसंचालन आप्पा बागल, गौतम जाधव यांनी केले. त्यानंतर विद्यार्थी परिचय व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न  झाला.
कार्यक्रमाचे सुरवात राष्ट्रगीताने समारोप वंदे मातरम ने करण्यात आला.

हिंगणघाटमध्ये घटनेतील मारेकऱ्याला लोकांच्या ताब्यात द्या पीडितेच्या वडिलांची माग

हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, मारेकऱ्याला लोकांच्या ताब्यात देण्याची पीडितेच्या वडिलांची माग    //Lok hitay news.
हिंगणघाट 10 फेब्रुवारी : गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेली हिंगणघाटच्या पीडितेची झुंज अखेर आज संपली. सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. हे वृत्त हिंगणघाटमध्ये पोहोचताच लोकांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. प्राध्यापिका असलेली पीडिता उपचारानंतर बरी होई अशी लोकांना अपेक्षा होती. ज्या क्रुरपणे विकेश नगराळे या आरोपीने तिला जाळलं होतं त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप आता आणखी वाढला असून आरोपीला लोकांच्या स्वाधीन करा अशी मागणी पीडित प्राध्यापिकेच्या वडिलांनी केलीय

Sunday 9 February 2020

पिंपरी चिंचवड शहर शिव सेना एक दिवशीय माहित अधिकार कार्यशाळा

पिंपरी. दि. 9  फ्रे. शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित एक-दिवशीय माहिती अधिकार कार्यशाळा
Lok hitay news
प्र. दिलीप देहाडे.
माहितीचा अधिकार-२००५ या विषयावर सविस्तर चर्चा व प्रशिक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी एक दिवशीय माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण शिबिर* या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

आसनव्यवस्था मर्यादित असल्यामुळे सर्वाना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. पहिल्या बॅचमध्ये रजिस्ट्रेशन कन्फर्म झालेल्या निवडक ५० जणांने उपस्थित राहवून हि कार्यक्रमाचे पूर्ण पणे माहिती समजून घेतले.

या वेळी प्रमूख उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमूख गजानन चिंचवडे. महिला शहरसंघटिका उर्मिलाताई काळभोर. सुनिता चव्हाण. शिल्पा आनपण. कामिनी मेश्रा. प्रतिक्षा घुले. मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर. गोरख पाटील. नरसिंग माने. अक्षय घटकार. आदिक भोसले. संजय शिरसाठ. मारूती म्हस्के. दत्ता गिरी. विशाल चव्हाण. मूकेश चौकेकर. माऊली जाधव. गणेश पाडूळे. बाळासाहेब गायकवाड. आधी शिवसैनिक उपस्थित होते. 9 फेब्रुवारी. 

Saturday 8 February 2020

भारतीय बोद्ध महा सभा पिंपरी चिंचवड शहरशाखेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने. महामाता रमाई आंबेडकर यांची 122वी जयंती साजरी

दि. 7 फेब्रुवारी
//Lok hitay news
 भारतीय बौध्द महासभा पिंपरी चिचंवड शहर अंतर्गत  त्यागमूर्ती माता रमाई जयंती कार्याक्रम  दि.07 /02/ 2020 रोजी सायंकाळी 06.30 वाजता. स्थळः डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चौक  पुणे  कार्याक्रमाचे  अध्यक्ष आयुः बापुसाहेब गायकवाड (अध्यक्ष .पि.चिं.शहर ) आयुः राधाकांत कांबळे(महासचिव भा.बौ.महासभा पुणे जिल्हा )   धम्म प्रवचनः विषयः माता रमाई जिवनचरित्र  प्रवचनकारः संगीता ताई भंडारे (केंद्रीय शिक्षीका .समता सैनिक ) सुत्रसंचलन आयुः अशोक सरतापे स्वागत  आयुः मछिंद्र कदम  प्रमूख उपस्थितीः आजिज भाई शेख  आयुः अशोकजी यादव साहेब उपाध्यक्ष संस्कार.आयुः अशोक शिवशरण (सहकोषाध्यक्ष भा.रि.प .घरकुल शाखा पुणे ) आयुष्यतीःशामाताई  जाधव आयुष्यतीः अ़ंजनाताई  कांबळे(उपाध्यक्षा महिला पुणे जिल्हा )  आयुः शाहाजी गायकवाड आयुः माणिक निसर्गंध संंतोष जोगदंड आयुः फुलचंद  जोगदंड अनुसया कांबळे .शोभा गायकवाड.रमाताई गायकवाड सर्व वाॕर्ड शाखेतील सर्व पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक  बौध्दाचार्य पदाधिकारी उपासक उपासिका समता सैनिक या सर्वांनी बहुसंख्ययेने कार्याक्रमास उपस्थिती होते आयुः रामचंद्र आचलकर (कोषाआध्यक्ष पिं .चिंचवड शहर ) हे सर्वांचे आभार मानले

Friday 7 February 2020

रिपब्लिकन जनशक्ती चे प्रदेश अध्यक्ष शैलेश मोरे यांच्या हस्ते माता रमाई च्या पुतळ्याला पुष्प. माला अर्पण


  1. Lok hitay news      पुणे. दि. 8 फेब्रुवारी, Lok hitay news

प्र. दिलीप  देहाडे.
   त्यागमुर्ती महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती दिना निमित्त वाडिया कॉलेज समोरील पुर्णाकृती पुतळ्यास रिपब्लिकन जनशक्ती चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले.व अभिवादन सभेत महामाता रमाई यांच्या केलेल्या त्याग कार्या  बाबत विचार व्यक्त करुन अभिवादन केले.या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव बोले साहेब, युवा नेते गिरीष मुरलीधर जाधव, जेष्ठ नेते सुदामराव चाबूकस्वार, युवा नेते सचिन सुसगोहेर, धम्मानंद शिंदे रमाई स्मारकाचे समन्वय विठठलराव गायकवाड, तसेच चळवळीतील असंख्य कार्यकर्ते व माताभगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी चळवळीतील उपस्थित मान्यवरांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 122 वि जयंती पिंपरी येथे मोठ्या आनंदानी साजरी

Lok hitay news #त्यागमूर्ती_रमा_भीमराव_आंबेडकर_यांची_122_वी_जयंती_उत्साहात_साजरी.//Lok hitay live news
प्रतिनिधी.. दिलीप देहाडे..
 पिंपरी ( 7 फेब्रुवारी) : महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 122 वी जयंती पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन #धुराजी_शिंदे , संतोष जोगदंड , धम्मराज साळवे व सर्व समाज बांधव यांनी केले.
" सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
त्यागमूर्ती माता रमाई यांनी आपल्या आयुष्यात बाबासाहेबांच्या सावलीप्रमाणे त्याच्या पाठीशी उभी राहून त्यांना साथ दिली अतिशय कठीण व  खडतर प्रसंगी बाबासाहेबांना सावरून समाजाप्रती लढण्याची ऊर्जा निर्माण केली त्या जिद्दीच्या जोरावर भारताने बाबासाहेबांनी या संपूर्ण विश्वावर आपल्या प्रकांड ज्ञानाच्या आधारे  कार्य केले जगाला हेवा वाटावा अशा विद्वत्तेची  राज्यघटना या देशाला दिली यामागे सुद्धा रमाईचे खूप मोठे  योगदान बाबासाहेबाना होते बाबासाहेबांच्या पाठीमागे संसाराचा गाडा हाकताना रमा मातेने बाबासाहेबांना कधीही घरची उणीव भासू दिली नाही याच गोष्टीमुळे बाबासाहेब आज समाजाचा उद्धार करू शकले यासारखे अनेक प्रसंग या मातेने उभ्या आयुष्यात गेले झेलले आजच्या मातेची जयंती समाजातील महिला भगिनींनी व विशेषता तरुण मुलींनी या मातेचा आदर्श घ्यावा येणारी पिढी सुसंस्कृत बलशाली व संघर्षमय घडवावी असे प्रतिपादन मानव जी कांबळे " यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर , शरद जी जाधव,  ओबीसी कृती समितीचे आनंदा कुदळे, लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे, संतोष जोगदंड, एमआयएमच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अंजना  गायकवाड,  धर्मराज साळवे ,युवक काँग्रेसचे विशाल कसबे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नितीन घोलप ,वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील, राजू साळवे , कांचन जावळे ,अरुण मैराळे ,अनिल मखरे,मनोज गजभार , अशोक जावळे, सर्वहारा उत्कर्ष संघटनाचे प्रा.बी.बी. शिंदे, राजू धुरंधरे आदी कार्यकर्ते व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Thursday 6 February 2020


देशात पहिले रिक्षा स्टेशन पिंपरी चिंचवड मध्ये

देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्डचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन.
//Lok hitay news.
 ( महिला रिक्षाचालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन)

 महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न  आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने  निगडी  भक्ती-शक्ती येथील अण्णाभाऊ साठे स्मारक जवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराच्या  महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, नगरसेवक सचिन चिखले , उत्तम केंदळे , पंकज भालेकर, कमल घोलप, शर्मिला बाबर, पोर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक सुलभाताई उबाळे, तानाजी खाडे, उर्मिला काळभोर, घरकाम महिला सभा अध्यक्ष सौ आशा कांबळे ,संजय बोराडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत, आणि त्यांनी स्वतःचे रिक्षा स्टँड निर्माण केले आहे हे शहराच्या   दृष्टीने अभिमानाची बाब आहे,  रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल महिलांच्या रिक्षा स्टॅण्डवर वाचनालय,पानपोई  आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील असे यावेळी महापौर यांनी सांगितले,
*महाराष्ट्र रिक्षा पंचायती* आणि घरकाम महिला सभेच्या  यांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स, बॅच, परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या. यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षाचालक झाल्या असून, आता महिलाही रिक्षा चालवणार आहेत.
महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे, त्यांनाही हक्काचे रिक्षा स्टँड मिळावे यासाठी  *महिलांचे देशातील पहिले रिक्षा स्टँड*  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी  मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला, देशातील महिलांचे पहिले रिक्षा स्टँडचे उद्घाटन
*दिनांक ०६/०२/२०२० रोजी* निगडी अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ भक्ती-शक्ती ,या ठिकाणी करण्यात आले ,
रिक्षा स्टँड वरती सर्व महिलांनी  फेटे घालून अत्यंत उत्साह साजरा केला

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष : सरस्वती गुजलोर,
यमुना काटकर, विजयलक्ष्मी हडपद, जयश्री मोरे, जयश्री साळुंखे, संगीता कांबळे, आयशा सोळसे, अक्षता गावडे, सविता ओव्हाळ, रेखा ठेळके, कविता मैदाड, रूपाली तिकोने, दिपाली तिकोने, मीना रंधवे

एस बी. पाटील अर्की टेकट मध्ये पदवी प्रदान सोहळा उत्साहत संपन्न

पिंपरी
--Lok hitay news
कल्पकतेचा ध्यास, शिकण्याची इच्छा असणाराच उत्कृष्ठ रचनाकार.....महेश नामपूरकर
‘राहण्यायोग्य शहर’ मध्ये वरच्याक्रमांकासाठी पर्यावरणपूरक वास्तूंची गरज.....महेश नामपूरकर
एस.बी.पाटील आर्किटेक्ट मध्ये पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी/ पुणे (दि. 6 फेब्रुवारी 2020) नाविण्याचा आणि कल्पकतेचा ध्यास व कायम नवीन शिकण्याची इच्छा असणारी व्यक्तीच उत्कृष्ठ रचना उभारु शकते. प्रत्येक वेळी कलात्मक दृष्टीकोन ठेवला तर वेगळेपणा जपणारी वास्तू तयार होईल. मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी कल्पकतेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक वास्तू उभाराव्यात. अशा वास्तूंमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होईल तसेच ‘राहण्यायोग्य शहर’ या वर्गवारीत आपल्या शहराचा क्रमांक आणखी वरचा येईल. यासाठी वास्तूरचनाकारांनी काम करावे असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तूविशारद आणि सुमांशल वास्तूसंस्थेचे संचालक महेश नामपूरकर यांनी केले.
       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस.बी.पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयातील पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा आकुर्डीत बुधवारी (दि. 5) नामपूरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, पीसीईटीचे कुलसचिव प्रा. योगेश भावसार, प्रा. शिल्पा पाटील आदी उपस्थित होते. वास्तूविशारद परिक्षेत 43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 6 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वैदेही कड हिचा महाविद्यालयात प्रथम व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 9 वा क्रमांक आल्याबदल विशेष गौरव करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नामपूरकर यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
       नामपूरकर म्हणाले की, खंडप्राय भारत देशात उत्तरेत असणारे हवामान दक्षिणेत तसेच असेल असे नाही. हवामानातील बदल स्थानिक नागरिकांच्या गरजा, आर्थिक पुरवठा, वास्तू रचनेची गरज या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकीय नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक वास्तू उभारली पाहिजे. अशा वास्तूंचा देखभाल खर्च कमीत कमी असावा. चोहोबाजूंनी खेळती हवा, स्वच्छ सुर्यप्रकाश आवश्यक ठिकाणी सजावट, रंग - रंगोटी, हिरवळ याचा विचार करुन उभारलेली वास्तू सर्वांनाच प्रसन्नदायक वाटते. भारताची लोकसंख्या विचारात घेता कमी खर्चात जास्त सुखसोयी देणा-या निवासी वास्तूंची गरज आहे. वास्तूरचनाकारांनी त्या दृष्टीने संशोधन व प्रयत्न करावेत असे नामपूरकर म्हणाले.
           विश्वस्त भाईजान काझी यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, देशाच्या जीडीपीमध्ये अभियंत्यांचा लक्षणीय सहभाग असतो. कोणतीही रचना, वास्तू तयार करताना अभियांत्रिकीच्या अनेक शाखांचा एकमेकांशी संबंध येतो. 21 व्या शतकात अभियांत्रिकी एवढे इतर कोणतेही क्षेत्र वेगाने विकसित झालेले नाही. सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखदायी, आरामदायी, आरोग्य संपन्न होण्यासाठी अभियंत्यांनी आणखी संशोधन करायला हवे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अशा नव संशोधकांना नेहमीच पाठबळ देत आली आहे. प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन प्रा. अनघा लवाटे, प्रा. प्रियांका लोखंडे, आभार प्रा. शिल्पा पाटील यांनी मानले. तसेच दर वर्षी प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना फिरता चषक देण्यात येईल अशी घोषणा महेश नामपूरकर यांनी केली.
-------------------------
फोटो ओळ : एस.बी.पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयातील पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ ज्येष्ठ वास्तूविशारद महेश नामपूरकर यांच्या उपस्थित झाला. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
----------------------
--------------------