Tuesday 31 March 2020

कामगार संघटनांशी चर्चा केल्या नंतर महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी च्या वेतनात 60टक्के कपात शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्के वेतन,, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची माहिती

Lok hitay news




          मुंबई. लोक हिताय न्युज. , दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली  घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Monday 30 March 2020

केंद्राकडून 16हजार 654कोटीची थकबाकी 31मार्च पर्यंत मीळावी. उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी केंद्राने 25हजार कोटीचे विशेष पॅकेज घावे. अजित पवार

Lok hitay news.


मुंबई, (लोक हिताय न्युज )दि. 31 :- राज्यावर आलेलं ‘कोरोना’चं संकट, ‘टाळाबंदी’मुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्यउत्पन्नात सातत्याने होत आलेली घट या पार्श्वभूमीवर आगामी काळात ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकाने महाराष्ट्राला 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजममंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राकडून राज्याला येणे असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, ती 31 मार्चपर्यंत देण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत केंद्राकडून येणे असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी मिळावी तसेच ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. राज्याची आर्थिक स्थिती व राज्यासमोरील आव्हानांची माहिती त्या पत्रात दिली आहे. केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात तीन आठवड्यांची टाळाबंदी जाहीर केली आहे. या टाळाबंदीमुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असते. परंतु ‘कोरोना’ आणि टाळाबंदीमुळे राज्याचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्यातच केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे 1687 कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे 14 हजार 967 कोटी रुपये अशी एकूण 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत राज्याला मिळावी तसेच ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी  25 हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.             
  

राज्यातील 39.कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन 17.रुणांची नोंद. राज्यातील एकूण रुग्ण संख्या 220* आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांची माहिती

Lok hitay news.


मुंबई,(लोक हिताय न्युज)  दि. ३०: राज्यात कोरोनाचे आज १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे तर आज  २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले.  त्यामुळे सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका  ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते तर करोना बाधित असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.  त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता १० झाली आहे.
*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील* :-
मुंबई                                   ९२
पुणे ( शहर व ग्रामीण भाग )    ४३
सांगली                            २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३
नागपूर                               १६
यवतमाळ                            ४
अहमदनगर                           ५
सातारा, कोल्हापूर             २
औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक प्रत्येकी  १
इतर राज्य - गुजरात              १
*एकूण २२० त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू*
याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही.
राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.   १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई- १४, पुणे- ७, पिंपरी चिंचवड- ९, यवतमाळ- ३, अहमदनगर- १, नागपूर- ४, औरंगाबाद- १
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. 

ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची जिल्हा अधिकारी,, नवलकिशोर राम यांनी पाहणी केली

Lok hitay news.




            पुणे,(लोक हिताय न्युज. प्र. ) दिनांक 30- कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत  5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली. यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अजय चंदनवाले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. हरीश ताटिया, डॉ. मुरलीधर तांबे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

            जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्‍यात येत आहे. ससून हॉस्पीटलची नवीन इमारत अकरा मजली असून सहाव्‍या व नवव्‍या मजल्‍यावर रिफ्यूजी एरिया आहे.  इमारतीतील सर्वच मजल्‍यावर आयसोलेशन बेड्सची सोय करण्‍यात येणार आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍याकडे रुग्‍णालय व अतिदक्षता  विभागाचे व्‍यवस्‍थापन ही जबाबदारी देण्‍यात आली आहे. पहाणीनंतर अधिष्‍ठाता कक्षात बैठक घेण्‍यात आली. बैठकीत इमारतीच्‍या इतर अनुषंगिक बाबींच्‍या उपलब्‍धतेवर चर्चा करण्‍यात आली. संपूर्ण इमारतीच्‍या वातानुकुलीन यंत्रणेसाठी नवीन ट्रान्‍सफॉर्मर (जनित्र), जादा व्‍हेंटीलेटर, लॉकडाऊनमुळे उपलब्‍ध मनुष्‍यबळाच्‍या मदतीने गतीने काम करणे यावर चर्चा झाली. कोरोनाच्‍या मुकाबल्‍यासाठी शासनाचे सर्वच विभाग सक्षमपणे काम करत असून नवीन इमारतीत 700 हून अधिक बेड्स तयार करण्‍याचे आव्‍हान पूर्ण करु, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला.

Sunday 29 March 2020

कोरोना च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा.. उपमुख्यमंत्री. अजित पवार.

Lok hitay न्युज..





मुंबई,(लोक हिताय न्युज. प्र. ) दि. 29 मार्च :- राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात आज सात नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३ झाली आहे.  जनतेने घरातंच थांबून योग्य काळजी घेतल्यास, खरेदीची गर्दी टाळल्यास, विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचे पालन केल्यास आपण निश्चितपणे ‘कोरोना’ला रोखू शकतो. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले आहे.
सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 24 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यापाऱ्याने आजारी असताना मेरठपर्यंत रेल्वेप्रवास केल्याचे उघड झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांचाही आता शोध सुरु आहे, इतरांचा जीव धोक्यात घालणारा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, ‘कोरोना’संदर्भात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 मुंबई, नवीमुंबई, राज्यातील अनेक शहरांच्या बाजारपेठेत आजही खरेदीसाठी गर्दी होते आहे. यामुळे ‘कोरोना’संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मर्यादित ठेवायची असेल तर, राज्यातील प्रत्येकाने  ‘लॉकडाऊन’चे पालन करुन घरातंच थांबावे. खरेदीसाठी गर्दी करु नये. परराज्यातील मजूरांनी आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करुन जीव धोक्यात घालू नये. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
 ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात काम करत असलेले डॉक्टर, आरोग्य, पोलिस, महसूल, बँक कर्मचारी तसेच शासनाच्या विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले असून शासकीय यंत्रणा ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी तयार असल्याचा विश्वास राज्यातील जनतेला दिला आहे.  ‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हजार शासकीय व खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे उपचार केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी  दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाचं जनतेने पालन करावं. राज्य सरकार, केंद्र सरकार व देशातील जनता सर्व मिळून ‘कोरोना’च्या विरुद्धचा लढा आपण जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Saturday 28 March 2020

मजूर कामगारांनी स्थलांतर करू नये आरोग्य व जेवण निवास व्यवस्था शासन करणार.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Lok hitay news.


मुंबई,(लोक हिताय न्युज. प्र. ) दि. 28: 'करोना' प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. ठाकरे पुढे म्हणाले, मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण तसेच आहे त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर परिचारिका यांनी योगदान घ्यावे, विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर

Lok hitay news

(लोक हिताय न्युज. प्र. )
            पुणे, दिनांक 28- कोरोना हा विषाणू समाजाचा शत्रू असून त्‍याच्‍याविरुध्‍दच्‍या लढाईत शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे,  असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्‍हैसेकर यांनी केले.  विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्‍ह्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्‍णालये यांच्‍या प्रमुखांची बैठक आयोजि‍त करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, सहकार आयुक्‍त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ.सचिंद्र प्रताप सिंह, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्‍य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे मनपाचे आरोग्‍य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्‍यासह इतर तज्ञ, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

            प्रारंभी डॉ. म्‍हैसेकर यांनी खाजगी वैद्यकीय व्‍यावसायिकांकडे उपलब्‍ध असलेल्‍या सुविधांची माहिती घेतली. देशात कोरोना विषाणूचा उद्रेक होत असून त्‍याला वेळीच आळा घालण्‍यासाठी सोशल डिस्‍टन्सिंगप्रमाणेच वैद्यकीय उपचारांची गरज भासणार आहे. सुदैवाने परिस्थिती सध्‍या नियंत्रणात आहे. मात्र, भविष्‍यात विपरित परिस्थिती उद्भवली तर सर्वच यंत्रणांनी सज्‍ज असणे गरजेचे आहे, यासाठी साधनसामुग्रीसह इतर आवश्‍यक बाबींचा आढावा त्‍यांनी घेतला.

            विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्‍वीपमेंट), एन 95 मास्‍क तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्‍ध होण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. कोरोनाच्‍या रुग्‍णांवरील उपचारासाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करावी लागते त्‍यानुसार शासकीय तसेच खाजगी रुग्‍णालयात असलेल्‍या इंटेन्सि‍व्‍ह केअर यूनिट (आयसीयू), व्हेंटीलेटर याचीही त्‍यांनी माहिती घेवून आवश्‍यक ते प्रमाणे यंत्रणा सज्‍ज ठेवण्‍याच्‍या त्‍यांनी सूचना केल्‍या.


जमाव बंदी कायदा असतानादेखील पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये देशी व विदेशी दारू खुलेआम विक्री करणाऱ्यांना कोणाचा अभयने ,, सुरेश निकाळजे

. Lok hitay news..



पिंपरी. दि. 28.मार्च. (लोक हिताय न्युज. प्र. )

लॉकडाऊन असूनही पिंपरी-चिंचवडमध्ये देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यासह एमपीडीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करून या लोकांवर जरब बसविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आरपीआय शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना मेल केले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे, “कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी बिनधास्तपणे तसेच काही भागात चोरून लपून देशी आणि विदेशी दारूची विक्री सुरू आहे. पिंपरी कॅम्प, भाटनगर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, भोसरी, चिखली, निगडी, चिंचवड, तळेगाव याठिकाणच्या अनेक भागात देशी आणि विदेशी दारूची विक्री होत असल्याचे उघड गुपित आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार गंभीरपणे पावले टाकत असताना पिंपरी-चिंचवडमधील काही समाजकंटकांना त्याचे काहीही देणेघेणे नसल्यासारखे चित्र आहे. हे समाजकंटक देशी आणि विदेशी दारूची विक्री सुरू ठेवून एकप्रकारे कोरोचा विषाणूचा संसर्ग वाढविण्याचा धोका पत्करत आहेत, हेच दिसून येते. ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये देशी आणि विदेशी दारूची विक्री करणाऱ्या समाजकंटकांवर दारूबंदी कायद्यासह एमपीडीए कायद्यांतर्गत तातडीने कारवाई

Friday 27 March 2020

अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विर्दभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. एपीएल (केसरी)शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य. मिळणार. छगन भुजबळ

Lok hitay news..



मुंबई,(लोक हिताय न्युज. प्र. )दि. २७  :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमानसी ५ किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.


देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालवधीत राज्यातील जनतेला अन्न, धान्य मुबलक व सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध योजना आखल्या जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्याचा निणर्य घेण्यात आला असून  त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ प्रतिमानसी पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या दि.२४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उपरोक्त १४ जिल्ह्यांतील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना या योजनेद्वारे एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.  या निर्णयामुळे विदर्भ मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला.. उपमुख्यमंत्री अजित पवार

Lok hitay news.



            मुंबई दि. 27 :(लोक हिताय न्युज. प्र. ) प्रजापिता ब्राम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देण्याचे काम  संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
            प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून दादी जानकी यांनी भारतासह अनेक देशात कार्य केले. जगाला सुखी, समाधानी करण्यासाठी त्यांनी मानवतेचा मंत्र दिला. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी होते. स्वच्छ भारत मिशनच्या ब्रॅण्ड अँम्बँसिडर म्हणून त्यांनी काम केले. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेसह त्यांच्या अनुयायांचा मार्गदर्शक हरपला असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

कोरोना उपाययोनांसंदभार्त यशवंतराव चव्हाण स्मुती रुग्णालयाची विभागीय आयुक्त. डॉ दीपक म्हैसेकरयांनी केली पाहणी....

Lok hitay news..




पिंपरी.  (लोक हिताय न्युज. प्र. दिलीप देहाडे. )दि.२७: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त वैदयकीय अधीक्षक डॉ. पवन साळवे, सहयोगी प्राध्यापक डॉ. किशोर खिलारे, डॉ. प्रवीण सोनी तसेच कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयातील उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयातील तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

हाँटेल मधील पदार्थ घरपोच अंडी कोंबडी मटण. मासेविक्रीला परवानगी सुरक्षितता बाळगून आंबा द्राक्षे संत्री केळी कलिंगड फळविक्रीही मान्य... उपमुख्यमंत्री अजित पवार

Lok hitay news..


(लोक हिताय न्युज. प्र. )
मुंबई, दि. 27 :-  जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 
राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त  असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्री महोदयांनी केला आहे.

कोरोना आपत्ती व्यवस्थापनासाठी मेडिकल विघार्थी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग घा.. सोमनाथ लोहार

Lok hitay news. दि. 27. मार्च.
करमाळा:-कोरोना आपत्ती व्यवस्थापनासाठी दोन वर्षापुढील  मेडिकल विद्यार्थांना ट्रेंनिग द्या अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ अध्यक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतमधील आघाडीचे विद्यार्थी नेता सोमनाथ लोहार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,कोरोना व्हायरसच वाढते संक्रमण रोखण्यासाठी शासन  पॅरामेडिकल स्टाफ उभारत असून  या स्टाफमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षापुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेतले तर एक मजबूत पॅरामेडिकल टीम उभा करता येईल व लोकांना सुविधा पुरवणं,रुग्णांचा जीव वाचवणं  सोयीच होईल.याशिवाय गरज असेल तर सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी व इतर कार्यकर्त्यांना स्वयंसेवक म्हणून सामावून घेण्यात याव व  त्यांनाही आवश्यक ट्रेंनिग द्यावं असेही सदर निवेदनात म्हटले आहे.

Thursday 26 March 2020

नागरिकांचि गैरसोय होऊनये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकानें 24 तास उघडी ठेवणार.... मुख्यमंत्री. उध्द्वव ठाकरे

Lok hitay news.




लोक हिताय न्युज. प्र.
मुंबई दि 26: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली..
लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे , त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.

Wednesday 25 March 2020

सावधान जनतेच्या सेवेसाठी रात्रीन दिवस एक करून न्याय मिळवून देणारे पत्रकारस पि. चि .शहरात जयहिंद पेट्रोल पंपा वर पेट्रोल नाकरण्यात आले मुळे पंप चालक. व मालकावर गुन्हा दाखल करावी

Lok hitay news.




(लोक हिताय न्युज. प्र).दि. 25.मार्च  पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात पेट्रोल-डिझेल विक्रीसही बंदी करण्यात आली आहे. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

या बंदी अंतर्गत खाजगी दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांना पेट्रोल भरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे.



अत्यावश्यक सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रण, पञकार आणि निर्मूलन करणाऱ्या खासगी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू आणि सेवा संदर्भात कार्य करणाऱ्या खासगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणाऱ्या व्यक्तींना यामध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र,पिंपरी-चिंचवड येथील जयहिंद पेट्रोल पंप येथे पञकारांनाच पेट्रोल देण्यात येत नाही बाकी सर्व ठीकाणी पञकारांना पेट्रोल मिळते पण याच जागी हे जयहिंद पेट्रोल पंप वाले मनमानी का करत आहेत. याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची इन्सिडेंटकमांडर म्हणून नेमणूक... जिल्हाअधिकारी ... नवल किशोर राम

Lok hitay news.


लोक हिताय न्युज. प्र. दिलीप देहाडे..
  पुणे दि. 25 :  जिल्ह्यामध्ये  कोरोना विषाणूचा ( कोव्हीड 19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर (Incident Commander) म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.
  पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्याकडील आदेशान्वये जुन्नर व आंबेगाव क्षेत्राचे सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 9783802020, पुणे शहर व शिरुर क्षेत्राचे उप विभागीय अधिकारी संतोष देशमुख 8275006945, मावळ व मुळशी क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के 9922448080, खेड क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी संजय तेली 9405583799, हवेली क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर 9822873333, बारामती व इंदापूर क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे 8975524199, दौंड व पुरंदर क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड 9860258932, भोर व वेल्हे क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव 9850114447 या  सर्व उप विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या क्षेत्रासाठी इनसिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

21 दिवसांच्या लॉक डाऊन च्या काळातही जीवनावश्यक कि सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत राहील... डॉक्टर दीपक म्हैसेकर

Lok hitay news.

लोक हिताय न्युज. प्र.
पुणे,२४ -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा ' लॉक डाऊन' जाहीर केला असला तरी  या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार  असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
  जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम १४४ च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. २१ दिवसाच्या 'लॉक डाऊन'च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण दुकानात गर्दी करू नका.कोणीही घाबरू नये. सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी.  घराबाहेर पडू नये . कोरोनाविरोधात आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे , असे आवाहन त्यांनी केले आहे.
---------

देशातील पहिले दोन रुग्ण कोरोना मुक्त झाल्याबद आंनद. कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉकटर. कर्मचाऱ्यांचे आभार... अजित पवार

Lok hitay news






मुंबई.प्र. दि. 25 मार्च 2020.
देशातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद;
‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे आभार
--  उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 25 :- देशातील पहिले ‘कौरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कौरोना’मुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात ‘कौरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही  मानले आहेत.
राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल, असा विश्वास देतांनाच उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना खरेदीसाठी गर्दी करु नये, नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असं आवाहन केलं आहे.
अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलंच, परंतु जीवनावश्यक वस्तंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
अमेरिकेनं ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनं अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं  आहे.
######****


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे..

देशातील पहिले दोन रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याचा आनंद..
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व आभार
संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत
दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, पुरवठा यापुढेही कायम नियमित सुरु राहिल.
बाजारात खरेदीसाठी गर्दी करु नये. सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी करावी.
रस्त्यावर, बाजारात, दुकानात इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार, जादा दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करणार..
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या गंभीर.
नागरिकांनी गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी.
अमेरिकेत ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेण्यात आली.
महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होऊन, आवश्यक ती काळजी घ्यावी.

Tuesday 24 March 2020

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी दाखवलेली कामगिरी निश्चित कर्तव्य निष्ठतेची आहे.. विशाल जाधव

Lok hitay news..



दि. 24.मार्च. (लोक हिताय न्युज. प्र )
गेल्या ९ मार्च पासून ते आजपर्यंत कोरोना ने ऊच्छाद मांडला आहे.या प्रकरणी जनतेचे उत्तर दायीत्व म्हणुन वेळोवेळी शासनाने व महाराष्ट्र राज्याचे मुख्य पालक या नात्याने मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी दाखवलेली कामगिरी निश्चितच कर्तव्य निष्ठतेची आहे." समस्या गंभीर पण शासन खंबीर" त्यांच्या वाक्याने गर्भगळीत झालेल्या मनावर मायेची फुंकर आहे.सुरूवातीला कर्फ्यु व नंतर संचार बंदी सारखे उचललेलं दमदार पावूल आहे.केवळ या दोन घोषणांनी कोरोनाला आळा बसत आहे,सामान्य माणूस मरणापासुन वाचला जातोय.आणी त्यामुळेच व डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने १२ कोरोना बाधीत मुक्त झाले आहेत.आपल्या दुरदृष्टीच्या धोरणांचा हा परिपाक आहे.आपल्या पदाचा व जनतेच्या विश्वासाचा आपण निश्चीत आदर केला असे वाटते.
आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांनी वेळोवळी पुरवलेली माहीती व दिलेला दिलासा हा बुडत्याला  काडीचा आधार म्हणावेसे वाटते.आपल्या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता आमच्या याच देही याच डोळ्यांनी अनुभवतो आहोत.पोलिस प्रशासनाला तर अंतःकरणा पासून नतमस्तक आहोत. दळणवळणा बाबतीत राज्यबंदी पासुन जिल्हाबंदी , मुख्य शहर बंदी  धार्मिकस्थळाची बंदी सार्वजनिक ठिकाणाची बंदी ही कोरोनाला हद्दपारिची नोटीसच म्हणावी लागेल.हे सर्व आपले कर्तव्य जरी असले तरी आपण दाखवलेली तत्त्परता वाखाणण्याजोगी आहे.पोलिसांनी जप्त केलेले १५ कोटीचे मास्क हे विसरून चालणार नाही.आमच्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यंतर्गत केलेल्या उपाययोजना तर थक्क करणा-या आहेत.
एकुणच आपत्कालीन राज्यात करावयाच्या योजना व योजनांचा पाठपुरावा ही महाराष्ट्रातील जनता पाहात आहे.
वाईट याचेच वाटतेय की ९०% जनता आपल्या सुचनांचा पाठपुरावा करत आहेत.पण राहीलेल्या १०% चं काय ? हा खरच मोठा मरणप्रश्न आहे, समोर मरण दिसत असतांना विकलांग मनोवृत्तीच्या नागरिकांबाबत काळजी वाटते.
चांगल्या कामाचं कौतुक का व्हायला नको ,केवळ याच भावनेतून हे व्यक्त करतोय.याला राजकीय भावनेने  कृपा करून पाहु नये ही हात जोडून विनंती.सध्या पोलिस प्रशासनाला खुप त्रास होतो आहे, कुटुंबांपासुन दुर, आंघोळ, नाष्टा, जेवण, व शारीरिक विश्रांती अर्थात झोप या पासुन पुर्णतः वंचीत आहे,कर्तव्य बजावताना त्यांनाही "हायरिस्क" मधून जावे लागते आहे. तरीही ते जिवाची बाजी लावून लढत आहे.संविधानातील "'डायरेक्टव्ह प्रिन्सीपल आँफ स्टेट पाँलिसी ""
चा उपयोग आपणास जाणीव आहे असे वाटते.
महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आपण सर्वच अत्यंत कठिण परिस्थीतीतुन जात आहोत,यांचे भान ठेवा,अज्ञानापोटी मरणाला मिठी का मारावी? जिवन फार सुंदर आहे ते जगुन पहा.
घरीच थांबा व मरणापासून वाचा रे बाबांनो.अहमदनगर,ठाणे सोलापूर च्या भाजीबाजारात होणा-या  गर्दी बाबत मी बेचैन आहे.
शेवटी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन,  महानगरपालिकेचे आयुक्त तसेच या कामी मदत करणा-या स्वयंसेवी संस्था,व शासनाच्या आवाहनाला साथ देणारे सुज्ञ नागरिक
यांचे आभार मानन्या पेक्षा या सर्वांच्या ऋणात राहणे मला आवडेल

जनतेनं मूर्त्या च्या रांगेतून घरी बसा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जमावबंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे





.Lok hitay news.




दिनांक 24 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जमावबंदीचा कायदा राज्यात  लागू करण्यात आलेला आहे या कायदा लागू करण्याच्या मागे महाराष्ट्र राज्य सरकारातील काही धोरणे जनतेच्या हितासाठी आहेत जनतेला वारंवार कोरोना व्हयरस. आजारापासून अलिप्त राहण्यासाठी विविध संस्था काम  करीत असताना देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती नागरिक मोठया गर्दीने दिसत आहेत आणि आज आपण अशा आजाराचा सामना करत आहे तो कोरोना व्हायरस सारखे आजाराला कोणीही बळी ना पडू यासाठी महाराष्ट्र सरकारने ही धोरणे हाती घेतलेले आहे परंतु या सरकारची धोरणे जनते नापसंद करून रस्त्यावर ती मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून येत आहे या गर्दीचा धोका करोडो नागरिकांना वरती  शक्यता नाकरता येते नाही   या पासून  अलिप्त राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने हे कडक  पाऊल उचलले आहेत या 144 जमावबंदीचा कायद्याचा आपण स्वागत करून आपल्या घरामध्ये बसावे आणि सरकारला आपल्या काम करण्यासाठी आपण प्रयत्न करावे आपण निरोगी राहण्यासाठी आपण स्वतःला लांब राहून आपल्या परिवाराची  देखील काळजी घ्यावी आपण आपल्या स्वतःला व आपल्या घरातील कुटुंबाला आजाराचा आमंत्रण घेऊन येऊ नका असी  काळजी द्या.  सरकार अनेक सेवाभावी संस्था आणि राज्य सरकारच्या संस्था आपल्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहेत आपल्याला  ग्रजीच्या वस्तू असणाऱ्या जीवन जगण्यासाठी गरजो वस्तू असतात त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात भाजी मार्केट असेल कपडा मार्केट होलसेल मार्केट असेल अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावरती गर्दी करताना आढळून येत आहात कृपया करून या गर्दीला कसही  करून याकडे दक्षता घेण्यात यावी अन्यथा एकापासून हजारों हजारापासून करोड अशा  पसरणारा हा आजार आहे या आजाराला सरकार नियंत्रणात आणण्यासाठी हा उपयोग प्रयोग करीत  आहेत,,,,,, माननीय माय बाप हो.ही  तळतळीची आणि आग्रहाची विनंती आपणास करीत आहे,,,,,
लोक हिताय न्युज चॅनेल च्या वतीने 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏दिलीप  देहाडे... 

Monday 23 March 2020

मानव जीवनात जे लोक महत्प्रयासाने स्वकष्टातून आपले अस्तित्व निमार्ण करतात त्या मांदियाळीमध्ये माजी महापौर. हनुमंतराव भोसले यांचे नाव अभिमानाने घयावे लागले.. किशोर गवळी

.Lok hitay news



दि. 23.मार्च. (लोक हिताय न्युज. प्र. ) नेहरूनगर व पिंपरी-चिंचवड शहरात ते "आण्णा"
या आपुलकीच्या नावाने प्रचलित.
राजकीय कारकिर्दीच्या आगोदर भाकरीचा प्रश्न मिटविण्यासाठी त्यांनी दगडखाणीत काम केले,कंपनी कामगार म्हणून नशिब आजमाविले,नागरी प्रश्नांची जान असल्याने लोकआग्रहास्तव त्यांनी १९८६ ची सार्वत्रिक निवडणूक लढविली,त्यात ते विजयी झाले व उद्योगनगरीच्या प्रथम उपमहापौर पदावर विराजमान झाले,एका सर्वसामान्य कामगारांच्या प्रतिनिधीचा तो एक सर्वोच्च सन्मान होता,नंतरच्या काळात महापौर,विरोधी पक्षनेता,विधी समिती सदस्य या पदांवर काम करताना त्यांनी शहरवासियांसाठी काम केले,त्यांच्या महापौर पदाच्या काळात सुरू झालेला गणेश फेस्टिवल,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पायाभरणी,श्रीराम लागूंसारख्या विचारवंताचा महापालिकेत त्यांनी केलेला सन्मान,धनराज पिल्ले या हॉकी कर्णधाराचा शरद पवारांच्या हस्ते त्यांनी घडवून आणलेला नागरी सत्कार,हॉकी स्टेडियमची निर्मिती या गोष्टी शहरवासिय विसरू शकणार नाहीत.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भावतो तो आण्णांचा साधेपणा,त्यांच्याबरोबर फिरताना अनेक असे जेष्ठ भेटतात ज्यांनी आण्णांबरोबर काम केलेले असते, त्यांना आण्णा थेट नावाने हाक मारतात व आस्थेवाईकपणे त्यांची व त्यांच्या कुटूंबाची चौकशी करतात,काम करत असतानाच्या आठवणी काढतात.
नेहरूनगर साठी तर आण्णा कुटूंबप्रमुखच,कुणीही निमंत्रण दिल्यास छोटया-मोठया कार्यक्रमांना आण्णा जातीने हजर असतात,नेहरूनगर मधील प्रत्येकाला आण्णा आपल्या घरातीलच एक वाटतात,म्हणून अनेक दशके त्यांनी लोकांचे प्रतिनिधीत्व केले.
आण्णांकडे प्रत्येकाच्या शब्दाला महत्व असते आणि ते कुठल्याही परिस्थितीत तो शब्द पाळतात,मी व्यक्तीश: त्यांच्याकडे विठ्ठलनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दार कमानीची मागणी केली असता,त्यांनी नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या मार्फत पहिल्याच प्रभागसमिती मध्ये ठराव करून घेतला.
आण्णांचे व माझे वैयक्तिक संबंध अनेकवेळा चर्चेचा विषय झाला,काहींना ते रूचलेही नाहीत,पण आण्णा व माझी विश्वासाची नाळ भक्कम होती आणि आजही ती कायम आहे.
आण्णा सदैव सांगतात कि रक्तनात्यापेक्षा विश्वासाचे नाते मोठे असते,त्याप्रमाणे आमच्यात परस्पर विश्वासाचे नाते निर्माण झाले.
आपल्या यशाचे श्रेय बाबासाहेबांना देताना,"बाबासाहेब नसते तर हे यश मिळाले नसते,बाबासाहेबांमुळे मी महापौर झालो." असे ते जाहीर भाषणात सांगतात,बहुजन समाजासाठी कळकळ व्यक्त करतात,शिव-फुले-शाहू-आंबेडकर-आण्णाभाऊ यांच्या विचारांची ते कास धरतात,म्हणून बहुजन समाजात जन्माला येवून त्यांनी असामान्य यश मिळविले म्हणून सबंध बहुजन समाजासाठी आण्णा "बहुजनभूषण"ठरतात.
अशा या बहुजनभूषण,लोकनेत्याचा सर्वसामान्यांच्या आण्णांचा २४ मार्च रोजी वाढदिवस,या वाढदिनी आदरणीय आण्णांना मी वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा देतो.
                  

Sunday 22 March 2020

ऐतिहासिक माणगाव परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाले आहे त्यानिमित्ताने बी आर एस पी च्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रम कोरोना मुळे रद्द करण्यात आले

Lok hitay news..

कोल्हापूर.. (लोक हिताय न्युज. प्र. )
आज दिनांक २१ मार्च २०२० रोजी *ऐतिहासिक_माणगाव_परिषदेला १०० वर्षे पुर्ण झाले* त्या निम्मीत BRSP च्या वतीने आयोजीत भव्य कार्यक्रम करोना वायरस मुळे रद्द करण्यात आला.

आज या ऐतिहासिक दिनी कोल्हापुर, माणगाव येथे  *BRSP_चे_संस्थापक_अध्यक्ष_संविधान_तज्ञ_अॅड_डॉ_सुरेश_माने सर* यांनी कोल्हापुर BRSP कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत ऐतिहासिक अशा माणगाव ला *भेट दिली* त्याच बरोबर *विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर* आणी *अरक्षणाचे_जणक_राजश्री_शाहु_महाराज* यांच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात आले....... 

Saturday 21 March 2020

कोरोना हा मानवजातीच्या विरोधातला लढा सर्वांनी एकजुटीने हल्ला परतवून लावू.. डॉ दीपक म्हैसेकर

Lok hitay news


दि. 21.मार्च. (लोक हिताय न्युज. प्र. )
▪बाहेरच्या व्यक्ती व संघटनांनी आय.टी.कंपन्यांमध्ये जाऊन गोंधळ घालू नये,
अशा लोकांविरुध्द कडक कारवाई केली जाईल. प्रशासनाला सहकार्य करावे.
▪उद्या कोणीही घराबाहेर पडू नये. जनता 'कर्फ्यू'ला प्रतिसाद द्या.
▪बँक व 'एलआयसी'आस्थापना ५०% वर आणले जाईल.
▪खाजगी दवाखान्याची देखील मदत घेणार.
▪ग्रामीण भागातही अद्ययावत यंत्रणा उभी करण्यात येत आहे.
▪लोकांनी घाबरू नये.मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.

पुणे,दि.२१-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा मानवजातीच्या विरोधातला लढा आहे. आपण सर्वजण मिळून हा हल्ला परतवून लावू शकतो. मात्र प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. तथापि, काही खाजगी व्यक्ती व संघटना आय.टी.कंपन्यांमध्ये जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेव्हा कोणीही कायदा हातात घेऊ नये. त्यासाठी प्रशासन सक्षम असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
    दि.22 मार्च रोजी  'जनता कर्फ्यू' चे आवाहन केले आहे. यादिवशी आपत्कालीन यंत्रणा वगळता सर्वांनी घरामध्ये थांबून  प्रतिसाद द्यावा, असे सांगून ते म्हणाले, आज पुण्यात दोन जणांचे पॉझिटिव्ह  आले असून आतापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रुग्णांची संख्या 23 झाली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासन व प्रशासन विविध  उपाययोजना करीत आहे.
    ग्रामीण भागातही अद्ययावत यंत्रणा उभी करण्यात येत आहे. ब्लड बँकांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांनी वैद्यकीय तपासणी करुन घेऊन गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन रक्तदान करावे. प्रशासन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिका-यांची माहिती घेत असून आवश्यकता भासल्यास त्यांची सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
या विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरी थांबून तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. घरी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करुन घराबाहेर पडू नये. या सूचनांचे पालन न करणा-यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
   कोरोना विरुध्दचा हा लढा काळजीपूर्वक व जोमाने लढणे आवश्यक असून पुणेकर जनता यापुढेही प्रशासनाच्या सूचना पाळून निश्चितच सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी आय.टी. क्षेत्रातील उद्योग कमीत-कमी        कर्मचा-यांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे या आणखी कमी          कर्मचा-यांमध्ये काम सुरु ठेवून त्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्था कंपनी परिसरात उपलब्ध करुन दिल्यास येण्या-जाण्याच्या मार्गातील गर्दी टाळता येईल. एस.टी. बसेसच्या फे-या कमी करण्यात आल्या असून नागरिकांनी बसस्थानके व रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळावी.
   जिल्हाधिकारी राम यावेळी म्हणाले, बँक व एल.आय.सी. आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचा-यांमध्ये काम करण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येईल , यासाठी रुग्णालयातील खाटा व अतिदक्षता विभाग राखीव ठेवण्याच्या सूचना खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. सध्या प्रशासनाकडे व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागातील सुविधा, औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच या साधनसामुग्रीच्या खरेदीसाठी निधीची कमतरता पडणार नाही, याची दक्षता घेतली जात असून जिल्हा वाषिक योजनेच्या निधीतील ५ टक्के निधी यासाठी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी न करता दक्षता घ्यावी. क्वारंटाईन करण्यात आलेले व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

पि. चि. मनपा. नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी.. आर पि आय. नेते सुरेश निकाळजे

.Lok hitay news..


लोक हिताय न्युज. प्र. दि. 20. मार्च.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान हीरानंद उर्फ डब्बू  हिरानंद उर्फ डब्बू आसवानी नगरसेवक यांची नार्को टेस्ट करण्यात यावी- सुरेश निकाळजे,.,..,

 हीरानंद डब्बू असणे त्या नगरसेवकाने सदैव बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या युवक तरुणांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकून सातत्याने पोलिसाचे संपर्क ठेवून अनेक तरुणाशी वादग्रस्त ठरवून त्यांच्यावर ती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे षडयंत्र रचून डब्बा भवानी सदैव बहुजन समाजाच्या तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा निदर्शनात आलेले आहे टोळीयुद्ध वाद पेटवण्याचे काम देखील या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आसवानी टोळीचे हे करीत आहेत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात पासून रोखण्यासाठी योग्य चाचणी नार्को टेस्ट माध्यमातून करून करण्यात यावी अशी मागणी आरपीआयचे नेते पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन मा. युवराज दाखले शिव व्यापारी संघटने पत्र दिले आहेअसे सुरेश निकाळजे यांनी माहिती दिली आहे

Friday 20 March 2020

कोरोना च्या अनुष्णगिन साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिऱ्यांना.. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Lok hitay news..




* 'डिपीसी'तून ५ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना

* 'कोरोना' साठी आर्थिक निर्बंध शिथील
(लोक हिताय न्युज. प्र. )
पुणे, दि.२०: कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय चंदनवाले, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना ते म्हणाले, कोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. आपल्या देशाला संकट नवीन नाही, या संकटातूनही आपण बाहेर पडू, या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे सांगून ते म्हणाले, लग्न समारंभाबरोबरच अन्य कार्यक्रमांचे विधीही कमीत कमी  व्यक्तींमध्ये साजरे करावेत.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांसाठी तसेच साहित्य खरेदीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेतून 5 टक्के  निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत. तसेच या परिस्थितीत आवश्यक साहित्य खरेदीचे निर्बंध वित्त विभागाने शिथील केले आहेत. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत आहे. सद्यपरिस्थितीतील प्रादूर्भाव पाहता ३१ मार्च पर्यंत लागू असणारे हे आदेश पुढील आदेश होईपर्यंत सुरु राहतील. रुग्णसेवेत असणा-या डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडू नये, याचा विचार करुन पर्यायी डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीसांच्या मदतीला होमगार्ड उपलब्ध करुन दिले जातील.
या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा, वीज, पाणी पुरवठा होण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने केले असून अन्नधान्याचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णालयेही आवश्यक त्या सुविधेसह तयार आहेत. या परिस्थितीत आरोग्य सेवेबरोबरच अत्यावश्यक सुविधा पुरविणा-या कर्मचा-यांचे कौतुक करुन गर्दी टाळण्यासाठी २५ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु ठेवावीत, अशा सूचना प्रशासनाला केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना गतीने करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, असे त्यांनी सांगितले.

Wednesday 18 March 2020

पिंपरी. मनपातील एनयूएचएम कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने किमान वेतन मिळणार.... केशव घोळवे

Lok hitay news


कामगार नेते केशव घोळवे यांच्या पाठपुराव्याला यश, एनयूएचएमच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
पिंपरी.(लोक हिताय न्युज. प्र. ) (दि. 17 मार्च 2020) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत कर्मचा-यांना किमान वेतन दरानुसार पुर्वलक्षी प्रभावाने वेतन द्यावे, असे केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सतिश पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना पत्राव्दारे कळविले आहे. तसे आदेशाचे पत्र किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य व भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नगरसेवक केशव हनुमंत घोळवे यांनी मंगळवारी (दि. 17 मार्च) मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावेळी एनयूएचएम कामगार प्रतिनिधी अक्षय बाणेकर, सागर हानवते, प्रदीप मोहिते, रवी चौरे, उमेश रापार्ती, राहुल पावरा आदी उपस्थित होते.
     राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (National Urban Health Mission - NUHM) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांवर 140 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही, तर सरासरी मासिक सहा हजार ते दहा हजार रुपये एवढे तुटपूंजे मानधन देण्यात येत आहे. त्यामुळे त्या कर्मचा-यांची आर्थिक, कौटूंबिक, सामाजिक कुचंबणा होत होती. या कर्मचा-यांच्या वतीने मागील एक वर्षापासून किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य व भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नगरसेवक केशव हनुमंत घोळवे हे केंद्रीय श्रम मंत्रालयात पाठपुरावा करीत होते. याबाबत घोळवे यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांना प्रत्यक्ष भेटून एनयूएचएम कर्मचा-यांना किमान वेतन श्रेणी मिळावी व पुर्वलक्षी प्रभावाने फरक मिळावा या मागणीचे पत्र दिले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन, महाराष्ट्र राज्य श्रम व कामगार विभाग मंत्रालय, किमान वेतन सल्लागार मंडळ आणि केंद्रीय श्रम मंत्रालयाचे अधिकारी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर 14 मार्च 2020 रोजी केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांच्या आदेशाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सतिश पवार यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना आदेश दिले आहेत, तसे पत्र घोळवे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त हर्डीकर यांना दिले.
        या आदेशामुळे एनयूएचएम अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करणा-या सन 2019-20 च्या मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा नुसार वैद्यकिय अधिकारी पूर्णवेळ, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर लेखा व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक गुणवत्ता आश्वासक, स्टाफनर्स, एएनएम, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर तथा लेखापाल व मदतनीस या पदांवर 140 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सरासरी फक्त मासिक सहा हजार ते दहा हजार रुपये एवढे अल्प मानधन मिळत होते. आता नविन किमान वेतन दरानुसार पुर्वलक्षी प्रभावाने वेतन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना सरासरी 22,600 ते 25,900 रुपयांपर्यंत वेतन मिळेल. एनयूएचएम कर्मचा-यांचे मानधन सुसूत्रीकरणाची कार्यवाही सुरु आहे. सद्यस्थितीत या कर्मचा-यांना मिळणारे वेतन हे किमान वेतन कायद्यात नमुद पेक्षा कमी असल्यास सुसूत्रीकरणानुसार वेतन देण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत वेतनातील फरक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. अशी माहिती नगरसेवक केशव घोळवे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगारांनी त्यांना किमान वेतनाचा लाभ मिळावा यासाठी किंवा वेळेत व थकलेले वेतन मिळावे यासाठी किमान वेतन सल्लागार मंडळ सदस्य केशव हनुमंत घोळवे (फोन नं. 9881257925, 7887887951 किंवा ईमेल - keshavgholave78@gmail.com,)  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------

कोरोना विषाणू संर्दभात शहराचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राखण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे.महापौर माई ढोरे

.Lok hitay news




पिंपरी. दि. 18.मार्च. (लोक हिताय न्युज. प्र )
कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाधिक जलद प्रतिसाद पथके तात्काळ कार्यान्वित करा : महापौर माई उर्फ उषा ढोरे.
पिंपरी चिंचवड शहराचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाधिक जलद प्रतिसाद पथके तात्काळ कार्यान्वित करा, असा आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज दि.18 बुधवार रोजी महापालिका प्रशासनाला दिले. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा आणि यापुढे कोणत्या गोष्टींचे नियोजन करावे लागेल याबाबत सविस्तर चर्चा आज महापौर ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि संबंधित अधिका – यांशी केली . यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , विरोधी पक्षनेते नाना काटे , शिवसेना गटनेते राहूल कलाटे , मनसे गटनेते सचिन चिखले , अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे , नगरसेवक राजेंद्र गावडे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , अजित पवार , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . के अनिल रॉय , अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहरात नेमके कोणकोणत्या भागात सर्वेक्षण केले, निर्जतुकीकरण केले. फवारणी केली याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी घेतली. जलद प्रतिसाद पथकांचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या . सोसायटीमधील चेअरमन आणि इतर रहिवासी यांना विश्वासान घेऊन त्यांचीही मदत घ्यावी, असे त्या म्हणाल्या. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना सामुहीक प्रयत्नांची गरज असते त्यामुळे उत्तम समन्वय ठेवून प्रशासनाने प्रभावीपणे कामकाज करावे. कोणत्याही स्वरूपाची आर्थिक गरज पडल्यास आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही करून योग्य नियोजन करावे अशी सूचना आयुक्तांना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली. शहरात ज्याठिकाणी गर्दीचे कार्यक्रम होत आहेत ते तात्काळ बंद करण्यासंदर्भात प्रशासनाने पावले उचलावीत, होम वारंटाईन केलेल्या व्यक्ती तथा परिवाराला सोसायटीतील रहिवाश्यांनी सहकार्य करावे, अशा स्वरूपाचे पत्र महापालिकेने सोसायटी धारकांना द्यावे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण अतिदक्षता कक्ष कमी पडत असल्यास तात्काळ त्यांची उभारणी करावी अशा सूचना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केल्या . नागरिकांनी कोरोना विषाणू संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये तसेच घाबरून जाऊ नये , महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आरोग्य विषयका सूचनांची अंमलबजावणी करावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले

Tuesday 17 March 2020

कोरोना आपत्तीचा एकजुटीने सामना करूया विभागीय आयुक्त. डॉ दीपक म्हैसकर

*Lok hitay News


लोक हिताय न्युज. प्र.
पुणे दि.17: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सुक्ष्म नियोजन केले जात असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे आणि या आपत्तीचा एकजुटीने सामना करूया,असे  आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
         कोरोनाबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी  पिंपरी चिंचवडचे आयुक्त. श्रावण हर्डीकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
                       विभागीय  आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले,  ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे, त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी.  तसेच त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची  ओळख पटेल. बाधित प्रवाशी आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती विचारपूस करणा-या पथकाने तातडीने घ्यावी. तसेच परदेशातून प्रवास करुन आलेले व ज्यांना बाधा झाली, अशा प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाईल. उद्यापासून विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांना 24 तास देखरेखीखाली ठेवले जाणार असून त्यासाठी परिपूर्ण व्यवस्था काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
                शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना महानगरपालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले,  स्थानिक पातळीवर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये कोरोना आजाराविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी जागृती करावी. कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवेसाठी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत उपाययोजनासंदर्भात प्रत्येक अधिका-यांने समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक पथकाचे कामकाज व जबाबदा-या याबाबतचाही सविस्तर माहिती घेतली.
           पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वैजापूर येथील भीमराव गायकवाड हत्याकांडप्रकरणी पालक मंत्र्यांकडून गँभीर दखल 30 दिवसात चार्जशीट दाखल होणार.. सुभाष देसाई

LOK HITAY NEWS.
लोक हिताय न्युज. दि. 17.मार्च.
औरंगाबाद : मौजे लाख, वैजापूर येथील दलित समाजाचे भीमराव गायकवाड या अल्पवयीन तरुणाच्या हत्याकांड प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येत असून या प्रकरणी तीस दिवस किंवा त्यापूर्वीच चार्जशीट दाखल करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन राज्याचे ज्येष्ठ मंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री आमदार सुभाष देसाई यांनी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे यांना दिले आहे.

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून घडलेल्या या हत्याकांडाचा तीव्र निषेध रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने नोंदविण्यात आला असून याप्रकरणी पालकमंत्री यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी मुदतीत चार्जशीट दाखल करून सदर घटना द्रुतगती न्यायालयामार्फत चालवण्यात येणार असून यात विशेष सरकारी वकील म्हणून पुणे येथील एडवोकेट प्रताप परदेशी यांची नियुक्ती करण्याचे तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर पिढी कुटुंबियांना आर्थिक मदत आजच ताबडतोब देण्याच्या सूचना संबंधितांना केले असल्याचेही देसाई यांनी डंबाळे यांना सांगितले आहे.
दरम्यान राज्य सरकार अशा घटनांच्या बाबतीत अतिशय गंभीर असून या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व आवश्यक ती पाउले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Monday 16 March 2020

कोरोना विषाणूने महाराष्टात ज्येष्ठ नागरिक 64 वर्षाचा मुर्त्यू झाला आहे महाराष्ट्रातली पहिला बळी आहे

.Lok hitay news.


 मुंबई, दि. 17.मार्च.( लोक हिताय न्युज. प्र. )
कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पहिला बळी घेतला आहे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यात एका 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा आज मंगळवारी मृत्यू झाला आहे त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोरोना विषाणूने महाराष्ट्रात मोठ्या प्रमानात शिरकाव केला आहे  पुण्यामधे सात  तर पिंपरी चिंचवड मध्ये नव रुग्ण पॉझिटिव्ह आहेत  तरीदेखील पॉझिटिव्ह रुग्ण वरती उपचार सुरूच आहे उपचार दरम्यान मुंबईमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला व मुलाला देखील कोरोना विषाणूची  लागवड झालेले आढळून आली आहे त्या मुळे देशामध्ये मूर्त्याची संख्या  तीन  झाले आहे असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

अट्रोसिटी घटनेकडे हेतुतः.. दुर्लक्ष केले प्रकरणात पालक मंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावे,. राहुल ढमाळे

Lok hitay news.


लोक हिताय न्यूज. प्र. दि. 16. मार्च.
औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटनांकडे हेतुतः दुर्लक्ष करून अत्याचारग्रस्त दलित समाज बांधवांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळणे तसेच याप्रकरणी दलित समुदायाला दिलासादायक कोणतीही कृती न केल्याप्रकरणी राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री पदाचा वाढत्या जातिय अत्याचाराच्या घटनांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी भूमिका रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे पक्ष नेते राहुल डंबाळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वैजापूर येथे गायकवाड नावाच्या युवकाचा जातीय कारणातून झालेला निर्घुण खून व यापूर्वी सिल्लोड येथील घटना यामुळे जिल्ह्यातील जातीय अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला असून जिल्ह्यातील दलित जनता भयभीत व संतापलेली आहे.

सदर घटनांकडे गांभीर्याने बघून विशेष आढावा बैठक घेऊन अशा घटना घडू नयेत याबाबतचा ठोस कृती कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देणे सेच अत्याचारग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देणे व या प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबत आश्‍वस्त करणे या नैतिक जबाबदारी पासून पालकमंत्री दूर राहिले असल्याने औरंगाबाद सारख्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार यामुळे त्यांनी गमावलेला आहे असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान वैजापूर येथील हत्याकांडप्रकरणी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी चर्चा झाली असून ॲट्रॉसिटी घटनेतील तरतुदीनुसार एक महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करण्याची ची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली असून सदर घटनेत आपण व्यक्तिशः लक्ष घालत असून संपूर्ण तपास आपण बारकाईने करणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी राहुल डंबाळे यांना दिले आहे दरम्यान सततच्या घडणाऱ्या घटनांमुळे अहमदनगर ऐवजी औरंगाबाद जातीय अत्याचाराच्या घटनांची केंद्रबिंदू असणारा जिल्हा होणे हे कोणासही भूषणावह नाही व यास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करावी असा आग्रह डंबाळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे झाला आहे.

दरम्यान कोरोना वायरस वातावरण कमी झाल्यानंतर रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने तात्काळ तीव्र आंदोलनाचे आयोजन या विषयावर औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात येणार असल्याचेही डंबाळे यांनी जाहीर केले.

Sunday 15 March 2020

जिल्हा परिषद शाळा सरडे येथे सत्कार सभांरभ मोठ्या आनंदात केला साजरा..

Lok hitay news



लोक हिताय न्युज. प्र. दि. 15.मार्च
जिल्हा परिषद शाळा सरडे येथे  गोविंद मोरे- पत्रकार , संजय धायगुडे- सरपंच , सुखदेव बेलदार श्रीराम सहकारी कारखाणा सचांलक  यांचा सत्कार  करण्यात आला सत्कार उद्दीस्ट या सरडे शाळेचे सर्व विद्यार्थी आज प्रतेक क्षेत्रात चागंल्या ठिकाणी कार्यरत आहेत  क्रीडा,शैक्षणीक,सामाजीक,पत्रकारीता,अशा लोंकाना समाजकार्य करण्यास अजून प्रोस्साहन करण्याचा उद्दीस्ट शाळेचे शिक्षक आणि शाळा समिती कमिटी  करत आहे यातून लहान विद्यार्थी चांगले घडत आहेत आणि या पुढे  ही विद्यार्थी घडावेत  त्या वेळी या शाळेसाठी सरपंच  सजंय धायगुडे यांनी ९१३००रुपये  चौदा वित्त आयोग या मधून सरडे गावातील शाळेसाठी  चेक द्वारे फंड देण्यात आला  सरडे गावातील  जिल्हा परीषद शाळा ही चांगल्या दर्जाची करावी अशी येथील नागरीकांचे म्हणने आहे . सरडे गावातील सर्व जिल्हा परीषद शाळा ह्या चांगल्या दर्जाच्या करण्याचा निर्णय सुखदेव बेलदार  यांनी घेतला आहे  आणि गावामध्ये गरीब मुलासांठी  कोणत्याच शिक्षणाच्या अडचणी साठी  आपण सर्व मिळून त्या मुलांच्या अडचणी सोडवायचे आणि सरडे गावचे  विद्यार्थी चागंल्या प्रकारे घडवून देशा मध्ये सरडे गावचे नाव उज्वल झाले पाहीजे असे असे त्या वेळी बोलण्यात आले  या वेळी सरडे गावातील दिलीप मोरे मा . उपसरपंच, विरसींग बेलदार (मा )विधी न्याय सचिव मत्रांलय ,भानुदास शेंडगे, रामभाऊ शेंडगे, नितीन बनसोडे,ग्रामसेवक गाढवे आण्णा, सचिन शेंडगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,  मुख्याध्यापक भोजणे सर ,कृष्णा जाधव  ( गुरूजी ),बाळासाहेब भंडलकर, सलीम शेख सरडे शाळा शिक्षक स्टाफ व  सरडे गावातील ग्रामस्थं मोठ्या सख्येंने उपस्थित होते

Wednesday 11 March 2020

बसपा पुणेजिल्हा सचिव यांच्या गाडी व कार्यलायची तोडफोड. करणाऱ्या वर अट्रोसिटी गुन्हा. दाखल

.Lok hitay news..


लोक हिताय न्युज. प्र.
पुणे:बसपा कार्यलयात तोडफोड, दोघांना मारहाण. तिघांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल. गोदाऊनच्या बाहेरील कचरा न उचलल्याच्या रागातून बहुजन समाज पक्षाच्या कार्यलयात तोडफोड करून ऐकाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.या गुन्ह्यात तिघांना अट्रोसिटी गुन्ह्यात अटक करण्यात आली,सूरज बाबासाहेब पोकळे,प्रसाद रमेश पोकळे,रमेश उर्फ आबा दत्तात्रय पोकळे(रा.धायरी, पुणे.)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत अरुण नानाभाऊ गायकवाड(44,रा,लोणारे वस्ती धायरी)यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी गायकवाड हे शनिवारी अकरा वाजता त्यांच्या सिहंगड रोड येथील बसपा कार्यालयात बसलेले असताना.सुरज,रमेश,प्रसाद हे त्यांच्या पक्ष कार्यालयाजवळ आले.गायकवाड यांनी संशयित आरोपिकडून गोडाऊन भाड्याने घेतले आहे.या गोडाऊनच्या बाहेर पडलेला कचरा का उचलला नाही,या कारणावरून चिडून जाऊन तिघांनी फिर्यादी यांचा मुलगा सूरज गायकवाड याला बांबूने व लोखंडी रॉडने मारहाण केली.तो घाबरून घराच्या दिशने पळून गेला.त्यानंतर तिघांनी फिर्यादीच्या कार्यालयातील पार्टीशीन फोडून दहा हजारांचे नुकसान केले.तसेच फिर्यादी यांना डोक्यावर हातावर मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करून महापुरुषांबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tuesday 10 March 2020

शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतूक आघाडी चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी अनुप किसनराव बेले यांची निवड....

Lok hitay news *


लोक हिताय न्यूज. प्र. दि. 10.मार्च..
शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष मिथुनजी खोपडे यांच्या सुचनेने व शिवशाही वाहतुक आघाडी प्रदेश अध्यक्ष विनोद खांडेकर यांच्या आनुमोदनाने *शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतुक आघाडी चंद्रपुर जिल्हाअध्यक्षपदी आनुप किसनराव बेले यांच्या निवडीची घोषणा शिवशाही व्यापारी संघ इतर शिवशाही सल्लग्न आघाडी संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी हॉटेल जयराम पिंपरी-चिंचवड काळेवाडी येथुन केली.*

नवनियुक्त चंद्रपुर शिवशाही वाहतुक आघाडी जिल्हाअध्यक्ष अनुप बेले यांनी सवॕसामान्य जनता वाहतुकदार व माता भगिंनी यांच्या संरक्षणासाठी व प्रगतीसाठी कटिबद्द राहण्याच्या सुचना युवराज दाखले यांनी दिल्या.

यावेळी शिवशाही वाहतुक आघाडी प्रदेश अध्यक्ष विनोद खांडेकर ,शिवशाही कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष मिथुन खोपडे,रविकिरण घटकार,आशिष वाळके,माऊली जाधव,संजय ढोकोलिया,आदी प्रमुख कायॕकतेॕ  उपस्थितीत होते.

कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ 14जोडप्यांचा मोफत भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Lok hitay news
लोक हिताय न्युज. प्र.
पुणे (९ मार्च )  :  सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विष्णूआप्पा नारायण हरिहर आणि नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर यांच्या वतीने  मातोश्री कै. लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले .

खोट्या प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च करून विवाहसोहळा साजरा करण्याची एक चुकीची परंपरा समाजामध्ये रूढ होत चालली आहे. समाजामधून ही परंपरा हद्दपार करून समाजाला वेगळी दिशा आणि एक चांगला संदेश देण्याचे काम यावेळी मोफत सामुदायिक विवाहसोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले.

हा सोहळा वर्धमान सांस्कृतिक केंद्र आईमाता मंदिरापुढे, कोंढवा-गंगाधाम रोड, बिबवेवाडी येथे १० ते १२ हजार लोकांच्या उपस्थितीत ताटामाटात संपन्न झाला.

या विवाहसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूआप्पा हरिहर यांनी आपले BE Civil असलेले चिरंजीव राहुल हरिहर यांचा विवाह नुकताच अतिशय साधेपणाने साजरा करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या विवाहसोहळ्यासाठी अनावश्यक खर्च न करता त्याच पैशांमधून  या भव्य सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या विवाहसोहळ्यात सहभागी एकूण १४ जोडप्यांबरोबर चिरंजीव राहुल हे देखील आपली पत्नी सौभाग्यवती डॉ.सानिका हिच्यासमवेत सहभागी झाले. या विवाहसोहळ्यासाठी १४ नववधूंना मणीमंगळसूत्र, वधुवरांना भरजरी पोशाख, संपूर्ण यथोचित धार्मिक विधी आणि उपस्थितांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या विवाहसोहळ्याचा खर्च हरिहर परिवाराच्या वतीने केला गेला.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे,माजी आमदार योगेश टिळेकर,  माजी आमदार महादेव बाबर,भाजप महा. सरचिटणीस योगेश गोगावले, खादी ग्रामोद्योग संचालक विद्यासागर हिरमुखे, डीसीपी पौर्णिमा गायकवाड, नगरसेविका आरती कोंढरे,सम्राट थोरात,तेजेंद्र कोंढरे आदी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

Monday 9 March 2020


. Lok hitay news 


लोक हिताय न्युज. ता २४;- विवाह हा आयुष्याच्या प्रवासात एक प्रमुख व महत्त्वाचा टप्पा असतो.आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्या सोबत जन्मभराचे नाते जोडलेले असते.परंतु समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकांतील लोकांसाठी लग्न गाठ बांधणे हे वाटते तेवढे सोपे नसते.आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी हा विवाह सोहळा थाटात करताना, लहान सहान खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर ठरतात.अशा परिस्थितीत महागाईतही सर्वसामान्यांना आनंद मिळावा याभावनेने माजी नगरसेवक व अनुसूचित जाति मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष विष्णू (आप्पा) नारायण हरिहर यांनी 25 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे लक्ष्मीकांत हरिहर यांनी सांगितले.आज हॉटेल 360 डिग्री, महाराज रोड, डेक्कन येथे पत्रकार आयोजित परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मातोश्री कै. लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  मा.  विष्णू  नारायणराव हरिहर यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. राहुल विष्णू हरिहर यांचा शुभ विवाह सोहळा गुरुवारी दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी दु. 12 वा. सोमनरमन गौडा एन्क्लेव्ह, चंद्रमौळेश्वर सर्कल, रायचूर,कर्नाटक राज्य येथे होणार आहे. या शुभविवाहाचे औचित्य साधून स्वागत समांरभप्रसंगी रविवारी दि. 8 मार्च 2020 रोजी सायं 6 ते 10 वेळेत ‘वर्धमान सांस्कृतिक केंद्र’ आईमाता मंदिराजवळ, गंगाधाम रोड, मार्केटयार्ड पुणे 37 येथे भव्य दिव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना विष्णू हरीहर म्हणले,” माझा मुलासोबत इतर 25 मुलामुलींची लग्न थाटामाटात लावून दिली जाणार आहेत.त्यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहताना वेगळेच समाधान पाहायला मिळणार आहे. हे समाधान पैसा संपत्तीमध्ये मिळणार नाही. समाज सेवा करण्याचा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा मनोदय आहे. यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे मी माझे भाग्य समजतो. अशा पद्धतीचे विवाह सोहळे होण्याची आज समाजाला गरज निर्माण झाली आहे.मागील काही वर्षापासून महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लग्न सोहळा सारखा आनंद क्षण अनुभवता येणं कठीण झाला आहे ही गरज ओळखून या उपक्रमामध्ये थोडासा हातभार लावण्याचे ठरवले.
माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते (महा.राज्य )मा. ना. श्री देवेंद्र फडवणीस  व सोलापूरचे खासदार मा. श्री डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
लग्नावर कोट्यवधी रुपयांची उधळण न करता हरिहर परिवार त्यांच्या  घरातील मुलाच्या विवाहाचा समांरभ या सामुदायिक विवाह सोहळ्यात करत असल्याने समाजाला एक वेगळा आदर्श घालून देत आहे .

Sunday 8 March 2020

पद्मश्री पोपटराव पवार यांचा सोमवार दिनांक 9 मार्च रोजी चिंचवड मध्ये जाहीर सत्कार

.
Lok hitay news



पद्मश्री पोपटराव पवार यांचा आज सोमवारी (दि. 9 मार्च) चिंचवड मध्ये जाहिर सत्कार..(लोक हिताय न्युज.. प्र. )
राज्य सरकारच्या आदर्श ग्राम उपक्रमाचे कार्यकारी संचालक हिवरे गावचे सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्थळ, वेळ, दिनांक - अडोर वेल्डिंग लि. चिंचवड प्लांट, सर्व्हे नं. 147/2बी+3, खंडोबा मंदीरा जवळ आकुर्डी चौक, चिंचवड पुणे -19, आज सोमवारी (दि. 9 मार्च) सकाळी 11 वाजता. कार्यक्रमाचे आयोजक अडोर वेल्डिंग लि. सीएसआर कमिटी, अध्यक्ष सतिश भट (व्यवस्थापकीय संचालक, अडोर वेल्डिंग लि.), प्रमुख पाहुणे नगरसेवक प्रमोद कुटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभूणे, प्रिती दिपक वैद्य, अमोल पाटील, मोहन कांडीकर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी कृपया यावेळी आपले प्रतिनिधी, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर पाठवून सहकार्य करावे हि विनंती. सोबत निमंत्रण पत्रिका जोडली आहे.
----------------------------

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड चे जनसंपर्क कार्यालयाचे आकुर्डी निगडी प्राधिकरण येते उदघाटन करण्यात आले Lok

.Lok hitay news

(लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे. )दि. 7 मार्च रोजी  नवीन जनसंपर्क कार्यालयाचे आकुर्डी, निगडी प्राधिकरण येते उदघाटन करण्यात आले. आप महाराष्ट्र अध्यक्ष श्री रंगा राचुरे या वेळी उपस्थित होते व  त्यांच्या हस्ते हे उदघाटन झाले.
त्याचबरोबर आम आदमी पार्टी ने राष्ट्रीय  जनसंपर्क अभियानाअंतर्गत  missed call campaign सुरू केले आहे त्याचे ही पिंपरी चिंचवड मध्ये नंबर जाहीर करून सुरवात करण्यात आली. तो नंबर आहे 9871010101. पिंपरी चिंचवड च्या सर्व नागरिकांना या नंबर वर मिस्ड कॉल देऊन पक्षाशी जोडून घेण्याचे आव्हान यावेळी आप युवा अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले.
त्याच बरोबर या वेळी K T बारापन्ना , माजी सहाय्यक आयुक्त  GST यांनी व इतर अनेक नागरिकांनी पक्षात प्रवेश केला .
त्याच बरोबर या वेळी पक्षविस्तार अंतर्गत पक्षाचे काही नवीन पदनियुक्त्या करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे
श्री राज चाकने, अध्यक्ष , पिंपरी चिंचवड युवा आघाडी
श्री रितेश भामरे, सचिव , पिंपरी चिंचवड युवा आघाडी
धैर्यशील लोखंडे , कोषाध्यक्ष , पिंपरी चिंचवड युवा आघाडी

या वेळेला मार्गदर्शन करताना आपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रंगा राचुरे यांनी सांगितले की सामान्य जनतेच्या सर्व समस्यांचे मूळ हे राजकारणात आहे. ग्रामीण भागात शाळांची बिकट अवस्था असो किंवा पाण्याचा प्रश्न असो हे राजकरण सुधारल्यावर  सहज सुटतात हे दिल्लीत आपच्या सरकार ने दाखवून दिले आहे . कार्यकर्त्यांनी हे प्रश्न महाराष्ट्रात सोडवण्यासाठी पक्ष सत्तेत आलाच पाहिजे या जिद्दीने कुठला ही संकोच ना बाळगता काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राचे आपचे युवा आघाडी अध्यक्ष यांनी येऊ घातलेल्या औरंगाबाद पालिका निवडणुकीत आप पूर्ण ताकदीने उतरत असल्याचे सांगितले. आप तेथे सर्व जागा लढवत आहे व लोकांचा ही चांगला प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी सांगितले.  या वेळी बोलताना आप चे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी आप पिंपरी चिंचवड मध्ये टक्केवारीचे राजकारण नक्की मोडून काढेल अशी आशा व्यक्त केली. या वेळी आपचे पुणे जिल्हा संघटन मंत्री अभिजित मोरे व युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संदीप सोनवणे यांनी दिल्ली सरकारच्या कामापासून प्रेरणा घेऊन इथे पक्ष विस्तार कसा करता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.
या वेळी आलेल्या शहरातील अनेक मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.
यावेळी आपचे पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष अनुप शर्मा,  महिला अध्यक्ष स्मिता पवार, पुणे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष वहाब शेख व
पिंपरी चिंचवड चे अल्पसंख्याक अध्यक्ष यशवंत कांबळे  व पुणे आणि पिंपरी चिंचवड चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.